२०१८ मधील काही महत्वाच्या खगोलिय गोष्टी !
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
नमस्कार! उद्यापासुन नविन इंग्रजी व आंतरराष्ट्रिय वर्ष २०१८ सुरू होत आहे त्यानिमित्त काही मोजक्या २०१८ मधील खगोलिय घटना इथे थोडक्यात देत आहे.
१. जानेवारीमध्ये २ पोर्णिमा व १ चंद्रग्रहण आहेत. पहिल्या पोर्णिमेला ( २ जानेवारी, पौष पोर्णिमा ) आपण सुपरमुन बघू शकतो.सुपरमुन म्हणजे मायक्रोमुनच्या आकारापेक्षा १४ टक्के मोठा व पर्यायाने अधिक तेजस्वी चंद्र. हाच सुपरमुन परत माघ पोर्णिमेला म्हणजे ३१ जानेवारीला बघु शकतो. ऐकाच महिन्यात दुसरा सुपरमुन आला की त्याला ंब्ल्यु मुन ं असे पण म्हणतात.
२. २०१८ मध्ये ' संपुर्ण सूर्य ग्रहण ' नाही. केवळ २ छोटेसे सुर्यग्रहण आहेत. ( भारतातून दिसणार नाही) ़माञ २ संपूर्ण चंद्रग्रहण आहेत. व ते दोन्हीं भारतातून दिसु शकतील. पहिले चंद्रग्रहण ३१ जानेवारी व दूसरे २७,२८ जुलै मध्ये आहे.
३. तसे बघायला वेगवेगळ्या प्रकारचे १० उल्कावर्षाव आहेत. फक्त फेब्रुवारी व मार्च महिना सोडला तर प्रत्येक महिन्यांत काही ठराविक दिवशी उल्कावर्षाव आहेत.हे उल्कांचे प्रमाण ताशी १० ते ताशी १५० इतके वेगवेगळे आहे.
येथे मला मृग नक्षत्रातील ओरायनिडस् ह्या उल्कावर्षावाविषयी सांगाचचे आहे. अत्यंत मोहक दिसणारा व सहज ओळखू येणारा हा ताशी २० उल्का असा वेग असणारा उल्कावर्षावाचा अनुभव घेऊ शकता २१ ,२२ आक्टोबर रोजी.
४. स्पेस ऐक्स ह्या खाजगी अमेरीकन संस्थाचे २०१८ चे मानवांना चंद्रभोवती विशिष्ट जवळ नेऊन परत सुखरूप परत आणण्याचे व त्यायोगे स्पेस टुरिझम सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे मंगळावर वसाहत हा पण त्यांचा एक उद्देश आहे.
५. ईस्ञो १० जानेवारीच्या जवळपास ३१ उपग्रह एकाचवेळी सोडणार आहे.ह्यात अमेरीका व फिनलंडचे नँनो सैटेलाइट पण आहेत. तसे मार्च मध्ये चांद्रयान २ मार्फत मुन लँन्डर सोडणार आहे.ह्याव्यतिरिक्त नेहमीचे कम्युनिकेशन व नेव्हिगेशनचे काही सैटेलाइट २०१८ मध्ये आहेतच.
प्रतिक्रिया
छान माहिती.. हा धागा 2018
+१
उपयुक्त धागा. २१-२२ ऑक्टोबरचे
+१११
ब्लू मून
आपली माहिती बरोबर आहे.
अरे वा! छान धागा.
आज ३१ उपग्रह सोडून ईस्ञोने शतक
दुर्बिणी आणि टेलिस्कोपस (
प्रयत्न करेल.
करा लवकर शेअर. मला पण लवकर एक
आकाश निरीक्षण नवीन जागा सांगा.
मकरसंक्रांतीनिमित्त आकाशदर्शन
थेट प्रसारण , लाईव्ह स्ट्रिमिंग
स्पेसएक्स ने अपोलो