वाहन खरेदी करतांना
वाहन खरेदी करतांना जनरली
१ एक्स शोरूम किंमत
२ रजिस्ट्रेशन
३ डेपो चार्जेस
४ इन्शुरन्स
ह्या सदरांखाली पैसे घेतात
१. नुसती एक्स शोरूम पैसे मोजून वाहन खरेदी करता येते का
--असे केले तर मुख्य अडचणी आणि मुख्य फायदे काय आहेत ?
२ रजिस्ट्रेशन आणि इन्शुरन्स online करतात असे डीलरच म्हणतात मग ते आपणच का करू नये ?
--२.a डीलर चा इंश्युरंस आणि आपला इन्शुरन्स ह्यात जवळपास दुपटी चा फरक आढळून आला आहे
३. डेपो चार्जेस ग्राहका कडून वसूल करणे हे नियमात /कायद्यात बसते का ? ते किती असावेत ह्यावर काही नियम / मार्गदर्शक तत्वे आहेत का ?
४. डिलिव्हरी घेतांना अमुक एक लिटर पेट्रोल घालून मग वाहन ताब्यात दिले जाईल असे वाहनाचे मन्युअल सांगते, प्रत्यक्षात १ २ (कमीत कमी) लिटर पेट्रोल घालून वाहन तय्ब्यात दिले जाते .
जागो ग्राहक जागो च्या अंतर्गत ह्यावर कुणी काही तज्ञ मते देऊ शकेल का ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
रजिस्ट्रेशन ..