वास्तव
१) एस टी महामंडळाने निवासी सुविधा दिली असतानाही (पुण्यातील राहणीमान परवडणार नाही म्हणून) ६५ किमीवर स्वतःच्या मूळ गावी राहणारा एक वाहक (कंडक्टर). घरातून संध्याकाळी ४:३० ला बाहेर पडला. ट्रॅफिक मुळे कसा बसा रात्री ८:१५ ला ड्युटीवर पोहोचला. घरून आणलेला दोन वेळचा डबा -- रात्रीचं जेवण आणि दुसऱ्या दिवशीच्या सकाळची न्याहारी. ३-४ पाण्याच्या बाटल्याही न विसरता भरून घेतलेल्या. रात्री ड्युटीच्या गावी मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी सकाळची फेरी करून घरी पोहोचायला संध्याकाळचे ४:३० वाजणार. घरी गेल्या गेल्या घराच्या पडवीत थाटलेल्या छोट्याशा दुकानात रात्री १० वाजेपर्यंत काम. दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून परत धावपळीला सुरुवात.
२) उन्हाच्या झळा सावलीत उभं राहूनही जाणवत होत्या. बार्शीहून करमाळा साधारण ६३ किमी अंतर, पण किमान दोन तासाचा प्रवास. एस टी तुडुंब भरलेली. पाण्याची बाटली चालकाने दरवाजाला बांधलेली, केबिन मध्ये बाटली ठेवण्यायोग्य एकही जागा नाही. इंजिनातून येणाऱ्या झळया कमी व्हाव्या म्हणून अर्धवट शिल्लक असलेल्या इंजिन कव्हरवर कागदी पुठ्याचं ठिगळ लावण्याचा चालकाने केविलवाणा प्रयत्न केलेला. लाही लाही होत असतानाही लाज म्हणून सदरा अंगावर तसाच ठेवलेला.
३) नुकतीच दोन एकर जमीन विकून मिळालेल्या पैशातून शिल्लक जमिनीत विहीर खोदण्यासाठी काम चाललेलं. खोदकाम यंत्राचा ३००० रुपये प्रतितास असा व्यवहार ठरलेला. रणरणत्या उन्हात गेल्या दोन दिवस संपूर्ण कुटुंब अगदी लहान मुलांसकट डोळ्यात तेल घालून पाण्याची वाट पाहत बसलेलं. डोळे आणि विहीर दोन्हीतलं पाणी मात्र आटलेलं.
याद्या
2580
प्रतिक्रिया
5
वर्गीकरण
मिसळपाव
आयुष्य संघर्षाचे आहे हे खरे..
१) बांधलेलंच जुनं राहातं घर -
क्र. ३ मध्ये विहीर खोदण्याचे आहे न?
In reply to १) बांधलेलंच जुनं राहातं घर - by कंजूस
ही तीन उदाहरणं फक्त निमित्त.
In reply to क्र. ३ मध्ये विहीर खोदण्याचे आहे न? by जेम्स वांड
समाजाचं डिझाइनच भरकटलंय...
In reply to १) बांधलेलंच जुनं राहातं घर - by कंजूस