सातोरी
सप्त-समुद्रांमधे मिसळती असंख्य सरिता मधुर जला
मार्गावरती समर्पणाच्या करिती पृथ्वीला सुफला
सप्त-रंग हे इन्द्रधनूचे क्षणभर दिसती-अन विरती
मेघांवरती रविकिरणांचे इन्द्रजाल अद्भूत किती
पुनरावर्तन सात दिसांचे जरी मानवा योग्य दिसे
अनादि काल-प्रवाह वाहे अंत तयाला कुठे असे?
अपूर्व विभ्रम सप्त-सुरांचे राग होउनी अवतरती
कोंदणात तालांच्या त्यांची अमूल्य रत्ने झगमगती
निर्धाराने परिश्रम करता असाध्य जगती काही नुरे
कल्पनेतले सप्त-स्वर्ग मग भूवरी येतिल खरेखुरे
खुप छान
प्रणया,