Skip to main content

बाप्पाचा नैवेद्य : खवा-पिस्त्याचे मोदक

लेखक सानिकास्वप्निल यांनी मंगळवार, 05/09/2017 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः १ वाटी खवा १/४ वाटी पिस्ते सालं, काढून, ४-५ चमचे दुधात घालून मिक्सरला वाटून घेणे अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्तं पिठीसाखर १ चमचा वेलचीपूड खायचा हिरवा रंग २ थेंब (ऐच्छिक) चांदीचा वर्ख (ऐच्छिक) साजुक तूप मोदकाच्या साच्याला लावण्यापुरतं कृती: नॉन-स्टीक पॅनमध्ये खवा मंद आचेवर परतून घ्यावा. त्यातच पिस्त्याची पेस्ट घालून तूप सुटेपर्यंत परतणे. आता त्यात खायचा हिरवा रंग, पिठीसाखर घालून मिश्रण गोळा होईपर्यंत परतणे. मिश्रण गोळा होऊ लागले की गॅस बंद करावा. थोडे थंड झाले की त्यात वेलचीपूड मिसळावी. . आता पेढे- मोदकाच्या साच्याला तुपाचा हात फिरवून मिश्रण भरून मोदकाचा आकार द्यावा. वरून चांदीचा वर्ख लावावा व बाप्पाला नैवेद्य दाखवावा. .

वाचने 12263
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

सुरेखच..... मार डाला

सुरेखच..... मार डाला

गणपतीची आरास तूच केलीस का?

In reply to by पैसा

हो गं. यंदा बाळांसाठी बाप्पांचे आगमन घरी झाले त्यामुळे सगळे घरीच केले.

मोदक जबरदस्त दिसत आहेत. सोबत जिलेबीचे ताट पाहून बाप्पाला देखील हे घेऊ कि ते असे झाले असेल. :)

In reply to by रेवती

बारा नाही सोळा ते अठरा होतात. प्रसादाच्या वाटीत ही थोडे आहेत शिवाय बाप्पाच्या हातावर ही मोदक आहे :)

वाह

मोदक मस्त! स्वाती

छान