ताज्या गैर-राजकीय घडामोडी भाग-१
ताज्या घडामोडी ची चर्चा करण्याकरता ताज्या घडामोडी हा धागा होता, परंतु सध्याची त्याची नवीन आवृत्ती फक्त राजकीय घडामोडी ची चर्चा करण्यासाठी असल्याने नवीन अराजकीय घडामोडी किंवा घटना तिथे टाकण्यास मर्यादा येत आहेत, त्यामुळे अराजकीय घडामोडी साठी हा नवीन धागा.
नुकतीच एक चिंताजनक बातमी वाचली, हीच बातमी मी तीन कि चार वर्षपूर्वी वाचलेली, परंतु यातून सरकार ने कोणताही धडा घेतला नाही हे पाहून आणखी चिंताजनक वाटतेय. हि बातमी आहे भारतातील औषधनिर्माण कंपन्यातील औषध कचऱ्यापासून तयार होणार्या सुपरबग ची. भारतातील हैदराबाद मध्ये औषद निर्माण कंपन्यांचा मोठा परिसर आहे तेथूनच भारतातून निर्यात होणार्या औषधापैकी ५०% औषधे तयार होतात. यातील बर्याच कंपन्या औषध निर्मिती साठी असणारे standards and regulations पाळतात, परंतु औषध कचरा/ drug residues बाहेर सोडताना मात्र कोणतीही काळजी घेत नाहीत, यातून ह्या गोष्टी जमीन आणि पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित करतायत आणि यातूनच जन्म होतोय सुपरबग चा. खाली दिलेला रेपोर्ट काय म्हणतोय पहा (हा रेपोर्ट साधा सुधा नसून Infection ह्या अंतराष्ट्रीय नियतकालिकात पब्लिश झालेल्या पेपर वर आधारित आहे)
India’s pharma industry is creating superbugs with its dirty effluent discharges
The presence of drug residues in the natural environment allows the microbes living there to build up resistance to the ingredients in the medicines that are supposed to kill them, turning them into what we call superbugs.
ह्या सुपरबग मुळे साधे साधे आजार सुधा गंभीर रूप धारण करतायत कारण antibiotics हे कुचकामी ठरतायत. हा रेपोर्ट काय म्हणतोय बगा
India has become the epicentre of the global drug resistance crisis, with 56,000 newborn Indian babies estimated to die each year from drug-resistant blood infections, and 70% to 90% of people who travel to India returning home with multi-drug-resistant bacteria in their gut, according to the study.
भारतातील कुचकामी कायदे आणि त्याची अंमलबजावणी याला कारणीभूत आहे, तसेच प्रशासकीय पातळीवर नसणारे गांभीर्य सुधा याला कारणीभूत आहे.
आता थोडी चांगली आणि सुखद बातमी
भारतातील अत्यंत नामवंत अश्या संस्थांनी (IISc and IISER) E. coli ह्या drug resistant bacteria वरती प्रयोग करून यातील antibiotic न विरोध करणाऱ्या enzyme चा शोध घेतला, आणि antibiotic ला कश्या पद्धीने निष्प्रभ केले जाते हे शोधून काढल. खालील बातमी मध्ये या पूर्ण प्रोसेस मध्ये H2S वायू च कार्य अत्यंत सहजरीत्या समजावून सांगितलं आहे. या शास्त्रज्ञाना पुढच्या प्रयोगात यश येवो हि सदिच्छा.
Reversing drug resistance made possible
जाता जाता आपल्या देशाचा राजधानीचे नाव बदनाम करणाऱ्या NDM-१ ह्या bacteria resistant enzyme विषयी माहिती विकिपीडिया वरती वाचता येयील
NDM-1
टीप: मी ह्या क्षेत्रातील जाणकार नाही, एक सामान्य वाचक म्हणून पहिल्या बातमी विषयी भीती आणि दुसर्या बातमी विषयीची उत्सुकता व्यक्त केली आहे.
वर्गीकरण
वाचन
10587
प्रतिक्रिया
0