आपण लहान असतो तेव्हा आपल्याला आपण कधी एकदाचे मोठे होतो असे सतत वाटत असते.लहानपणाची मजा जरी वेगळी असली तरी प्रत्येकाला मोठेपणाच्या एलाईट क्लबात सामिल व्हायचे असते.मी लहान असताना स्वतःला दाढीमिश्या काढून आपण मोठे झालो आहोत अशी स्वतःची समजुत करुन घ्यायचो.वडील म्हणायचे तुलाही येतील दाढी मिश्या,जरा कळ काढ .यथावकाशात मला भरघोस दाढीमिश्या आल्या.मी नवतरुण होतो.दाढी कोरणे ,मिश्या वाढवने असले प्रकार कॉलेजमध्ये करायचो.त्यावेळेस आमच्याकडे यझदी गाडी होती ,ती गावातून सुसाट पळवणे हा माझा छंद होता.
काही दिवसांपुर्वी मी आरश्यात बघत असताना लक्षात आले की आपले केस पांढरे व्हायला लागले आहेत.पुर्वीची दाढीची काळीभोर खुंट आता बरीच पांढरी पडायला लागली आहेत.तरी मी दाढी वाढवली.यथावकाश आजुबाजुचे माझे तरुण मित्र मला " ओ काका " अशी हाक मारुन चिडवायला लागले.ज्या षोडशा मला दादा म्हणायच्या त्या काका म्हंणायला लागल्या तेव्हा माझी झिंग उतरली.विचार करु लागलो ,आता आपण नवतरुण राहीलेलो नाही.आपण ३० नुकतेच पार केले आहे.त्यादिवशी नेहमीप्रमाणे मैदानावर चालायला गेलो.एक रनिंग करणारा मित्र भेटला ,त्याच्या बरोबर थोडे रनिंग करुन बघुयात म्हणून पळायला सुरवात केली.अवघ्या काही सेकंदात धाप लागायला लागली.हातानेच त्याला पुढे जायला सांगितले व तिथेच थांबलो.घरी येताना बाईक चालवत येत होतो,आजुबाजुने नवतरुणांच्या बाइक्स सुसाट जात होत्या ,मी बराच संथ चाल्वत होतो,दहा वर्षापुर्वीचा यझदीवरचा वेग मला आता भीती दाखवत होता.मला आठवायला लागले ते कॉलेजमधले दिवस ,१८,१९ वर्षांचा असताना अंगात असलेली रग,बेदरकारपणा कुठल्याकुठे उडून गेला होता.राहीले होते फक्त ७० किलोचे संथावलेले शरीर.वयाने त्याचे परिणाम दाखवायला सुरवात केली आहे.
अजुन मिडलाईफ यायला खुप वेळ आहे.पण त्याची आतापासुनच भीती वाटायला लागली आहे.साठीतले रोग आजकाल चाळीशीत आले आहेत.न जाणो आपल्यालाही चाळीशीतच डायबेटिस ,हार्ट् ब्लॉकेज असे काही जडले तर?
मग या वाढत्या वयाविषयी इतरांना काय वाटते ते विचारुन बघितले.सगळ्यांनी माझाच विचार परत माझ्यापाशी बोलुन दाखवला.मित्र ही तेच बोलत होते.साला आजकाल पुर्वीसारखा जल्लोष वाटत नाही कशात.
या वाढत्या वयाचा शाररीक ,आर्थिक , लैंगिक ,भावनिक सर्व् पातळ्यांवर परिणाम होतो.हळवेपणा वाढतो,होपलेसनेसही वाढत जातो.एखाद्या फटाका मुलीने दिलेले किलर लुक तितकीशी शिरशीरी आणत नाहीत ,जेव्हढि कॉलेजमध्ये यायची.शेतीच्या कामात मी नियमीत लक्ष घालत असल्याने तिथे अजुन वयाचा परिणाम तितपत जाणवत नाही.असो ,मी माझेच पुराण सांगत बसत नाही.तुम्हाला ,स्त्री पुरुष दोघांना माझे काही प्रश्न.
१. तुम्हाला तुमच्या वाढलेल्या/वाढत असलेल्या वयाचा त्रास होतो का?
२.वाढत्या वयाचे काय शाररीक ,मानसिक,आर्थिक परिणाम होत आहेत.? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह.
३. वयाबरोबर सौंदर्य लोप पावत असे म्हणतात ,अदर सेक्सला तुम्ही कमी अपील होत जात आहात का? यावर उपाय काय ?
४.आपल्याला सुयोग्य आहाराने वय लपवता येते,आपण तरुण दिसतो हे कितपत खरे आहे?
५.ग्रेसफुल एजिंग हा काय प्रकार आहे ते मला समजले नाही,कुणी सोप्या शब्दात सांगितले तर आभारी राहीन.
धन्यवाद.
वाचन संख्या
4272
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म्म
तुम्हाला तुमच्या वाढलेल्या/वाढत्या वयाचा गिल्ट येतो का???
आताशा मी फक्त बकाणे पॉपकॉर्नचे भरतो.......
मूळ धागा न वाचता डायरेक्ट
टफी आप लगे राहो
आत्मपरिक्षण
क्या से क्या हो गया
मैय्या मोरी, मैं नहीं माखन
In reply to क्या से क्या हो गया by एस
यम्मा
In reply to मैय्या मोरी, मैं नहीं माखन by यशोधरा
मेरी सुबहो को, तेरी शामों का
In reply to यम्मा by रुस्तम
रुक जाना नही तू कभी हार के
In reply to मेरी सुबहो को, तेरी शामों का by अनन्त अवधुत
हम दिल दे चुके सनम,
In reply to रुक जाना नही तू कभी हार के by एस
माँग के साथ तुम्हारा मैंने,
In reply to हम दिल दे चुके सनम, by रेवती
रजनीगंधा जीवनी या
In reply to माँग के साथ तुम्हारा मैंने, by नावातकायआहे
काय मग मिपाकर्स, जेवण झाले का
हो
हाफ़ीसात जेवलो, पंजाबी भाज्या.
In reply to हो by आमोद
घरी
In reply to हाफ़ीसात जेवलो, पंजाबी भाज्या. by मोदक
पोळी, कोशिंबीर आणि खर्डा.
In reply to घरी by आमोद
कढीभात. थालिपीठं. बाजरीची
In reply to पोळी, कोशिंबीर आणि खर्डा. by आदूबाळ
पोळी, हिरव्या मुगाची उसळ.
In reply to कढीभात. थालिपीठं. बाजरीची by एस
मी अबीरला पटकन गिळता यावा
In reply to पोळी, हिरव्या मुगाची उसळ. by रेवती
तिखटामिठाच्या पुर्यांबद्दल
In reply to मी अबीरला पटकन गिळता यावा by पिलीयन रायडर
तुमचं पहिलं वाक्य तुफान
In reply to मी अबीरला पटकन गिळता यावा by पिलीयन रायडर
=))
In reply to तुमचं पहिलं वाक्य तुफान by संदीप डांगे
पण तुम्ही अबीरला का गिळताय? =
In reply to =)) by पिलीयन रायडर
आयुष्याचा तो टप्पा आलाय...
आयुष्याचा तो टप्पा आलाय...
ऑ अच्चं जालं तल
हे पोस्ट टाकणाऱ्या माणसाला