"अर्थक्रांती" बोकिल को गुस्सा क्यों आता है ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोटाबंदीचा मार्ग सुचविणाऱ्या अर्थक्रांतीचे संस्थापक अनिल बोकील यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. अशी बातमी सध्या जोरात आहे.. सर्व वृत्तपत्र यास ठळक प्रसिद्धीही देत आहेत
अर्थक्रांती आणि बोकिल गेले सोळा वर्षे यावर काम करत आहेत त्यांची चिकाटी स्तुत्य आहे....
मोदींनी नोटाबंदी केल्यापासुन बोकिलांना बरे दिवस आले आहेत.. त्यातून आत्ता मोदींवर टिका केल्याने त्यांचा TRP बराच वाढला आहे ...चांगल आहे ...
पण गम्मत अशी आहे : बोकीलांच्या म्हणण्याप्रमाणे "सरकारने माझ्या प्रस्तावातील पाच मुद्द्यांपैकी केवळ दोनच गोष्टी उचलल्या"
आता बाकीच्या तीन का उचलल्या नाहित यावर ते फारसे भाष्य करीत नाहीत.
त्यांच्या प्रस्तावात थेट आणि अप्रत्यक्ष कराबरोबर केंद्रीय कर रद्द करणे, बँक व्यवहारांवरील कर, पैसे काढण्यावर कोणताही कर नसणे, आर्थिक व्यवहारांवर कायदेशीर मर्यादा आणि मोठ्या रक्कमेच्या चलन रद्द करणे असे मुद्दे होते.
आता थेट आणि अप्रत्यक्ष कराबरोबर केंद्रीय कर रद्द करणे, बँक व्यवहारांवरील कर हे मुद्दे अत्यंत अव्यवहार्य आहेत. सध्या एकूण transactions पैकी बँकेच्या माध्यमातून होणारी transactions किती? मग रोख रकमेच्या माध्यमातून केले जाणाऱ्या व्यवहारांचे काय ? असं प्रकारे बँक व्यवहारांवरील कर आकारणे म्हणजे रोखीच्या व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासारखे नाही का? अशा सामान्य प्रश्नांचे उत्तर द्यायच्या भानगडीत ते फारसे पडत नाहीत.
सध्या थेट आणि अप्रत्यक्ष कराबरोबर केंद्रीय करांचे उत्त्पन्न किती? आणि तेव्हढे उत्पन्न मिळवण्यासाठी बँक व्यवहारांवरील कर किती टक्के ठेवावा लागेल ? उत्तर नाही
सध्या आपल्या इकॉनॉमीचे नवसाचे पोर .. GST (गुड्स & सर्विस टॅक्स) त्याचे काय करायचे ? भृणहत्या ?
तेंव्हा अर्थक्रांतीला बरे दिवस आलेत म्हणुन बोकील आनंदी ..
बोकीलांनी मोदींवर टीका केली म्हणून माध्यमे आनंदी ...
नोटबंदी केली म्हणून भक्त आनंदी ...
सामान्यांच्या गैरसोयीचा मुद्दा मिळाला म्हणून विरोधक आनंदी
मोदींनी वरील अव्यवहार्य पर्याय स्वीकारले नाहीत म्हणून आम्ही आनंदी ...
थोडक्यात काय तर आनंदी आनंद गडे .. जिकडे तिकडे चोहीकडे
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हिंदूच्या बातमीत बर्यापैकी
राळेगणसिद्धी आणि हिवरेबाजार
तीनही दुवे पहिले .
बस, हेच आहे आजकालचे
तरीही हे असलं रिपोर्टींग
तरीही हे असलं रिपोर्टींग
फोन मेल सहज टॅप होतात
चर्चा आर्थिक गोष्टीवरून हेरगिरीकडे वाळू लागली ...
चर्चा आर्थिक गोष्टीवरून हेरगिरीकडे वाळू लागली ...
;))
चर्चा आर्थिक गोष्टीवरून हेरगिरीकडे वाळू लागली ...
चर्चा आर्थिक गोष्टीवरून हेरगिरीकडे वाळू लागली ...
होय
GST लांबणीवर पडता काम नये .
पंतप्रधान पूर्णवेळ हजर राहिले
नवीन आर्थिक वर्षात GST लागू होणे महत्वाचे आहे
कालचा गोंधळः गोंधळ विरोधकांनी
विशेष अधिवेशन बोलावण्याची तरतूद आहे
बघूया.