Skip to main content

तुम्हाला तुमच्या वाढलेल्या/वाढत्या वयाचा गिल्ट येतो का???

Published on बुधवार, 14/12/2016
आपण लहान असतो तेव्हा आपल्याला आपण कधी एकदाचे मोठे होतो असे सतत वाटत असते.लहानपणाची मजा जरी वेगळी असली तरी प्रत्येकाला मोठेपणाच्या एलाईट क्लबात सामिल व्हायचे असते.मी लहान असताना स्वतःला दाढीमिश्या काढून आपण मोठे झालो आहोत अशी स्वतःची समजुत करुन घ्यायचो.वडील म्हणायचे तुलाही येतील दाढी मिश्या,जरा कळ काढ .यथावकाशात मला भरघोस दाढीमिश्या आल्या.मी नवतरुण होतो.दाढी कोरणे ,मिश्या वाढवने असले प्रकार कॉलेजमध्ये करायचो.त्यावेळेस आमच्याकडे यझदी गाडी होती ,ती गावातून सुसाट पळवणे हा माझा छंद होता. काही दिवसांपुर्वी मी आरश्यात बघत असताना लक्षात आले की आपले केस पांढरे व्हायला लागले आहेत.पुर्वीची दाढीची काळीभोर खुंट आता बरीच पांढरी पडायला लागली आहेत.तरी मी दाढी वाढवली.यथावकाश आजुबाजुचे माझे तरुण मित्र मला " ओ काका " अशी हाक मारुन चिडवायला लागले.ज्या षोडशा मला दादा म्हणायच्या त्या काका म्हंणायला लागल्या तेव्हा माझी झिंग उतरली.विचार करु लागलो ,आता आपण नवतरुण राहीलेलो नाही.आपण ३० नुकतेच पार केले आहे.त्यादिवशी नेहमीप्रमाणे मैदानावर चालायला गेलो.एक रनिंग करणारा मित्र भेटला ,त्याच्या बरोबर थोडे रनिंग करुन बघुयात म्हणून पळायला सुरवात केली.अवघ्या काही सेकंदात धाप लागायला लागली.हातानेच त्याला पुढे जायला सांगितले व तिथेच थांबलो.घरी येताना बाईक चालवत येत होतो,आजुबाजुने नवतरुणांच्या बाइक्स सुसाट जात होत्या ,मी बराच संथ चाल्वत होतो,दहा वर्षापुर्वीचा यझदीवरचा वेग मला आता भीती दाखवत होता.मला आठवायला लागले ते कॉलेजमधले दिवस ,१८,१९ वर्षांचा असताना अंगात असलेली रग,बेदरकारपणा कुठल्याकुठे उडून गेला होता.राहीले होते फक्त ७० किलोचे संथावलेले शरीर.वयाने त्याचे परिणाम दाखवायला सुरवात केली आहे. अजुन मिडलाईफ यायला खुप वेळ आहे.पण त्याची आतापासुनच भीती वाटायला लागली आहे.साठीतले रोग आजकाल चाळीशीत आले आहेत.न जाणो आपल्यालाही चाळीशीतच डायबेटिस ,हार्ट् ब्लॉकेज असे काही जडले तर? मग या वाढत्या वयाविषयी इतरांना काय वाटते ते विचारुन बघितले.सगळ्यांनी माझाच विचार परत माझ्यापाशी बोलुन दाखवला.मित्र ही तेच बोलत होते.साला आजकाल पुर्वीसारखा जल्लोष वाटत नाही कशात. या वाढत्या वयाचा शाररीक ,आर्थिक , लैंगिक ,भावनिक सर्व् पातळ्यांवर परिणाम होतो.हळवेपणा वाढतो,होपलेसनेसही वाढत जातो.एखाद्या फटाका मुलीने दिलेले किलर लुक तितकीशी शिरशीरी आणत नाहीत ,जेव्हढि कॉलेजमध्ये यायची.शेतीच्या कामात मी नियमीत लक्ष घालत असल्याने तिथे अजुन वयाचा परिणाम तितपत जाणवत नाही.असो ,मी माझेच पुराण सांगत बसत नाही.तुम्हाला ,स्त्री पुरुष दोघांना माझे काही प्रश्न. १. तुम्हाला तुमच्या वाढलेल्या/वाढत असलेल्या वयाचा त्रास होतो का? २.वाढत्या वयाचे काय शाररीक ,मानसिक,आर्थिक परिणाम होत आहेत.? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. ३. वयाबरोबर सौंदर्य लोप पावत असे म्हणतात ,अदर सेक्सला तुम्ही कमी अपील होत जात आहात का? यावर उपाय काय ? ४.आपल्याला सुयोग्य आहाराने वय लपवता येते,आपण तरुण दिसतो हे कितपत खरे आहे? ५.ग्रेसफुल एजिंग हा काय प्रकार आहे ते मला समजले नाही,कुणी सोप्या शब्दात सांगितले तर आभारी राहीन. धन्यवाद.

याद्या 4272
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

रहने दो, तुमसे ना हो पायेगा

मला माझ्या वाढलेल्या/वाढत्या वयाचा गिल्ट येतो का हे माहित नाही पण आताशा मिपावर येणाचा गिल्ट यायला लागलाय. अमुक आयडी आता खुडूक झालायं असं काही नोटिफिकेशन देणारं फिचर मिपावर भविष्यात आणता येईल काय ? कृप्या पर्सनळी घेऊ नये ही विन्ती. आजचा अभ्यास : खुडूक होणे म्हणजे काय ?

धाग्याची या विदारक परिस्थिती स्वत:अनुभवतो..... आता आता मेंदू केवळ झटके ते देतो.... टफींचा नवीन धागा बघता मी लगेच गारठतो..... आता कुठले सखोल धागे पुन्हा ते दिसती ? आता नाही मिपाची समई...उरली निव्वळ उदबत्ती !

मूळ धागा न वाचता डायरेक्ट प्रतिसाद वाचायला आलो, ह्याचा मला अजिबात गिल्ट येत नाही! तुम्हाला येतो काय? (प्रश्न वाचकांना आहे हेवेसांनल)

सर्व गदारोळात आपले धागेच तेव्हडे आमच्यासाठी मनोरंजन हो :)

टर्बोपंत, काही म्हणा तुमचे धागे विचार करायला लावणारे असतात. विशेषतः हा धागा प्रत्येकाला आत्मपरिक्षण करायला लावणारा आहे. यावर प्रांजळ प्रतिसाद येतील, अशी आशा आहे. मी माझे अनुभव लवकरच लिहेन.

In reply to by रुस्तम

मेरी सुबहो को, तेरी शामों का, मेरी शामों को, तेरे वादों का, मेरी रातों को, तेरे ख्वाबो का, मेरी निंदो को, तेरी बाहों का, मेरे जज्बों को, तेरी चाहों का, बहकी बहकी सी कुछ खताओं का, खूबसूरत से कुछ गुनाहों का इंतजार.. इंतजार... अपने बादल का, अपनी बारिश का, अपने सावन का इंतजार, अपनी धडकन का, अपनी सांसों का, अपने जीने का इंतजार.. तेरे आने का, तुझको पाने का, फिर ना जाने का इंतजार... र

In reply to by अनन्त अवधुत

रुक जाना नही तू कभी हार के काटों पे चल कर मिलेंगे साये बहार के ओ राही, ओ राही ओ राही, ओ राही ओ राही, ओ राही ओ राही, ओ राही ह

In reply to by रेवती

माँग के साथ तुम्हारा मैंने, मांग लिया संसार दिल कहे दिलदार मिला, हम कहें हमें प्यार मिला प्यार मिला हमें यार मिला, एक नया संसार मिला आस मिली अरमान मिला जीने का सामान मिला मिल गया एक सहारा माँग के साथ तुम्हारा ... "र" येतोय

आपले? काय जेवलात आज?

In reply to by रेवती

मी अबीरला पटकन गिळता यावा म्हणुन दलिया केला आहे आज भाज्या घालुन. :) पण आता कशाला गाजराचा हलवा वगैरे सांगितलंस ग? परत भुक लागली.

In reply to by पिलीयन रायडर

तिखटामिठाच्या पुर्‍यांबद्दल बोलायला नको म्हणून गाजर का हलवा म्हणाले, नाहीतर खस्ता कचोर्‍याही पाच सात आहेत. स्वारी बरं का. चल भेंड्या खेळायला.

In reply to by संदीप डांगे

=)) ओ तो आजारी आहे हो!!! म्हणुन... पण माझा स्वयंपाकातला आनंद पहाता दुसर्‍या पद्धतीने घ्यायलाही माझी ना नाही!! मी आपलं पोळी-भाजी ऐवजी दलिया-भाज्या खाउ घालते. हिशोब तोच, फक्त काही जळायची / करपायची / बिघडायची शक्यता जराशी कमी!