✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शेअर मार्केट- म्युच्युअल फंड एसआयपी (SIP) बद्दल काही बेसिक प्रश्न

क
कुटस्थ यांनी
Sat, 05/13/2017 - 04:40  ·  लेख
लेख
मी सध्या भारतीय शेअर मार्केट मध्ये म्युच्युअल फंड एसआयपी माध्यमातून गुंतवणूक करायचे योजिले आहे.एसआयपी इन्व्हेस्टमेंट per month असेल तेही ऑनलाईन ब्रोकरच्या माध्यमातून. एसआयपी मध्ये प्रथमच गुंतवणूक करत असल्याने काही प्रश्न आहेत ते असे: १. प्रत्येक महिन्याच्या कोणत्या तारखेला फंड युनिट्स विकत घेतले जातील हे आपल्याला ठरवता येते का? येत असल्यास तारीख बदलता येते का? असल्यास किती वेळा बदलू शकतो? २. एसआयपी चा कालावधी बदलणे शक्य असते का? म्हणजे मी एसआयपी ५ वर्षासाठी सुरु केली तर नंतर तो कालावधी कमी करता येतो का (जसे कि ३ वर्ष)? त्याचप्रमाणे एसआयपी चा कालावधी वाढवता येतो का? म्हणजे मी एक वर्षाचा एसआयपी सुरु केला आणि ६ महिन्यानंतर वाटले कि कालावधी वाढवून २ वर्ष करावा तर ते शक्य असते का कि नवीन एसआयपी सुरु करावा लागतो? ३. एखाद्या महिन्यात पैसे भरू शकलो नाही तर काय होते? काही penalty असते का? ४. एखाद्या महिन्यात SIP Amount पेक्षा जास्त पैसे भरून SIP फंड मध्येच युनिट्स विकत घेता येतात का? ४. मुदतीपूर्वी युनिट्स विकता येतात का? असल्यास त्यावर exit load पडतो का? आणि short term capital gain असेल तर एसआयपी वर टॅक्स भरावा लागतो का? ५ . SIP आणि Flexi-SIP यात काय फरक आहे? Flexi-SIP मध्ये महिन्याच्या कोणत्याही तारखेला युनिट्स विकत घेण्याची मुभा असते का? कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25773 वाचन

💬 प्रतिसाद (66)

प्रतिक्रिया

मला आपल्याकडील

उदय
Tue, 05/16/2017 - 04:29 नवीन
मला आपल्याकडील गुंतवणुकदारांच्या मानसिकतेची मोठी गंम्मत वाटते. माझ्या अल्पमतीप्रमाणे गुंतवणुक ही करपश्चात मिळणारा परतावा किती या प्रश्नाचे उत्तर मिळवुन करायला हवी मात्र आपल्याकडे भार किती ?? सल्लागाराचे कमिशन किती ?? हेच कळीचे मुद्दे असतात. एकदम खरी गोष्ट आहे. In the end, it matters what you keep. त्यामुळे गुंतवणुकीत होणारी वाढ, गुंतवणुकीतला खर्च आणि आयकर हे सर्व बघावे लागते. वृद्धी जास्त आणि खर्च + आयकर कमी केला की नेट फायदा जास्त होतो. त्यामुळे लोड नकोच (जे कमिशनच्या रुपात गुंतवणुकदाराच्या खिशातून जाते), एक्स्पेन्स रेशिओ कमीच हवा. तुम्ही ५% लोड दिले तर १००० रुपयांऐवजी तुमचे ९५० रुपयेच गुंतवले जातात, म्हणजे तुम्ही खड्ड्यातूनच सुरुवात करता. बॅकएण्ड लोडने तुमचा फायदा कमी होतो. या वर्षीच्या वॉरन बफेच्या रिपोर्टबद्दल हे वाचा. Yes, expenses do matter. SBI Nifty Index Fund या फंडाचा Expense Ratio हा 0.67 आहे. दुर्दैवाने हा पण खूप जास्त आहे. मी गुंतवणूक करतो त्याचा 0.04% आहे. पण बहुदा भारतात अजून असे फंड मिळत नाहीत. जेव्हा व्हॅनगार्ड भारतात म्युचुअल फंड सुरू करेल तेव्हा खरोखर भारतातील गुंतवणूकदारांचा खूप फायदा होईल.
विषय निघालाच आहे म्हणुन आणखी एक असाच मुद्दा... काय वाट्टेल ते झाले तरी टॅक्स भरणार नाही,,,ही भुमिकाही अशीच आततायीपणाची आहे.
टॅक्स मॅनेज्ड म्युचुअल फंड असा एक प्रकार असतो ज्यात शॉर्ट टर्म गेन्स कमी ठेवण्याचा प्रयत्न असतो कारण शॉर्ट टर्म गेन्स हे तुमच्या वार्षिक उत्पन्नात धरले जातात आणि जास्त दराने आयकर भरावा लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत

मला आपल्याकडील

उदय
Tue, 05/16/2017 - 04:30 नवीन
मला आपल्याकडील गुंतवणुकदारांच्या मानसिकतेची मोठी गंम्मत वाटते. माझ्या अल्पमतीप्रमाणे गुंतवणुक ही करपश्चात मिळणारा परतावा किती या प्रश्नाचे उत्तर मिळवुन करायला हवी मात्र आपल्याकडे भार किती ?? सल्लागाराचे कमिशन किती ?? हेच कळीचे मुद्दे असतात. एकदम खरी गोष्ट आहे. In the end, it matters what you keep. त्यामुळे गुंतवणुकीत होणारी वाढ, गुंतवणुकीतला खर्च आणि आयकर हे सर्व बघावे लागते. वृद्धी जास्त आणि खर्च + आयकर कमी केला की नेट फायदा जास्त होतो. त्यामुळे लोड नकोच (जे कमिशनच्या रुपात गुंतवणुकदाराच्या खिशातून जाते), एक्स्पेन्स रेशिओ कमीच हवा. तुम्ही ५% लोड दिले तर १००० रुपयांऐवजी तुमचे ९५० रुपयेच गुंतवले जातात, म्हणजे तुम्ही खड्ड्यातूनच सुरुवात करता. बॅकएण्ड लोडने तुमचा फायदा कमी होतो. या वर्षीच्या वॉरन बफेच्या रिपोर्टबद्दल हे वाचा. Yes, expenses do matter. SBI Nifty Index Fund या फंडाचा Expense Ratio हा 0.67 आहे. दुर्दैवाने हा पण खूप जास्त आहे. मी गुंतवणूक करतो त्याचा 0.04% आहे. पण बहुदा भारतात अजून असे फंड मिळत नाहीत. जेव्हा व्हॅनगार्ड भारतात म्युचुअल फंड सुरू करेल तेव्हा खरोखर भारतातील गुंतवणूकदारांचा खूप फायदा होईल.
विषय निघालाच आहे म्हणुन आणखी एक असाच मुद्दा... काय वाट्टेल ते झाले तरी टॅक्स भरणार नाही,,,ही भुमिकाही अशीच आततायीपणाची आहे.
टॅक्स मॅनेज्ड म्युचुअल फंड असा एक प्रकार असतो ज्यात शॉर्ट टर्म गेन्स कमी ठेवण्याचा प्रयत्न असतो कारण शॉर्ट टर्म गेन्स हे तुमच्या वार्षिक उत्पन्नात धरले जातात आणि जास्त दराने आयकर भरावा लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत

सर, आम्ही भारतात रहातो..

प्रसाद भागवत
Tue, 05/16/2017 - 09:39 नवीन
सर, आम्ही भारतात रहातो.. अमेरितील अर्थसाक्षरतेची तुलना येथे होणे शक्य नाही येथे दसऱ्याच्या दिवशी लुटायचे प्रतिकात्मक सोने घेताना आपट्याऐवजी कांचनाची पान घेणारी जनता आहे..सबब Expense Ratio जास्त असणारच. बाकीही बरेच फरक आहेत तेंव्हा बफेट साहेबांची ही टिपण्णी, अथवा टॅक्स मॅनेज्ड म्युचुअल फंड, आपली रिक्स प्रोफाईल सांगीतली की फंड सुचविणारे सॉफ्ट्वेअर वगैरे संदर्भ गैरलागु आहेत. भाकरीची तुलना पिझ्झाबरोबर कशाला करायची ?? अर्थात येथे भाकरी निकृष्ट वा हिणकस असे मला सुचवायचे नाही, खरेतर स्थिती उलटीच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय

प्रसादजी

अमर विश्वास
Mon, 05/15/2017 - 11:07 नवीन
प्रसादजी स्मॉल कॅप फंड शक्यतो टाळा.. हे मी लिहिले आहे ते या धाग्याच्या संदर्भात.. पहिल्यांदाच SIP मध्ये गुंतवणुक करताना .. ते सुद्धा गुंतवणुक सल्लागाराशिवाय ... या परिस्थितीत स्मॉल कॅप फंड टाळणे मला तरी श्रेयस्कर वाटते .. कारण रिस्क कमी होते ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद भागवत

आपल्या मताचा आदर आहे.. मात्र

प्रसाद भागवत
Mon, 05/15/2017 - 11:27 नवीन
आपल्या मताचा आदर आहे.. मात्र SIP ह्या पर्यायातच धोका कमी होण्याची रचना असल्याने मी ह्या पर्याया करिता अधिक आक्रमक फंडस निवडावे या मताचा आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास

म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत

एस
Sun, 05/14/2017 - 22:17 नवीन
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत झालेला तोटा इतर गुंतवणुकीच्या नफ्याच्या विरुद्ध दाखवता येतो का? समभागातील तोटा दाखवता येतो तसा?
  • Log in or register to post comments

" बाहुबलीज ऑफ वेल्थ' म्हणुन

कुटस्थ
Mon, 05/15/2017 - 09:56 नवीन
" बाहुबलीज ऑफ वेल्थ' म्हणुन एक यादी फिरते आहे, ती तपासावी "---> ही यादी कोणाकडे आली आहे का? असल्यास कृपया धाग्यावर पाठवावी.
  • Log in or register to post comments

लिक्विड फंडांसाठी टॅक्स

प्रसन्न३००१
Mon, 05/15/2017 - 10:22 नवीन
लिक्विड फंडांसाठी टॅक्स इम्प्लिकेशन्स काय असतात. समजा, मी ठराविक मुदतीने पैसे भरत गेलो आणि त्यातील काही पैसे काढून घेतले तर अशा वेळी मला किती टॅक्स भरावा लागेल?
  • Log in or register to post comments

एस आय पी सारखाच एस डब्ल्यू पी

सुबोध खरे
Mon, 05/15/2017 - 12:22 नवीन
एस आय पी सारखाच एस डब्ल्यू पी (SYSTEMATIC WITHDRAWAL PLAN) हा तितकाच महत्त्वाचा. बऱ्याच वेळेस लोक समभाग किंवा म्यु. फंडात पैसे गुंतवतात आणि बाजार तेजीत असताना ते विकत नाहीत त्यामुळे नंतर आपल्या पैशाची कमी झालेली किंमत पाहणे नशिबी येते. याचा मी स्वतः सुद्धा अनुभव घेतला आहे. एखादे फळ जेंव्हा पूर्ण पिकले असेल तेंव्हाच तोडणे आणि सेवन करणे फायदेशीर असते अन्यथा त्याची चव अति पिकल्यामुळे उतरते असा सार्वत्रिक अनुभव आहे. दुर्दैवाने बाजार किती चढेल याचे कुणीच भाकीत करू शकत नाही त्यामुळे बाजार जेंव्हा पडत असतो तेंव्हा जसे समभाग किंवा म्यु. फंडात पैसे गुंतवावेत तसेच बाजार चढत असताना आपले थोडे फार पैसे मोकळे करणे तितकेच आवश्यक आहे. यासाठी SWP पण करा असा सल्ला वित्तीय सल्लागार देतात
  • Log in or register to post comments

सहमत,

प्रसाद भागवत
Mon, 05/15/2017 - 12:28 नवीन
सहमत, सर्व फंडात ग्रोथ आणि डिविडेंट असे ऑपशन्स असतात. त्यातला ग्रोथ ऑपशनच घ्यावा.... हे विधान तसे पाहिले तर खरे पण सरधोपट आहे आपल्याला पैसे लागण्याची शक्यता व संभाव्य टॅक्सेशन या घटकांचाही विचार करावा. हे विधान करताना हा मुद्दाही मला लिहायचा होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

प्रसाद साहेब

अमर विश्वास
Mon, 05/15/2017 - 12:49 नवीन
प्रसाद साहेब मी फारच सरधोपट माणुस आहे :) मी वर प्रतिसाद दिला आहे तेच परत लिहितो फंड कंपन्यांनी लाभांश दिल्यावर NAV काढतात. त्यामुळे डिवीडेंट पर्यायाची NAV ही ग्रोथ पर्यायापेक्षा कमी असते. त्यामुळे फंडामधील गुंतवणुकीचे मूल्य कमी भरते ... अर्थात हा पैसा आपल्याला डिवीडेंट रुपाने मिळालेला असतो. पण बरेचदा हा डिवीडेंट बराच कमी (small one time value) असतो. तो आपल्या खात्यात तसाच पडुन राहतो / खर्च होतो थोडक्यात लाभांश मिळाल्यावर लगेच तो गुंतवला जाईल असे होत नाही. SIP चे उद्दिष्ट दीर्घ मुदतीत रक्कम (कॉर्पस) जमा करणे हे असेल तर ग्रोथ पर्याय चांगला ठरतो. अर्थात हे मी fill it , shut it , forget it .. या सूत्रानुसार म्हणतो आहे . जर आपल्या आर्थिक नियोजनात डिवीडेंट चा वापर करायचा असेल तर ठीक आहे .. अन्यथा ग्रोथ हा पर्याय जास्त फायदेशीर आहे ...
  • Log in or register to post comments

या धाग्यावर होत असलेल्या

डोके.डी.डी.
Tue, 05/16/2017 - 08:05 नवीन
या धाग्यावर होत असलेल्या चर्चेतून खूप नवीन आणि उपयुक्त माहिती मिळत आहे. आपले आभार पहिली शंका अक्सिस लॉंग टर्म या ELSS फंडां मध्ये माझी एक sip चालू होती की जी सध्या बंद आहे सध्या यातच नव्याने sip चालू करू का दुसरी शंका मी शेयर आणि mutual फंडासाठी icici बँकेत ऑल इन वन सेविंग ट्रँडींग डिमॅट खाते उघडले होते . पण आता सेविंग खाते जर बँड केले तर डिमॅट खाते बंद होईल काय आणि डिमॅट खाते नवीन खोलता येईल का . गरजेचे आहेच का विशेषतः mutual फंडासाठी बाहुबलीज ऑफ वेल्थ ही यादी असेल तर टाका इथेच.
  • Log in or register to post comments

म्युचुअल फंड विकत घ्यायला

अनुप ढेरे
Tue, 05/16/2017 - 09:39 नवीन
म्युचुअल फंड विकत घ्यायला डिमॅटची गरज नाही. त्या त्या कंपन्यांच्या सायटीवर जाऊन त्यांचे फंड विकत घेता येतात. किंवा https://www.fundsindia.com/ या साईटवरून देखील घेता येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डोके.डी.डी.

म्युच्युअल फंडातील

अमर विश्वास
Tue, 05/16/2017 - 12:15 नवीन
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी डीमॅट ची गरज नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डोके.डी.डी.

SIP बद्दल एक प्रश्न,

चिनार
Tue, 05/16/2017 - 09:59 नवीन
SIP बद्दल एक प्रश्न, एक वर्षानंतर Equity सिप रीडिम केल्यावर इन्कम टॅक्स द्यावा लागत नाही. पण हे एक वर्ष कसं मोजलं जाते? उदा. १-१-२०१७ ला मी १००० रु. दरमहाची सिप चालू केली तर १-१-२०१८ ला पूर्ण वर्षभराची पुंजी रिडिम केल्यास त्यावर टॅक्स माफ आहे का? की फक्त १-१-२०१७ च्या युनिट्सवर टॅक्स माफ होईल??
  • Log in or register to post comments

गुंतवणुकीचा प्रत्येक व्यवहार

प्रसाद भागवत
Tue, 05/16/2017 - 10:15 नवीन
गुंतवणुकीचा प्रत्येक व्यवहार वेगळा मानला जाईल, त्या व्यवहाराच्या तारखेपासुन एक कॅलेडर वर्ष हा कालावधी ग्राह्य घरला जाईल सबब फक्त १-१-२०१७ च्या युनिट्सवर टॅक्स माफ होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा