✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ताज्या घडामोडी - भाग २२

श
श्रीगुरुजी यांनी
Mon, 02/12/2018 - 23:33  ·  लेख
लेख
मल्याची किंगफिशर कंपनी इंग्लंडमध्ये खटला हरली. ९ कोटी डॉलर्सची नुकसान भरपाई द्यावी लागणार. https://timesofindia.indiatimes.com/world/uk/vijay-mallyas-kfa-loses-court-battle-in-uk-to-pay-90m-in-claims/articleshow/62886014.cms
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
39850 वाचन

💬 प्रतिसाद (228)

प्रतिक्रिया

काँग्रेसचे कृपाशंकर बाइज्जत बरी.

manguu@mail.com
गुरुवार, 02/15/2018 - 13:19 नवीन
मुंबई: बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांची परवानगी न घेताच दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातून काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांची अखेर सुटका झाली आहे. या खटल्यातून एसीबी कोर्टाने दोषमुक्त केल्यानं कृपाशंकर सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/congress-leader-kripashankar-singh-discharged-in-assets-case/articleshow/62926684.cms
  • Log in or register to post comments

अश्या निकालांमुळे सामान्य आणि

जानु
गुरुवार, 02/15/2018 - 13:32 नवीन
अश्या निकालांमुळे सामान्य आणि अधिक सामान्य हे लोकांच्या मनात ठळकपणे अधोरेखित होते.
  • Log in or register to post comments

कृपाशंकर त्या काळात आमदार

श्रीगुरुजी
गुरुवार, 02/15/2018 - 14:36 नवीन
कृपाशंकर त्या काळात आमदार असल्याने त्याच्यावर खटला दाखल करण्यासाठी विधानसभा अध्यक्षाच्या परवानगीची आवश्यकता होती. २०१४ मध्ये तत्कालीन विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील (भ्रष्टव्याधी खांग्रेस) यांनी कृपाशंकरला वाचविण्यासाठी परवानगी नाकारली. त्यामुळे न्यायालयाने त्याच्यावर खटला चालविण्यास नकार दिला आहे. एका अध्यक्षाने परवानगी नाकारल्यानंतर दुसर्‍या अध्यक्षाला परवानगी देता येत नाही. 'आदर्श' अशोक चव्हाणांवरील खटल्यासाठी राज्यपालांची परवानगी मागितली होती. तत्कालीन खांग्रेसी राज्यपालांनी चव्हाणांना वाचविण्यासाठी परवानगी नाकारली. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर नवीन राज्यपाल विद्यासागर राव यांनी खटल्यासाठी परवानगी दिली. परंतु डिसेंबर २०१७ मध्ये उच्च न्यायालयाने आरोपपत्रातून चव्हाणांचे नाव काढून टाकले. त्यावेळी हे कारण दिले की आधीच्या राज्यपालाने परवानगी नाकारल्यानंतर नवीन राज्यपालाची परवानगी कायदेशीर मानली जात नाही. कृपाशंकर असो वा चव्हाण, दोघांनाही तत्कालीन खांग्रेस-राष्ट्रव्याधी सरकारने वाचविले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जानु

आयला यांनी जाता जाता कुठेकुठी

आनन्दा
गुरुवार, 02/15/2018 - 16:00 नवीन
आयला यांनी जाता जाता कुठेकुठी पाचरी मारून ठेवल्यात देव जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

हा नियम बदलला पाहिजे

कपिलमुनी
गुरुवार, 02/15/2018 - 19:22 नवीन
गुन्हेगार आमदार खासदार असला तरी परवानगी वगैरेचा नियम बदलायला हवा. पोलीस आणि न्यायालयासमोर सगळेजण सारखे हवेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

यात अजून वाईट गोष्ट म्हणजे

सुबोध खरे
गुरुवार, 02/15/2018 - 19:56 नवीन
यात अजून वाईट गोष्ट म्हणजे आदर्श मध्ये प्रचंड घोटाळा आहे हे उच्च न्यायालयानेच मान्य केले असूनही केवळ राज्यपालांनी परवानगी दिली नाही म्हणून केवळ तांत्रिक कारणावरून त्यांच्यावर खटला भरता येत नाही. वा रे कायदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बर्र्र्र्र्र्र् ....

manguu@mail.com
Fri, 02/16/2018 - 00:12 नवीन
गोमांस , मशीद , मदरश्यात राष्ट्रगीत , ट्रिपल , नोकरीतले आरक्षण , व्हाट्सपवर प्रधानसेवकांच्या विरोधी लिहिल्यास शिक्षा, नोटाबंदी .. इ इ बाबतीत एका रात्रीत नवीन कायदे करणे आणि ते राबवणे जमते , मग हे का जमू नये ? उपयोग काय त्या भौमताचा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

माहिती नसताना पिचक्या टाकणे

सुबोध खरे
Fri, 02/16/2018 - 13:56 नवीन
माहिती नसताना पिचक्या टाकणे सोडणार नाहीच का तुम्ही? यासाठी कायदा केला तरी तो राज्यसभेत पास होणार नाही. तीन तलाक सारखा आणि मुळात यासाठी घटना दुरुस्ती करायला लागेल म्हणजे २/३ बहुमत दोन्ही सभागृहात ते केंव्हा येईल तेही माहिती नाही. मोदी सरकारने १२०० जुने आणि कालबाह्य कायदे रद्द केले https://www.indiatoday.in/mail-today/story/narendra-modi-law-ministry-ravi-shankar-prasad-984025-2017-06-22 आणि काँग्रेसने १९८८ साली पास झालेला बेनामी मालमत्तेचा कायदा २८ वर्षे प्रलंबित ठेवला (का ते विचारू नकाच गडे!!) आणि इथे तुम्ही फक्त फुसकुल्या सोडताय. गोमांस , मशीद , मदरश्यात राष्ट्रगीत , ट्रिपल , नोकरीतले आरक्षण , व्हाट्सपवर प्रधानसेवकांच्या विरोधी लिहिल्यास शिक्षा, नोटाबंदी .. इ इ बाबतीत एका रात्रीत नवीन कायदे करणे आणि ते राबवणे जमते हे सर्व कायदे होतेच फक्त या सरकारने अंमलबजावणी सुरु केली गोवध हत्याबंदी तर आपल्या घटनेतच घटनाकारांनी लिहिली आहे. आता सांगा डॉ आंबेडकर मूर्ख होते म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

राज्यपालाच्या आदेशाचे नेमके काय प्रकरण आहे ?

manguu@mail.com
Fri, 02/16/2018 - 14:23 नवीन
हो का ? घटनेतच गोवधबंदी लिहिलेले असताना गोव्यात खुशाल गायी कापणारे दीदशहाणे म्हणायचे की काय ? एका राज्यपालाने आदेश दिला की पुन्हा दुसर्या राज्यपालाने त्याबाबत आदेश देऊ नये , हा कायदा आहे की संकेत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तुम्हीच शोधून सांगा बरं

सुबोध खरे
Fri, 02/16/2018 - 15:46 नवीन
तुम्हीच शोधून सांगा बरं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

२/३ चे तुणतुणे

manguu@mail.com
Fri, 02/16/2018 - 15:44 नवीन
भाजपाने कायदा केला का नाही, असे विचारले की २/३ चे तुणतुणे वाजवत बँडवाले पळत येतात. १९९१ नंतर ( कदाचित त्याच्याही आधीपासून ) नेमके कोणते सरकार २/३ बहुमतात होते ? तरी तेंव्हा काँग्र्सने अमका कायदा का केला नाही अन तमका का केला नाही, हे विरोधक विचारतच होते ना ? तरीही नवे कायदे येणे अन जाणे होत होते ना ? २/३ स्पष्ट बहुमत असलेले याआधीचे शेवटचे सरकार कधी होते म्हणे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तुम्हीच शोधून सांगा बरं

सुबोध खरे
Fri, 02/16/2018 - 15:46 नवीन
तुम्हीच शोधून सांगा बरं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

...

manguu@mail.com
Fri, 02/16/2018 - 15:55 नवीन
१९९१ पर्यंत शोधले, आता त्याच्यामागे शोधायला हवे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आता 1947 पर्यंत शोधा

सुबोध खरे
Fri, 02/16/2018 - 15:56 नवीन
आता 1947 पर्यंत शोधा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

दोन्ही मोदी एकत्र

manguu@mail.com
गुरुवार, 02/15/2018 - 20:52 नवीन
२०१६ साली नीरव मोदी घोटाळा प्रधानसेवकाना कळवुनही दोघे दावोसमध्ये एकत्र होते . http://www.thehindu.com/business/congress-targets-pm-over-davos-photo-with-nirav-modi/article22762831.ace Targeting Prime Minister Narendra Modi for the presence of PNB (Punjab National Bank) fraud accused celebrity jewellery designer Nirav Modi in the Indian business delegation at Davos, Congress president Rahul Gandhi has said "being seen with the Prime Minister helped the businessman flee the country."
  • Log in or register to post comments

पेपरची लिंक

manguu@mail.com
गुरुवार, 02/15/2018 - 20:53 नवीन
http://www.thehindu.com/business/congress-targets-pm-over-davos-photo-with-nirav-modi/article22762831.ece
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

सेलेक्टिव्ह रिडींगचं परत एक

बिटाकाका
गुरुवार, 02/15/2018 - 22:29 नवीन
सेलेक्टिव्ह रिडींगचं परत एक प्रदर्शन!! आपल्यालाच लिंक्स मधलं आपल्याला हवं ते वाचायचं आणि नको ते दुर्लक्ष! ते हरिप्रसाद काय म्हणाले ते वाचा परत! https://m.timesofindia.com/business/india-business/pnb-fraud-nirav-modi-left-india-with-family-in-first-week-of-january/articleshow/62930682.cms बाकी, डावोस च्या कार्यक्रमात कुणालाच नरेंद्र मोदींनी बोलावलं नव्हतं! ते तिथे यजमान नाही, अतिथी होते. आपल्या अंधभक्तना सुखवण्यासाठी थर्ड क्लास राजकारणाचं प्रदर्शन मांडणारे त्या निरव मोदींच्या प्रायव्हेट पार्टीत मश्गुल होते म्हणे. काही माध्यमांनी मांडलेला आणि जालावर उपलब्ध असलेला घटनाक्रम - २०११ - पहिल्यांदा लेटर ऑफ अंडरटेकिंग देण्यात आले. आणि इथून घोटाळ्याला सुरुवात झाली. २०१८... १ जानेवारी - निरव मोदी कुटुंबासकट देशाबाहेर ३ जानेवारी - पीएनबी ला संशयास्पद व्यवहार सापडले. २३ जानेवारी - निरव मोदी मोदींसोबत डावोसमध्ये. २९ जानेवारी - पीएनबी ने निरव मोदी विरोधात २८० कोटींच्या गैरव्यवहाराची तक्रार दाखल केली. १४ फेब्रुवारी - पीएनबी ने अजून दोन तक्रारी दाखल केल्या आणि हा घोटाळा ११५०० कोटींच्या आसपास असल्याचे ईडी ला सांगितले. माध्यमे ईडीने 5100 कोटींची संपत्ती जप्त केल्याच्या बातम्या दाखवत आहेत. शिवाय निरव मोदीने सहा महिन्यात पैसे परत करणार असल्याचे कळवल्याची बातमीही दाखवत आहेत. असो, स्वतःच्याच नाकाखाली झालेले घोटाळे बाहेर निघाल्यावर घाईत आरोप करून नंतर तोंडावर आपटल्याचा हा काही पहिला प्रकार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

सेलेक्टिव्ह रिडींगचं परत एक

बिटाकाका
गुरुवार, 02/15/2018 - 22:33 नवीन
सेलेक्टिव्ह रिडींगचं परत एक प्रदर्शन!! आपल्यालाच लिंक्स मधलं आपल्याला हवं ते वाचायचं आणि नको ते दुर्लक्ष! ते हरिप्रसाद काय म्हणाले ते वाचा परत! https://m.timesofindia.com/business/india-business/pnb-fraud-nirav-modi-left-india-with-family-in-first-week-of-january/articleshow/62930682.cms बाकी, डावोस च्या कार्यक्रमात कुणालाच नरेंद्र मोदींनी बोलावलं नव्हतं! ते तिथे यजमान नाही, अतिथी होते. आपल्या अंधभक्तना सुखवण्यासाठी थर्ड क्लास राजकारणाचं प्रदर्शन मांडणारे त्या निरव मोदींच्या प्रायव्हेट पार्टीत मश्गुल होते म्हणे. काही माध्यमांनी मांडलेला आणि जालावर उपलब्ध असलेला घटनाक्रम - २०११ - पहिल्यांदा लेटर ऑफ अंडरटेकिंग देण्यात आले. आणि इथून घोटाळ्याला सुरुवात झाली. २०१८... १ जानेवारी - निरव मोदी कुटुंबासकट देशाबाहेर ३ जानेवारी - पीएनबी ला संशयास्पद व्यवहार सापडले. २३ जानेवारी - निरव मोदी मोदींसोबत डावोसमध्ये. २९ जानेवारी - पीएनबी ने निरव मोदी विरोधात २८० कोटींच्या गैरव्यवहाराची तक्रार दाखल केली. १४ फेब्रुवारी - पीएनबी ने अजून दोन तक्रारी दाखल केल्या आणि हा घोटाळा ११५०० कोटींच्या आसपास असल्याचे ईडी ला सांगितले. माध्यमे ईडीने 5100 कोटींची संपत्ती जप्त केल्याच्या बातम्या दाखवत आहेत. शिवाय निरव मोदीने सहा महिन्यात पैसे परत करणार असल्याचे कळवल्याची बातमीही दाखवत आहेत. असो, स्वतःच्याच नाकाखाली झालेले घोटाळे बाहेर निघाल्यावर घाईत आरोप करून नंतर तोंडावर आपटल्याचा हा काही पहिला प्रकार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

नाही म्हणजे, मी काय म्हणतो, काय च्युगिरी सुरू आहे जगात?

जेम्स वांड
गुरुवार, 02/15/2018 - 23:18 नवीन
कोणी ११,००० कोटी रुपये चोरतोय अन कुठंतरी हुंड्यासाठी एक पोरगी स्वतःला पोरगं भासवून अजून दोन पोरींशी लग्न करतीये!
  • Log in or register to post comments

रच्याकने

जेम्स वांड
गुरुवार, 02/15/2018 - 23:21 नवीन
आत्ता कुठं सरकार विरोधात बोंब ठोकायला विरोधकांना वातावरण तयार झालं होतं नव्हतं की प्रवर्तन निदेशनलाय (मराठीत ई डी) ने मोदी म्हणजे निरव मोदीची ₹५१०० करोड फक्त चे सोने नाणे हिरे जवाहिर अन स्थावर जंगम मालमत्ता अटॅच केली ! म्हणजे बघा, ५१०० कोटी ह्याचं किडुकमिडुक फुकुन आले अन ५६०० कोटी बँक री-कॅपिटलायझेशन प्लॅन मध्ये पीएनबीला अलॉट होणार होते! झाली की लेको रिकव्हरी सुरू अन समाप्त
  • Log in or register to post comments

छान

manguu@mail.com
Fri, 02/16/2018 - 00:15 नवीन
काँग्रेस आणि इन्फोशिसचा आधार कार्डाचा निर्णय अगदी योग्यच होता. त्याबद्दल त्यांचे अन ते राबवत असल्याबद्दल मोदींचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

निरव मोदी

सर टोबी
गुरुवार, 02/15/2018 - 23:22 नवीन
निरव मोदी व्यवस्थित देशाच्या बाहेर गेल्या नंतर तक्रार करण्यात येते यात तुम्हाला काहीही काळं बेर दिसत नाही? आर्थिक गुन्हेगारांना व्यवस्थित देशाबाहेर घालविण्याचा एक नावाचं पायंडा या सरकारने पडला आहे.
  • Log in or register to post comments

असंच काही नाही सर टोबी

जेम्स वांड
गुरुवार, 02/15/2018 - 23:26 नवीन
क्वात्रोची प्रकरणात किंवा युनियन कार्बाईडचा वॉरन अँडरसन पळून जाण्यात झालेले पुढीलांचे पराक्रम पाहून ह्यांसी स्फुरण चढले असावे (असलेच तर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

तक्रार ब्यांकेने केल्यानंतरच

श्रीगुरुजी
गुरुवार, 02/15/2018 - 23:36 नवीन
तक्रार ब्यांकेने केल्यानंतरच तपास यंत्रणा तपास करू शकतात. आधी ब्यांक, नंतर रिझर्व्ह ब्यांक आणि शेवटी तपास संस्था असा क्रम असतो. या प्रकरणात व आधीच्या मल्या प्रकरणात ब्यांकेने गुन्हेगारांना पळून जाण्याची संधी दिली आणि नंतरच तक्रार नोंदवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

तसं असेल तरी...

अर्धवटराव
Fri, 02/16/2018 - 01:33 नवीन
आर्थीक व्यवहारंवर नजर ठेवणार्‍या सरकारी उच्चपदस्थांना, पर्यायाने सरकारला असल्या घोटाळ्यांचा वास येत नसेल हे शक्य वाटतं. घोटाळेबाजांना ते घोटाळेबाज आहेत हे माहित असुनही देशाबाहेर जाऊ देणे हि सरकारी यंत्रणांची, पर्यायाने सरकारची चुक आहे. नो एक्स्क्युस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

http://www.firstpost.com

सुबोध खरे
Fri, 02/16/2018 - 18:26 नवीन
http://www.firstpost.com/business/pnb-fraud-upa-govt-couldve-avoided-nirav-modi-scam-in-2013-says-ex-allahabad-bank-director-who-blew-whistle-against-loan-4353983.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

ति बातमी वाचली अगोदरच

अर्धवटराव
Fri, 02/16/2018 - 19:51 नवीन
२०१४ पुर्वीचं राष्ट्रीय सुरक्षा, पीकपाणी, आर्थीक क्षेत्रातले कन्सर्न... या सर्वांचं ब्रीफींग मोदी सरकारला निश्चीत देण्यात आलं असणार. या घोटाळ्यांची खबरबात सरकारला नव्हती हे काहि पटत नाहि. अर्थात, याला पुराव्यांचा काहि आधार नाहि. सरकार नामक अजस्त्र यंत्रणा प्रत्येक क्षेत्राची इत्थंबूत माहिती ठेवते असं म्हणतात. नोटाबंदी वगैरे करण्यासोबत असल्या चालु आणि होऊ घातलेल्या घोटाळ्यांना चाप लावता आला असता असं एक नागरीक म्हणुन भाबडी आशा होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

....

manguu@mail.com
Fri, 02/16/2018 - 20:02 नवीन
नोटाबंदीच्या काळातच , त्या डिसेंबरातच नीरव मोदीच्या घरी कुणाचे तरी लग्न झाले. नोटाबंदीत देश तडफडत असताना ऊपरवाले की किर्पा से कार्य निर्विध्न पार पडले. नीरव तेंव्हाच पळून जाणार होता , २०१६ साली. http://www.wionews.com/india-news/this-is-how-nirav-modi-planned-his-safe-exit-from-india-33071
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

इंट्रेस्टींग

अर्धवटराव
Sat, 02/17/2018 - 00:05 नवीन
पण त्यात आश्चर्य वाटण्यालायक काहि नाहि. इतका मोठा स्कॅम करणारा माणुस परतीचे मार्ग आखुनच पुढे जात असणार. सरकारी आशिर्वादाने अगदी राजरोसपणे असले एक्सीट यापुर्वी देखील झाले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

उगाच असे कसे होऊ शकते, तसे

बिटाकाका
Fri, 02/16/2018 - 07:38 नवीन
उगाच असे कसे होऊ शकते, तसे कसे होई शकते यापेक्षा त्यांना भारतातून बाहेर न जाऊ देण्यासाठी सरकार कायद्याने काय करू शकत होते सांगा. ती बँक स्वतः सांगतेय की त्यांनाच ३ जानेवारीला पहिल्यांदा संशयास्पद व्यवव्हर, तेही २८० कोटींचे, सापडले. त्याच्या चौकशीत हा सगळा घोळ बाहेर आला तेव्हा २९ ला २८० साठी तक्रार दाखल करण्यात आली. ११५०० ची तक्रार १४ फेब ला करण्यात आली. बाकी काही हजार कोटींच्या खालचे घोटाळे करायचेच नाहीत हा मागच्या सरकारने घातलेला पायंडा दुर्लक्ष करून आता त्या आर्थिक गुन्हेगारांना बाहेर घालण्याचा पायंडा आलाय वगैरे दाखविण्याचा आटापिटा कीव करण्याजोगा आहे असे मला वैयक्तिकरित्या वाटते. असो, त्या आर्थिक गुन्हेगाराच्या प्रायव्हेट पार्टीमध्ये जाणारे, मोदी डावोसमध्ये भारताचे पंतप्रधान म्हणून गेले असताना, सोबत फोटो कसा काय काढला म्हणून ओरडत आहेत हे पाहून खूप मौज वाटली. अपेक्षितच आहे म्हणा. जनता सब जानती है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

एका पक्षाच्या,

पुंबा
Fri, 02/16/2018 - 15:30 नवीन
एका पक्षाच्या, विचारप्रणालीच्या दावणीला बांधले जाऊन अत्यंत असभ्य भाषेत भुंकणार्‍या ट्रोलांना मिपाईतके अनुकूल वातावरण अन्य कोठे असेल असे वाटत नाही. केवळ आपल्याला पटत नाही अश्या पक्षाला, विचारसरणीला गलिच्छ नावाने उल्लेखायचे प्रकार सहन कसे केले जातात काय माहित नाही. सन्मानपुर्वक चर्चा व्हायची हा इतिहासच म्हणायचा का?
  • Log in or register to post comments

अगदी खरे,

प्रचेतस
Fri, 02/16/2018 - 15:34 नवीन
अगदी खरे, आणि दोन्ही बाजूंना असे लोक आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

प्रचंड सहमत!

हतोळकरांचा प्रसाद
Fri, 02/16/2018 - 15:39 नवीन
प्रचंड सहमत! एकतर वेडंवाकडं बोला, किंवा डुआयडी म्हणा किंवा वैयक्तिक उखाळ्या पाखाळ्या काढा! कामातून थोडं बरं वाटावं, मत मांडता यावं म्हणून इकडे यावं तर आजकाल हि परेशानी! मजा नाय राव!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

अगदी सहमत.

राही
Sat, 02/17/2018 - 19:01 नवीन
अधिकतर मिपावरच अशी भाषा आणि वैयक्तिक हल्ले दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

भाजपच्या नगरच्या उपमहापौराने

हतोळकरांचा प्रसाद
Fri, 02/16/2018 - 15:45 नवीन
भाजपच्या नगरच्या उपमहापौराने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी अपशब्द बोलल्यामुळे वातावरणात तापल्याची बातमी मटा दाखवत आहे. (बातमी खरी असल्यास) भाजपला बुडवायला विरोधकांची गरज नाही. असले लोकच पुरेसे असल्याचे चित्र दिसत आहे.
  • Log in or register to post comments

हो

manguu@mail.com
Fri, 02/16/2018 - 15:54 नवीन
मटाला बातमी आहे. गुन्हा दाखल झाला आहे. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/ahmednagar-news/deputy-mayor-of-ahmednagar-booked-for-objectionable-remarks-against-chhatrapati-shivaji-maharaj/articleshow/62945849.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

हिच ती क्लिप

प्रसाद_१९८२
Fri, 02/16/2018 - 16:45 नवीन
या भाजपाच्या लोकांना सत्तेचा कसला माज चढलाय ते या श्रीपाद चिंदमच्या बोलण्यातून दिसते. थेट छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यापर्यंत मजल गेली यांची. ----- ---- https://www.youtube.com/watch?v=kBHfw2aQAsg
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

निषेध निषेद निषेद ..!!

विशुमित
Fri, 02/16/2018 - 18:16 नवीन
वा! काय सुसंस्कृत भाषा!! काय सुसंस्कृत पातळी!!! ..... काय पार्टी विद डिफरेन्स!!!! ..... काय त्या घोषणा!!! छत्रपती का आशीर्वाद, चलो चले खाजपके साथ!!!! .... श्रीपाद छिंदम तुझं कसं रं काय, खाली मुंड वर पाय..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२

...

manguu@mail.com
Fri, 02/16/2018 - 19:10 नवीन
साहेब फरार झालेत म्हणे. भाजपाच्या काळात काहीही गंभीर घडलं की संबंधित लोक लगेच फरार होतात .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

काँग्रेसच्या काळात फ्रॉड

सुबोध खरे
Fri, 02/16/2018 - 19:32 नवीन
काँग्रेसच्या काळात फ्रॉड केलेलय व्यक्ती तुरुंगात बसून मज्जा करीत आणि पैसे कधीहि परत आल्याचे दिसले नाही. १९९२ साली हर्षद मेहतांच्या घोटाळा झाल्यांनतर पैसे परत आल्याचे किंवा त्याची मालमत्ता जप्त केल्याचे ऐकले नाही. २२०० कोटीच्या घोटाळ्यासाठी त्यांच्यावर खटला भरून त्याना ५ वर्षाची शिक्षा झाली आणि त्यांना रुपये २५ हजार फक्त चा दंड झाला. शेवटी विकिलिक्स ने हर्षद मेहतांचे १ लाख ३५ हजार कोटी एकंदर १३ खात्यात स्विस बँकेत आहेत असे उघडकीस आणले. (२०११). "Black money in Swiss banks mainly from India". Wikileaks 88.80.16.63 Port 9999 (SSL enabled). याचे पुढे काही झाल्याचे ऐकिवात नाही. याउलट काल ११,००० कोटींचा घोटाळा उघडकीस आल्यावर ताबडतोब कार्यवाही करून ५२०० कोटीची मालमत्ता जप्तही झाली. https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/pnb-fraud-ed-seizes-rs-5100-crore-properties-in-nirav-modi-case/articleshow/62934540.cms असेच श्री मल्ल्या यांनी ९००० कोटी चा घोटाळा केला त्यापैकी ६६३० कोटी ची मालमत्ता जप्तही करण्यात आली आहे http://indianexpress.com/article/business/enforcement-directorate-attaches-vijay-mallyas-assets-worth-rs-6630-cr-3011418/ एवढे करूनही भाजप सरकारचीच नव्हे श्री नरेंद्र मोदींचीच सर्व चूक असते. बढिया है
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

१९९२ साली हर्षद मेहतांच्या

मार्मिक गोडसे
Sat, 02/17/2018 - 12:28 नवीन
१९९२ साली हर्षद मेहतांच्या घोटाळा झाल्यांनतर पैसे परत आल्याचे किंवा त्याची मालमत्ता जप्त केल्याचे ऐकले नाही. https://www.google.co.in/amp/s/m.timesofindia.com/city/mumbai/25-years-on-harshad-mehta-scam-recovery-continues/amp_articleshow/58664818.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मी याच्या उलट वाचले आहे.

सतिश गावडे
Sat, 02/17/2018 - 12:35 नवीन
मी याच्या उलट वाचले आहे. त्याचे पैसे आयकर विभागाकडे आहेत आणि त्याची बायको ते पैसे मिळवण्यासाठी लढा देत आहे. Harshad Mehta's wife fights to get back Rs 688 cr Return my money, Harshad Mehta's wife tells I-T dept
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

आता भक्तही फेकू लागलेत.

मार्मिक गोडसे
Sat, 02/17/2018 - 18:03 नवीन
आता भक्तही फेकू लागलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

3 दिवसात यांची औकाद कळली...

विशुमित
Fri, 02/16/2018 - 20:53 नवीन
https://www.facebook.com/mahancp.official.impupdates/posts/1207383952728571
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

भाजपाच्या काळात काहीही गंभीर

मामाजी
Fri, 02/16/2018 - 21:41 नवीन
भाजपाच्या काळात काहीही गंभीर घडलं की संबंधित लोक लगेच फरार होतात याचा साधा व सरळ अर्थ असा की काॅंग्रेस /यूपीए च्या काळात करोडोंचे घोटाळे करून इथे रहायला काहीही भीती नव्हती. परंतू आपल्या मता प्रमाणे आता अशा घोटाळेबाजांवर फरार व्हायची पाळी आली आहे. असो, नकळत का होइना, आपल्या सारखा मोदींचा मनापासून द्वेष करणार्याने पण हे मान्य केले की मोदींच्या शासनात घोटाळेबाजांवर फरार होण्याशिवाय दूसरा पर्याय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: manguu@mail.com

घोटाले पहले भी हुए लेकिन क्या

मार्मिक गोडसे
Mon, 02/19/2018 - 16:34 नवीन
घोटाले पहले भी हुए लेकिन क्या • सत्यम वाला राजू भाग पाया? • क्या सहारा श्री भाग पाया ? • क्या आसाराम भाग पाया ? • क्या तेलगी भाग पाया ? • क्या हर्षद मेहता भाग पाया ? • क्या हितेन दलाल भाग पाया ? नहीं सब पकड़े गये और सबको इसी देश के कानून ने दण्ड दिया लेकिन अब ? • ललित मोदी भाग गया • माल्या भाग गया • नीरव मोदी भाग गया • नीशल मोदी भाग गया • केतन मेहता भाग गया • मेहुल चौकसी भाग गया • जयेश भाग गया। चौकीदार इनसे मिला हुआ है। आए थे देश में विदेश से काला धन लाने।। और विदेश को देश का सफेद धन भेजने लगे।। जागो भारत जागो। 1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मामाजी

थापाथापी किती कराल?

अनुप ढेरे
Mon, 02/19/2018 - 16:49 नवीन
थापाथापी किती कराल? गोडसेजी ललित मोदी कधी पळाला सांगा की वाईच? आणि केतन मेहता कोणे नक्की? मला तरी सिनेमाचा डायरेक्टर केतन मेहता माहिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

भाजपाभक्त् नाचताहेत

manguu@mail.com
Fri, 02/16/2018 - 23:12 नवीन
छिंदम पूर्वी काँग्रेसचा होता , मग तो भाजपात आला. ही काँग्रेसची संस्कृती आहे म्हणे ... भाजप्यानी त्याला शुद्ध् करुन तिकिट दिले , संघाची टोपी दिली , मग आता दगड त्यानाच मारतील ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

विशुमित साहेब,

बिटाकाका
Sun, 02/18/2018 - 15:38 नवीन
विशुमित साहेब, अत्यंत संतापजनक प्रकार, मला खात्री आहे कि त्या व्यक्तीला योग्य धडा शिकवतील. पण मी काय म्हणतो, पक्षाच्या एका व्यक्तीने असं काही केलं की तो पक्षाचा अजेंडा असल्यासारखं संस्कार वगैरे काढण्यात येतात. मग त्याच पक्षाचे हे खालील बातमीतील खासदार, शाळेतील मुलांचा संडास बंद आहे म्हटल्यावर स्वतःच्या हाताने साफ करतात तेव्हा तो किती संस्कारी पक्ष आहे असे म्हणण्यात काही अडचण असेल काय? अर्थात डबल स्टॅंडर्ड नसतील तर! शिवाय एखाद्या पक्षाच्या नेत्याने बलात्कार, शिवीगाळ, गुंडागर्दी केली तर त्या पक्षांचेही संस्कार काढण्यात येतात काय? आवश्यकता भासल्यास संदर्भ देण्यात येतील. https://www.google.co.in/amp/s/m.timesofindia.com/india/watch-bjp-mp-cleans-school-toilet-with-bare-hands/amp_articleshow/62966899.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

मला वाटतंय तुम्ही माझा

विशुमित
Mon, 02/19/2018 - 10:33 नवीन
मला वाटतंय तुम्ही माझा प्रतिसाद पुन्हा चष्मा न घालता वाचला आहे. खाजप नावाचा एक पक्ष " छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन सत्तेत आला" आणि त्या पक्षाचे एक पाईक त्यांचा जाहीर अपमान करत आहेत. पायिका बरोबर तुमच्या आवडत्या पक्षाची पण लोक लक्तरे वेशीला टांगणारच ना. एका हाताने वाजणारे डब्लस्टन्डर्ड च डफडे वाजवण्या पेक्षा गळ्यात ढोल बांधा आणि दोन्ही साईडने बडवा. मी लेझीम बरोबर गजी डाव धरतो. ... मी त्या संस्कारी खासदारांची बातमी वाचली नव्हती. सगळ्याच बातम्या वाचल्या पाहिजेत आणि त्या लगेच ताज्या घडामोडीवर चिटकवल्या पाहिजेत. प्रत्येक बातमीचा प्लस मायनस करून जर त्या नल्लीफय झाल्या तर त्या पक्ष्याबाबत, त्या विचारसरणी बाबत ब्र काढायचा नाही असा कोणता नियम नसावा मिपा वर. बाकी त्या खासदारांचा आणि त्यांच्या संस्कारी पक्षाचा लय पुळका आला असेल तर अवश्य नवीन धागा काढा किंवा ताज्या घडामोडीवर ठळक अक्षरात प्रतिसाद टाकला असता तरी चालले असते. मी चष्मा काढून नक्की पोच पावती देईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिटाकाका
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा