पंडित आताच तू गेल्याची बातमी वाचली आणी जाणवलं पुण्याशी आपुलकीने नातं असलेला अजून एका कलाकार गेला.
कित्येक चित्रपटातून तू भेटत होतास अगदी विविध रोल्स मध्ये पण तुझं खास असं अस्तिव जाणवलं ते 'माचीस' मध्ये त्यातला 'सनातन' तू ज्या दहकतेने रंगवला आहेस त्याला तोड नाही.
'जंगल बुक' मधला 'बघिरा' कोण विसरू शकेल, त्या आवाजातच एवढी जरब होती कि बस्स.....
अगदी कालपरवा तुझा 'मकबूल' पाहिला, त्यात नासिर बरोबरची तुझी जोडी झकासच होती. तुम्ही दोघही FTII च्या एकाच बॅच मधले असल्याने दोघांमधल जे को-ऑर्डिनेशन होतं, ते लाजबाब होतं. त्यातला तुझा 'इन्स्पेक्टर पंडीत' पाहून तुझी चीड हि आली आणि तुझ्या अभिनयाला सलाम हि करावा वाटला.
" शक्ती का संतुलन बना रहना चाहिए संसार में, आग के लिए पानी का डर होना चाहीएँ" या डायलॉग मध्ये आयुष्यातलं केवढ मोठं सत्य अगदी सहजपणे बोलून गेलास.
आयुष्यभर विविधरंगी भूमिकांतून डायलॉग प्रमाणे अभिनयाचं संतुलन राखलं होतंस , ते आता संपलं.

RIP पंडित जिथे असशील तिथे पण असंच शक्ती का संतुलन बनवून ठेव.
प्रतिक्रिया
6 Jan 2017 - 1:00 pm | विशाल कुलकर्णी
कितीतरी अजरामर भुमिका...
अर्धसत्य मधला वेलणकर, यात्रा मधला लेखक, मंडीमधला राम गोपाल, घायलमधला इन्स्पे. डिसोजा........
अतिशय ताकदीचा, गुणी कलावंत ! _/!\_
6 Jan 2017 - 1:31 pm | एस
कालच 'हन्ड्रेड फीट जर्नी' या चित्रपटाची आणि ओम पुरींच्या भूमिकेची आठवण आली होती आणि आज त्यांच्या निधनाचे दुःखद वृत्त वाचले. त्यांना सलाम!
6 Jan 2017 - 2:54 pm | पद्मावति
खूप वाईट वाटले. भावपूर्ण श्रद्धांजली _^_
6 Jan 2017 - 5:46 pm | तुषार काळभोर
समांतर व धंदेवाईक मसालापटांत तितक्याच सहजतेने वावरणार्या ओम पुरी यांना श्रद्धांजली.
-सेल्युलर की कसम
6 Jan 2017 - 6:12 pm | रेवती
हंड्रेड फूट जर्नीमधील लाजवाब अभिनय.
जे झाले ते वाईट झाले. जाण्याचे वय नव्हते.
श्रद्धांजली.
7 Jan 2017 - 1:50 am | रुपी
दंगलमधली गीताची भूमिका करणारी अभिनेत्री "चाची ४२०" मध्ये लहान मुलगी भारती होती. तिला पाहण्यासाठी अगदी २ मिनिटे तो सिनेमा लावला त्यात ओम पुरी होते. त्या चित्रपटात नेहमीच्या 'सिरियस' रोलपेक्षा वेगळीच भूमिका त्यांच्या वाट्याला आली होती.