✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

!! एक स्वप्नपूर्ती !! झिरो बजेट नैसर्गिक शेती

अ
अजित पाटील यांनी
गुरुवार, 02/01/2018 - 19:11  ·  लेख
लेख
तिन वर्षापूर्वी शेतीमध्ये नवीन काहीतरी सुरू करायच्या उद्देशाने शोध घ्यायला सुरुवात केली. इंटरनेट वर बरीच काही नवीन प्रोजेक्ट्स उपल्बध होते त्याचा अभ्यास सूरु झाला पण कोणाचा प्रोजेक्ट सध्याच्या शेतकऱ्याच्या परिस्थितीला अनकुल असा मला तरी वाटत नव्हता, कारण आपला शेतकरी बांधव कर्जाच्या अजगराच्या विळख्यात अडकला आहे तो जितका त्यातून सुटण्याचा प्रयन्त करेल तितका जास्त त्याच्या घट्ट अश्या विळख्यात अडकत आहे असे मला वाटते पण याला काहीतरी उत्तर असेल का म्हणून माझी शोध माहीम सुरूच ठेवाली. एक दिवस इंटरनेट वर शून्य खर्चाची नैसर्गिक शेती बदल माहिती मिळाली . पहिल्यादा वाचल्यावर थोडे मनाला पटलेच नाहीं करण आपण एकीकडे शेतकरी आत्महत्या बदल दररोज मीडिया न्यूज पेपर इंटरनेट वर वाचतो, की शेती खर्चिक असल्यामुळे कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहेत. मला सुरवातीला हे थोडे जादूच्या गोष्टी सारखे वाटले. कारण जो तो नवीन काहीं शोधून शेतकरायला लुबाडण्याचे षड्यंत्रत विकत होते. अमुक एक आमच्या कढून विकत घ्या आणि भरगोस फायदा मिळवावा जो की शेतकऱ्याला कधीच मिळाला नाहीं, पण या सर्वाचे मात्र भरगोस फायदा झाला असो.... उचुकता म्हणून वाचन सुरू केले आणि आदरणीय श्री सुभाष पालेकर गुरुजीनि शोधलेल्या या अनोख्या आशा शेती प्रणाली वाचून भारावून गेलो. पण पुस्तकात शेती ही नेहमी सोपी वाटते प्रत्यक्षात कुठे आणि हे सर्व कसे समजेल याचा शोध सुरु झाला. एक दिवस असेच माझा मित्र विनोद पाटील शी बोलताना त्याने त्याचा मित्र संतोष याच्याबद्दल माहिती दिली जो काही दिवसांपासून याचा अभ्यास आणि अवलंब सुरू केला आहे . मग काय लगेच फोन करून मी , विनोद पाटील आणि विजय भेटायला गेलो. आमची चर्चा सुरू झाली संतोष ने प्रथम त्याचा या प्रवासाबद्दल माहिती दिली आणि नंतर या शेती प्रणालीबद्धल माहिती द्यायला सुरुवात केली आम्ही सर्व काही ऐकत होतो एक एक गोष्टी जादू सारखी वाटत होती. संतोष भारावून सर्व काही सांगत होता आम्ही मध्ये मध्ये आमचे प्रश्न विचारत होतो व संतोष त्याला योग्य ते उत्तर देत होता . 2 ते 3 तास कसे गेले समजलेच नाही संतोष ने आम्हाला त्याच्या व्हाट्स अँप ग्रुप मध्ये सामील करून घेतले व युट्युब (Youtube) वरील मिलिंद काळे यांनी रेकॉर्ड केलेली गुरुजीच्या शिबिराच्या विडिओ चा लिंक दिल्या . हे विडिओ म्हणजे जणू अल्लीबाबाच्या गुहेचा दरवाजा उघडावा आणि आतील हिरे माणिक दिसावे असे झाले . मग काय वेळ मिळेल तसे विडिओ बघायला सुरवात झाली. मी शेतीमध्ये खुप काही काम केले नसल्यामुळे समजायला थोडे अवघड जात होते पण गुरुजी एक एक मुद्दे पूर्ण मुद्देशीर समजवत होते.ऑफिस मध्ये मी आणि सत्यजित आणि विश्वचेतन चहाच्या सुटीत आम्हाला न समजलेल्या गोष्टी बदल बोलू लागलो संतोष ला कॉल करू लागलो ग्रुप मध्ये विचारू लागलो ग्रुप मध्ये केशव जी आम्हाला मार्गदर्शन करू लागले आणि आमचा प्रवास सुरु झाला.

इथे पर्यंत सर्व काही सुरळीत सूर होते पुढील लढाई अवघड होती ज्याची कल्पना संतोष ने आधीच दिली होती, की आपल्या घरच्यांना हे सर्व समजून सांगणे आणि शेती मध्ये अवलंब करणे. पण जेव्हा तुमचो इच्छा शक्ती असते तेव्हा मार्ग मिळतो. लॅपटॉप वर सर्व विडिओ डाउनलोड केली आणि गावी गेल्यावर आमचे मोठे बंधू आनंद पाटील याला ते दाखवू लागलो. त्याचा शेती माधील अनुभव खुप आहे तो खुपच पद्धशिर रित्या शेती करतो पण रासायनिक तो गुंठ्याचा अडीच ते 3 टन उसाचे उत्पन्न घेतो. त्याला त्याबद्दल बक्षीसीज पण मिळाले आहे. गावातील आणि भागातील बरीच शेतकरी त्याचा शेतीसाठी मार्गदर्शन घेतात . त्याला माझ्या सारख्या सॉफ्टवेअर मध्ये काम करण्याने ज्याला शेती मध्ये कधीच आवड नव्हती त्याने शेती बदल सांगणे खुपच अवघड गोष्ट होती. प्रत्येक वेळी थोडे थोडे विडिओ दाखवू लागलो त्याचें प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयन्त करत होतो काही उत्तरे आमच्या ग्रुप मधून संतोष केशव देत होते. भाऊ मला बरेच उदाहरणे देत होता की अश्या सारख्या पद्धती कश्या गावातील लोकांनी अवलंबून त्याचा तोटा झाला आहे . आपल्या समाजात चांगली गोष्ट प्रसार व्हायला वेळ लागतो पण अपयशाची गोष्ट लवकर प्रसार होती . मी त्याला विचारले कि ज्याचा तोटा झाला त्याने सर्व पद्धतीचा अवलंब योग्य पद्धतीने केला होता का ? ही वरील लढाई सुरू असताण मी माझ्या फ्लॅट मधील गच्चीवर माझे प्रयोग सुरू झाले. सुरवातीला माझ्या मंडळींना तयार करणे अवघड होते तिला तशी आवड होती पण फुलाच्या बागेची पण मी त्याला विरोध केला होता करण ती झाडे फार काळ टिकत न्हवती. मग तिनेच आणलेल्या कडीपत्याच्या बियापासून सुरवात केली कारण दररोज नेहमी फोडणी देताना त्याची आवर्जुन आठवण यायची कारण तो एक तर सुकलेला असायच किंवा नसायचा. गावाकडून माती आणली होती बिया टाकल्या या अनोख्या प्रोयोगाची सुरवात झाली. आता जीवामृत कोठून कसे आणायचे हा मोठा प्रश्न होता पण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा ध्यास घेता तेव्हा निसर्ग तुम्हाला आवश्यक गोष्टी चा पुरवठा करू लागतो. माझे सायकलिंग नुसतेच सुरू झाले होते आणि आम्ही घोरवडेश्वर ला जायला सुरवात केली होती तिथे तेथील एक रहिवाशी दररोज त्याच्या देशी गायी डोंगरावर चरायला सोडत होते. त्याची ओळख करून त्याच्या कडून शेन आणि गोमूत्र मिळाले ते घेऊन पहिल्यादा फ्लॅट मध्ये जिवामुर्त तयार झाले मला शेणाच्या वासाची सवय हाती पण सौ ना थोडा त्रास झाला. आमचा कडीपत्ता चे रोप तयार होते वांगी टॅमोटो भेंडी लावली होती सर्वाना जीवामृत दिले आणि काहीच दिवसात आम्हाला या पद्धतीची प्रचीती यायला सुरुवात झाली मुलांना पण खुप आनंद होत होता घरी असे काहीतरी पाहायला मिळत होते.

पहिली परीक्षा पास झालो होतो पुढील लढाई अवघड होती मागील वर्षी योगायोगाने एक 4 ते 5 गुंठाचा प्लॉट रिकामा होता संधी चालून आली होती मी भावाला बोललो आपण या प्लॉट मध्ये zbnf ने ऊस आणि भाजीपाला घेऊ. मी त्याला विचारले तुझा या शेतात रासायनिक शेतीत किती ऊस निघेल तो बोलला 5 ते 6 टन मी बोललो जर हा प्रयोग जर काही कारणामुळे यशस्वी झाला नाही तर मी त्याचे पैसे देईन कारण माझ्या मनात विश्वास होता कि आपला हा प्रयन्त यशस्वी होणार. मग काय झाली ना या अनोख्या अशा प्रवासाची सुरवात, सुरवातीला बऱ्याच अडचणी होत्या कारण कुंडीमध्ये झाडे लावने आणि मोठया शेतीमध्ये हा प्रोयोग करणे खुपच फरक होता आणि प्रथम ही पद्धत अवलंब होत होता त्यामुळे नेमके कसे आणि कधी हे प्रश्न होतेच. परंतु केशव आणि संतोष आणि इतर ग्रुप मेंबर्स चे अनुभव आणि मार्गदर्शन सुरूच होते एक एक गोष्टी स्वप्नासारखे घडत होत्या. सुरवातीला एक आश्चर्याचा धक्काच बसला माझ्या वर्ग मित्र मानशिंग कडे गावी घनामृत मिळाले त्याला प्रदशनात गुरुजींची पुस्तके मिळाली होती ती वाचून त्याचा प्रयत्न सुरू होता गोमूत्र पण त्याने गोळा करून ठेवले होते त्यामुळे जिवामुर्त चा प्रश्न सुटला होता.

जे काही उपलब्ध आहे आणि जसे जमेल तसे सुरवात झाली आढकळत सावरत प्रवास सुरु झाला आई बाबाची मदतीला आले. 7*2 उसाचे मॉडेल ठरले आणि मध्ये भाजीपाला घायचा ठरला . थोड्याच दिवसात आमचा प्लॉट सुंदर असे रूप घ्यायला लागला हे पाहून मनात आनंद होत होता पण हि नुसती सुरवात झाली होती. प्रथमच नैसर्गिक भाजी मिळणार होती, कधी नाही इतके भाजीचे उत्पादन झाले होतं 16 ते 18 प्रकारची भाजीपाला इतक्या छोट्या शेतातून मिळत होता हे सर्व करताना कष्ट तर होते कारण भाजीपाला नियोजन काढणी इत्यादी सुरू होतेच परंतु बाजारातून भाजी विकत आणणे पूर्ण बंद झाले होते. आता गुरुजींच्या शून्य खर्च च्या नैसर्गिग शेतीची प्रचिती येत होती.

भाजीपाला चांगला आला होता पण ऊस काही वाढ होत नव्हती बरोबरची रासायनिक उसाची वाढ झपाट्याने होत होती, त्यामुळे भावाकडून टोमणे मिळत होते मग केशव जी ना विचारणा केली त्यांनी सांगितले सुरवातीला यामध्ये उंची कमी वाढते करण मुळाची वाढ जास्त होते मग थोडे हायसे वाटले.

 

11 महिन्यांनी उसाची उंची चांगली वाढली त्यामुळे भाजीपाला बंद झाला. पुढील अव्वान होते ते चांगले गुळाळ शोधणे जो नैसर्गिक पद्धतेने गुळ तयार करेल जसे वरती बोललो तसे गावापासून जवळच गुळाळ असलेले समजले आणि आनंदाला पारावार उरला नाही. मग ठरले गुळ बनवायचा आव्हाने तर भरपूर होते ऊस तोडणे, घेऊन जाणे पण भावाने हे आव्हान खुबीने पेलून 20 जानेवारी 2018 शनिवार रात्री 11 वाजता ऊस गुळाळावर घेऊन गेला. दुपारी आईचा फोन आला पुण्यात भरपूर कामे होती पण सर्व बाजूला ठेऊन रात्रीच्या बस ने कोल्हापूर ला रवाना झालो आणि रविवारी सकाळी घरी पहाटे 5 वाजता हजर झालो.. दुपारी आमचा नंबर होता थोडी झोप घेऊन शेतात जाऊन आलो मग गुळाळावर जाऊन आलो. 3 वर्षाच्या प्रतिक्षेचे आज प्रत्येक्षात घडणार होते दुपारी 2 ला सगळे साहित्ये घेईन परत गेलो आणि सुरू झाली ती लागभग उसाचे वजन झाले 2750 किलो ऊस झाला थोडा ऊस 2 घाण्याला कमी पडत होता एकाला जास्त होता भाऊने गुळाळाच्या मालकाशी विचार करून 2 घाणे घ्यायचे ठरवले एक 1350 आणि एक 1400 किलो. शेतातून भेंडीची झाडे आणली होती ऊस फोडणी सूर झाली रस गोळा होऊ लागला होता आनंदाला पारावार च नव्हता सर्व गोष्टी डोळ्यामध्ये आणि कॅमेऱ्यामध्ये बंद करण्याचे सुरू होते रस कायली मध्ये आला आणि उखळू लागला चुना आणि भेंडी टाकली तशी उसाची मळी वरती येऊ लागली गुळवे काका आपले काम खुबीने सुरू होते मध्ये मध्ये रस उखळी देऊन रसाची अवस्था तपासून पाहत होते आणि टेस्ट करून सर्वाना इशारा देण्यासाठी तयार होते. जशी युद्धाला सैनिक नायकाचा इशाऱ्याची वाट पाहत असतात तशी सर्व जण आपापली आयुधे घेऊन तयार होती. इशारा झाला उखळती कायली रोलर वर उचलून वाफ्यामध्ये रस ओतला आणि कायली मागे सरकली, तसे सगळी मंडळी रस फवाड्याने घोटण्यामध्ये गुंग होती कोणी इकडे कुणी तिकडे रस ढकलत होते आणि गूळ भरायची सुरवात झाली काही मिनिटातच सर्व ऊस 1 किलो च्या भांड्यानमध्ये भरून झाला 161 किलो गूळ तयार झाला होता सर्व काही होत होते त्यावर विश्वास बसत न्हवता पण हो स्वप्न पूर्ण झाले होतं सर्वांच्या कष्टाचं चीज झाले होते दुसर्या घाण्यातून 187 किलो असा ऐकून 348 किलो गूळ तयार झाला होता.

 

 

या प्रवासमध्ये खुप काही शिकायला मिळाले सुरवात होती त्यामुळे चुका ही झाल्या त्या येत्या प्रवासात सुधारण्याचा प्रयत्न करेन माझे यामध्ये फारच कमी सहभाग होता माझा भाऊ आनंद पाटील आई बाबा वहिनी भावाची मुले यांचे कष्ट या मागे होत तसेच माझी बायको आणि मुले आणि या माझा वेडा ला समजून घेतले आणि साथ वेळ दिला. मी प्रथम आदरणीय श्री सुभाष पालेकर गुरुजींचे आभार मानतो ज्यांनी सुंदर अशी शेती पद्धती शेतकऱ्यांना शोधून दिली आहे मला वाटते हीच पद्धत शेतकऱ्याला या आत्महत्येच्या अजगराच्या विळख्यातून सुटका करू शकेल तसेच संतोष केशशवजी याच्या अमूल्य अश्या मार्गदर्शन आणि कौतुकबद्दल मनपूर्वक आभार मानतो मिलिंद काळे यांचे खुप खुप आभार ज्यांनी zbnf ची विडिओ इंटरनेट वर सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून दिली आहेत सत्येजीत पाटील आणि विश्वाचेतन याची या प्रवासमधील मोलाची साथ मिळाली त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार तसेच प्रत्येक्ष वा अप्रत्येक्ष ज्यांनी या प्रवासात मदत कौतुक आणि साथ दिली त्याचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानून माझ्या या स्वप्न प्रवासाचे लेखन पूर्ण करतो

अजून खुप मोठा प्रवास आहे ही नुसती सुरवात आहे!! !! एक पाऊल पुढे !! अजित पाटील पोखले For more information about zbnf Please visit http://www.palekarzerobudgetspiritualfarming.org/zbnf.aspx
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
221229 वाचन

💬 प्रतिसाद (112)

प्रतिक्रिया

खूप छान, आणि स्फुर्तीदायक.

खटपट्या
गुरुवार, 02/01/2018 - 20:40 नवीन
खूप छान, आणि स्फुर्तीदायक. आता तुम्हाला खर्च कीती आला आणि उत्पादन किती मिळाले त्याचा हिशोब दीलात तर बरे होइल. अगदी डिटेल नाही दीलात तरी चालेल. ढोबळ हिशोब सांगितला तरी चालेल...
  • Log in or register to post comments

ढोबळ हिशोब सांगितला दिला आहे

अजित पाटील
गुरुवार, 02/01/2018 - 21:50 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

फारच छान! शुभेच्छा..

खेडूत
गुरुवार, 02/01/2018 - 20:42 नवीन
फारच छान! शुभेच्छा..
  • Log in or register to post comments

तुमच्या धाडसाचे व कष्टांचे

एस
गुरुवार, 02/01/2018 - 21:59 नवीन
तुमच्या धाडसाचे व कष्टांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. मनःपूर्वक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

अत्यंत स्पृहणिय उपक्रम !

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 02/01/2018 - 22:22 नवीन
अत्यंत स्पृहणिय उपक्रम ! भारताला तुमच्या सारख्या धाडसी आणि उपक्रमी तरुणांची गरज आहे ! नोकरी एके नोकरी काय सगळेच करतात, पण अगदी विकसित देशांनाही असेच उपक्रमी लोक पुढे नेतात. तुमचे अनुभव आमच्यासाठी इथे लिहिल्याबद्दल अभिनंदन आणि आभार !
  • Log in or register to post comments

उत्तम उपक्रम .. असेच नवीन

गवि
गुरुवार, 02/01/2018 - 22:44 नवीन
उत्तम उपक्रम .. असेच नवीन प्रयोग करत रहा. झीरो बजेट ही कन्सेप्ट नीट समजली नाही. बिन भांडवलाची शेती का? जीवामृत किंवा अन्य काही घटक कुठूनतरी मिळाले / मिळवले असा उल्लेख आहे. पण झीरो बजेट या संकल्पनेशी इतर वर्णनाची सांगड बसवल्यास रोचक वाटेल. या पद्धतीने आलेलं पीक , उत्पन्न नेहमीच्या (रासायनिक अथवा तत्सम) पद्धतीपेक्षा जास्त आलं किंवा कमी.. किती जास्त आलं, नेमका प्लस पॉइंट काय हे सर्व आणखी एका लेखात विस्तारित करावं ही विनंती.
  • Log in or register to post comments

झीरो बजेट ही कन्सेप्ट

अजित पाटील
गुरुवार, 02/01/2018 - 23:23 नवीन
लेखाच्या सुरवातीला विडिओ लिंक दिली आहे एकाद्या पूर्ण बघा आणि तरीही काही शंका असेल तर मला कॉल करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अरे वा! कालच श्री सुभाष

रुपी
Fri, 02/02/2018 - 00:15 नवीन
अरे वा! कालच श्री सुभाष पालेकर यांच्या झिरो बजेट शेती प्रयोगांबद्दल वाचलं. फोटोतली वांगी काय दिसत आहेत! तुमचे प्रयत्न खूप कौतुकास्पद आणि स्फूर्तीदायक आहेत.
  • Log in or register to post comments

अत्यंत स्पृहणिय, अभिनंदन !

शेखरमोघे
Fri, 02/02/2018 - 01:31 नवीन
अत्यंत स्पृहणिय, अभिनंदन ! अनुभव लिहिल्याबद्दल आभार! जर रासायनिक पद्धत वापरली असती तर उसाकरता आणि गुळाकरता काय काय वापरावे लागले असते?
  • Log in or register to post comments

आभारी आहे

अजित पाटील
Fri, 02/02/2018 - 07:06 नवीन
जर रासायनिक पद्धत वापरली असती तर उसासाठीं रासायनिक खते , तणासाठी रासायनिक फवारणी आणि गुळासाठी वेगवेगळी रासायनिक घटक.वापरतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखरमोघे

अभिनंदन

चाणक्य
Fri, 02/02/2018 - 07:13 नवीन
फार मस्त प्रयोग केलात. अॅग्रोवनला संपर्क करा, त्याद्वारे अजून शेतक-यांपर्यंत पोचवता येईल हा प्रयोग.
  • Log in or register to post comments

मनःपूर्वक शुभेच्छा!

नावातकायआहे
Fri, 02/02/2018 - 08:20 नवीन
मनःपूर्वक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

मनापासून अभिनंदन

महेश हतोळकर
Fri, 02/02/2018 - 09:30 नवीन
असं काहीतरी सकारात्मक वाचायला बरं वाटतं. माझ्याकडेही तुमच्या फ्लॅटसारखी थोडी जागा आहे. मलाही गच्चीवरच्या बागेचा प्रयोग करायचा आहे. काही शंका आहेत.
  • जीवामृत किती वापरावे लागवे?
  • किडीच्या प्रादुर्भावावर काय उपाय केलात?
  • भाज्या काढल्यानंतर उरलेला ओला कचरा शेतातच जिरवलात का कसं?
  • रासायनीक शेतीच्या तुलनेत पाणी कमी लागतं का जास्त?
अजूनही आहेत. नंतर विचारेन.
  • Log in or register to post comments

आणखी एक राहिलं

महेश हतोळकर
Fri, 02/02/2018 - 09:37 नवीन
लिहीत रहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर

आभारी आहे

अजित पाटील
Fri, 02/02/2018 - 11:39 नवीन
कृपया वरती दिलेले विडोये किंवा गुरुजींचे शिबीर करा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील चला पुन्हा निसर्गाकडे – भाग 2 - "चला पुन्हा निसर्गाकडे", खास करून फक्त शहरातील लोकांसाठी एक दिवसीय संवाद शिबिर: 1. https://www.youtube.com/watch?v=75wkk1mdHIE 2. https://www.youtube.com/watch?v=M0KCfhx5H2M Terrace Garden 3. https://www.youtube.com/watch?v=2vT5vqXcKeM https://www.youtube.com/watch?v=xwe5T-N3wU0 शेती साठी 1. https://www.youtube.com/watch?v=GuKR_dOioGU
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर

फार फार अभिनंदन अजित साहेब.

sagarpdy
Fri, 02/02/2018 - 11:27 नवीन
फार फार अभिनंदन अजित साहेब.
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण लेख

पिवळा डांबिस
Fri, 02/02/2018 - 11:31 नवीन
तुमच्या यशाबद्द्ल मनापासून अभिनंदन. आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

तुमची चिकाटी, जिद्द आणि

जागु
Fri, 02/02/2018 - 11:37 नवीन
तुमची चिकाटी, जिद्द आणि धाडसाला सलाम. तुमच्या संपूर्ण टिमचेच कौतुक. मी रोज वाचत असते सुभाष पाळेकरांच्या कार्यक्रमांबाबत. त्यांचेच एक कार्यकर्ते जोडपे श्री तुषार देसाई आणि सौ. विद्या देसाई हे आमच्या खास मित्रपरीवारातील आहेत. त्यांनी zbnf धान्य भाजांचा व्यवसाय चालू केला आहे लोकांपर्यंत विषमुक्त अन्न पोहोचावे म्हणून. मी त्यांच्याकडून नेहमी गहू घेते. तुमच्या पुढच्या शेतीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. तुमचे लेखन प्रेरणादायी आहे.
  • Log in or register to post comments

खुपच छान

अजित पाटील
Fri, 02/02/2018 - 11:55 नवीन
असेच आपण विश्वासाने एकमेकांना मदत केली पाहिजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

मी पण घरी लागवड केलेल्या

जागु
Fri, 02/02/2018 - 12:03 नवीन
मी पण घरी लागवड केलेल्या झाडांना, भाज्यांना रासायनिक खत बंद केले आहे. आता जमेल तेव्हा जीवामृत आणि शेणखताचाच वापर करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजित पाटील

मी पण घरी लागवड केलेल्या

जागु
Fri, 02/02/2018 - 12:03 नवीन
मी पण घरी लागवड केलेल्या झाडांना, भाज्यांना रासायनिक खत बंद केले आहे. आता जमेल तेव्हा जीवामृत आणि शेणखताचाच वापर करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजित पाटील

शुभेच्छा!

श्वेता व्यास
Fri, 02/02/2018 - 11:46 नवीन
तुमच्या प्रयत्नांना यश आलेलं वाचताना खूप छान वाटलं. तुमची शेती अशीच फळत राहो ही शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

. . ..

आशु जोग
Fri, 02/02/2018 - 12:28 नवीन
अविश्वसनीय पण सत्य
  • Log in or register to post comments

अभिनंदन. इथे शेअर केल्याबद्दल

प्राची अश्विनी
Fri, 02/02/2018 - 12:30 नवीन
अभिनंदन. इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अजित पाटील जी..

विशुमित
Fri, 02/02/2018 - 13:06 नवीन
सर्व प्रथम तुमचे मी अभिनंदन करू इच्छितो. त्याला कारण हे आहे की- १. नोकरी सांभाळून तुम्ही शेतीमध्ये पथदर्शक प्रयोग (छोट्या क्षेत्रात का असेना) करून यश मिळवलेत. विशेष म्हणजे ३७ हजाराचा faydya sakat. २. स्थानिक मित्रांचे सहकार्य आणि त्याच बरोबर तुमच्या जवळ असलेल्या ज्ञानाचे आदानप्रदान. सर्वात महत्वाचे- ३. बॅलन्स शीट/ प्रॉफिट लॉस मांडण्याचा प्रयत्न. (अजून डिटेलिंग असणारा बनवण्याचा प्रयत्न करा) शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या यशाची हीच खरी गुरु किल्ली आहे. पण मोठ्या क्षेत्रासाठी (३ एकर च्या पुढे) झिरो बजेट/सेंद्रिय शेती व्यवहार्य नाही, हा माझा अनुभव आहे. मुळात झिरो बजेट असे काही नसते. बाकी ऊस जोरदार आला आहे. आणि फोटो एकदम लाजवाब. (एस्पेसिअल्ली मिरची आणि वांग्याची )
  • Log in or register to post comments

y

काजुकतली
Sat, 02/10/2018 - 14:50 नवीन
तुम्ही यु ट्युबवरचे विडिओ पहा, लोक कित्येक एकरावर झिरो बजेट करताहेत, रासायनिक पेक्षा जास्त उत्पन्न मिळवताहेत. गुरुजींचे अलिबागेत शिबिर आहे एप्रिल मध्ये. त्यात सहभागी व्हा व सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

सगळे करून झाले आहे.

विशुमित
Sat, 02/10/2018 - 17:30 नवीन
सगळे करून झाले आहे. रासायनिक आणि सेंद्रिय शेतीचा मिलाप च व्यवहार्य आहे, हे माझ्या स्वानुभवातून सांगतो आहे. इतरांना फायदा झाला असेल तर स्तुत्य आहे. यु ट्युबवरचे विडिओ मधील यशस्वी शेतकरी नेटवर्किंग कंपनीचे प्रचारक/सदस्यांसारखे बऱ्याच गोष्टी फुऊन सांगत असतात. ग्राउंड लेव्हलवर चित्र काही वेगळे असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काजुकतली

ग्राउंड लेव्हलवर चित्र काही

मार्मिक गोडसे
Sat, 02/10/2018 - 18:41 नवीन
ग्राउंड लेव्हलवर चित्र काही वेगळे असते. सेंद्रीय शेतीबद्दल crop care federation of india काय म्हणते http://www.misalpav.com/comment/701330#comment-701330
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

बरोबर आहे. शेतीच्या नावावर

काजुकतली
Sun, 02/11/2018 - 09:37 नवीन
बरोबर आहे. शेतीच्या नावावर काहीही चाललेले असते. यात ऑर्गनिक पद्धतीचा दोष नाही तर ती राबवणारा माणूस आपला शॉर्ट टर्म फायदा व्हावा म्हणून ही चोरी करतोय. त्याला वाटतेय तो पैसे कमावतोय व लॉंग टर्ममध्ये तो ते गमावतो. ऑर्गनिक शेती काशी करतात मला माहित नाही पण त्यात खर्च खूप असणार म्हणून अशी चोरी करायला माणसे उद्युक्त होतात. पाळेकर गुरुजी प्रणित नैसर्गिक शेतीत खर्च कमी होत जातो. पण सुरवातीला खूप मेहनत आहे. तुमची जमीन जंगलातल्या नैसर्गिक जमिनीसारखी निरोगी व्हावि म्हणून जिवामृताचा विरजणाचे वेळापत्रक पाळावे लागते. काहीच रसायने वापरत नसल्यामुळे सुरवातीला येणारे किडी व रोग रोखण्यासाठी सांगितलेले नैसर्गिक उपाय नियमित करावे लागतात. यांच्यात चालढकल केलीत तर पीक हातचे जाणार आणि तुम्ही नैसर्गिक शेती खोटी म्हणणार. एकदा तुमची शेती नीट इस्टेब्लिश झाली की हे सगळे कमी होते. पण आपल्याला पीक ईल्ड जास्तीत जास्त हवेच असल्याने संरक्षण हे करावेच लागते. बऱ्याच लोकांनी असेच अर्धवट तंत्र वापरून गुरुजींवर फेक म्हणत आरोप केलेत. पण गुरुजींनी जे तंत्र सांगितले ते डोळे झाकून जसेच्या तसे निदान एकदातरी करा. अर्धवट करून अपयश मिळणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

y

काजुकतली
Sat, 02/10/2018 - 14:51 नवीन
तुम्ही यु ट्युबवरचे विडिओ पहा, लोक कित्येक एकरावर झिरो बजेट करताहेत, रासायनिक पेक्षा जास्त उत्पन्न मिळवताहेत. गुरुजींचे अलिबागेत शिबिर आहे एप्रिल मध्ये. त्यात सहभागी व्हा व सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

अभिनंदन

सुमीत भातखंडे
Fri, 02/02/2018 - 13:12 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा. खूप छान वाटलं वाचून.
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा !

कपिलमुनी
Fri, 02/02/2018 - 13:40 नवीन
नोकरी संभाळून हा उपक्रम केल्याबद्दल अभिनंदन ! बागेतील शेती करणार्‍यांनी आवर्जुन करावा असा प्रयत्न आहे. डिटेल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments

हे शाबास!

पैसा
Fri, 02/02/2018 - 17:36 नवीन
प्रयोग आवडला! रिकाम्या चर्चांपेक्षा असे काही केलेले उत्तम!
  • Log in or register to post comments

+1

हरवलेला
Sun, 02/18/2018 - 02:54 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

खुप छान प्रयोग...

रंगीला रतन
Fri, 02/02/2018 - 23:06 नवीन
खुप छान प्रयोग...पण वर विशुमित ह्यंनि म्हंट्ल्या प्रमाणे मोठ्या क्षेत्रा साठी कितपत फायदेशीर ठरेल सांगता येणे कठिण आहे.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सुखीमाणूस
Fri, 02/02/2018 - 23:12 नवीन
हा प्रयोग मोठ्या प्रमाणात यशस्वी होवो ही सदिच्छा
  • Log in or register to post comments

मस्त हो....

मुक्त विहारि
Sat, 02/03/2018 - 00:51 नवीन
लगे रहो.
  • Log in or register to post comments

साक्षात

नाखु
Sun, 02/04/2018 - 15:31 नवीन
मान्यवरांच्या प्रतिक्रिया झाल्यावर मी काय सांगणार? वा खु साठवली आहे नक्की भेट द्यावी म्हणतोय. शहरातील अनभिज्ञ नाखु ता क गेली तीन वर्षे ओला कचरा घरच्या घरी जिरवायचा प्रयोग यशस्वीपणे​ राबविण्यात येत आहे
  • Log in or register to post comments

मी गेली २ वर्षे. एकही हरित

तेजस आठवले
Sun, 02/04/2018 - 17:11 नवीन
मी गेली २ वर्षे. एकही हरित कचऱ्याची काडी घराबाहेर जाऊ दिली नाहीये.सध्या माझ्या गॅलरीत साधारण ४ कुंड्यात लावलेल्या रोपांना, नवजात धरून १४ टोमॅटो लागले आहेत. अवांतर, मक्याचे कणीस दाणा खाऊन झाल्या नंतर कुंडीत टाकले होते, साधारण आज ८ महिन्यांनी ते आतून पूर्णपणे कुजले आहे परंतु बाहेरून त्याचा कडकपणा शाबूत आहे. माझ्या मते पूर्णपणे विघटन होण्यास अजून सहा महिने जातील. त्यामुळे गुरे ही सेल्युलोज आधारित खाद्य पचवू शकतात हे आपल्यावर खरंच उपकार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

मी पण ओल्या कचर्‍यातल एकही

जागु
Wed, 02/07/2018 - 14:10 नवीन
मी पण ओल्या कचर्‍यातल एकही साल कचर्‍यात टाकत नाही. थेट एखाद्या कुंडीत किंवा खत करण्याच्या जागेत टाकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले

मक्याचे कणीस हातोड्याने बारीक

पिंगू
Wed, 02/07/2018 - 14:46 नवीन
मक्याचे कणीस हातोड्याने बारीक करुन मातीत मिक्स केले. सहा महिण्यात कुजून मातीत मिसळले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले

सत्तरच्या काळात ट्रॅक्टरचा

कंजूस
Sun, 02/04/2018 - 16:51 नवीन
सत्तरच्या काळात ट्रॅक्टरचा प्रसार वाढू लागला तेव्हा त्यातील संभाव्य धोकेही लोकांना सांगायला हवे होते. १) डिझेलचा वापर २) ओटो उद्योगांवर अवलंबून राहाणे ३) गुरे नाहीशी झाल्याचा परिणाम.
  • Log in or register to post comments

तुमचा प्रयोग यशस्वी

मनिमौ
Sun, 02/04/2018 - 19:51 नवीन
ठरला हे वाचून खूप आनंद झाला. भाज्या अगदी रसरशीत दिसत आहेत. रंगाची चमकच भाजी चवदार असेल हे सांगतेय. जीवामृत कसे आणी किती दिलेत हे सविस्तर लिहिले तर बरे होईल
  • Log in or register to post comments

झकास!तुमचे आणि या तुमच्या

नूतन सावंत
Sun, 02/04/2018 - 22:30 नवीन
झकास!तुमचे आणि या तुमच्या पयोगाला पाठिंबा देणाऱ्या तुंव्ह्या परिवाराचे अभिनंदन.आंब्याच्या बागेत रासायनिक खते न वापरता अमृतवण्याचा उपयोग करून उत्पन्न घेतले होते आताही बाल्कनी बागेत घरच्या कचऱ्यावर भाज्या पिकवत असते,
  • Log in or register to post comments

...

manguu@mail.com
Wed, 02/07/2018 - 12:43 नवीन
छान ..
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि खूप शुभेच्छा.

अनिंद्य
Wed, 02/07/2018 - 13:08 नवीन
अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. अनिंद्य
  • Log in or register to post comments

खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!

राघव
Wed, 02/07/2018 - 14:21 नवीन
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा! :-)
  • Log in or register to post comments

खूप खूप अभिनंदन. इतकं

पिशी अबोली
Wed, 02/07/2018 - 14:23 नवीन
खूप खूप अभिनंदन. इतकं सकारात्मक काही वाचून आनंद झाला.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

झेन
Wed, 02/07/2018 - 14:53 नवीन
अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

अभिनन्दन

अरविंद कोल्हटकर
गुरुवार, 02/08/2018 - 00:50 नवीन
हा प्रयोग करून अनुभवाचे बोल सांगितल्याबाबत अभिनंदन आबि धन्यवाद. ह्याचा पुरेसा प्रसार व्हायला हवा आणि शेतकर्‍यांना नवी दिशा मिळायला हवी. मला शेतीचा कसलाच अनुभव नाही हे आधीच मान्य करतो. हे लिहिल्यावर माझा प्रश्न असा आहे की ह्या तन्त्रामध्ये ईश्वर, अध्यात्म अशा गोष्टींवर का भर दिला गेला आहे? वरच्या विडीओमध्ये असेहि सांगितले आहे की अध्यात्मावर आणि ईश्वरावर विश्वास नसेल तर ह्या मार्गाला शेतीचा नैसर्गिक मार्ग असे माना आणि काम सुरू करा. इतकेच पुरेसे नाही का? ईश्वर, अध्यात्म अशा गोष्टी चर्चेत आल्या की त्याचा परिणाम काय होईल ते सांगता येत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे शेणमूत गायीचेच असण्यावर इतका भार का दिला आहे? अन्य प्राण्याचे शेणमूत चालणार नाही काय? गायींच्या आणि अन्य प्राण्यांच्या शेणमुतामध्ये qualitative असा काही फरक आहे का? गाय ह्या प्राण्याचे हे अवास्तव दैवतीकरण आवश्यक आहे काय?
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा