http://www.misalpav.com/node/42032 या धाग्यावर खालील प्रतिसाद आलेला. त्याच्या उत्तरार्थ हा धागा आहे. गंमत म्हणून वाचा.
गर्दी, त्याचा तुच्छतादर्शक 21 Feb 2018 - 3:15 pm | बिटाकाका गर्दी, त्याचा तुच्छतादर्शक उल्लेख याबतीतील मुद्दा इतर उदाहरणामुळे पटला. त्यामुळे ते नास्तिकांचं एक राहू देतो. ------------------------------------------- पण धार्मिक स्थळी ते ज्या देवाला मानतात त्याचे काही सेकंदासाठी दर्शन घेण्यासाठी जी रेटारेटी, फसवणूक (स्वतःची आणि दुसऱ्यांची) चालते, हे कसे समर्थनीय आहे? देव चराचरात आहे हि शिकवण सर्व ईश्वरवाद्यांना का मान्य नसावी? हे एकूणच ईश्वरवादी व्यवस्थेचे फेल्युअर मानावे का? यामुळेच नास्तिकांचे फावते असे म्हणणे चुकीचे ठरेल काय?============================================== हा एक वेगळा विषय आहे म्हणून वेगळा धागा काढत आहे. या लेखातलं कोणतंही विधान बिटाकाकांना वा कुणाला उद्देशून नाही, केवळ त्यांच्या विधानांचा संदर्भ आहे. (शिवाय यनावालांचा ट्यार्पि वाढवतो म्हणूनही माझ्यावर खूप टिका झालेली आहे. असो.). लेखात यनावाला (= अश्रद्ध) शब्द स्पेलिंग सोपं आहे म्हणून वापरलाय. =======================================
पण धार्मिक स्थळी ते ज्या देवाला मानतात त्याचे काही सेकंदासाठी दर्शन घेण्यासाठी जी रेटारेटी, फसवणूक (स्वतःची आणि दुसऱ्यांची) चालते, हे कसे समर्थनीय आहे?अर्थातच कोणत्याही प्रकारची, कोणत्याही व्यवस्थेशी निगडित असलेली फसवणूक कायदेशीर रित्या वा नैतिक रित्या समर्थनीय नसते. यात दुमत असायचं कारण नाही. मात्र आधुनिक जगात, खासकरून चुकीची विधाने करू शकण्याचे संवैधानिक स्वातंत्र्य असल्यामुळे, लोकांचे फसवणूक कशाला म्हणायचे याचे फंडे गंडलेले आहेत. कोणत्याही व्यवहारात दोन व्यक्ति आपसांत जे काही करार करतात त्यांचं उल्लंघन करणे म्हणजे फसवणूक. कोण्या विशीष्ट प्रकारचा करार करणे हीच फसवणूक असू शकत नाही. मला नक्की काय म्हणायचं हे इंग्ग्रजीत सुद्धा लिहितो. Subject to compliance of applicable frameworks, execution of a particular kind of contract in itself cannot be said to be some kind of cheating. Again, subject to compliance of applicable frameworks, only an intentional breach of a pre-concluded contract can be called chicanery. मंदिरात जे काही आर्थिक व्यवहार होतात, त्याला यनावालांसारखा अश्रद्ध पार्टी असतो का? म्हणून देवाचे दर्शन घडवतो वा देवाची कृपा घडवून आणतो असा भटात आणि भक्तात करार झाला तर यनावालांनी म्हटल्यामुळं तो फ्रॉड होत नाही. हां, पण म्हटल्याप्रमाणे देव दिसला नाही वा कृपा झाली नाही, तर यनावाला देखील दखल देऊ शकतात. तो प्रॉपर फ्रॉड होतो. दुसरी केस धरू, एक थर्ड पार्टी म्हणून यनावालांना असं वाटतं आणि असं आहे ही कि त्या भटाला स्वतःला ठाऊक आहे असलं देव बिव काही नसतं, पण भक्ताला हे माहित नाही. भक्त १०० काय १००० रुपये द्यायला तयार होऊ शकतो त्याला नीटपैकी पटवलं तर. यनावालांना नि भटाला मनातल्या मनात खरं काय ते माहीत आहे पण ते एकमेकांशी काही बोलत नाही. मग आता? इथे देखील यनावाला काही करू शकत नाही. जेव्हा दोन व्यक्ति करार करतात तेव्हा त्यांनी आवश्यकता असल्याप्रमाणे करारात सर्विस डेलिवरी स्टँडर्ड्स (तत्सम कायतरी) मंजे मान्य केलेली सेवा वा उत्पादन नक्की कसं, कुठे, कधी द्यायचं आहे याचे डिटेल लिहायचे असतात. अन्यथा ते कायद्यानुसार वा परंपरागत पद्धतीनुसार जसं देतात तसं गृहित धरलं जाईल. आता समजा यनावालांनी अस्तिकांचं सोंग आणायचं आणि भटाला जेलमधे टाकायचं असं ठरवलं, नि एक व्यवस्थित करार केला, त्यात नीट लिहिलं कि असा असा देव दाखवायचे पैसे मिळतील, इ इ. खर्या भटानं असा करार केला असता का वा केला असता तर यनावालांनी डेलिवरी झालीय, रिसिट द्या बिल द्या ही अध्यात्मिक चर्चा कशी केली असती हे जरा बाजूला ठेऊ. पण ज्या भटाची मूळात स्वतःचीच श्रद्धा नाही, त्याचं काय? तर अर्थातच यनावाला त्याला कोर्टात खेचतील. तिथं काय होईल? तर सर्वप्रथम कोर्ट कराराची चौकट आहे ती पाळली गेली आहे का ती पाहिली जाईल. उदा. भटाचं नि यनावालांची जन्माची प्रमाणपत्रं, डोकं जाग्यावर आहे का किंवा करार करताना होतं का, कराराच्या वेळी हातात बंदूका तर नव्हत्या, देव दिसायचा कर दिलाय का, कोणत्या कायद्याचं उल्लंघन करत नाही ना, इ इ पाहिलं जाईल. हे सगळं व्यवस्थित असेल तर, नि समजा जज विचारसरणीने "आपल्या यनावालांचा" गुरु (असा काही पदार्थ असणे संभव असेल तर) असेल तर म्हणेल देव दाखवणे म्हणजे काहीच न दाखवणे तेव्हा सर्विस डिलिवरी झाली आहे नि पेमेंट करावा. एक जज म्हणू शकतो कि देवाचं जे काय वर्णन आहे तसलं काहिही दाखवा, त्याला देवच मानलं जाईल करारापुरतं. थोडा अजून वेगळा जज म्हणू शकतो कि देव हा एक व्हॅलिड पदार्थ नाही, तेव्हा त्याचा उल्लेख असलेली कलमे सोडून बाकी करार लागू असेल. म्हणजे एकूणात करार कॅन्सल होईल. या शेवटच्या दोन्ही केसेसमधे भटाला पैसे परत द्यावे लागतील. सुज्ञलोक म्हणतील अरे यना, मूर्ती पाहून घे नि अर्धे पैसे दे पण यना मानणार नाहीत. आता यना भटाला जेलमधे टाका म्हणतील. पण एखादी सेवा देऊ न शकणे म्हणजे गुन्हा नव्हे. हा पर्फॉमन्स डीफॉल्ट झाला, क्षमतांच्या अभावाने. म्हणून कोर्ट काही तसं करणार नाही. ------------------------------------------------------------------------------------------ थोडक्यात, अगदी स्वतःचा देवावर विश्वास नसताना देव दाखवतो म्हणून पैसे घेऊन न दाखवणं हा देखील गुन्हा असू शकत नाही. आणि हे अनैतिक आहे असं फक्त यनावाला म्हणतात. त्याला तरी कुठं सिद्ध करता येतं भटाचा मूळी देवावर विश्वासच नाही? याला फक्त ब्रिच ऑफ काँट्रक्ट म्हणतात. ईंग्रजीत लिहितो. A mere breach of contract is not tantamount to ill-intended, criminal contract. ---------------------------------------------------------------------------------------- आता जर कपिलमुनी तिथे अवतरले नि त्यांना वाटलं कि यनावर अन्याय झालाय. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अहो, हे देव मंजे बीटकॉइन टाइपचं प्रकरण आहे. असलं काही नसतं, याची काही व्यवस्था नसते, याला काही मूल्य नसतं, तेव्हा याच्यावर बॅन पाहिजे. आणि देव दाखवण्याचं काँट्रॅक्ट्च बेकायदेशीर केलं पाहिजे. मग संसद आणि न्यायालय देव आहे का नाही हे कुणी सांगायचं याचा अधिकार कुणाला आहे यावर भांडू लागतील. तितक्यात भटाच्या नशीबानं त्याचे कान फुंकायला घाटपांडे साहेब आले नि तू देखील एक पी आय एल टाकून दे. देव मानायचाच नसेल तर त्याच आधारावर नाणी नि नोटा बंद करा. आम्ही का मानायचं कि त्यांच्यात मूल्य असतं? ते तरी दिसतं का? नि ते ही भयानक असंबंद्ध, अनियंत्रित आणि नुकसानदायक हेलकावे खात बदलत असतं. तेव्हा तुम्ही बँका बंद करा वा चालू ठेवायच्या असतील तर कॅश रिझर्व रेशो १००% ठेऊन चालवा. तुम्ही अगोदर तुम्ही जे आहे मंता ते मूल्य काढून डोळ्यासमोर दाखवा मग मी त्याच प्रकारे देव दाखवतो. आता संसदेत नि न्यायालयात दुसर्या एका विषयावर भांडण चालू होइल. त्यानंतर संसदेत एक कमिटी बनेल - देव आणि मूल्य या संबंधित, समान संकल्पना आहेत काय त्यांना एकमेकांचे कायदे लागू होणे शक्य आहे काय या विषयावर. -------------------------------------------------------- शेअरबाजारात काय होतं? गुंतवणूकीची वाढ होईल म्हणून आपण पैसे लावतो. मी पैसे वाढवून देईन असं थेट कुठं लिहिलं नसलं तरी कंपनीची जी फोरकास्टीव विधानं असतात ती नि बाजारात तिनं शेअर विकायला काढलेत ही गोष्ट एकत्र पाहीली जाईल आणि ते देखील एक कंस्ट्रूड काँट्रॅ़क्ट मानलं जाईल. पण समजा ती कंपनी बुडली तर मी काय करू शकतो? कंपनीच्या मालकाला धंदा चालवता आला नाही म्हणून मी जेलमधे घालू शकत नाही. माझ्या रिस्कवर मी ती गुंतवणूक केली. थेट असं म्हणता येईल कि माझ्या समाधानासाठी मी संभाव्य फसवणूकीचा करार केला. शेअर असो वा देव असो, स्वतःच्या संभाव्य फसवणूकीत परिणत होणारा करार करणं वा करवून घेणं बेकायदेशीर वा अनैतिक नाही. ९०% (रिटेल) लोकांचे पैसे मार्केटात बुडतात. मग शेअरबाजार बंद करणार आहात का? आपला स्वभाव असले प्रकार मानत नसेल माणसानं देवापासून, बाजारापासून दूर राहावं, पण उगाच फसवणूक फसवणूक म्हणून कांगावा करू नये. कोणाला देवाला १००० रु देऊन कोटी रुपयांची कृपा झाली, किंवा असाच आंतरसंबंध आहे असं मानलं गेलं तर आपण मधे का पडावं? ज्या शेअरात पोटेंशिअल आहे त्यामागे जशी झुंबड उडते तशी इथे उडणारच. म्हणून माझं म्हणणं असं पडतं कि ज्याचा देवात अनध्यात्मिक रस आहे त्याचा नि त्याच्या रसाचा उचित सन्मानच करावा. ---------------------------------- आता एक दुसरा संबंधित मुद्दा - समाजाच्या लोककल्याणवादी वर्गाचा, सजग वर्गाचा फोकस हा व्यवस्थात्मक अन्याय सर्वात अधिक कोठे आहे तिथे असावा हे रास्त वाटतं. आज जो धार्मिकार्थिक अन्याय आहे तो नगण्य आहे. व्यक्तिशः मला धार्मिकार्थिक अन्याय नष्ट करणे हेच करियर बनवणार्या लोकांची कीव येते (तसा माझा पिंड बुद्धींची कीव इ करवणारा अजिबात नाही. मानवी मूर्खता, विक्षिप्तता, विचित्रता मी मानवी जीवनाचं सन्मान्य सौंदर्य मानतो.). आजच्या व्यवस्थांत अनेकविध प्रकारच्या श्रमांचं, कौशल्यांचं, शक्तींचं, उत्पादनांचं, सेवांचं, क्षमतांचं, अधिकारांचं अतिशय अन्यायकारक असं आणि रिग्ड स्वरुपात मूल्यमापन होत आहे. इतिहासात तुलतेन अतिच. ज्या गृहितकांवर प्रत्यक्ष बाजार चालतोय, अर्थव्यवस्था चालतेय, राज्यव्यवस्था चालतेय नि त्यांत निष्पाप, सामान्य माणूस लूटला जात आहे. ही लूट कायदेशीर आहे आणि तिला अनैतिक म्हणणारा वर्ग असोच, तिचे विक्राळ रुप माहित असणारा वर्ग, जगात खूपच नगण्य आहे म्हणून हे जवळजवळ नैतिक देखील झालं आहे. धार्मिक लूटीची मात्रा या लूटीच्या अब्जावधी पटींनी कमी आहे. आज आपण ५००० वर्षापूर्वीच्या वेदकालीन ब्राह्मणाने घेतलेल्या दक्षिणेची निर्भत्सना करतो. ५००० वर्षांनंतर आपलं देखील ऑडिट होणार आहे आणि कदाचित त्यांचेकडे खूप जास्त ऐवज असतील आपल्या "मानवतापणाचं आणि बुद्धिमत्तेचं" आकलन करायला. आपल्या टिकांचा फोकस आज सृजित केलेल्या व्यवस्था हव्यात, आज अंमलात असलेल्या व्यवस्था हव्यात खासकरून दूरस्थ थांबून विचार केला असताना असं दिसत असेल कि या व्यवस्थांनी होणारी लूट, होणारा अन्याय खूप आहे, राजरोस आहे नि तिला संवैधानिक मुलामा आहे शिवाय सामाजिक नैतिकतेचं प्रतिष्ठान देखील आहे. आजचे समाजसुधारक असलो तरी भविष्यातले टिकापात्र होणार नाही ना अशी काळजी लोकांनी घ्यायला हवी. अशा एकूण संदर्भात मला मंदिरातली फसवणूक, आता हे शब्द अयोग्य नाहीतच ठरवलं तरी, चीड आणत नाही. ----------------------------
देव चराचरात आहे हि शिकवण सर्व ईश्वरवाद्यांना का मान्य नसावी? हे एकूणच ईश्वरवादी व्यवस्थेचे फेल्युअर मानावे का?असं गृहितक व्यवस्था चालवण्यासाठी आवश्यक आहे असं वाटत नाही. असं नाही मानलं तरी चालतं. शरीर हे शरीर चालवतं हे जास्त लॉजिकल असलं तरी शरीर मेंदू चालवतो असं म्हणणारेच जास्त निघतील. मेंदूचं काम जास्त महत्त्वाचं कसं? चेतासंस्थेच्या अवयवांचे प्रस्थ का? शरिरातील विविध अवयवांना वेगवेगळे महत्त्व द्यायचे निकष काय? अनेक जीवांना अनेक अवयवच नसतात. कधि कधी मेंदूही नसतो. पण सगळा घोटाळा लोक सोडवत बसणार नाहीत. सर्वसाधारणपणे व्यवस्था अशा असाव्यात कि अल्पसंख्य अशा भांडखोर नि डोक्याचा भुगा करणार्या सर्व ज्ञानी लोकांनी सगळे डोके लावून बनवलेल्या असाव्यात. त्यांनाच त्या परस्परांस स्वीकार्य असाव्यात. किमान पहिले दुसरे स्थान असं काहीतरी असावं. सामान्य माणसाला फार जास्त डोकं न लावता (म्हणजे डोकं न लावता असं नव्हे) व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. विवेकवादी नावाच्या नवमूर्ख पंथानं प्रत्येकच व्यक्तिनं व्यक्तिगत स्तरावर सर्व ज्ञानातत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा अशी हूल पेटवून ठेवली आहे. हे काही शक्य नाही. या लोकांनी अत्यंत प्रभावशाली पद्धतीनं असलेल्या पारंपारिक व्यवस्था व्यवस्था एकतर्फी दिवाळखोर जाहीर केल्या आहेत. पर्यायी व्यवस्था दिली वा अस्तित्त्वात आणायला यूनो वा डब्ल्यूटीओ सारखा फोरम बनवला नाही. अशा काळात सर्वच प्रकारचे विचार मानणारे लोक असतील नि याला काही कोण्या एका व्यवस्थेचा, विचाराचा फेल्यूअर म्हणता येणार नाही. कधी मेरिट्ला महत्त्व आल्यास, येऊ दिल्यास नि या चराचर-ईश्वरवादात मेरीट असल्यास तो पुन्हा फोफावेल. ================================ लेखकास, मंजे मला, सर्व धर्म, पंथ, जाती, विचारधारा, अस्मिता, इ इ चा आत्यंतिक आदर आहे. कोणत्याही विधानाचा टोकाचा अर्थ काढून 'अर्थाचा अनर्थ भागवताच्या चिंध्या' असा प्रकार होऊ नये अशी आशा आहे.
वर्गीकरण
वाचने
18903
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
जोशी डोन्ट टेक इट पर्सनली बट
लिहिण्याची अतिशय गचाळ पद्धत.
In reply to जोशी डोन्ट टेक इट पर्सनली बट by जेम्स वांड
गंमत म्हणून वाचा ....
In reply to लिहिण्याची अतिशय गचाळ पद्धत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत.
In reply to लिहिण्याची अतिशय गचाळ पद्धत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बेबंद, घाईने दणादण लिहिलेले,
In reply to सहमत. by राही
डॉ. बिरुटे,
In reply to लिहिण्याची अतिशय गचाळ पद्धत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अॅग्रिड
In reply to जोशी डोन्ट टेक इट पर्सनली बट by जेम्स वांड
अजून एक शिकता आलं तर शिका.
In reply to अॅग्रिड by arunjoshi123
कुस्तीच्या आखाड्यात
In reply to अजून एक शिकता आलं तर शिका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोण्या एका सदस्यात इतके सगळे
In reply to अजून एक शिकता आलं तर शिका. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चला एखादा नविन ओ एम जी तयार
:)
हेच मान्य नसेल तर....
In reply to :) by पैसा
थोडक्यात काय पैसा ताई
In reply to :) by पैसा
तमशाने समाज बिघडत नाही अन किर्तनाने सुधारत नाही, सगळे ठेविले अनंते राहणार आहेत झालं
मूळात फसवले गेलो आहोत हेच
In reply to :) by पैसा
+१००
In reply to मूळात फसवले गेलो आहोत हेच by प्रकाश घाटपांडे
>>> मूळात फसवले गेलो आहोत हेच
In reply to मूळात फसवले गेलो आहोत हेच by प्रकाश घाटपांडे
>>> अंधश्रद्धेचे बळी हेच
In reply to >>> मूळात फसवले गेलो आहोत हेच by श्रीगुरुजी
आपली फसवणूक होते हेच कोणाला
In reply to :) by पैसा
पांढरा झेंडा
In reply to आपली फसवणूक होते हेच कोणाला by arunjoshi123
मी ही असेच करतो ..
In reply to :) by पैसा
अशा वेळी लेख लिहून, वाद घालून
In reply to मी ही असेच करतो .. by चौकटराजा
नास्तिकांची समस्या आपले
In reply to अशा वेळी लेख लिहून, वाद घालून by arunjoshi123
+ ९९९९९९९९९९९९९९९९९९९ ... Perfect !!!!!!!!!!!!!!!!!!!! वृषभनयनांचा अचूक लक्श्यभेद!!!!!!माझे विधान नीट वाचा
In reply to अशा वेळी लेख लिहून, वाद घालून by arunjoshi123
नाद
In reply to माझे विधान नीट वाचा by चौकटराजा
अरुण जोशी सर,
बिटाकाका
In reply to अरुण जोशी सर, by बिटाकाका
"लिखाणातील त्रुटी सगळेच
In reply to बिटाकाका by जेम्स वांड
जेम्स वांड साहेब, आपला
In reply to बिटाकाका by जेम्स वांड
ओके
In reply to जेम्स वांड साहेब, आपला by arunjoshi123
कोण बरे ते?
In reply to जेम्स वांड साहेब, आपला by arunjoshi123
मी मिटवण्याकरता म्हणालो हो.
In reply to कोण बरे ते? by राही
इशारा काफी होता है असे मला
In reply to कोण बरे ते? by राही
फसवणूक -२
In reply to अरुण जोशी सर, by बिटाकाका
फुरसतीच्या कविता
मिपावरील एकमेव समस्या
In reply to फुरसतीच्या कविता by नाखु
यनावालांवर आस्तिकांकडून
In reply to मिपावरील एकमेव समस्या by प्रचेतस
तुम्हाला नेमकं काय म्हणावयाचं
In reply to यनावालांवर आस्तिकांकडून by arunjoshi123
काही लिबर्टीज घेत मी कसा
In reply to तुम्हाला नेमकं काय म्हणावयाचं by प्रचेतस
घाणेरडी विशेषणं म्हणजे नेमके
In reply to काही लिबर्टीज घेत मी कसा by arunjoshi123
कदाचित मी देखिल प्रचंड
In reply to काही लिबर्टीज घेत मी कसा by arunjoshi123
http://www.misalpav.com
In reply to कदाचित मी देखिल प्रचंड by प्रकाश घाटपांडे
आपल्याला यनावालांची भाषा कठोर
In reply to कदाचित मी देखिल प्रचंड by प्रकाश घाटपांडे
आपल्याला यनावालांची भाषा कठोर वाटते, न पटणारी वाटते इतकच. ती घाणेरडी नव्हे.त्यांना कदाचित् , यनावालांची भाषा उर्मट, उद्धट, अशिष्ट असते असे म्हणायचे असावे... मला तरी ती तशीच वाटते. शिवाय, खुल्या मंचावर कोणी टोचून बोलले किंवा उचकावले नसताना (अनप्रोव्होक्ड)* अशी भाषा वापरणे हे अहंमन्यतेचे, अपरिपक्वतेचे, असुसंस्कृतपणाचे आणि निषिद्ध असते हे समजत नाही अश्या माणसाला काय म्हणावे ? अश्या प्रवृत्तीत आणि जुलूमी (टायरंट) प्रवृत्तीत असलाच तर जरा कमीजास्त प्रमाणाचाच काय तो फरक आहे. * : किंबहुना, ज्ञानी, सभ्य आणि विनयशील माणूस दुसरा कोणी टोचून बोलला तरी स्वतःच्या मनाचा तोल ढळू न देता बोलतो/लिहितो. नाही का ? जी व्यक्ती स्वतःच्या मनाचा तोल सांभाळून विचार व्यक्त करू शकत नाही ती व्यक्ती इतरांना विचार करायला काय शिकवू शकणार ?!इतक्या सुंदर आणि सहज लेखावर
लेख तुम्ही वाचलाय असे गृहीत धरून
In reply to इतक्या सुंदर आणि सहज लेखावर by असंका
खालील प्रतिसाद संपूर्ण अवांतर
In reply to लेख तुम्ही वाचलाय असे गृहीत धरून by जेम्स वांड
अरे बापरे!
In reply to खालील प्रतिसाद संपूर्ण अवांतर by असंका
ये हुई ना बात! याला म्हणतात
In reply to अरे बापरे! by जेम्स वांड
तुम्ही फारच मनावर घेतलेलं
In reply to अरे बापरे! by जेम्स वांड
"प्रत्येकच व्यक्तिनं
जोशी साहेब, महान..
झाली का फिट्टमफाट? :)
इतक्यात ?! छे, छे, हा वाद
In reply to झाली का फिट्टमफाट? :) by सतिश गावडे
घटनेत बदल
अजोंचा प्रतीसाद?
वेलकम बॅक, अजो!
शामजी, वामनजी धन्यवाद.
च्यायला... मिपा म्हंजे मिपा