समारोप....
मंडळी या चर्चेचा समारोप मी करतोय. जोरदार चर्चा झाली. मजा आली.
एक गोष्ट मात्र शंभर टक्के खरी आहे की मिसळपाववरील सदस्यांची उपस्थिती ही तात्याच्या माणसं जोडण्याच्या कलेमुळे आहे.
येथे इतरही प्रतिभावान मंडळी येतात. त्यांचे लेखन करतात. अनुभव सांगतात, भांडतात, आयमाय काढतात, त्यामुळे इथे यायला आवडतं.
हेच मिसळपावच्या लोकप्रियतेचे कारण आहे.
एरव्ही इतक्या कमी कालावधीत इतकी लोकप्रियता दुसर्या कुठल्या मराठी संकेतस्थळाला लाभली असेल असे वाटत नाही.
मी सुद्धा इथे येतो तो तात्याच्या मैत्रीमुळेच. मोकळेपणा आहे, आपुलकी आहे, स्नेह आहे.
चार शिव्या द्यायच्या चार घ्यायच्या आणि सर्वांच्या नावानं चांगभलं म्हणून इथून जायचं.
बापू
पुण्याहून पत्र
प्रिय बाबा, शि. सा. न. वि. वि ..
मी पुण्यात सुखरूप पोहोचलो. इथे बऱ्याच गंमती पाहायला मिळत आहेत.
पुणेकरांचं जुनं वाहन म्हणजे सायकल. आपल्या गावात जसे देवाला सोडलेल्या रेड्याला काही करत नाहीत, तसंच इथे सायकलस्वारांना कोणतेही नियम लागू नाहीत. इथलं सध्याचं वाहन म्हणजे बाइक. त्यांना इंधनबचतीचं महत्त्व खूपच पटलं आहे. त्यामुळे ते दुचाकीवर तीनजण बसतात. सिग्नलपाशी लाल दिवा असला, तरी सहसा थांबत नाहीत. त्यामुळे पेट्रोल जास्त जळते ना. वळताना हात दाखवायचा, तर चौदा स्नायू वापरावे लागतात म्हणे! म्हणून हात दाखवण्याचे कष्ट कुणी घेत नाही. हात दाखवून अवलक्षण व्हायला नको म्हणून रिक्षावाले तर पायानं वळण्याचा इशारा करतात.
इथे सहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना तीन आसनी रिक्षा म्हणतात आणि दहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना सहा आसनी रिक्षा म्हणतात. आहे ना गंमत?
प्रतिक्रिया
समारोप
बाळासाहेब
पुण्याहून