Skip to main content

अश्वत्थामा

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 06/11/2017 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या एका खोलवर अंधार्‍या कप्प्यामधे कुठेतरी दडपून टाकलेली तूझी आठवण,.... कधीतरी उफाळून बाहेर येतेच अचानक, मला नकळत...... आणि मग कोरड्या पडलेल्या जखमा परत भळभळू लागतात मनावर मोठा दगड ठेवून तूला लिहिलेले ते शेवटचे पत्र इतक्या वर्षां नंतरही.... जसेच्या तसे, डोळ्यांसमोर नाचत असते, मला आणि फक्त मलाच माहीत आहे ते पत्र लिहिण्याचे खरे कारण पत्रात खरे कारण लिहायची हिम्मत झाली नाही आणि तूझ्याबरोबर खोटं बोलायच नव्हत, (तू नेहमी प्रमाणे अचूक पकडलेच् असते) म्हणून मग शेवटी नाव लिहायचेही टाळले बर्‍याच वेळा मी माझी तुलना, अश्वत्थाम्याशी करतो पण खरेतर तो सुध्दा, माझ्या पेक्षा कितीतरी भाग्यवान.... कारण त्याला आपली जखम, जगापासून लपवावी लागत नाही… पैजारबुवा,
लेखनविषय:

वाचने 2844
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

झकास हो पैजारबुवा.

बुवा, डायरेक्ट आत पोहचली.. जियो..