मी काल एक लोखंडी कढई आणि एक लोखंडी तवा विकत घेतला आहे.
त्यावर "वर्जिन लोखंडाच्या पट्टीपासून तयार केलेले आहे " असे लिहिलेले आहे.
वरील भांडी आणि बीड (कास्ट आयर्न) यांच्यात काय फरक आहे ?
त्यावर "ते आधीच सिझन केलेले आहेत" असा कोणताही उल्लेख नाही. तरीही त्यांच्यावर काळे कोटिंग आहे. साबणाने आणि ब्रशने घासले तर काळे कोटिंग निघत आहे. हे आधीच केलेले सिझनिंग आहे का?
तरीही मी एका कढईला घास-घासून, बोटाला काळे लागणार नाही इथवर आणले आहे. त्यानंतर तेल लावून गरम केले.
त्या कढईत आज सकाळी पालकाची भाजी केली. इतक्या लवकर भाजी करणे योग्य आहे का? भाजी उतरवल्यावर जे थोडेसे पाणी उरले होते त्यात काळे सूक्ष्मकण दिसले. "इतना टार, इतना टार " या झैरातीची धडकी आधीच भरलेली आहे त्यामुळे म्हणा हवंतर, ही भाजी खायचे मन होईना.
जर तवा/कढई व्यवस्थित सिझन करून घ्यायचे असेल तर काय करावे लागेल? आणि किती दिवस करावे लागेल?
शिवाय एकदा केलेले सिझनिंग किती काळ वापरावे? पुन्हा सगळं घासून नव्याने सिझनिंग करण्याची वारंवारता किती?
प्रत्येक वापरानंतर भांडे साबणाने/राखेने धुतले तर चालते का? कि साफ करून तसेच ठेवून द्यावे? प्रत्येक वापरानंतर तेल चोपडून ठेवावे लागते का?
[संपादक: मला प्रश्नोत्तरे प्रकारात लेखन करायला परवानगी नाही त्यामुळे काथ्याकूट प्रकारात करावे लागते आहे]
वर्गीकरण
वाचने
9649
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
नॉनस्टिक कोटिंगवाला तवा घेऊन
नाही. लोखंडीच घेतलं. पण
In reply to नॉनस्टिक कोटिंगवाला तवा घेऊन by कंजूस
व्हर्जिन लोखंडाची पट्टी
गंज
In reply to व्हर्जिन लोखंडाची पट्टी by अभ्या..
ह्या विषयावर
https://www.maayboli.com/node
इकडे पहिल्यापासून चर्चा
In reply to https://www.maayboli.com/node by एमी
व्हरजिन लोखंड, तवा सीझनवणे वगैरे
चित्रगुप्त, गदगदून आले त्याला
In reply to व्हरजिन लोखंड, तवा सीझनवणे वगैरे by चित्रगुप्त
टायपो
In reply to चित्रगुप्त, गदगदून आले त्याला by हणमंतअण्णा शंक…
तापवून तापवून लोखंडाचे काय
In reply to टायपो by हणमंतअण्णा शंक…
तवा सीझनिंग
गली शहाजहान कालीन होय काका
In reply to तवा सीझनिंग by अरविंद कोल्हटकर
'ऑरगॅनिक', 'ग्लुटेन फ्री' आणि एफडीए सर्टिफाईड व्हर्जिन तवा
ऑर्गॅनिक , ग्लुटेन फ्री लोल
In reply to 'ऑरगॅनिक', 'ग्लुटेन फ्री' आणि एफडीए सर्टिफाईड व्हर्जिन तवा by चित्रगुप्त
वेगन?
In reply to ऑर्गॅनिक , ग्लुटेन फ्री लोल by प्रसाद गोडबोले
वोकच्या आकाराची कढई/पॅन
मला तर हा हणमंतअण्णा
काय पावनं काय म्हनता?