साहित्यः
१ वाटी खवा
१/४ वाटी पिस्ते सालं, काढून, ४-५ चमचे दुधात घालून मिक्सरला वाटून घेणे
अर्धी वाटीपेक्षा थोडी जास्तं पिठीसाखर
१ चमचा वेलचीपूड
खायचा हिरवा रंग २ थेंब (ऐच्छिक)
चांदीचा वर्ख (ऐच्छिक)
साजुक तूप मोदकाच्या साच्याला लावण्यापुरतं
कृती:
नॉन-स्टीक पॅनमध्ये खवा मंद आचेवर परतून घ्यावा.
त्यातच पिस्त्याची पेस्ट घालून तूप सुटेपर्यंत परतणे.
आता त्यात खायचा हिरवा रंग, पिठीसाखर घालून मिश्रण गोळा होईपर्यंत परतणे.
मिश्रण गोळा होऊ लागले की गॅस बंद करावा.
थोडे थंड झाले की त्यात वेलचीपूड मिसळावी.
आता पेढे- मोदकाच्या साच्याला तुपाचा हात फिरवून मिश्रण भरून मोदकाचा आकार द्यावा.
वरून चांदीचा वर्ख लावावा व बाप्पाला नैवेद्य दाखवावा.
वाचने
12263
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
गणपती बाप्पा मोरया !!!
क्लास!
जीव घेणार तु सानिका
मस्त
मस्त
अप्रतिम सानि. खुप सुंदर दिसत
झकास!
धन्यवाद
In reply to झकास! by पैसा
मोदक
वाह! मोदकांना वेगळा रंग पाहून
धन्यवाद
In reply to वाह! मोदकांना वेगळा रंग पाहून by रेवती
सुरेख!
वाह
मोदक तर भारीच. पण माझी नजर
वा..
अहाहा किती सुबक न चवदार :)
सुंदर !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nirmala Sitharaman to focus on military preparednessसुरेख! रंग अप्रतिम आलाय.
छान