बैलाच्या मटणाला बारा नंबरचं मटण म्हणतात; पण त्यामागचं काय कारण असेल?
या बारा नंबरचा नेमका अर्थ काय?
बरं नेमकी बाराच का?
11 का नाही?
13 का नाही?
कोणाला काही माहिती आहे का?
वाचने
8182
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
असे धागे
बैलाचं माहित नाही पण कदाचित असे धागे मिपाचे नक्की बारा वाजवतील असं वाटतंय! :)
हा धागा काढण्यामागे आपला
In reply to असे धागे by उपयोजक
हा धागा काढण्यामागे आपला नक्की हेतू कायआहे?
उत्सुकतेपोटी हा विषय शेअरला
In reply to हा धागा काढण्यामागे आपला by सुबोध खरे
काय आहे, की मला हा प्रश्न काही मित्रांनी विचारला. म्हणे, दुबईपर्यंत बारा नंबरच म्हंटलं जातंय. मग मी अनेक ठिकाणी माहिती घेतली, पण कुठेही माहिती मिळाली नाही. म्हणून उत्सुकतेपोटी हा विषय शेअरला. असो.
अठराविश्वे दारिद्र्य हे जसं अपभ्रंशातून आलंय तसंच हे असेल... अठराच का एकोणीस का नाही किंवा एकवीस का नाही
विद्युल्लता अकलूजकरांनी या वाक्प्रचाराचा वेध घेतला असता त्यांना सुनीताताई देशपांडे यांनी सांगितलं, की ते खरं तर अठराविशे दारिद्र्य आहे... 18 गुणिले 20 बरोबर 360... म्हणजे वर्षभर दारिद्र्य.... म्हणून अठराविशे दारिद्र्य... अठराविश्वे नव्हे....
असो...
तसंच या 12 नंबरमागेही काही कारण असेल...
उत्सुकता चाळवली... बाकी दुसरं काही नाही...
नवीन सभासदाचा पहिलाच धागा
कदाचित त्यांचा हा पहिलाच धागा आहे. गुगल आणि मिसळपाव मध्ये त्यांचा गोंधळ झाला असावा.
गोंधळ अजिबात नाही...
In reply to नवीन सभासदाचा पहिलाच धागा by सुहासवन
गोंधळ अजिबात नाही... माहितीसाठी आपणासारख्या सुज्ञांना विचारलेला हा भाबडा प्रश्न
पण १२ कुठे म्हण्तेत बीफला?
पण १२ कुठे म्हण्तेत बीफला?
दसलंबरी म्हणतेत. बडेका, मोठ्ठाड (मोठे हाड) नाहीतर दहाचं हे प्रचलित शब्द आहेत. हे १२ कुठून आणलं?
अगदी अगदी
In reply to पण १२ कुठे म्हण्तेत बीफला? by अभ्या..
शब्दाशब्दाशी सहमत
म्हणतात की हो....
In reply to पण १२ कुठे म्हण्तेत बीफला? by अभ्या..
तुम्ही म्हणलात तेही खरं आहे, पण बारा नंबरही म्हणतात की हो...
सुहास वचन यांच्या
सुहास वचन यांच्या प्रतिक्रियेला एकच नंबर. लोल
सुहासवन*
सुहासवन*
इकडे बरेच बैल
त्यांना वाटलं असेल इकडे बरेच बैल असतील.
@पी महेश चोराला फोटो काढतानाच पकडायला हवं होतं... तसं ज्या डुरक्याकडून ऐकलं त्यालाच विचारायचं होत.. १२ नंबर कशाला बे?
मिळालं उत्तर...
In reply to इकडे बरेच बैल by बाजीप्रभू
विचारलं की त्याला... खूप वेळाने उत्तर मिळालं.....
पी-महेश-करजेवण in काथ्याकूट
पी-महेश-करजेवण in काथ्याकूट
अबाबा:
दोन/तीन ऒळींच्या धाग्याला जिलबी म्हणतात; पण त्यामागचं काय कारण असेल?
या जिलबीचा नेमका अर्थ काय?
बरं जिलबीच का?
चकली का नाही?
कडबोळी का नाही?
कोणाला काही माहिती आहे का?
१२ नंबराआडून एक छुपा हल्ला . . . . .
एमेच १२ वर ?
कुछ समझे दया ????
बारामती वर कशावरून नाही ?
In reply to १२ नंबराआडून एक छुपा हल्ला . . . . . by माम्लेदारचा पन्खा
बारामती वर कशावरून नाही ?
तिथे बैल नाहीत हो . . . . .
In reply to बारामती वर कशावरून नाही ? by पगला गजोधर
बैलांकडूून काम करून घेणारे आहेत !
बैलांना पाठिंब्याचा हिरवा घास
In reply to तिथे बैल नाहीत हो . . . . . by माम्लेदारचा पन्खा
बैलांना पाठिंब्याचा हिरवा घास दाखवा... बैल दावन तोडुन मदत करतो. ..
आत्ता कळलं!
In reply to बैलांना पाठिंब्याचा हिरवा घास by पगला गजोधर
मिपावरच्या अनेक आयडींच्या समर्थनाचं कारण.
खि खी खे खै....
In reply to १२ नंबराआडून एक छुपा हल्ला . . . . . by माम्लेदारचा पन्खा
हा हा हा
बीफ बद्दल नक्की माहीत नाही पण
बीफ बद्दल नक्की माहीत नाही पण 12 नं चे मटण (बोकड मेंढी इ) म्हणजे 12 महिन्यापेक्षा लहान जनावरांचे मांस. जनावर कोवळे असल्यामुळे मास वातड (रबरी) लागत नाही
बीफ बद्दल नक्की माहीत नाही पण
बीफ बद्दल नक्की माहीत नाही पण 12 नं चे मटण (बोकड मेंढी इ) म्हणजे 12 महिन्यापेक्षा लहान जनावरांचे मांस. जनावर कोवळे असल्यामुळे मास वातड (रबरी) लागत नाही
सुबोधजी... पटलं...
In reply to बीफ बद्दल नक्की माहीत नाही पण by सुबोध खरे
धन्यवाद सुबोधजी....
हेच त्यामागचं कारण असू शकेल...
आता मिपा चा पुढील कट्टा
आता मिपा चा पुढील कट्टा इंदिरा नगर मदी च
मला असे वाटते की
भारतात हिंदूंना आक्षेपार्ह वाटते म्हणून गाईच्या वा गुराच्या मांसाचा स्पष्ट उल्लेख केला जात नाही. बीफला बडे का गोश्त म्हणायची पद्धत आहे. बडा (ड + नुक्ता) ह्या शब्दाचे स्पेलिंग bara असे केले जाऊ शकते (जसे भाखडा चे स्पेलिंग bhakra असे केले जाते, खेडा चे khera). आता ह्याचाच १२ असा अनुवाद करुन चटकन कळणार नाही असा एक शब्द म्हणून तो वापरला जाऊ लागला असेल असा एक अंदाज.
कदाचित असंही असेल...
In reply to मला असे वाटते की by हुप्प्या
त्रिंबक नारायण आत्रेंच्या 'गावगाडा' या पुस्तकात यावर काही आहे का? मी वाचलं नाही, पण काही जणांनी मला सांगितलंय, की यात बारा नंबरवर काही तरी लिहिलंय... असो.. पण आपण दिलेली माहितीही शब्दशोध मोहिमेतील महत्त्वाची ठरेल.
कदाचित असंही असेल...
In reply to मला असे वाटते की by हुप्प्या
त्रिंबक नारायण आत्रेंच्या 'गावगाडा' या पुस्तकात यावर काही आहे का? मी वाचलं नाही, पण काही जणांनी मला सांगितलंय, की यात बारा नंबरवर काही तरी लिहिलंय... असो.. पण आपण दिलेली माहितीही शब्दशोध मोहिमेतील महत्त्वाची ठरेल.