Skip to main content

कोकणातली खादाडी!

लेखक कबीरा
Published on शुक्रवार, 13/01/2017
मेहेरबान लोकहो साधारण अलिबाग पासून ते तारकर्ली पर्यंत कोकण पालथा घातला तर कुठे कुठे दर्जा खायला मिळू शकेल ह्याची यादी करून ठेवायचा विचार आहे. म्हणजे कस नंतर गाडीला किक मारून एकदाच १०-१२ दिवसाचा प्ल्यान आखून मस्तपैकी कोकणाची खास निवांत पणे खादाडी वारी करून यावी. बुलेट ची साथ, कोकणाचा प्रवास, खायचं प्यायचं आणि निवांत समुद्र काठी एखाद आवडीचं पुस्तक घेऊन पडून राहायचं. अजून सुख ते काय?? हातात डायरी, पेन घेऊन तयार आहे गड्यानो...सुचवा एक एक ठिकाण

याद्या 3233
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

तुम्ही पूर्वीपण बरेच धागे टाकून माहीती गोळा केली आहे , त्याचे पुढे कुठे लोणचे घातलेत ते आधी सांगा ! आणी मुख्य म्हणजे थंडरबर्ड घेउन आरई कळपात आलाय याची जाहीर कबुली द्या

ए भावसाहेब, असा टेस्टी विषय काथ्याकूट मंदी का टाकते रे तुमी पोरेलोक, मस्त विषय हाय, पर अपुनचा पास, आपुनला नाय काय आयडिया.

आमचा तर घोळच होतो. निव्वळ शाकाहारी म्हटले की कुठून आले असं बघतात. कोकणात शाकाहारी कुठे मिळते ते सांगा मग निवांत कच्च्याबच्यासकट जातो कोकणात. गणपतीपुळे आणि एक दोन ठिकाणे सोडली तर माश्याच्या वासाने जेवण जात नाही पोरांना....

In reply to by जानु

रत्नागिरीत शाकाहारी सगळीकडे चांगले मिळते. आम्ही रत्नागिरीकर लोक मधे फेसबुकवर यादी करून लाळ गाळत बसलो होतो. उलट चांगले मासे शोधत फिरावे लागेल.

श्रीवर्धनला काही घरगुती हाॅटेल्स आहेत. लक्ष्मीनारायण मंदिरासमोर एक मस्त हाॅटेल आहे. नाव विसरलो पण तिकडे प्राॅन्स आणि मासे सुंदर मिळतात.

मालवण, हॉटेल रुचिरा कणकवली, हॉटेल निखिल कुडाळ, हॉटेल भाऊंची खानावळ गणपतीपुळे, हॉटेल समीर वरील ठिकाणी उत्तम मांसाहारी जेवण मिळते .