Skip to main content

नासाच्या जवळी

लेखक लाल गेंडा यांनी गुरुवार, 14/09/2017 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल : आजीच्या जवळी घड्याळ कसले..) कवितेचा कालावधी - सन 1996 नासाच्या जवळी यान कसले आहे चमत्कारिक पुढे पुढे ते जाते अचूक कोणास कसे ठावुक त्याची पीरपीर चालते कधीतरी त्रास फार टाकते परंतु मोठ्या ग्रहाजवळ जाऊनी माहिती ते आणते गॅलिलिओ नाव ठाऊक असे मला तयाचे गरगर फिरत स्वताभोवती माहिती सारखे पाठवते तीन दोन एकच्या तणावात उडते ते पृथ्वीवरून सरसर उंच जाऊन विराजते चंद्रापासून आज इकडे तसेच उद्या त्या तिकडे जायता पाठवते झरझर ते चित्रांच्या गंमती सदा होऊनी गेली वर्षे पाठवूनी त्यास पत्ता कधी न लागला संपत आले काम तयाचे पुढे ते जाई आता एकला पायोनियर व्हॉयेजर ती पुढे शांतपणे गेली पाठवत राहिली नवनवी माहिती अनंते विलीन झाली तसेच होणार याचे असे मला वाटते म्हणून मी म्हणतो अजुनी थोडे त्यास जगू दे
लेखनविषय:

वाचने 899
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

वा! या विषयावर कवितादेखील होऊ शकते असे स्वप्नातही वाटले नव्हते. आता कॅसिनी अंतराळयानाच्या आजच्या शेवटच्या प्रवासाबद्दल कविता करा!