✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रोकडरहित व्यवहारांसाठी भीम अ‍ॅप कसे वापरावे याची मराठीत माहिती.

क
कौशिक लेले यांनी
Sat, 12/31/2016 - 15:50  ·  लेख
लेख
कॅशलेस अर्थात रोकडरहित व्यवहार अधिक सहज व्हावेत या दृष्टीने कालच (३० डिसें २०१६) माननीय पंतप्रधानांनी "भीम" अ‍ॅपची घोषणा केली. यूपिआय अ‍ॅपचीच ही सुधारित आवृत्ती आहे आणि वापरायला अधिक सोपं आहे. पेटीएम प्रमाणे मोबईल नंबर वापरून पैसे पाठवणे, क्यूआर कोड वापरून समोरच्याचा नंबर घेणे अशा सुविधा यात दिल्या आहेत.माझ्या मोबाईल वर अ‍ॅंड्रॉईड ६.०.१ आहे आणि त्यात ते यशस्वीरित्या इन्स्टॉल झालं आणि काम करत आहे. हे भीम अ‍ॅप कसे वापरावे याची सोपी प्रक्रिया समजून घ्या मराठीतून. मी लिहिलेल्या या सचित्र ब्लॉगपोस्ट मधून http://kaushiklele-learnmarathi.blogspot.in/p/marathi-instructions-to-use-bhim-app.html तुम्ही वाचा; इतरांनाही सांगा, नक्की शेअर करा. आणि ब्लॉगपोस्ट कशी वाटली तेही सांगा. धन्यवाद, कौशिक लेले
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6218 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

शाब्बास !

संजय क्षीरसागर
Sat, 12/31/2016 - 16:14 नवीन
छान माहिती.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

कौशिक लेले
Sun, 01/01/2017 - 08:10 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

लय भारी!

जावई
Sun, 01/01/2017 - 06:26 नवीन
१ नंबर!
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

कौशिक लेले
Sun, 01/01/2017 - 08:11 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जावई

सुंदर माहिती, धन्यवाद !!!

साधा मुलगा
Sun, 01/01/2017 - 11:46 नवीन
सुंदर माहिती, धन्यवाद !!!
  • Log in or register to post comments

धन्यवाद. ब्लॉगपोस्ट आवडली

कौशिक लेले
Mon, 01/02/2017 - 18:30 नवीन
धन्यवाद. ब्लॉगपोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रमंडळीशी लिंक शेअर कराल का. - कौशिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साधा मुलगा

हे अ‍ॅप कालच इन्स्टॉल केले.

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 01/01/2017 - 13:46 नवीन
हे अ‍ॅप कालच इन्स्टॉल केले. हे इतर अ‍ॅप्सपेक्षा जास्त सुलभ आणि युजर फ्रेंडली आहे. मात्र एका बँकेतल्या एकापेक्षा जास्त अकाऊंटसाठी एकच मोबाईल फोन क्रमांक नोंदलेला असल्यास ते त्या बँकेसाठी वापरता येत नाही. ही कमी दूर करणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments

एका पेक्षा जास्त खात्यांना

कौशिक लेले
Mon, 01/02/2017 - 18:21 नवीन
एका पेक्षा जास्त खात्यांना एकाच नंबर दिला असेल तर सगळी खाती दिसतात त्यातील हवे ते खाते निवडता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

यादी दिसत नाही.

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 01/02/2017 - 20:26 नवीन
यादी दिसत नाही. फक्त, "एकापेक्षा जास्त अकाऊंट या नंबरशी जोडलेले आहेत असा संदेश येतो" आणि पुढे जाता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौशिक लेले

:( मी जेव्हा इन्स्टॉल केलं

कौशिक लेले
Tue, 01/03/2017 - 15:21 नवीन
:( मी जेव्हा इन्स्टॉल केलं तेव्हा मला यादी दिसली आणि त्यातलं एक खातं मी निवडलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

मला तशी यादी दिसली नाही.

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 01/03/2017 - 16:01 नवीन
मला बँकांची यादी दिसली... खात्यांची यादी दिसली नाही. १. सद्या एका फोनवर एकाच बँकेचा एकच खातेक्रमांक वापरता येतो. म्हणजे दर खात्याला वेगळा फोन वापरावा लागेल, जे गैरसोईचे आहे. २. एकाच फोनवरचे अ‍ॅप लॉगइन केल्यावर (अगोदर निवडलेल्या) अनेक बँकाची यादी ---> त्यातून बँक निवडल्यावर त्या बँकेतील (अगोदर निवडलेल्या) आपल्या अनेक खातेक्रमांकांची यादी दिसायला हवी ---> त्यातून हवा तो अकाऊंट निवडून व्यवहार पुरा करता यायला हवा. असे झाले तरच, एकाच फोनवरून हवा तो अकाऊंट वापरून व्यवहार करणे सोपे होईल. ३. असे झाल्यासच, (अ) दिवसाभरात अनेक बँकखाती वापरून अनेकदा आर्थिक व्यवहार करणारे व्यावसायिक आणि (आ) कुटुंबातील सर्व खात्यांचे व्यवहार सांभाळणारे ग्राहक, यांना हे अ‍ॅप सोईचे होईल आणि हे अ‍ॅप आणि इ-व्यवहार व्यवहारात येण्यास जोराची मदत मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौशिक लेले

माझा एक बँकेतला एकच अकाउंट

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 01/03/2017 - 16:05 नवीन
माझा एक बँकेतला एकच अकाउंट फोनशी जोडलेला आहे, त्याला भीमवर घेण्यास समस्या आली नाही. पण दुसर्‍या बँकेच्या अकाउंटसाठी दुसरा फोन घेणे व्यावहारीक नसेल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

माझ्या मोबाईल वर दिसत नाही हे

प्रकाश घाटपांडे
Sun, 01/01/2017 - 14:06 नवीन
माझ्या मोबाईल वर दिसत नाही हे अ‍ॅप. एनपीसीआय चे!
  • Log in or register to post comments

मी जो आयडी दिलाय तोच शोधात

कौशिक लेले
Mon, 01/02/2017 - 18:22 नवीन
मी जो आयडी दिलाय तोच शोधात आहात ना गुगल प्ले वर ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

bhim npci असा सर्च प्ले वर

प्रकाश घाटपांडे
Tue, 01/03/2017 - 09:59 नवीन
bhim npci असा सर्च प्ले वर दिला. पण एनपीसीआय चे अ‍ॅप दिसत नाही. डेलेना च भीम दिसतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौशिक लेले

संगणकावर प्ले स्टोअर वर

प्रकाश घाटपांडे
Tue, 01/03/2017 - 10:04 नवीन
संगणकावर प्ले स्टोअर वर पाहिले तर एनपीसीआयचे दिसते पण इनकॉम्पॅटिबल टु ऑल युवर डिव्हाईस असे दिसते. माझ अ‍ॅन्ड्रॉईड ४.०.४ आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

https://play.google.com/store

कौशिक लेले
Tue, 01/03/2017 - 15:23 नवीन
https://play.google.com/store/apps/details?id=in.org.npci.upiapp&hl=en च्या अनुसार "Requires Android 4.1 and up"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

माझे साइन इन होत नाही याच्यात

सतरंगी
Sun, 01/01/2017 - 21:42 नवीन
माझे साइन इन होत नाही याच्यात
  • Log in or register to post comments

अॅंड्राॅइडच अाहे ना?

स्वधर्म
Mon, 01/02/2017 - 12:16 नवीन
सध्या तरी हे अॅप फक्त अॅंड्राॅइड फोनवरच चालते. http://gadgets.ndtv.com/apps/news/bhim-app-android-download-ios-version-supported-banks-transaction-limits-and-more-you-need-to-know-1643528
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतरंगी

भीम अ‍ॅप वापरायला अतिशय सोपे

पुंबा
Mon, 01/02/2017 - 09:43 नवीन
भीम अ‍ॅप वापरायला अतिशय सोपे आहे आणि पेटीएम वगैरे वॅलेटसचा बाजार बसवण्याची पुरेपूर क्षमता याच्यात आहे. सरकारने याचा अधिकाधीक प्रचार प्रसार करावा. म्हात्रेकाका म्हणतात तसे एकच मोबाईल नंबर दोन किंवा अधिक खात्यांना दिलेला असेल तर अ‍ॅड करता येत नाहीत हा प्रॉब्लेम आहेच याशिवाय हे अ‍ॅप सर्वदूर पोचण्यात खालील अडचणी येऊ शकतात. १. आयएमपीएस चार्जेस : जवळजवळ सर्वच बँकांचा ठरावीक imps transactions charge आहे. जसे, एचडीएफसी साठी ५ रु. आकार आहे. १० रु. जरी पाठवले तरीही ५ रू. जातात. पेटीएम मध्ये असा चार्ज ग्राहकाकडून वसूल केला जात नाही. तेव्हा एका ठरावीक रकमेच्या transactions(उदा. १०००) करीता कुठलाच चार्ज असू नये. अर्थात बंकांना settlement करीता परतावा मिळायला हवाच, तेव्हा अश्या सर्व बंकांना या खर्चासाठी सरकारने सबसीडी द्यावी, लकी ड्रॉ सारख्या योजनांत पैसा खर्च करण्याऐवजी हे होऊ शकेल. जेणेकरून लोक भाजी खरेदीसाठीदेखील यूपीआय वापरू शकतील. २. पेटीएम प्रमाणे इथेदेखील पेमेंट झाल्याचा मेसेज लगेच आला पाहीजे, मी चचणी म्हणून मित्राला ५० रू. पाठवले त्याला तसा मेसेज आला नाही. तेच त्याने मला पैसे पाठवल्यानंतरदेखील झाले.
  • Log in or register to post comments

आयएमपीएस चार्जेस : मी

कौशिक लेले
Mon, 01/02/2017 - 18:27 नवीन
आयएमपीएस चार्जेस : मी आयसीआयसीआय आणि पंजाब नॅशनल बँक यांच्या मधून देवघेव करून बघितली (१०/-). मला कुठलाही चार्ज लागला नाही. मी आज (२ जानेवारीला ) पण ट्राय केले. चार्जेस लागले नाहीत. असं कसं ? पेटीएम प्रमाणे मला मेसेज लगेच आला आणि खात्यात पैसे पण लगेच दिसले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

लेले साहेब

स्वधर्म
Mon, 01/02/2017 - 12:18 नवीन
खूप महत्वाचे काम करत आहात असेच सुरू ठेवा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद. असं प्रोत्साहन

कौशिक लेले
Mon, 01/02/2017 - 18:28 नवीन
धन्यवाद. असं प्रोत्साहन मिळालं कि हुरूप वाढतो. ब्लॉगपोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रमंडळीशी लिंक शेअर करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म

भीम वापरलं आत्ताच. एका

अनुप ढेरे
Mon, 01/02/2017 - 15:20 नवीन
भीम वापरलं आत्ताच. एका मित्राला पाठवले पैसे. १००र चाचणी म्हणून. चार्जेस पडले नाहीत असं दिसतय. दोन सेकंदात बँकेत आल्याचा/गेल्याचा मेसेज आला. पेटीएमपेक्षा लैच भारी आहे.
  • Log in or register to post comments

तुमची बँक कोणती? मला एचडीएफसी

पुंबा
Mon, 01/02/2017 - 16:39 नवीन
तुमची बँक कोणती? मला एचडीएफसी ने चार्ज लावला ५ रु. शिवाय मेसेजदेखील नाही आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

ICICI

अनुप ढेरे
Mon, 01/02/2017 - 17:10 नवीन
ICICI
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

ICICI and PNB. no charges.

कौशिक लेले
Mon, 01/02/2017 - 18:29 नवीन
ICICI and PNB. no charges. माझा स्वतःचा अनुभव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

भीम डाउनलोड केल्यावर पुढे

सुबोध खरे
Mon, 01/02/2017 - 19:59 नवीन
भीम डाउनलोड केल्यावर पुढे जातच नाही. काय कारण असावे? दोन वेळेस डाउनलोड करून झाले. बाकी पे टी एम चिल्लर आणि पे झॅप पण मोबाईल वर आहेत त्यामुळे त्यांच्यात काही भांडण तर होत नाही?
  • Log in or register to post comments

प्ले स्टोअर वरून इन्स्टॉल

कौशिक लेले
Mon, 01/02/2017 - 20:52 नवीन
प्ले स्टोअर वरून इन्स्टॉल केलेत का फक्त डाउनलोड ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

उत्तम माहिती !

मदनबाण
Tue, 01/03/2017 - 06:23 नवीन
उत्तम माहिती !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ हैं आप से भी खूबसुरत आपके अंदाज हैं... :) :- Ghar (1978)
  • Log in or register to post comments

आपला आभारी आहे !!

कौशिक लेले
Tue, 01/03/2017 - 15:24 नवीन
आपला आभारी आहे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आयला अ‍ॅपला लिमिट आहे! एका

अनुप ढेरे
Tue, 01/03/2017 - 15:23 नवीन
आयला अ‍ॅपला लिमिट आहे! एका वेळेला जास्तित जास्तं १०हजार आणि दिवसाला २०.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा