Skip to main content

मनाचं प्लॉटिंग

लेखक फुंटी यांनी सोमवार, 22/01/2018 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मनात आहेत असंख्य Non Attached प्लॉटस गुंतत नाही मी सहसा कशात प्लॉटिंग करून ठेवलंय मी काटेरी तारेच्या कुंपणाने बंदीस्त लहान होतो तेव्हाही होतेच हे प्लॉट पण त्याला असायच काटेरी ठेवाच कुंपण त्यावर काटे असले तरी फुलही फुलायची अधूनमधून आता मात्र मनाचे प्लॉट रुक्ष व्यवहारांच्या काटेरी तारेने वेढलेले हल्ली कुंपणावर वाढवलेला वेल दिसायला सुंदर दिसतो मात्र त्याखालीअसतेच व्यवहारांचा पहारा कुणाशीही मोकळंढाकळ बोलावं असं नाही राहिलं अंगण प्रशस्त गेटमधून कुणी आलं बोलायला तरच बोलावं हेच झालंय आमचं हाय स्टॅंडर्ड
लेखनविषय:

वाचने 1479
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

छान! NA चं पुन्हा agriculture करुन घ्या की. :)

In reply to by प्राची अश्विनी

अग्रीकल्चर प्लॉटला भाव कवडीमोल येतो.आणि कुणी येऊन शेतीच करेल याची खात्री नाही ना... ;-)