Skip to main content

हे बारा नंबर म्हणजे काय हो...?

हे बारा नंबर म्हणजे काय हो...?

Published on 19/10/2017 - 17:46 प्रकाशित
बैलाच्या मटणाला बारा नंबरचं मटण म्हणतात; पण त्यामागचं काय कारण असेल? या बारा नंबरचा नेमका अर्थ काय? बरं नेमकी बाराच का? 11 का नाही? 13 का नाही? कोणाला काही माहिती आहे का?

याद्या 8103
प्रतिक्रिया 26

बैलाचं माहित नाही पण कदाचित असे धागे मिपाचे नक्की बारा वाजवतील असं वाटतंय! :)

In reply to by सुबोध खरे

काय आहे, की मला हा प्रश्न काही मित्रांनी विचारला. म्हणे, दुबईपर्यंत बारा नंबरच म्हंटलं जातंय. मग मी अनेक ठिकाणी माहिती घेतली, पण कुठेही माहिती मिळाली नाही. म्हणून उत्सुकतेपोटी हा विषय शेअरला. असो. अठराविश्वे दारिद्र्य हे जसं अपभ्रंशातून आलंय तसंच हे असेल... अठराच का एकोणीस का नाही किंवा एकवीस का नाही विद्युल्लता अकलूजकरांनी या वाक्प्रचाराचा वेध घेतला असता त्यांना सुनीताताई देशपांडे यांनी सांगितलं, की ते खरं तर अठराविशे दारिद्र्य आहे... 18 गुणिले 20 बरोबर 360... म्हणजे वर्षभर दारिद्र्य.... म्हणून अठराविशे दारिद्र्य... अठराविश्वे नव्हे.... असो... तसंच या 12 नंबरमागेही काही कारण असेल... उत्सुकता चाळवली... बाकी दुसरं काही नाही...

पण १२ कुठे म्हण्तेत बीफला? दसलंबरी म्हणतेत. बडेका, मोठ्ठाड (मोठे हाड) नाहीतर दहाचं हे प्रचलित शब्द आहेत. हे १२ कुठून आणलं?

त्यांना वाटलं असेल इकडे बरेच बैल असतील. @पी महेश चोराला फोटो काढतानाच पकडायला हवं होतं... तसं ज्या डुरक्याकडून ऐकलं त्यालाच विचारायचं होत.. १२ नंबर कशाला बे?

पी-महेश-करजेवण in काथ्याकूट अबाबा: दोन/तीन ऒळींच्या धाग्याला जिलबी म्हणतात; पण त्यामागचं काय कारण असेल? या जिलबीचा नेमका अर्थ काय? बरं जिलबीच का? चकली का नाही? कडबोळी का नाही? कोणाला काही माहिती आहे का?

बीफ बद्दल नक्की माहीत नाही पण 12 नं चे मटण (बोकड मेंढी इ) म्हणजे 12 महिन्यापेक्षा लहान जनावरांचे मांस. जनावर कोवळे असल्यामुळे मास वातड (रबरी) लागत नाही

बीफ बद्दल नक्की माहीत नाही पण 12 नं चे मटण (बोकड मेंढी इ) म्हणजे 12 महिन्यापेक्षा लहान जनावरांचे मांस. जनावर कोवळे असल्यामुळे मास वातड (रबरी) लागत नाही

भारतात हिंदूंना आक्षेपार्ह वाटते म्हणून गाईच्या वा गुराच्या मांसाचा स्पष्ट उल्लेख केला जात नाही. बीफला बडे का गोश्त म्हणायची पद्धत आहे. बडा (ड + नुक्ता) ह्या शब्दाचे स्पेलिंग bara असे केले जाऊ शकते (जसे भाखडा चे स्पेलिंग bhakra असे केले जाते, खेडा चे khera). आता ह्याचाच १२ असा अनुवाद करुन चटकन कळणार नाही असा एक शब्द म्हणून तो वापरला जाऊ लागला असेल असा एक अंदाज.

In reply to by हुप्प्या

त्रिंबक नारायण आत्रेंच्या 'गावगाडा' या पुस्तकात यावर काही आहे का? मी वाचलं नाही, पण काही जणांनी मला सांगितलंय, की यात बारा नंबरवर काही तरी लिहिलंय... असो.. पण आपण दिलेली माहितीही शब्दशोध मोहिमेतील महत्त्वाची ठरेल.

In reply to by हुप्प्या

त्रिंबक नारायण आत्रेंच्या 'गावगाडा' या पुस्तकात यावर काही आहे का? मी वाचलं नाही, पण काही जणांनी मला सांगितलंय, की यात बारा नंबरवर काही तरी लिहिलंय... असो.. पण आपण दिलेली माहितीही शब्दशोध मोहिमेतील महत्त्वाची ठरेल.