सत्यजित भाऊंची उत्तम गजल "ओंजळीने ती जसा झाकून घेते चेहरा" वाचली.
एक 'कोबरा' सोडला तर बाकी सगळे शेर डसले! :)
ईर्शाद. अर्थातच आमचा नजराणा....
ओंजळीने ती जरी झाकून घेते चेहरा...
येत नाही लपवता पण गाल मोठा गोबरा!
मोकळ्या केसांतुनी माळून येते तेरडा
अन् जटांचा जीवघेणा सुंभ दिसतो का बरा?
आरसा भंजाळतो हो ती जशी डोकावते
केवढी गबदूल आहे, कोण म्हणते अप्सरा!
ओठ ओठांनी स्वतःचे घट्ट मिटते सारखी
भिववतो भोळ्या जिवाला चुंबनांचा तोबरा!
काय सांगू केवढी असते भयानक भेट ती?
ती फुल्यांची मेहुणी अन् मी फुल्यांचा सोयरा!
-चतुरंग
वाचने
2689
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुकर्रर!
स्वतंत्र धागा काढून ब्येष्ट
=))
In reply to स्वतंत्र धागा काढून ब्येष्ट by मितान
नाही रे! नाही !
आरसा भंजाळतो हो ती जशी
क ह र !!
@मोकळ्या केसांतुनी माळून येते
वाह!..
कहर ,लोल
ओंजळीने ती जरी झाकून घेते