मिपावर "ग्रामीण" विभाग

विशुमित's picture
विशुमित in काथ्याकूट
18 May 2018 - 11:06 am
गाभा: 

https://www.misalpav.com/node/42631
अशा ग्रामीण बाज असणाऱ्या कथांना/धाग्यांना भरभरून मिळणाऱ्या प्रतिसादावरून एक प्रस्ताव मांडू इच्छितो की मिपावर "ग्रामीण विभाग" देखील चालू झाला पाहिजे. देशविदेशातील आपल्या बांधवांना मुरलेल्या लोणच्याचा आस्वाद तरी घेता येईल.
--
वेगळी ओळख कशासाठी याबद्दल मतमतांतरं असू शकतात.
तुम्हाला काय वाटते मंडळी ?

प्रतिक्रिया

राही's picture

18 May 2018 - 7:01 pm | राही

मला आवडेल. मात्र मेन बोर्डवर यातले लिखाण सध्याप्रमाणेच प्रतिसादांच्या तारीखवेळेनुसार दिसत राहायला हवे.
या निमित्ताने आणखी एक सूचना की मिपा उघडतानाची ' मिपाशिफारस' ही पायरी काढून टाकावी. नव्या लेखनापर्यंत थेट पोचता यावे.

मिपा उघडतानाची ' मिपाशिफारस' ही पायरी काढून टाकावी. नव्या लेखनापर्यंत थेट पोचता यावे. >>+१

मित्रहो's picture

21 May 2018 - 2:52 pm | मित्रहो

मिपा उघडतानाची ' मिपाशिफारस' ही पायरी काढून टाकावी >> +1 शिफारस असली तरी ती बाजूला कोपऱ्यात असावी अशी सर्वात वर नको.

जेम्स वांड's picture

18 May 2018 - 7:25 pm | जेम्स वांड

विचार भारी हे, कराय हरकत नाय, पर आपन कसं चावडी लेव्हलची मानसं. नाय म्हंजी आपली ग्रामपंचायत आपन हुलुच नेट लावून. पर हे जिल्हा लेव्हल मॅटर हाय, आपुन कलेक्टर सायबाला दिऊया एक निवेदन समदी, पर आपल्या चावडीचं पैलं काम दिसाय हवं, तूर्तास प्रस्ताव तयार करून धाडू म्हंतु मी फुडं बघाय यील, कसं?

बाकी चावडीकर काय म्हणत्यात त्ये बी बगाय हवं आपन काय चार लोकांभैर नाई!

मला वाटतं की अशा प्रकारचा 'शहरी-ग्रामीण' भेद नको मिपावर. सध्या आहे ते वर्गीकरण व्यवस्थित आणि पुरेसं वाटतं. 'जनातलं-मनातलं' मध्ये ललित इत्यादी प्रकारचे लेखन करता येतं. त्यात शहरी, ग्रामीण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, गोवा वगैरे सगळंच बसतंय व्यवस्थित. कारण काय होईल की 'सारस्वत', 'बिगर-सारस्वत' असली विचित्र लेबलं लेखकांच्या नावपुढं लावतील लोक. कशाला असलं काही? नको तो भेद आणि नको तो वाद.

विरोधी मत मांडतो आहे. क्षमस्व. व्यक्तिगत न घेणे.

टवाळ कार्टा's picture

18 May 2018 - 7:55 pm | टवाळ कार्टा

मम

मला वाटतं की अशा प्रकारचा 'शहरी-ग्रामीण' भेद नको मिपावर.
येप्प...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mersalaayitten... :- I [ A.R. Rahman | Vikram, Amy Jackson | Shankar ]

जेम्स वांड's picture

18 May 2018 - 8:20 pm | जेम्स वांड

बरोबर वाटतोय,

मरू दे च्यायला आपण अदुगर एक एक चिमूट गाय छाप लावूयात मग बोलूयात :D

अनुप ढेरे's picture

19 May 2018 - 9:55 am | अनुप ढेरे

अगदी सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2018 - 12:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विषय संपला.

-दिलीप बिरुटे

अभ्या..'s picture

21 May 2018 - 2:44 pm | अभ्या..

असे पटकन शिक्के नाहि मारायचे ब्वा.
होऊ द्या ना चर्चा.
बिघडले काय ग्रामीण बोलीचा विभाग असला तर. त्या विभागात एखादी राजकारणाची चर्चा ग्रामीण भाषेत चालेल. ग्राम्य असले तरी काय झाले, काही नवीन शब्दांची, वाक्यप्रचारांची ओळख होईल. गावाकडच्या चार गोष्टी समजतील. चुलीवरच्या चार पाककृतींची ओळख होईल. कधी वर्‍हाडी भाषेत ललित येईल, कधी कोल्हापूर सांगली सातार्‍याच्या बोलीत काथ्याकूट रंगेल. मराठवाडी 'च्या मायची कटकट' म्हणीत साखर कारखाने मराठवड्यात पायजेत का नको ह्याच्यावर भांडू. उदगीरकरासारखा एखांदा "ट्रॅक्टर वाल्यात कुमार सानू इतका फेमस का" ह्याच्यावर लिहिल. एखादा संकेतानंद अहिराणी भाषेत कविता सादर करील. आन्ना आप्पा करीत आम्ही बी आमच्या मातीतले चार वल्ली आजून पेश करु. नुसते पुणे मुंबई सोडून छोट्या शहरात, गावात लै मराठी बाकी आहे की. नुसतंच पिझ्झा बर्गर करीत, शेअर्स, फ्लॅटचे रेट आणि लेटेस्ट कारच्या मॉडेलवर चर्चा करण्यापेक्षा हे करु. काय बिघडलं?
काय म्हणताव सर मग?

बिटाकाका's picture

21 May 2018 - 8:32 pm | बिटाकाका

त्येंचं बी पटतंय आन तुमचंबी! काय उमजंना बगा!!
-----------------
"ग्रामीण" नावामुळं गडबड होत आसंल तर गावाकडचं वारं नायतर गावची माती आसलं कायतर म्हणा, कसं?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2018 - 10:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर असे वेगवेगळे कप्पे नकोच नको असं माझं १८५७ पासून मत आहे. ही मिसळ आहे, सरमिसळ. एकाच गोष्टीत सर्व. मिसळपाव उघडलं की विविध विषयांची सर्व सरळमिसळ दिसेल.

आज ग्रामीण विभाग सुरु झाला की उद्या शहरी विभागाची मागणी येईल. परवा आदिवासी विभाग, तेरवा जनवादी विभाग, चौदाव्या दिवशी अभिजनवादी, पंधराव्या दिवशी स्त्रीवादी, सोळाव्या दिवशी दलित विभाग सुरु करु द्या म्हणतील. सतराव्या दिवशी स्वतंत्र मराठा विभाग सुरु करु द्या म्हणतील. अठराव्या दिवशी ब्राह्मणांसाठी वेगळ्या विभागाची मागणी येईल. मुख्य बोर्डावर खूप शिवाशिवी चालते म्हणतील. एकोणीसाव्या दिवशी आम्हाला प्लीज कोकणी विभाग सुरु करुन द्या म्हणतील, आम्ही तिकडे कोंकणी बोलू. विसाव्या दिवशी आम्हा प्रमाणबोली बोलणार्‍यांसाठी एक विभाग सुरु करा प्लीज अशी मागणी येईल. मिपावर खुप अशुद्ध लिहितात लोक. असं झालं आहे, इथलं अशुद्ध लेखन पाहुन बजबजपुरी नावाचं शुद्ध मराठी लेखन करणार्‍यांसाठी एक संकेतस्थळ सुरु झालं होतं. डांगी बोलीसाठी वेगळा विभागाची मागणी येईल. अहिराणी बोलीसाठी एक वेगळा विभाग सुरु करा म्हणतील. उद्या कोणी पुरुषांसाठी वेगळा 'कोनाडा' सुरु करुन द्या म्हणतील. स्त्रीयांसाठी कोणी माजघर करुन द्या म्हणतील. आपली मुलं इथे यायला लागली की एक बालविभाग सुरु करावा लागेल. देवाळु लोकांसाठी एक विभाग सुरु करा म्हणतील, आम्हाला तिकडे आरत्या आणि घंटा वाजवायची असतील म्हणतील. अशा वेगवेगळ्या मागण्या येतील.

तेव्हा काय लिहायचं ते मिपाच्या मुख्यबोर्डावर लिहावं . व्यवस्थित शीर्षके द्या म्हणजे लेखनात काय आहे, त्याची ओळख होईल. मिपा जसं आहे, तसं राहु द्या. त्याला बदलु नका. कालांतराने जे आवश्यक बदल आहेत ते होतीलच पण उगाच भेद करणारे विभाग सुरु करु नये, असं माझं प्रामाणिक मत आहे. बाकी, तुम्ही लोक जाणे आणि तुमचे मिपामालक जाणे. :)

-दिलीप बिरुटे
(मिपाकर)

पिलीयन रायडर's picture

21 May 2018 - 11:04 pm | पिलीयन रायडर

जोरदार पाठिंबा आहे. काही उपयोग नसतो विभाग करून. आहे त्या बोर्डावर गुण्यागोविंदाने राहूया. पुष्कळ झालं!

पिवळा डांबिस's picture

22 May 2018 - 12:08 am | पिवळा डांबिस

प्रा. डाँ. च्या वरील प्रत्येक वाक्याशी सहमत.
वेगवेगळ्या विषयांसाठी वेगळे विभाग असणं (उदा. पाककृती, चित्रकला ) हे समजू शकतो पण भाषा-बोलींसाठी वेगळे विभाग असायची गरज वाटत नाही.
इथेच खुल्या फोरमवर आम्ही प्रमाणित, ग्रामीण, कोकणी, अर्ध-इंग्रजी अशा विविध स्वरूपात (विषयाला अनुसरून) लिखाण केलेलं आहे आणि वाचकांना ते स्वीकारण्यात अडचण आलेली दिसलेली नाही.
शिवाय हाच नियम लावायचा झाला तर 'मोकलाया दाही दीशा' साठी 'अगम्य' हा नवीन भाग सुरू करावा लागेल. :)

चित्रगुप्त's picture

18 May 2018 - 9:12 pm | चित्रगुप्त

साहित्य प्रकार यात 'आरोग्य' असा स्वतंत्र विभाग/पर्याय असणे जास्त उपयोगी ठरावे.

आरोग्यासाठी नवा विभाग सुरू झाल्यास त्यात ‘आरोग्यविज्ञान : काल, आज आणि उद्या’ असे सदर सुरू करायला मला आवडेल .

जव्हेरगंज's picture

18 May 2018 - 9:51 pm | जव्हेरगंज

सर्व प्रकारच्या कथा एकत्रित वाचण्यासाठी स्वतंत्र कथा विभाग असणे जास्त सोयीचे होईल.

रातराणी's picture

19 May 2018 - 2:13 am | रातराणी

अगदी! इतर कुठले विभाग असण्यापेक्षा कथा विभाग वेगळा असावा.

नाखु's picture

19 May 2018 - 9:56 am | नाखु

कथा विभाग पुरेसा होईल असे वाटते

वाचकांची च पत्रेवाला नाखु

कुठलापण विभाग काढा पण नवीन लेखन अंतर्गत हे सर्व दिसू द्या प्लिज.

'साहित्य प्रकार' वर टिचकी मारल्यास
लेख
चर्चा
कविता
कलादालन
पाककृती
क्रिडाजगत
तंत्रज्ञान
भटकंती
राजकारण.
∆ हे सगळं दिसतंय.

पण खाली प्रकार मधे
जनातलं, मनातलं
काथ्याकूट
जे न देखे रवी...
∆ हे दिसतय

दोन्हीकडे एकच नाव असुदेत ना!

नाही ओ, त्या दोन वेगळ्या टॅग आहेत

एमी's picture

19 May 2018 - 8:54 am | एमी

लेख = जनातलं, मनातलं
चर्चा = काथ्याकूट
कविता = जे न देखे रवी...

∆ असंच आहे ना?

अभिजीत अवलिया's picture

19 May 2018 - 11:14 am | अभिजीत अवलिया

एस ह्यांच्याशी सहमत. असा वेगळा विभाग काढण्याची काहीच गरज नाही. कथा आणि आरोग्य हे दोन विभाग सध्या तरी गरजेचे वाटतायत.

श्वेता२४'s picture

19 May 2018 - 1:36 pm | श्वेता२४

पण कथा व आरोग्य हे दोन स्वतंत्र विभाग हवेत असे मलाही वाटते.

विशुमित's picture

19 May 2018 - 6:52 pm | विशुमित

प्रवासात आहे... नंतर माझे म्हणणे मांडतो.

अभिजीत अवलिया's picture

21 May 2018 - 9:26 am | अभिजीत अवलिया

अजून एक विभाग जो आवर्जून यावा असे मला वाटते तो म्हणजे 'अर्थकारण'.

ह्यात वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक, टॅक्स संबंधित प्रश्न, घर/जमीन/दुकान खरेदी/विक्री असे सगळे विषय हाताळले जातील आणि आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने लोकांना महत्वाची माहिती मिळेल.

पुंबा's picture

21 May 2018 - 11:19 am | पुंबा

++११
अर्थकारण, आरोग्य, कथा हे विभाग असणे अधिक योग्य ठरेल.

टवाळ कार्टा's picture

21 May 2018 - 11:51 am | टवाळ कार्टा

+१११११११११११११११

श्वेता२४'s picture

21 May 2018 - 2:00 pm | श्वेता२४

सहमत आहे

शब्दबम्बाळ's picture

21 May 2018 - 10:50 pm | शब्दबम्बाळ

सहमत!

रामदास२९'s picture

21 May 2018 - 6:28 pm | रामदास२९

मान्य.. शहरी , ग्रामीण असा भेदभाव न करता .. उत्तम साहित्य निर्माण व्हाव ही इच्छा ..

कपिलमुनी's picture

21 May 2018 - 10:31 pm | कपिलमुनी

पुरुष कोनाडा झाला पाहिजे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 May 2018 - 10:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=)) अरे देवा....!

आपलं एक कोनाड्याचं स्वप्न आहे. आपण काही कोनाड्यावादी लोकांचं एक शिष्टमंडळ लवकर मिपामालकांना भेटणार आहोत. ;)
कोनाड्यासहित संयुक्त मिपा झालाच पाहिजे. अरे होत कसा नाय, झालाच पाहिजे. भारत माता की जय. वंदे मातरम. =))

-दिलीप बिरुटे
(कोनाडावादी)

टवाळ कार्टा's picture

21 May 2018 - 11:20 pm | टवाळ कार्टा

प्रचंड पाठिंबा

रच्याकने माजघराचे कसे काय चालू आहे

रानरेडा's picture

21 May 2018 - 10:57 pm | रानरेडा

पुणे हे मुंबईकर लोकांच्या मते गाव आहे , तर त्याचा समावेश कोठे करावा ??

रानरेडा's picture

21 May 2018 - 10:57 pm | रानरेडा

पुणे हे मुंबईकर लोकांच्या मते गाव आहे , तर त्याचा समावेश कोठे करावा ??

सर्वांना सर्वं काही यांच्या मागे मिपाने लागू नये एवढीच सदिच्छा!

बाकी हाल हलाल नन्तर कोणी ** विचारत नाही.

** अनुभव अनुभव हो बाकी काही नाही.

ग्रामीण पेक्षा बोलीभाषा विभाग असावा, म्हणजे त्या त्या बोलीभाषेत जे काही लिहिलं जाईल ते तिथे येईल. कारण बोलीभाषा काय फक्त गावातच बोलल्या जातात असं नाही.

तेजस आठवले's picture

25 May 2018 - 5:46 pm | तेजस आठवले

माझ्या मते, अर्थकारण / आरोग्य / कथा असे विभाग चालू करता येतील. मिपावरच्या बऱ्याच कथांचा दर्जा खरंच चांगला आहे. तसेच आरोग्य ह्या विषयावर चांगले लेख येऊन गेले आहेत आणि येतील. अर्थकारण ह्या विषयांमध्ये विविध आर्थिक बाबींबद्दलची माहिती असणारे लेख संग्रहित करता येतील.अगदी विमा,मेडिक्लेम, शेअर मार्केटपासून बऱ्याच गोष्टींची चर्चा करता येऊ शकेल. फार जास्त वर्गीकरण पण नको.

त्याहीपेक्षा सरळ दोन विभाग करून एकामध्ये फक्त खरे आयडी आणि दुसऱ्यात डुआयडी असे वर्गीकरण करून टाका. खऱ्या आयडींची सत्यता वैध करून(कसे ते माहित नाही) त्यांना एकच आयडी घेऊन द्यावा. डुआयडी विभागात फक्त डुआयडी असतील, त्यांना तिकडे हवा तो धुमाकूळ घालता येईल.सध्या कुठल्याही धाग्यावर डुआयडी खऱ्या आयडी आणि इतर डूआयडींबरोबर जो वितंडवाद घालतात तो तरी कमी होईल.डुआयडी कोणालाही घेता येईल आणि डुआयडी विभागात कुठल्याही धाग्यावर काहीही बरळता येईल. एकूणच मुक्त संस्थळ असले तरी स्वातंत्र्याचा दुरुपयोग झाल्याने बरेच चांगले लेखन करणारे आयडी मिपापासून दूर गेलेले आहेत हे आपण कोणीच नाकारू शकत नाही.बऱ्याच आयडींना जर मिपावर आता लिहावेसेच वाटत नसेल, तर कुठेतरी धोरण बदलले गेले पाहिजे.
३-४ दिवस एखादे नवे लेखन नाही आले तरी हरकत नसावी पण जे काही येईल ते सकस असावे.

मिसळपावचे अधिकृत धोरण ह्या पानावरील मुद्द्यांपासून काही प्रमाणात का होईना फारकत घेतली जात आहे, असे वाटते.विशेषतः मुद्दा ४,५ आणि ८. बऱ्याच वेळा संपादक मंडळावर पण मर्यादा पडतात.त्यामुळे त्यांच्यावरील कार्यभार कमी होईल असे काही नवे धोरण आखता येईल का ह्याचा विचार व्हावा.

या धाग्यावर माझी भूमिका मांडायला नुसता उशीरच झाला नाहीतर भूमिका मांडायचीच नाही असे ठरवले होते. पण...
====
मुळात काहीतरी भेदाची लक्ष्मणरेषा ओढून मिपावर दरी निर्माण करायचा पुसटशी कल्पना देखील मनाला शिवली नव्हती. वांड साहेबांच्या जनात मनातल्या कथेवर ती एक उत्स्फूर्तपणे दिलेली प्रतिक्रिया होती.
====
१. वांड साहेबांच्या कथे वर प्रतिक्रिया देताना भले भले शिकले सवरलेल्या आणि बहुतांशी शुद्ध मराठीत प्रतिसाद देणाऱ्या सदस्यांनी चक्क ग्रामीण भाषेत वाहवाह केली.
२. काहींनी कराडला जाऊन पुन्हा एस टी बसून तो थरार अनुभवायची इच्छा प्रकट केली. का म्हणून ? शहरात-देश विदेशात सुख सोयीयुक्त विमान- मेट्रो मध्ये बसणारी मंडळींना त्या डबड्या एसटीत बसायची हौस का म्हणून झाली असेल? कृषी पर्यटनाच्या बैलगाडीत बसायची तर लय हौस लोकांना!
३. मागे तळेगाव एमआयडीसी'त ऑडिट संपल्यावर तेथील कंपनीतील CFO ने जेवायला जाऊ म्हणून खेड शिवपूरला आणले. ऑर्डर काय दिली तर चुलीवरील झुणका भाकर. पुण्यातील पंचतारांकित हॉटेलं काय जळाली होती का हा प्रश्न पडला होता.
४. १५ दिवसापूर्वी महाबळेश्वरला गेलो होतो, तिथे मॅप्रो गार्डन मध्ये काही विवाहित ललना खोटी खोटी बांधलेल्या झोपडीतील (विजलेल्या) चुलीला फुकणीने फुंकर घालताना फोटो काढून चेपुवर पोस्टत होते. घरात गॅस असताना कशाला असले येडे चाळे करत असतील असे साहजिकच वाटत होते.
५. ६०-७० लाखाचे फ्लॅट्स असताना लोक कशाला त्या दऱ्याखोऱ्यात हुण्डरायला जीवाचे हाल करायला पदरमोड करून जात असतील याबद्दल मला नेहमीच आश्चर्य वाटले आहे. काय आहे त्या डोंगर कपारीत ?
====
कुठेतरी माणसाला सुसंस्कृत शहरीकरणातून थोडा विरुंगुळा म्हणून थोडे गावठी व्हावे ही सुप्त इच्छा आहे. आता चेपुवर " मी गावठी, लाज नाही अभिमान आहे " असे लिहलेल्या फ्रेम्स स्वतःच्या फोटो समोर लावून मिरवत असतात. कशा साठी ?
====
सन्मानीय सदस्यांच्या ह्या 'ग्रामीण' विभागामुळे इतर विभाग करण्याच्या मागण्या वाढतील विचारांशी मी सहमत आहे. भेद निर्माण करण्याचा माझा बिलकुल हेतू नव्हता हे पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो.
====
ग्रामीण ऐवजी " गावरान" विभाग असे केले तर ??? (चिकाटी सोडायची नाही)