सल्ला हवा : लोखंडी तवा
मी काल एक लोखंडी कढई आणि एक लोखंडी तवा विकत घेतला आहे.
त्यावर "वर्जिन लोखंडाच्या पट्टीपासून तयार केलेले आहे " असे लिहिलेले आहे.
वरील भांडी आणि बीड (कास्ट आयर्न) यांच्यात काय फरक आहे ?
त्यावर "ते आधीच सिझन केलेले आहेत" असा कोणताही उल्लेख नाही. तरीही त्यांच्यावर काळे कोटिंग आहे. साबणाने आणि ब्रशने घासले तर काळे कोटिंग निघत आहे. हे आधीच केलेले सिझनिंग आहे का?
तरीही मी एका कढईला घास-घासून, बोटाला काळे लागणार नाही इथवर आणले आहे. त्यानंतर तेल लावून गरम केले.
त्या कढईत आज सकाळी पालकाची भाजी केली. इतक्या लवकर भाजी करणे योग्य आहे का? भाजी उतरवल्यावर जे थोडेसे पाणी उरले होते त्यात काळे सूक्ष्मकण दिसले. "इतना टार, इतना टार " या झैरातीची धडकी आधीच भरलेली आहे त्यामुळे म्हणा हवंतर, ही भाजी खायचे मन होईना.
जर तवा/कढई व्यवस्थित सिझन करून घ्यायचे असेल तर काय करावे लागेल? आणि किती दिवस करावे लागेल?
शिवाय एकदा केलेले सिझनिंग किती काळ वापरावे? पुन्हा सगळं घासून नव्याने सिझनिंग करण्याची वारंवारता किती?
प्रत्येक वापरानंतर भांडे साबणाने/राखेने धुतले तर चालते का? कि साफ करून तसेच ठेवून द्यावे? प्रत्येक वापरानंतर तेल चोपडून ठेवावे लागते का?
[संपादक: मला प्रश्नोत्तरे प्रकारात लेखन करायला परवानगी नाही त्यामुळे काथ्याकूट प्रकारात करावे लागते आहे]
वर्गीकरण
वाचन
9633
प्रतिक्रिया
0