तू बोले तो बन जाऊं मैं, बुल्लेशा सौदाई
सूफ़ीज़म एक अनोखा धर्म आहे. अस्तित्त्वाकडे काव्यात्मकतेनं पाहाण्याचा असा दृष्टीकोन दुर्लभ. आपण पुरुष आहोत आणि सर्व प्रकटजग स्त्री आहे. तस्मात, प्रसंग कोणताही असो, जगणं म्हणजे आपण आणि अस्तित्त्वात चाललेली, इष्काची जुगलबंदी आहे. मग प्रत्यक्षात ती, पत्नीशी झालेली ताटातूट असो, आर्थिक आपत्ती असो, शारीरिक दुर्घटना असो की कडेलोटाला नेणारी मानसिक दुरावस्था असो.... अस्तित्त्वानं, किंवा स्त्रीनं, ती आपल्याशी केलेली इष्कबाजी आहे. हा सूफ़ी जगण्याचा अंदाज़ आहे.
सूफ़ीजमचा नज़रिया कळला तर इर्शाद क़ामिलचा हा कलाम, हृदयाला स्पर्शून गेल्याशिवाय राहाणार नाही. जबरदस्त शायरीतून व्यक्त होणारी विरहाची व्यथा आणि मृत्यूसुद्धा हिरावून घेणार नाही अशी दुर्दम्य लगन.
पपॉनच्या आवाजात हा शेर गाण्याची सुरुवात करतो....
कुछ रिश्तोंका नमकही, दूरी होता है
ना मिलनाभी बहुत, जरूरी होता है ।
मग या, सूफ़ीसंगीताला साजेशल्या ओळी, खास क़व्वालांनी गायल्या आहेत.
दम-दम, दम-दम, तू मेरा
दम-दम, दम-दम.
मेरा हर-दम, दम-दम,
दम-दम....
दम म्हणजे प्राण (किंवा श्वास) आणि दम म्हणजे क्षण! तू माझा प्राण आहेस. तूच माझा प्रत्येक क्षण आहेस (हर-दम). तू माझा प्रत्येक श्वास आहेस. तुझा आणि माझा प्राण एकच आहे (हम-दम) !
तू बात करेया, ना मुझसे
चाहे आँखोंका पैगामना ले,
पर ये मत केहना, अरे ओ पगले..
मुझे देख ना तू, मेरा नाम न ले
तुझसे मेरा दीन धरम है ,
मुझसे तेरी खुदायी (2)
तू माझ्याशी अबोला धरला आहेस आणि माझ्या नजरेतून बोलण्याचा प्रयत्नाला सुद्धा तुझा प्रतिसाद नाही. पण निदान असं तरी म्हणू नकोस की ‘तू माझ्याकडे पाहू नकोस. माझं नांव सुद्धा घेऊ नकोस’ कारण तूच माझी प्रार्थना आहेस...आणि माझ्या प्रेमामुळे तुला देवत्त्व प्राप्त झालंय. तूच माझा देव आहेस !
तू बोले तो बन जाउं मैं
बुल्लेशा सौदाई,
मैं भी नाचूं ...
मैं भी नाचूं मनाऊ सोहने यार को
चलूं मैं तेरी राह बुल्लेया,
मैं भी नाचूं रिझांउं सोहने यार को
करूं ना परवाह बुल्लेया
तू फक्त राजी व्हायचा आवकाश की, मी बुल्लेशाचा भक्त होईन,
आणि आनंदानं नाचून, माझ्या सोन्यासारख्या सखीची मिन्नत करीन.
आनंदानं नाचून, माझ्या सोन्यासारख्या सखीला रिझवीन,
मला कुणाचीही पर्वा राहाणार नाही.
मग खरं तर.... तूच माझी बुल्ले-शहा होशिल!
इथे सूफ़ी क़व्वाल पुन्हा दम-दमचा नवा माहौल तयार करतात ....
मेरा हरदम, दम, हरदम तू
मेरा मरहम तू, मरहम तू ,
मेरा हरदम, दम, हरदम तू
इथे `मेरा मरहम तू, मरहम तू' अशा अनोख्या ओळी आल्या आहेत. तू माझ्या वेदनांची मुक्ती आहेस...तुझा सहवासच माझा सुकून आहे.
माना अपना इश्क अधूरा
दिल ना इसपे शरमिंदा है,
पूरा होके ख़तम हुआ सब
जो है आधा वो ही जिंदा है ।
आपली प्रेमकहाणी अर्ध्यातच संपली असली तरी, मी नाऊमेद नाही. कारण माझ्याबाजूनं प्रेम कायम आहे. ते अर्ध असलं तरी अजून जीवंत आहे.
याला दुसराही एक आयाम आहे. पूर्ण होणारी प्रत्येक गोष्ट लयाला जाते. आणि अपूर्ण गोष्ट कायम जीवंत राहाते. तसं आपलं प्रेम आहे ! त्यात दुरावा आहे म्हणून तर, त्याची मजा आहे.
हो, बैठी रहेती है उम्मीदे
तेरे घर की देहलीजोंपे
जिसकी ना परवाझ ख़तम हो
दिल ये मेरा वही परिंदा है ।
अत्यंत मोहक क़लाम आहे.... माझ्या आशा अजून तुझ्या उंबर्याशी बसून आहेत. आणि माझ्या हृदयाची, तुला गवसणी घालण्याची जिद्द तर, कधीही न संपणारी आहे. परवाझ आणि परिंदा या शब्दात इर्शादनं कमाल केली आहे. जसा एखादा जिद्दी पक्षी, आपल्या पंखांनी, आभाळ कवेत घेण्याची जिगर ठेवतो, तसं माझं हृदय आहे. तू कितीही नाराज असलीस तरी, माझ्या उमेदीची भरारी, न संपणारी आहे.
बख्शे तू जो प्यारसे मुझको,
तो हो मेरी रिहाई....
तू फक्त प्रेमानं, मला माफ कर. आणि या विरह वेदनेतून मी मुक्त होईन......
तू बोले तो बन जाउं मैं
बुल्लेशा सौदाई,
मैं भी नाचूं ...
मैं भी नाचूं मनाऊ सोहने यार को
चलूं मैं तेरी राह बुल्लेया,
मैं भी नाचूं रिझांउं सोहने यार को
करूं ना परवाह बुल्लेया
मेरा हरदम, दम, हरदम तू..
.........
तू याद करेया, ना मुझको
मेरे जीनेमें, अंदाज़ तेरा
सर-आँखोंपर है, तेरी नाराज़ी
मेरी हार में है, कोई राज़ तेरा ।
शायद मेरी जान का सदका
माँगे तेरी जुदाई (2)
या ओळी गाण्याचा क्लायमॅक्स आहेत.
तू मला विसरुन गेलीस तरी बेहत्तर.
माझ्या जगण्यात.... तू कायम माझ्याबरोबर आहेस, असंच मी जगतो.
तुझी नाराजी तर,
मला कायम मंजूर आहे.
आणि मी संपूर्ण पराभूत झालो तरी,
त्यात तुझं (म्हणजे नियतीचं), काही तरी न उलगडणारं रहस्य असेलच !
तुझ्यापासूनची ही ताटातूट,
आता बहुदा,
माझ्या प्राणांचा सौदा मागते आहे....
(पण हा सौदा सुद्धा, तुझ्याप्रती असलेली माझी लगन, संपवू शकणार नाही.)
तू बोले तो बन जाउं मैं
बुल्लेशा सौदाई,
मैं भी नाचूं ...
मैं भी नाचूं मनाऊ सोहने यार को
चलूं मैं तेरी राह बुल्लेया,
मैं भी नाचूं रिझांउं सोहने यार को
करूं ना परवाह बुल्लेया
मेरा हरदम दम, हर दम तू
मेरा हरदम दम, हर दम तू
मेरा हरदम दम, हर दम तू
मेरा हरदम तू.....
कुछ रिश्तोंका नमक ही, दूरी होता है
ना मिलना भी बहुत, ज़रूरी होता है ।
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सूफी 'जम'
मूळ अरबी शब्द
संपूर्ण गाणं इथे ऐकता येईल
धन्यवाद! कष्ट घेतल्याबद्दल.
मी अजूनही ते गाणं एकतोयं
सलमान खानचे पिक्चर पाहणे
धन्यवाद !
अप्रतिम गाणे आहे हे,
होवून जाऊद्या एक सुंदर विवेचन
इर्शाद !
काहीही हं मा सं,
मस्त ....
सुरेख! सूफ़ी काव्याला कुठला
सूफी आणि झेन ची फ्याशन
सूफ़ी नज़रीया !
आऊच!
मार्कस ऑरेलियसचा प्रतिसाद एखादे वेळी उपयोगी होईल
खुप सुंदर लेखन संक्षी सर !
मनःपूर्वक धन्यवाद !
हा चित्रपट तर पाहीलेला नाही व पाहणारही नाही मात्र
मैं भी नाचूं मनाऊ सोहने यार को चलूं मैं तेरी राह बुल्लेया,यातला हा भाग की मी बुल्ले शाह च्या मार्गावरुन जाईल त्याच्याप्रमाणेच प्रेम करेल, त्याच्यासारखचं प्रियेला, मनवेल हा भाग आवडला. कारण बुल्ले शाह च्या पंजाबी काफिया या वाकई सुंदर आहेत. त्यातील आध्यात्मिक भाग फारसा रुचत नसला तरी त्यातील लॉन्जींग व इन्टेसीटी मनाला भावते. या बहुत करुन आबिदा परवीन व नुसरत फतेह अली खान यांच्या कॅसेट मधुन ऐकावयास मिळाल्या त्यानंतर बुल्ले शाह विषयी माहीती मिळाली. व हा मीर तकी मीर ( रेख्ते के तुम्ही उस्ताद नही हो गालिब... नाजुकी उनके लब की क्या कहीए.. वाला ) चा समकालीन होता ही नविन माहीती मिळाली. दोघांमध्ये बंडखोरी भिनलेली आहे. बुल्ले शाह तर काही ठिकाणी फारच उग्र व बंडखोर होत जातो विशेषतः त्याच्या काळाच्या मानाने ( शिवाजी महाराजांचे निधन वर्ष बुल्ले शाहचे जन्म वर्ष ) फारच जास्त बोचेल असे लिहीतो. मीर ही याच्याच प्रभावात " दैर मे बैठा, कश्का खीचा, कबका तर्क इस्लाम किया असे म्हणतो की काय असे वाटते. बाकी नुसरत फतेह अली खान ने बुल्ले शाहच्या ओरीजनल कविते शी कुठे कुठे थोडी छेडखानी केलेली दिसते कधी कधी सोपे हिन्दी शब्द घेण्याकडे कल दिसतो. बाबा बुल्ले शाह ची अप्रतिम पंजाबी "काफिया" इथे. ही साईट फारच सुंदर आहे एकदा अवश्य बघावी. http://www.hindi-kavita.com/HindiBaba-Bullhe-Bulleh-Shah.php बाकी गाणे आवडले हे वाचले नसते तर सुटले असते.धन्यवाद मारवाजी !