मंजु यांच्या धाग्यावर मी माझ्या व्हिज्युअल स्पेशिअल सेन्स बद्दल उल्लेख केला आहे.निसर्गाच्या या थोड्याशा वरदानामुळे लहानपणापासून एक छंद सोबतीला आहे.
मिनिएचर्सचा!
गाव,शहर यांच्या प्रतिकृती बनवण्याचा छंद मला आहे.जे काही बनवतो ते चांगलं बनवतो असा माझ्या आर्किटेक्ट बंधूंचा अभिप्राय आहे.पण बरं बनवतो असं समजायला हरकत नाही.
कागद,कार्डबोर्ड,थर्माकोल हीच माध्यमं आजपर्यंत वापरली आहेत.
आतापर्यंत हे सगळं छंद या मर्यादेपर्यंतच होतं.त्यामुळे त्यात शास्त्रशुध्दपणा नव्हता.आता असा विचार करतो आहे की याचं शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेऊन त्याचा आर्थिक प्राप्ती वाढवण्यासाठी काही उपयोग करता येईल का?
म्हणूनच या विषयातील प्रशिक्षण कुठे घेता येईल? तसंच या कलेचा उपयोग अर्थार्जनासाठी कशा प्रकारे करता येईल याबद्दल मार्गदर्शन हवं आहे.
सध्या मी कोल्हापुरात नोकरी करतो आहे.त्यामुळे पूर्ण वेळ शिक्षण घेणं शक्य होणार नाही.पण अर्धवेळ किंवा रविवारी असा वेळ मिळू शकतो.
या व्हिज्युअल स्पॅशिअल सेन्सचा उपयोग आणखी कुठे करता येईल का?
माझं शिक्षण आणि नोकरी दोन्ही इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातलं आहे.
सगळं व्यवस्थित जुळून आलं तर कालांतराने पूर्णवेळ इकडेच देण्याचा विचार आहे.तूर्तास प्रशिक्षण आणि याचा उपयोग करुन एखादा जोडव्यवसाय किंवा पार्टटाईम नोकरी एवढाच उद्देश ठेवला आहे!
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आगावू आभार मानतो!
याद्या
3457
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
"miniature museum" असे गूगल
धन्यवाद!
In reply to "miniature museum" असे गूगल by अत्रे
वेलकम! अजून एक कल्पना -
In reply to धन्यवाद! by उपयोजक
नक्की
In reply to वेलकम! अजून एक कल्पना - by अत्रे
जोशी म्युझीयमला भेट द्या.
हो
In reply to जोशी म्युझीयमला भेट द्या. by राघवेंद्र
हा छंद म्हणून एकदम मस्त आहे.
+१
In reply to हा छंद म्हणून एकदम मस्त आहे. by अभ्या..
थॅन्क्स खेडूतकाका,
In reply to +१ by खेडूत
आभार! वास्तव अाहे हे!
In reply to हा छंद म्हणून एकदम मस्त आहे. by अभ्या..
थोडक्यात कलेचा व्यवसाय
In reply to हा छंद म्हणून एकदम मस्त आहे. by अभ्या..