Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चला ऐकूया शास्त्रीय संगीत!!!

घ
घाटावरचे भट यांनी
गुरुवार, 10/02/2008 - 15:05  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11526 वाचन

💬 प्रतिसाद (33)

प्रतिक्रिया

घ
घाटावरचे भट गुरुवार, 10/02/2008 - 15:09 नवीन

वसंतराव देश्पांडे - मारवा

मी सुरुवात करतो मंडळी... वसंतराव देशपांडे म्हटलं की चटकन मारवा राग डोळ्यासमोर येतो इतकं त्यांचं आणि मारव्याचं नातं अतूट आहे. तो मारवा आपल्याला इथे ऐकता येइल - http://www.esnips.com/doc/f1d0b49f-4a52-4150-a4be-c98c47241f7b/Dr.-Vasantrao-Deshpande---Marwa ऐका आणि कळवा!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
श
शेखस्पिअर गुरुवार, 10/02/2008 - 20:11 नवीन

तोड्लस...

फोडलस...जियो.. बुवा...जियो... घाटावरचे बुवा... रापचिक....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
न
नंदन गुरुवार, 10/02/2008 - 15:15 नवीन

उपक्रम

छान आहे. मागे सर्किट यांनी अभिजात संगीतातील दहा रत्ने यावर मते मागवली होती, तेव्हा त्यांनी निवडलेल्या रागांचा शोध घेऊन लिहिलेला हा प्रतिसाद येथे पुन्हा द्यावासा वाटतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
आ
आगाऊ कार्टा गुरुवार, 10/02/2008 - 16:06 नवीन

शास्त्रीय संगीत

खालील दुव्यावर मी विविध गायकांची मला आवडलेली ध्वनीमुद्रणे साठवली आहेत... तुम्ही ती डाऊनलोड करु शकता... http://www.4shared.com/dir/5499114/ba18f5a6/Ameya.html
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 10/02/2008 - 16:53 नवीन

कार्ट्या...

कार्ट्या... ;) छान आहे रे तुझी लिंक... डाऊनलोड करतोय... बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आगाऊ कार्टा
आ
आगाऊ कार्टा गुरुवार, 10/02/2008 - 18:19 नवीन

अवांतर

धन्यवाद बिपिन महाराज.... अजुन एक दुवा.... http://www.4shared.com/dir/5849856/b0f96ecb/Marathi_Katha.html येथे मला आंतरजालावर मिळलेल्या विविध कथा साठवून ठेवल्या आहेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 10/02/2008 - 18:35 नवीन

अरे वा!!!

अरे वा!!! हळूच एक एक लिंका काढताय राव...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आगाऊ कार्टा
प
प्राजु गुरुवार, 10/02/2008 - 23:29 नवीन

कार्ट्या..

खरंच तुझी हि लि़क खूप कामाची आहे. मी फेव्हरेट्स मध्ये ऍड केली आहे. धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आगाऊ कार्टा
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/02/2008 - 16:44 नवीन

धन्यवाद

धन्यवाद भटसाहेब, छान धागा आहे.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 10/02/2008 - 16:52 नवीन

भटा... छान

भटा... छान आहे धागा. बिपिन.
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 10/02/2008 - 18:26 नवीन

हॉरर धागा

भटा शास्त्रिय संगीताची आम्हाला फार भिती वाट्टे ... मिसळपाव वरचा सगळ्यात दुर्मिळ प्रकार "हॉरर धागा" सुरू केल्याबद्दल अभिनंदन .. चालू द्या -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
  • Log in or register to post comments
ख
खडूस गुरुवार, 10/02/2008 - 18:48 नवीन

ह्या गाण्याची माहिती मिळाली तर नक्कीच आवडेल

मला 'आईशपथ' ह्या चित्रपटातील 'जागत तोरे कारन' हे गाणं खूप आवडतं. तज्ञानी माहिती दिली तर नक्कीच आवडेल. http://www.esnips.com/doc/c80c2070-adc2-442e-b5d9-d4e17af8014c/Aai-Shappath_Jagat-tore-karan संगीतातील 'ढ' - खडूस
  • Log in or register to post comments
स
सोम्यागोम्या गुरुवार, 08/05/2010 - 05:09 नवीन

जागत तोरे कारन

खडूस, जागत तोरे कारन ही बिलासखानी तोडी मधली सी. आर. व्यासांनी केलेली रचना आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खडूस
ख
खडूस Mon, 08/16/2010 - 10:35 नवीन

धन्यवाद :)

खूप खूप धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोम्यागोम्या
स
संजय अभ्यंकर गुरुवार, 10/02/2008 - 19:00 नवीन

चला ऐकूया शास्त्रीय संगीत!!!

शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीता साठी खालील दुवे: http://www.sawf.org/music/articles.asp?pn=Music http://www.parrikar.org/ संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... गुरुवार, 10/02/2008 - 19:34 नवीन

नमस्कार भटसाहेब.....

माझेही थोडे योगदान... यशवंत बुवा जोशी..भिमपलास...सुंदर..तालीम कशी हवी याची एक झलक... http://fb.esnips.com/doc/726a95ed-5837-4055-b589-f33db813cff7/Raag-Bhimpalasi स्वरभास्करांचा दरबारी...केवळ अप्रतिम... http://fb.esnips.com/doc/7ae9ed9e-25a2-43a7-966d-b888554dd2c9/Bhimsen-Joshi-Raag-Darbari-Kanada संजीव अभ्यंकर http://hindustaniclassical-anand.blogspot.com/ http://sramsoft.blogspot.com/ आपलाच.. मुकुल...
  • Log in or register to post comments
ह
हेरंब गुरुवार, 10/02/2008 - 20:27 नवीन

शंका

"याद ना जाये" हे , 'दिल एक मंदिर' मधले गाणे कुठल्या रागावर आधारित आहे ?
  • Log in or register to post comments
ख
खडूस गुरुवार, 10/02/2008 - 21:29 नवीन

राग - किरवाणी

ह्या दुव्यावर अधिक माहिती मिळू शकेल. http://www.asavari.org/songs.html - आहेच मी खडूस पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेरंब
प
प्रमोद देव गुरुवार, 10/02/2008 - 21:09 नवीन

इथून हवे तेव्हढे संगीत उतरवून घ्या.

पॅट्रिक मौटल्स ह्या संकेतस्थळावर भारतीय शास्त्रीय संगीताचा खजिना आहे.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sun, 12/28/2008 - 22:12 नवीन

वसंतराव देशपांडे - २ गंधारांचा गौड मल्हार

नमस्कार लोक्स, ईस्निप्सवर माझ्या एका मित्राने टाकलेले १९७८ सालातले एक लाईव्ह ध्वनिमुद्रण. यात वसंतरावांनी २ गंधार असलेला गौड मल्हार गायला आहे. कोमल गंधार आल्यामुळे रागाचं चलन थोडंफार रामदासी मल्हाराच्या जवळ गेलेलं आहे (उदा. पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांचा रामदासी मल्हार). या रागात कोमल गंधार प्रबल आहे, आणि गौड मल्हारात महत्वाच्या असणार्‍या शुद्ध गंधाराचं महत्व थोडं कमी झालंय (हे सगळे मी ऐकून काढलेले निष्कर्ष आहेत). एक उत्तम श्रवणानुभव. कोमल गंधार आणि त्यासोबत टिपिकल गौड मल्हारासारखी 'म म प ध नी प' ही संगती यांचं कॉम्बिनेशन झकासच....जरूर ऐका... हा दुवा - http://www.esnips.com/doc/70964c63-640a-4159-8ecf-14bdb3020f39/Vasantrao-Deshpande_Gaud-Malhar(LIVE) --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 10/03/2008 - 00:22 नवीन

हा धागा

हा धागा चांगलाच आहे, त्यामुळे जुनी, काळाच्या आड गेलेली मंडळी आणि त्यांची ध्वनिमुद्रणे ऐकायला मिळातात हे निर्विवाद.. परंतु प्रत्यक्ष मैफलींची मजा काही औरच! मला माझ्या भाग्याने अगदी भरपूर प्रत्यक्ष मैफली ऐकायला मिळाल्या, ती मर्मबंधातली ठेव खासच आहे... अभिजात संगीताच्या गेल्या २०-२५ वर्षातल्या खाजगी, जाहीर अश्या अनेक मैफलींच्या खूप खूप आठवणी आहेत, अगदी गवयाच्या हातात हात मिळवून समेला दाद देण्याचा आनंद मला अनेकदा मिळाला आहे आणि तो आनंद काही औरच असतो... भटसाहेबांच्या हा धाग्यामुळे त्या मैफलींच्या आठवणी सांगायचा मोह होतो आहे परंतु तूर्तास निवांत अशी सवडच मिळत नाही... :( असो, तात्या.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Fri, 10/03/2008 - 00:41 नवीन

आठवणी

तात्या, माझ्या पिढीतली, माझ्या आसपास वय असलेली अनेक मंडळी मिपावर आहेत ज्यांना दुर्दैवाने अनेक दिग्गज कलावंतांना प्रत्यक्ष ऐकायची संधी मिळाली नाही. आम्हाला त्यांच्या ध्वनिमुद्रणातच समाधान मानावं लागतं. तेव्हा आपल्या या आठवणी आमच्यासाठी नक्कीच आनंददायी ठरतील. अगदी पुनःप्रत्यय घेणं शक्य नसलं तरी निदान त्याच्या जवळपास तरी जाता येईल. तेव्हा येउ देत तुमच्या आठवणी. खरं तर तुम्ही 'मैफिली आठवणीतल्या' वगैरे सारखा एखादा क्रमशः धागाच सुरु करायला हवा. तुम्ही एवढं ऐकलं आहे की तुम्ही ते शेअर करायलाच हवं!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
व
विसोबा खेचर Fri, 10/03/2008 - 07:54 नवीन

भटसाहेब, थो

भटसाहेब, थोडी निवांत सवड मिळू दे, नक्की लिहिणार आहे... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
घ
घाटावरचे भट Mon, 10/13/2008 - 00:32 नवीन

यमन!!!

परमेश्वराने यमन ज्यांना आंदण म्हणून दिलाय अशा २ व्यक्ती...पं. भीमसेन जोशी आणि उस्ताद आमिर खानसाहेब. ऐकूया त्यांचा यमन... Image removed. पं. भीमसेन जोशी Image removed. उस्ताद आमिर खानसाहेब --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
म
मोहन Mon, 10/13/2008 - 17:56 नवीन

हे आणखी काही दुवे

ITC ने कोलकत्यात चालवलेली Sangeet Research Academy गुरुकुल पध्दतीने शास्त्रिय संगीत शिक्षणाचे काम कित्येक वर्षे करत आहे. पं कशाळकर, रशीद खान सारखे लोक तेथे गुरू म्हणून काम करत आहेत. www.itcsra.org www.sarangi.info ही पाकिस्तानी साईट आहे. ह्यावर अनेक दुर्मिळ संगीत आहे www.adityakhandwe.com ही माझ्या मुलाची साईट. त्यात त्यानी गायलेले काही राग उतरवता येतील. मोहन
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 10/30/2008 - 14:29 नवीन

सातार्‍या

सातार्‍याजवळ औंध नावाच्या गावात पं गजाननबुवा जोशी दरवर्शी एक महोत्सव साजरा करायचे. अजूनही हा महोत्सव होत असतो. दिवाळी अगोदरच्या एकादाशीला हा कार्यक्रम होतो. आडगाव असूनही अनेक दिग्गज कलाकार इथे येतात. झोंबणार्‍या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 11/02/2008 - 08:53 नवीन

मी अनेकदा

मी अनेकदा या उत्सवात गेलो आहे आणि अगदी मनसोक्त गाणं ऐकलं आहे... आपला, (गजाननबुवांच्या घरातला) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
घ
घाटावरचे भट Tue, 11/04/2008 - 05:55 नवीन

जुगलबंदी

मंडळी, जुगलबंदी हा आपल्या शास्त्रीय संगीतातील एक मनोहारी प्रकार. जेव्हा दोन (आणि डॉन) लोकांच्या वेगेवेगळ्या शैलींचा मिलाफ घडून येतो, तेव्हा तो श्रवणानंद अवर्णनीय असतो. माझ्याकडे असाच एक दूरदर्शनचा जुना व्हिडीओ आहे, तो मी यूट्यूब वर टाकीन म्हणत होतो. पण परवाच मला दिसलं की कोणीतरी आधीच तो तिकडे अपलोड केलाय. माझं कामच झालं. असो, आता त्या व्हिडीओविषयी - दिग्गज कलाकारांनी गायलेले २ पहाडाएवढे राग पं. भीमसेन जोशी आणि उस्ताद रशीद खां - राग दरबारी आणि राग मियां की तोडी राग दरबारी (किन बैरन कान भरे - पारंपारिक दरबारी मधली चीझ. यातल्या 'मोरा पिया मोसे बोलत नाही' वर भीमण्णांनी घेतलेली जागा आणि त्यानंतर रशीद खां यांच्याकडे बघून दिलेलं मिष्कील हास्य.......वाह!!!) भाग-१ भाग-२ राग मियां की तोडी (लंगर कांकरिया जी न मारो) राग मियां की तोडी आणि शेवटी डेझर्ट म्हणून राग शंकरा (आदि महादेव बीन बजावत) भाग-१ भाग-२ त्याच कार्यक्रमात गायलेली खमाज ठुमरीसुद्धा आहे पण ती या भल्या गृहस्थाने अपलोड केलेली दिसत नाही. सवड होताच अपलोड करीन. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Sun, 12/28/2008 - 22:25 नवीन

भीमपलास

बापूराव पलुसकर - भीमपलास (आकाशवाणी ध्वनिमुद्रण) बापूराव पलुसकर - जयजयवंती (आकाशवाणी ध्वनिमुद्रण) तशी जुनी आणि दुर्मिळ ध्वनिमुद्रणं आहेत. आमच्या एका मित्रवर्यांनी ईस्निप्सवर चढवलीयेत. जरूर ऐकून पाहा. बापूरावांचा अत्यंत निकोप आणि तितक्याच तयारीचा आवाज, गळ्यावर चढवलेली अस्सल परंपरेची ग्वाल्हेर गायकी आणि भीमपलास आणि जयजयवंतीसारखे मधुर राग.....जवाब नहीं.
  • Log in or register to post comments
स
स्वानन्द Sun, 12/28/2008 - 22:45 नवीन

मला

मला शास्त्रीय सन्गीताचं स्वरांवर आधारीत रसग्रहण करता येत नाही. पण ऐकायला मात्र जरूर आवडतं. एक वर्ष शिकलो पण ते म्हणजे समुद्रातल्या थेंबाप्रमाणे म्हणता येईल. सद्ध्या नोकरीमुळे लगेच गाणं शिकता येणं कठीण दिसतंय. पण यादरम्यान रागाची माहीती वाचायची आणि त्याच्या जालावरून वेगवेगळ्या कलाकारांच्या बन्दीशी, ख्याल अगदी जे मिळेल ते ऐकायचं असं ठरवलय. ऐकायला तर मिळतय. पण वाचण्यासठी फारसं काही मिळत नाहीये. कोणी एखादं पुस्तक /ईबूक सुचवू / देऊ शकता का? अच्युत गोडबोलेंचं नादवेध नावाचं एक खूप रंजक आणि माहितीपूर्ण सदर लोकसत्तेत यायचं. तसं काही मिळलं तर खूप बरं होईल. --स्वरानन्द
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Wed, 12/31/2008 - 13:55 नवीन

बरीच

बरीच पुस्तकं आहेत. नमुन्यादाखल काही १) पं. भातखंडे - हिंदुस्थानी संगीत पद्धती २) पं. विनायकराव पटवर्धन - राग विज्ञान भाग १ ते ७ ३) पं. रामाश्रय झा - अभिनव गीतांजली १ आणि २ बाजारात मिळतात की नाही ठाऊक नाही. १ मिळेल कदाचित, २ ची शक्यता धूसर आहे. ३ नक्की मिळेल. पण ही हार्डकोअर म्हणावीत अशी शास्त्रीय संगीतावरची पुस्तकं आहेत. म्हणजे रागाची थोडी माहिती, आणि अनेक बंदिशी. तुमची निकड नक्की हीच आहे का ते मला ठाऊक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द
स
स्वानन्द Wed, 12/31/2008 - 08:27 नवीन

आहे का

आहे का एखादं अस पुस्तक?
  • Log in or register to post comments
ज
जाई अस्सल कोल्हापुरी गुरुवार, 08/05/2010 - 17:06 नवीन

धृपद ऐकण्यात कोणाला रस आहे का?

धृपद धागा दिला तर चालतो का? काही डागर बंधुंचे अप्रतिम संकलन आहे.http://www.dhrupad.info/music.htm त्यातला अभोगी ऐका.....अप्रतिम आहे. मियाँ मल्हार ही सुंदर आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा