चित्रपट परिक्षण : डंकर्क
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
शक्यतो मी इंगजी चित्रपट कमी पाहातो. पण तोच जर ऐतिहासिक किंवा वैज्ञानिक असेल तर मी जरुर पाहातो.
असाच मागच्या आठवड्यात डंकर्क चित्रपट पाहाण्याचा योग आला आणि माझा वेळ आणि पैसा वसुल!
हा चित्रपट दुसर्या महायुध्धातील एका सत्यकथेवर आधारित आहे. जर्मनी च्या नाझी फौजानी फ्रान्सच्या समुद्र किनार्यावर ब्रिटिश आणि फ्रेन्च फौजांना जमीन , वायु आणि समुद्र या सर्व ठिकाणाहुन प्रचंड हल्ले करुन सळो की पळो करुन सोडले असताना हे मित्र देश कसे आक्रमणातुन वाचतात आणि हजारो सैनिकांचे जीव कसे वाचवले जातात याचे सुन्दर चित्रण या चित्रपटात आहे.
चित्रपट सुरु होतो तो समुद्र किनार्यावर होणार्या बेछुट गोळिबाराच्या द्रुश्याने. अत्यन्त थरारक असे हे द्रुश्य. त्यात अनेक ब्रिटिश आणि फ्रेन्च सैनिक म्हणजे अगदी
१४ ते १७ वयोगटातील कोवळे सैनिक मारले जातात पण मित्र फौजा जास्तीत जास्त सैनिकाना वाचवण्यासाठी एका मोठया बोटिची व्यवस्था करतात! चित्रपटाचा नायक या बोटीत जखमी सैनिक सहकार्याला घेऊन कसे चढतो ते द्रुश्य अतिशय वास्तववादी वाटते. याच बोटीत चढण्यासाठी जीव वाचवण्यासाठी चालेलेली चढाओढ
आणि ब्रिटिश सैनिक फ्रेन्च सैनिकाना त्यात येण्यासाठी करत असलेला विरोध पाहुन मानवी स्वभावाची "मी ..... माझे लोक " अशी मनोव्रुती पाहावयास मिळते.
ही बोट किनार्याच्या शोधात जात असताना भयंकर हवाई हल्ले चालुच असतात. पण ब्रिटिश एअर फोर्स विमानातील शेवटच्या इन्धनाच्या थेम्बा पर्यन्त कसा प्रतिकार
करतात याचे सुन्दर चित्रण यात आहे. याशिवाय दुसर्या एका लहान बोटीतुन प्रतिकार केला जातो व प्रसंगी या बोटीतुन हल्ले करुन शत्रुचा प्रतिकार केला जातो.
सतत होणार्या हवाई हल्ल्यामुळे मोडकळीस आलेल्या व बुड्त चाललेल्या जहाजातुन सैनिक इतर छोट्या नावेत ऊडी मारुन प्राण कसे वाचवतात हे अतिशय सुन्दर रीत्या चित्रीत केले आहे. एकन्दरीतच हा चित्रपट खुर्चीला खिळवणारा आहे. फेसाळलेला समुद्र किनारा, जखमी सैनिक आणि किनारा व आपले देशबंधू दिसल्यावर
सैनिकांच्या डोळ्यातील आनन्द पाहाण्यासारखाच!
हा चित्रपट फ्रान्सच्या वास्तविक स्थानी डन्कर्क येथे चित्रीत झाला आहे.
या ऐतिहासिक ऑपरेशन मध्ये ६०००० पेक्षा जास्त सैनिकांना सुरक्षित हलवण्यात आले होते.
एक अतिशय वास्तववादी समरपट !
चित्रपट संपल्यानन्तर "युध्ध म्हणजे अनाठायी रक्तपात असला तरी प्रत्येक देशाने युध्धासाठी सदैव सज्ज असलेच पाहिजे असे परस्परविरोधी विचार मनात घोळत
रहातात".
दिग्दर्शक - ख्रिस्तोफर लोहन
प्रतिक्रिया
दिग्दर्शक - ख्रिस्तोफर लोहन
चित्रपट परीक्षण
मला रविवारी हा चित्रपट पहायचा
विवीयाना ला ४डी आहे
काल पाहिला ..
सिनेमा खूपच भारी आहे. जेट्टी
+ १
कालच पहिला आणि आवडला,