✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

(कुणाच्या फांदीवर कुणाची आर्ची)

स — स्वामी संकेतानंद, Tue, 01/17/2017 - 20:38
अत्यंत अर्थहीन, स्वैर आणि अजागळ विडंबन सादर आहे! कुणाच्या फांदीवर कुणाची आर्ची? कशासाठी चढवावे टेकू देऊन? झाड होते कुणासाठी मूळ रोवून? जमतात येथे कुणी मुव्हीज बघून! तरी कशी आणतात घरातुनी खुर्ची? लोक सारे येती येथे बुलेटवरून वृक्ष जाती वजनाने वाकून झुकून फांदीवर घेती सेल्फी झोकून झोकून म्हणती हे वेडे पीर, 'चढू फांदी वरची!' अंत झाला फोटोसाठी, जन्म एक सेल्फी पारध्याची वाणी म्हणजे बेचवच कुल्फी फांदी तीच परी तिची पडे गड्या ढलपी परश्यापरी आयुष्य हे फांदीमुळे खर्ची - स्वामी

प्रतिक्रिया द्या
3540 वाचन

💬 प्रतिसाद (11)

कैच्याकै विडंबन =))

सतिश गावडे
Tue, 01/17/2017 - 21:11 नवीन
कैच्याकै विडंबन =))
  • Log in or register to post comments

हरे राम!

पैसा
Tue, 01/17/2017 - 22:21 नवीन
हे काय आहे? याच्यामुळे झाडाच्या फांदीवर चढलेल्या मिपाबायका आणि बुडणारी संस्कृती आठवली!
  • Log in or register to post comments

अप्रतिम! 'ती' फांदी तुटली ना,

एस
Tue, 01/17/2017 - 22:33 नवीन
अप्रतिम! 'ती' फांदी तुटली ना, त्यावरून सुचलेय हे स्वामीजींना. _/\_
  • Log in or register to post comments

अरारारा!

पैसा
Tue, 01/17/2017 - 22:44 नवीन
आर्ची आणि परश्या हे आता ऐतिहासिक लोकांत जमा झाले का? नशीब आपल्याकडॅ बंगाली लोकांसारखी सिनेमानटांची देवळे बांधत नाहीत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

अरेरे.. तुटली? कशी काय?

खेडूत
Wed, 01/18/2017 - 10:07 नवीन
अरेरे.. तुटली? कशी काय? पर्यटन खाते काय करते तरी काय ? आता एक धातूचं म्युरल बनवून घ्या म्हणावं झाडासारखं, अन आमच्या लाडक्या कलाकारांचे पुतळे सुद्धा! माणसानं सेल्फी घ्यावी कशी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

अक्च्युअली ही भारी आयडिया आहे

एस
Wed, 01/18/2017 - 10:10 नवीन
अक्च्युअली ही भारी आयडिया आहे. पर्यटनखात्याने गंभीरपणे विचार करायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

Swamiji - the king of

आदूबाळ
Wed, 01/18/2017 - 00:19 नवीन
Swamiji - the king of unintended puns...
  • Log in or register to post comments

Swamiji - the king of

जयंत कुलकर्णी
Wed, 01/18/2017 - 11:14 नवीन
Swamiji - the king of intended puns... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

गप रंव

पैसा
Wed, 01/18/2017 - 11:29 नवीन
रे मेल्या, गप रंव. मिपावर एकतरी निरागस पोरगं असू दे! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

दुत्त दुत्त स्वामिज्जीईईईईईई!

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/18/2017 - 09:35 नवीन
दुत्त दुत्त स्वामिज्जीईईईईईई! =))
  • Log in or register to post comments

वाह वा...

थॉर माणूस
Wed, 01/18/2017 - 10:56 नवीन
वाह वा... एका वेगळ्याच उंचीवरून खाली येणारी कविता. :D
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा