कॅशलेस अर्थात रोकडरहित व्यवहार अधिक सहज व्हावेत या दृष्टीने कालच (३० डिसें २०१६) माननीय पंतप्रधानांनी "भीम" अॅपची घोषणा केली.
यूपिआय अॅपचीच ही सुधारित आवृत्ती आहे आणि वापरायला अधिक सोपं आहे. पेटीएम प्रमाणे मोबईल नंबर वापरून पैसे पाठवणे, क्यूआर कोड वापरून समोरच्याचा नंबर घेणे अशा सुविधा यात दिल्या आहेत.माझ्या मोबाईल वर अॅंड्रॉईड ६.०.१ आहे आणि त्यात ते यशस्वीरित्या इन्स्टॉल झालं आणि काम करत आहे.
हे भीम अॅप कसे वापरावे याची सोपी प्रक्रिया समजून घ्या मराठीतून. मी लिहिलेल्या या सचित्र ब्लॉगपोस्ट मधून
https://kaushiklele-learnmarathi.blogspot.in/p/marathi-instructions-to-…
तुम्ही वाचा; इतरांनाही सांगा, नक्की शेअर करा. आणि ब्लॉगपोस्ट कशी वाटली तेही सांगा.
धन्यवाद,
कौशिक लेले
वाचने
6298
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
शाब्बास !
छान माहिती.
धन्यवाद.
In reply to शाब्बास ! by संजय क्षीरसागर
धन्यवाद.
लय भारी!
१ नंबर!
धन्यवाद.
In reply to लय भारी! by जावई
धन्यवाद.
सुंदर माहिती, धन्यवाद !!!
सुंदर माहिती, धन्यवाद !!!
धन्यवाद. ब्लॉगपोस्ट आवडली
In reply to सुंदर माहिती, धन्यवाद !!! by साधा मुलगा
धन्यवाद. ब्लॉगपोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रमंडळीशी लिंक शेअर कराल का.
- कौशिक
हे अॅप कालच इन्स्टॉल केले.
हे अॅप कालच इन्स्टॉल केले. हे इतर अॅप्सपेक्षा जास्त सुलभ आणि युजर फ्रेंडली आहे.
मात्र एका बँकेतल्या एकापेक्षा जास्त अकाऊंटसाठी एकच मोबाईल फोन क्रमांक नोंदलेला असल्यास ते त्या बँकेसाठी वापरता येत नाही. ही कमी दूर करणे आवश्यक आहे.
एका पेक्षा जास्त खात्यांना
In reply to हे अॅप कालच इन्स्टॉल केले. by डॉ सुहास म्हात्रे
एका पेक्षा जास्त खात्यांना एकाच नंबर दिला असेल तर सगळी खाती दिसतात त्यातील हवे ते खाते निवडता येते.
यादी दिसत नाही.
In reply to एका पेक्षा जास्त खात्यांना by कौशिक लेले
यादी दिसत नाही.
फक्त, "एकापेक्षा जास्त अकाऊंट या नंबरशी जोडलेले आहेत असा संदेश येतो" आणि पुढे जाता येत नाही.
:( मी जेव्हा इन्स्टॉल केलं
In reply to यादी दिसत नाही. by डॉ सुहास म्हात्रे
:( मी जेव्हा इन्स्टॉल केलं तेव्हा मला यादी दिसली आणि त्यातलं एक खातं मी निवडलं
मला तशी यादी दिसली नाही.
In reply to :( मी जेव्हा इन्स्टॉल केलं by कौशिक लेले
मला बँकांची यादी दिसली... खात्यांची यादी दिसली नाही.
१. सद्या एका फोनवर एकाच बँकेचा एकच खातेक्रमांक वापरता येतो. म्हणजे दर खात्याला वेगळा फोन वापरावा लागेल, जे गैरसोईचे आहे.
२. एकाच फोनवरचे अॅप लॉगइन केल्यावर (अगोदर निवडलेल्या) अनेक बँकाची यादी ---> त्यातून बँक निवडल्यावर त्या बँकेतील (अगोदर निवडलेल्या) आपल्या अनेक खातेक्रमांकांची यादी दिसायला हवी ---> त्यातून हवा तो अकाऊंट निवडून व्यवहार पुरा करता यायला हवा. असे झाले तरच, एकाच फोनवरून हवा तो अकाऊंट वापरून व्यवहार करणे सोपे होईल.
३. असे झाल्यासच, (अ) दिवसाभरात अनेक बँकखाती वापरून अनेकदा आर्थिक व्यवहार करणारे व्यावसायिक आणि (आ) कुटुंबातील सर्व खात्यांचे व्यवहार सांभाळणारे ग्राहक, यांना हे अॅप सोईचे होईल आणि हे अॅप आणि इ-व्यवहार व्यवहारात येण्यास जोराची मदत मिळेल.
माझा एक बँकेतला एकच अकाउंट
In reply to मला तशी यादी दिसली नाही. by डॉ सुहास म्हात्रे
माझा एक बँकेतला एकच अकाउंट फोनशी जोडलेला आहे, त्याला भीमवर घेण्यास समस्या आली नाही. पण दुसर्या बँकेच्या अकाउंटसाठी दुसरा फोन घेणे व्यावहारीक नसेल !
माझ्या मोबाईल वर दिसत नाही हे
माझ्या मोबाईल वर दिसत नाही हे अॅप. एनपीसीआय चे!
मी जो आयडी दिलाय तोच शोधात
In reply to माझ्या मोबाईल वर दिसत नाही हे by प्रकाश घाटपांडे
मी जो आयडी दिलाय तोच शोधात आहात ना गुगल प्ले वर ?
bhim npci असा सर्च प्ले वर
In reply to मी जो आयडी दिलाय तोच शोधात by कौशिक लेले
bhim npci असा सर्च प्ले वर दिला. पण एनपीसीआय चे अॅप दिसत नाही. डेलेना च भीम दिसतय.
संगणकावर प्ले स्टोअर वर
In reply to bhim npci असा सर्च प्ले वर by प्रकाश घाटपांडे
संगणकावर प्ले स्टोअर वर पाहिले तर एनपीसीआयचे दिसते पण इनकॉम्पॅटिबल टु ऑल युवर डिव्हाईस असे दिसते. माझ अॅन्ड्रॉईड ४.०.४ आहे
https://play.google.com/store
In reply to संगणकावर प्ले स्टोअर वर by प्रकाश घाटपांडे
https://play.google.com/store/apps/details?id=in.org.npci.upiapp&hl=en
च्या अनुसार "Requires Android 4.1 and up"
माझे साइन इन होत नाही याच्यात
माझे साइन इन होत नाही याच्यात
अॅंड्राॅइडच अाहे ना?
In reply to माझे साइन इन होत नाही याच्यात by सतरंगी
सध्या तरी हे अॅप फक्त अॅंड्राॅइड फोनवरच चालते. https://gadgets.ndtv.com/apps/news/bhim-app-android-download-ios-versio…
भीम अॅप वापरायला अतिशय सोपे
भीम अॅप वापरायला अतिशय सोपे आहे आणि पेटीएम वगैरे वॅलेटसचा बाजार बसवण्याची पुरेपूर क्षमता याच्यात आहे. सरकारने याचा अधिकाधीक प्रचार प्रसार करावा. म्हात्रेकाका म्हणतात तसे एकच मोबाईल नंबर दोन किंवा अधिक खात्यांना दिलेला असेल तर अॅड करता येत नाहीत हा प्रॉब्लेम आहेच याशिवाय हे अॅप सर्वदूर पोचण्यात खालील अडचणी येऊ शकतात.
१. आयएमपीएस चार्जेस : जवळजवळ सर्वच बँकांचा ठरावीक imps transactions charge आहे. जसे, एचडीएफसी साठी ५ रु. आकार आहे. १० रु. जरी पाठवले तरीही ५ रू. जातात. पेटीएम मध्ये असा चार्ज ग्राहकाकडून वसूल केला जात नाही. तेव्हा एका ठरावीक रकमेच्या transactions(उदा. १०००) करीता कुठलाच चार्ज असू नये. अर्थात बंकांना settlement करीता परतावा मिळायला हवाच, तेव्हा अश्या सर्व बंकांना या खर्चासाठी सरकारने सबसीडी द्यावी, लकी ड्रॉ सारख्या योजनांत पैसा खर्च करण्याऐवजी हे होऊ शकेल. जेणेकरून लोक भाजी खरेदीसाठीदेखील यूपीआय वापरू शकतील.
२. पेटीएम प्रमाणे इथेदेखील पेमेंट झाल्याचा मेसेज लगेच आला पाहीजे, मी चचणी म्हणून मित्राला ५० रू. पाठवले त्याला तसा मेसेज आला नाही. तेच त्याने मला पैसे पाठवल्यानंतरदेखील झाले.
आयएमपीएस चार्जेस : मी
In reply to भीम अॅप वापरायला अतिशय सोपे by पुंबा
आयएमपीएस चार्जेस : मी आयसीआयसीआय आणि पंजाब नॅशनल बँक यांच्या मधून देवघेव करून बघितली (१०/-). मला कुठलाही चार्ज लागला नाही. मी आज (२ जानेवारीला ) पण ट्राय केले. चार्जेस लागले नाहीत.
असं कसं ?
पेटीएम प्रमाणे मला मेसेज लगेच आला आणि खात्यात पैसे पण लगेच दिसले.
लेले साहेब
खूप महत्वाचे काम करत आहात असेच सुरू ठेवा.
धन्यवाद. असं प्रोत्साहन
In reply to लेले साहेब by स्वधर्म
धन्यवाद. असं प्रोत्साहन मिळालं कि हुरूप वाढतो.
ब्लॉगपोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रमंडळीशी लिंक शेअर करा.
भीम वापरलं आत्ताच. एका
भीम वापरलं आत्ताच. एका मित्राला पाठवले पैसे. १००र चाचणी म्हणून. चार्जेस पडले नाहीत असं दिसतय. दोन सेकंदात बँकेत आल्याचा/गेल्याचा मेसेज आला. पेटीएमपेक्षा लैच भारी आहे.
तुमची बँक कोणती? मला एचडीएफसी
In reply to भीम वापरलं आत्ताच. एका by अनुप ढेरे
तुमची बँक कोणती? मला एचडीएफसी ने चार्ज लावला ५ रु. शिवाय मेसेजदेखील नाही आला.
ICICI
In reply to तुमची बँक कोणती? मला एचडीएफसी by पुंबा
ICICI
ICICI and PNB. no charges.
In reply to ICICI by अनुप ढेरे
ICICI and PNB. no charges. माझा स्वतःचा अनुभव.
भीम डाउनलोड केल्यावर पुढे
भीम डाउनलोड केल्यावर पुढे जातच नाही. काय कारण असावे?
दोन वेळेस डाउनलोड करून झाले.
बाकी पे टी एम चिल्लर आणि पे झॅप पण मोबाईल वर आहेत त्यामुळे त्यांच्यात काही भांडण तर होत नाही?
प्ले स्टोअर वरून इन्स्टॉल
In reply to भीम डाउनलोड केल्यावर पुढे by सुबोध खरे
प्ले स्टोअर वरून इन्स्टॉल केलेत का फक्त डाउनलोड ?
उत्तम माहिती !
उत्तम माहिती !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ हैं आप से भी खूबसुरत आपके अंदाज हैं... :) :- Ghar (1978)
आपला आभारी आहे !!
In reply to उत्तम माहिती ! by मदनबाण
आपला आभारी आहे !!
आयला अॅपला लिमिट आहे! एका
आयला अॅपला लिमिट आहे! एका वेळेला जास्तित जास्तं १०हजार आणि दिवसाला २०.