काही माणसे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, स्वतःच्या सुरक्षेची पर्वा न करता, जगावेगळे धैर्य दाखवून, आपल्याशी तसा काही तडक संबंध नसलेल्या लोकांना वाचविण्यासाठी असामान्य कार्य करतात. अश्या माणसांना बर्याचदा पुरेशी प्रसिद्धी मिळत नाही आणि थोडीबहूत मिळाली तरी, यातली बरीच माणसे प्रसिद्धिपराङमुख असल्याने, जनतेच्या आठवणीतून सहज निघून जातात. मात्र, अशी माणसे खर्या अर्थाने नायक (हिरो) असतात.
असाच एक, मुथुन्नी मॅथ्युज नावाचा, भारतिय सुपुत्र आणि नायक काल (२० मे २०१७ रोजी) आपल्यातून कायमचा निघून गेला आहे. आज हे नाव कोणाला सहजपणे आठवणार नाही. पण या दु:खद क्षणी त्याच्या कामगिरीची आठवण करणे आवश्यक आहे.
सद्दाम हुसेनने २ ऑगस्ट १९९० साली कुवेतवर हल्ला केला आणि जेमतेम दोन दिवसांत ते चिमुकले राष्ट्र पादाक्रांत केले. कुवेतमध्ये कामासाठी आलेले आणि इराक-कुवेत शत्रूत्वाशी काहीही देणे घेणे नसलेले सुमारे २ लाखांच्या आसपास भारतिय नागरिक मात्र या युद्धाच्या धुमश्चक्रीत सापडले आणि नंतर अनेक दिवस इराकी सैन्याच्या ताब्यातील कुवेतमध्ये अन्नपाण्याविना अडकून पडले. आपल्या कुटुंबासह तेथून पळून जाण्याइतकी ओळख आणि क्षमता असलेल्या मुथुन्नी मॅथ्युजने तेथेच राहून युद्धाने होरपळलेल्या आणि सर्वस्व गमावलेल्या आपल्या देशबांधवांना देशात परतण्यासाठी मदत करण्याचे ठरवले. त्याने स्वतःच्या पैशांचा व ओळखीचा वापर करून हजारो लोकांना अन्नपाणी पुरवले आणि भारतिय सरकारने लोकांच्या परतीसाठी विमानव्यवस्था करेपर्यंत त्यांना तगून रहायला मदत केली. या काळात मॅथ्युजने दिल्लीतील भारतीय परराष्ट्र मंत्रालयातील अधिकार्यांशी संपर्क साधून, त्यांच्या मागे लागून, एक प्रकारे कुवेतमधील भारताच्या "अनधिकृत प्रतिनिधी"ची भूमिका वटवली आणि सुमारे दीड-दोन लाख भारतियांना भारतात सुखरूप परतण्यासाठी मदत केली. या घटनेवर आधारीत असलेला "एअरलिफ्ट (Airlift)" नावाचा एक हिंदी चलतचित्रपट काही काळापूर्वी प्रदर्शित झाला आहे. त्यात अक्षय कुमारने मॅथ्युजची भूमिका केली आहे. वीस वर्षाचे तरूण मॅथ्युज १९५६ साली कामाच्या शोधात कुवेतमध्ये पोहोचले. टंकलेखक म्हणून टोयोटा कंपनीत नोकरीला लागलेल्या या तरूणाने त्याच कंपनीतून १९८९ साली व्यवस्थापकिय संचालक (मॅनेजिंग डायरेक्टर) या पदावरून निवृत्ती स्विकारली ! त्यानंतर त्यांनी कुवेतमध्येच स्वतःचा कार रेंटल आणि जनरल ट्रेडिंगचा व्यवसाय सुरू केला. याशिवाय, ते कुवेतमधिल जब्रिया इंडियन स्कूलचे अध्यक्ष व इंडियन आर्ट सर्कलचे संस्थापक सदस्य होते. त्यांच्या समाजोपयोगी कामामुळे ते कुवेतमध्ये "टोयोटा सनी (Toyota Sunny)" या नावाने प्रसिद्ध होते. कुवेतमधिल युद्धाचा ज्वर उतरल्यावर जरी हा नायक सर्वसाधारण भारतियाच्या स्मृतीतून निघून गेला असला तरी, ज्यांना युद्धाच्या रणधुमाळीतून बाहेर काढून भारतात सुखरूप परतायला मदत केली ते सुमारे २ लाख भारतिय आणि त्यांचे कुटुंबिय टोयोटा सनीचे ऋण विसरणे शक्य नाही ! या असामान्य भारतिय वीराला त्याच्या मृत्युसमयी अनेकनेक सॅल्युट्स आणि भावपूर्ण श्रद्धांजली !
मुथुन्नी मॅथ्युज

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
23635
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
__/\__
'एअरलिफ्ट'मध्ये उल्लेखही नाही
मॅथ्युज यांना भावपूर्ण
खूप छान माहिती. एयरलिफ्ट
_/\_
सुन्दर लेख
सुन्दर लेख
सुन्दर लेख
भावपूर्ण श्रद्धांजली_/\_
भारताच्या ह्या सुपुत्राला
सलाम !
__/\__
भावपूर्ण श्रध्दांजली!
_/\_
_/\_
प्रसंगोचित, उत्तम लेख !
___/\___
समयोचित लेख. ___/\___
श्रध्दांजली!
सुन्दर लेख __/\__
भावपूर्ण श्रध्दांजली! __/\__
प्रसंगोचित, उत्तम लेख !
साध्या मुलास धन्यवाद
कुवेतवरील इराकी आक्रमणाच्या
In reply to साध्या मुलास धन्यवाद by गामा पैलवान
हा दुवा बघा
In reply to साध्या मुलास धन्यवाद by गामा पैलवान
धन्यवाद!
In reply to हा दुवा बघा by साधा मुलगा
दुर्दैवाने बर्याच व्यक्तिंचे महानपण ते गेल्यानंतर समजते.
रणजीत कट्याल
अर्थातच
In reply to रणजीत कट्याल by चित्रगुप्त
हीरो अक्षय कुमार फिक्स असताना
In reply to रणजीत कट्याल by चित्रगुप्त
मग रजनीकांत ला घ्यायचे.
In reply to हीरो अक्षय कुमार फिक्स असताना by अभ्या..
मूळ कुवैत एअरलिफ्टच्या वेळी
In reply to रणजीत कट्याल by चित्रगुप्त
पंजाबी गैर पंजाबी वगैरे
In reply to मूळ कुवैत एअरलिफ्टच्या वेळी by जेम्स वांड
पंजाबी गैर पंजाबी वगैरे अप्रस्तुत वाटून गेलेयाच्याशी १००% सहमत. पण, श्रेयनिर्देश करायची वेळ आली तेव्हा सरकारने त्या कारवाईच्या खर्या निस्वार्थ नायकांची योग्य ती दखल घेतली नव्हती आणि आजही सर्वसामान्य माणसाला त्यांची नावेही माहीत नाहीत, हे दुर्दैवी सत्य मानावेच लागेल.होय
In reply to पंजाबी गैर पंजाबी वगैरे by डॉ सुहास म्हात्रे
_/\_
समयोचित लेख. ईच्छा शक्तीच्या
समयोचित लेख. हे कार्य खरोखरच
एअरलिफ्ट नंतर या माणसाबद्दल
सुरेख लेख
_/\_
_/\_
स्वकियाना मायदेशी परतायला
छान माहिती.
भावपूर्ण श्रध्दांजली! _/\_
भावपूर्ण श्रध्दांजली!
He was the hero we needed, but not the one we deserved .!!!
भावपूर्ण श्रद्धांजली...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Heysa rudhrassa Heysarabhadra samudhrassa... :) :- Baahubali 2एकन्दरित असे बरेच दुर्लक्शित
खूप छान माहिती आहे
लेख आवडला
!!! भावपूर्ण श्रध्दांजली !!!
मस्त माणसाची उत्तम माहीती
___^____