गाभा:
गेल्या काही दिवसांत युरोपात आश्रय घेण्यासाठी म्हणून आलेल्या निर्वासितांसंबंधीचे काही व्हिडीओ पाहिले. ते पाहता युरोपची वाट लागतेय/लागलीये असंच वाटायला लागलंय. युरोपस्थित किंवा नुकतंच युरोपात जाऊन आलेली मंडळी यावर प्रकाश टाकू शकतील का? धन्यवाद.
यावर आधी चर्चा झाली असल्यास व ती आजच्या स्थितीतही वैध असल्यास तिचा धागा मिळाला तरी आवडेल.
प्रतिक्रिया
29 Dec 2016 - 5:12 am | खटपट्या
ज्या युरोपीय देशांनी सीरीयन निर्वासीतांना आश्रय दीलाय त्यांची पंचाइत झालीय खरी. नुकतेच जर्मनी आणि फ्रान्स मधे हे परीणाम दीसू लागले आहेत. या निर्वासीतांबरोबर पुर्वी कोणत्या न कोणत्या दहशदवादी गटाबरोबर काम केलेले लोक युरोपात दाखल झालेत.
हे निर्वासीत निर्वासीतांसारखे रहात नाहीत. आपण पाहूणे आहोत, आपल्याला आश्रय देउन या देशाने आपल्यावर उपकार केलेत ही भावना या निर्वासीतांमधे नाही. सर्व काही ओरबाडून घेण्याची व्रुत्ती गेली नाही. संस्कारांचा भाग आहे...
29 Dec 2016 - 11:10 am | पैसा
जागतिकीकरण का हे! उंट आणी अरब आठवले.
29 Dec 2016 - 12:18 pm | मधुरा देशपांडे
जर्मनीतील निर्वासितांचे प्रश्न
हे वर्षभरा पूर्वीचे काही अनुभव. त्यानंतर सुद्धा परिस्थिती फार बदललेली नाही. उलट दुर्दैवाने निर्वासितांच्या नावाने अनेक पाकिस्तानी, अफगाण आणि इतर लोक आले आहेत हे मात्र ठळकपणे दिसले. :(
29 Dec 2016 - 5:05 pm | सूड
ही बातमी कितपत खरी आहे?
30 Dec 2016 - 9:37 am | मधुरा देशपांडे
नक्की सांगता येणार नाही, पण निदान लोकल न्यूज चॅनल वर जे काही थोडंफार ऐकण्यात येतं, त्यावरून काही लोक परत गेल्याबद्दल आणि बॉर्डर कंट्रोल बद्दल ऐकलं आहे, पण इथे या बातमीत दिलेल्या प्रचंड संख्येनी लोक परत गेले असतील असं वाटत नाही, शिवाय परत जाताना भरपूर पैसे दिले, म्हणजे आर्थिक भार आहेच सरकारवर.
29 Dec 2016 - 12:28 pm | डॉ सुहास म्हात्रे
निर्वासितांच्या स्वरूपात पाश्चिमात्य देशांत स्लिपर सेल पसरविणे हे आपले ध्येय आयसिसने अनेकदा उघडपणे जाहीर केलेले आहे. तेव्हा हे अपेक्षितच होते.
पाश्चिमात्य देशांतील उदारमतवादींची मते मध्यपूर्वेसंबंधात अतिउदारमतवादी (अल्ट्रा-लिबरल) होतात, याचा पुरेपूर फायदा अतिरेक्यांनी घेतला तर आश्चर्य काय ?!
29 Dec 2016 - 4:24 pm | mandarbsnl
तुष्टीकारणाची लाचारी जोवर संपत नाही तोपर्यंत हे असंच... एका भाविष्यवाणीप्रमाणे फ्रान्स ची आता पूर्णतः वाताहत होणार आहे... संस्कार तसे असल्याने ती लोकं जिहादी होणारच...
30 Dec 2016 - 7:41 am | मारवा
संस्कार तसे असल्याने ती लोकं जिहादी होणारच...
ठाम
स्वराज्य हा ...मिळवणार च
30 Dec 2016 - 5:14 pm | सूड
हे वाचा. एका धर्मवेड्या माथेफिरुने ख्रिसमस बाजाराची धुळधाण उडवली आहे. १२ लोक मेलेत. अतिरेक्यांना धर्म नसतो हे लाख वेळा मान्य केलं तरी प्रत्येक अतिरेकी विशिष्ट धर्माचाच का असतो हा प्रश्न उरतोच.
Dschihad= जिहाद
31 Dec 2016 - 12:10 pm | गुरूप्रसाद बाचल
मी रविवारी दो महिने युरोप मध्ये राहून परत आलो,या दोन महिन्यात रेफ्यूजी समजून मला कमी अधिक त्रास झाला.जसे moll मध्ये गेल्यावर लगेच पोलिस येवून passport चेक करणे,खरेदी करायला पैसे आहे का? कचरा कागद पडलेला असेल तर तो आम्ही टाकला या भावनेने लोकांचे पाहणे, जेव्हा आम्ही आमच्या युरोपियन मित्रांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले लोक तूम्हाला रेफ्यूजी समजून असे वागतात कारण त्यांना खूप त्रास झालेला आहे