फुकाचे भरवसे मिळतात सारे, हवे ते नेहमीच हुलकावते..
मागावयाचे कुणाला-कशाला.. वेदना मनातील वदू लागते!
जगातील घडणे - जगाचे बिघडणे.. जगाचीच सारी दोषांतरे..
विवेकात शक्ती किती ती असावी.. डोळ्यात दिसती जुनी जळमटे!
कधी दिव्य काही मनातून उठते [की] स्वतःचीच झोळी खुजी भासते..
फुटक्या घड्याची ओंजळ कितीशी.. थेंबासही ती नको वाटते!
आशा-निराशा.. पुन्हा तीच रेषा.. गिरवण्यात आयुष्य शिलगावते!
असावी मनाची किती लक्तरे ती.. वेचावयाला उलटती युगे!
राघव
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1027
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
@
इतका विरोधाभास ?
In reply to @ by अत्रुप्त आत्मा
छान !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 3 पेग :- Kannada Rapper Chandan Shettyवाह!!