Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वटवट on Tue, 11/22/2016 - 14:36
कोणत्याही लोकशाहीचा एक मूळ नियम असावा कि कायदे सर्वांसाठी सारखे असावेत. आणि हा नियम पाळला जावा. असे कायदे असतील तरंच सर्वजण कायदे इतमामाने पाळतील. त्यांचा आदर राखतील. इथे सर्वांसाठी म्हणजे सर्व धर्मीयांसाठी असे अभिप्रेत आहे. ह्या नियमाला हा देश स्वतंत्र झाल्या झाल्या तडाखा बसला. हिंदू कोड बिलाने... आंबेडकर आणि नेहरू प्रचंड आग्रही होते म्हणून हे बिल पास झालं.. आणि फक्त हिंदूंना हे बिल लागू करण्यात आले. आधी हिंदू कोड बिल हे एकंच होतं... पण त्याला प्रचंड विरोध होता म्हणून त्याचे चार तुकडे पाडण्यात आले. १. हिंदू मॅरेज ऍक्ट २. हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट ३. हिंदू अडॉप्शन अँड गार्डीयनशिप ऍक्ट आणि ४. हिंदू सक्सेशन ऍक्ट... जाणून बुजून मुस्लिमांना ह्यातून वगळण्यात आलं. त्यांना त्यांच्या शरियत प्रमाणे वागायला अनुमोदन दिलं... कारण त्यांनी असला भारताने पारित केलेला कायदा मान्य केला नसता म्हणून... तुम्ही आमचे कायदे मानत नसाल तर त्यांना बाहेरचा दरवाजा किंवा योग्य ती शिक्षा दाखवली गेली नाही...तर त्यांच्यासाठी कायदे वगळले गेले. त्यांच्या धर्मासोबत चाटण्याचा धर्मसुद्धा अवलंबिला गेला... गरज नसताना... त्यांच्या कट्टरतेला खतपाणी घालायला इथून सुरुवात झाली... नंतर स्पष्ट उल्लेख करायचा झाला आणि कशी आपल्या संसदेने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला कचऱ्याची टोपी दाखवून, नं पटणारे मुस्लिम लांगुलचालन केले ह्याचा दाखला द्यायचा झाला तर खूप गाजलेली शाह बानो केस सांगावीच लागेल.. तर झालं होतं असं कि ह्या शाह बानोचा मोहम्मद अहमद खानशी निकाह झाला होता १९३२ साली. २ मुलं आणि ३ मुली ह्यांचा नंतर जन्म झाला. मोहम्मद अहमद खाननं साधारण १९७५ च्या सुमारास ह्या शाह बानो ला घरातून बाहेर काढलं. तिने सीआरपीसीच्या सेक्शन १२५ अंतर्गत महिना ५०० रुपयांच्या पोटगीसाठी याचिका दाखल केली, इंदोरच्या मॅजिस्ट्रेटसमोर. (सीआरपीसीच्या सेक्शन १२५ अंतर्गत कोणतीही बायको, घटस्फोटिता, पालक, पाल्य पोटगीसाठी दावा दाखल करू शकतात.) १९७८ मध्ये मोहम्मद अहमद खाननं तिला तलाक दिला. त्यानंतर तिने दुसरं लग्न केलं नाही. आता बचाव करताना मोहम्मद अहमद खाननं सांगितलं कि शाह बानो त्याची बायको नाही. तेंव्हा त्याची तिला पोटगी द्यायची काहीही जबाबदारी नाही. (मुस्लिम पर्सनल लॉ नुसार तलाकनंतर नवऱ्याची बायकोप्रती जबाबदारी फक्त दोनच बाबतीत असते. एक म्हणजे मेहेर, आणि दुसरं म्हणजे इद्दत पुरती पोटगी. मेहेर ही एक रक्कम असते कि जी निकाह करतेवेळेस निश्चित केलेली असते कि जी तलाक, जर झाला तर, नंतर नवर्याने बायकोला द्यायची असते. आणि इद्दत म्हणजे तलाकनंतरचा फक्त तीन महिन्याचा काळ, अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर तलाकनंतर तीन मासिक पाळ्यांचा कालावधी. तोही ८७ दिवसांचा... संपलं.) मोहम्मद अहमद खाननं असा बचाव करायचं कारण म्हणजे त्याने आधीच दोन वर्षे २०० रुपये प्रति महिना तिला पोटगी दिलेली होती आणि त्याचबरोबर ३००० रुपये कोर्टात डिपॉझिट केलेहोते, मेहेरम्हणून... तरीही कोर्टाने त्याला अतिरिक्त २५ रुपये प्रति महिना शाहबानोला द्यायची ऑर्डर केली. पोटगीची रक्कम खूप कमी होती म्हणून शाहबानो ने मध्यप्रदेशच्या हायकोर्टात अपील दाखल केलं. हायकोर्टाने ते अलाउ करून १७९.२० रुपयाची पोटगी द्यायची ऑर्डर केली. त्याच्याविरुद्ध मोहम्मद अहमद खाननं सर्वोच्च न्यायालयात अपील केलं, जे त्या न्यायालयाने फेटाळून लावलं... आणि ऐतिहासिक निर्णय दिला कि इद्दत च्या कालावधीनंतर सुद्धा मुस्लिम नवर्याने बायकोला पोटगी द्यावी, सीआरपीसीच्या सेक्शन १२५ च्या अन्वये. "इस्लाम खतरेमे है" च्या आरोळ्या सुरु झाल्या. सर्व तथाकथीत मुस्लिम विचारवंत ह्यांच्या बैठका वाढू लागल्या. पहिल्यांदाच न्यायालयाने त्यांच्या धर्मात हात घातला होता.. इतरांच्या बाबतीत जे काही करायचं ते करा पण इस्लामला हात नाही कोणी लावू शकत हा त्यांचा स्टॅन्ड होता... अख्खे मुस्लिम जनमानस ढवळून निघाले. राजीव गांधीचे सरकार होते. सर्व मुल्ला, मौलवी गेले त्यांना भेटायला. गंभीर इशारे दिले. सरकारला धोका उत्पन्न करण्याची गर्भित धमकी दिली. राजीव गांधी घाबरले, टरकले... आणि संसदेला हाताशी धरून "मुस्लिम वूमन (प्रोटेक्शन ऑफ राईट ऑन डायव्होर्स) ऍक्ट १९८६" पास केला. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवली. आणि सीआरपीसीचा सेक्शन १२५ हा मुस्लिमांना लागू होणार नाही आणि लागू करायचा असेल तर दोघांनी तसं ऍफेडेव्हिट सादर करावं असं सांगितलं गेलं. आता कोण मुस्लिम नवरा नसती आफत ओढवून घेईल असं ऍफेडेव्हिट सादर करून?? आता पुन्हा तो इद्दतचा नियम लागू केला गेलाय.. इथं काय झालं??? मुस्लिम जनता सर्वोच्च न्यालयाचा निर्णय कि जो कायदाच असतो, तो मानायला तयार नव्हती तेंव्हा कायदा पुन्हा वळवला गेला... त्यांचे बूट चाटण्यासाठीच ना? आणि आता पुन्हा हाच मुद्दा आपल्यासमोर येतोय "इस्लामिक बँकेच्या रूपात" शरियत कायद्यानुसार कर्जावर व्याज घेणे पाप आहे. हा कायदा बरेच मुस्लिम लोक पाळतात. बरेच मुस्लिम लोकं बँकेचे व्यवहार करीत नाहीत. त्यामुळे त्यांचे पैसे बँकेच्या व्यवहारात येत नाहीत. त्यामुळे जर त्यांचे पैसे बँकेच्या व्यवहारात आणायचे असतील तर शरियतच्या कायद्यानुसार चालणारी बँक असावी ह्या पायावर इस्लामिक बँक उभी आहे. ह्या बँकेत कर्जावर व्याज आकारले जात नाही कारण शरियत कायद्यानुसार कर्जावर व्याज घेणे पाप आहे. मग ह्या बँका कशा चालतात... त्या प्रत्यक्षरित्या नाही पण अप्रत्यक्ष रित्या व्याज घेतातंच. उदाहरण द्यायचं झालं तर... एकाला होमलोन घ्यायचं आहे.. तर बँक ते घर एकतर विकत घेईल किंवा बांधून देईल. त्यानंतर त्याव्यक्तीकडून त्या घराचे भाडे आकारेल. ह्या अश्या भाड्यामधून बॅंक नफा मिळवते. जर धंद्यासाठी कर्ज हवे असेल तर प्रॉफिट-लॉस शेअरिंगच्या तत्वावर ही बँक चालते, प्रत्यक्ष व्याज नं घेता. आखातात हि बँक जोरात चालते (अर्थात तिथे काही पर्यायच नाही म्हणा). तिथे मूळ व्यवसाय हा तेलाचाच आहे म्हणून तोट्याची शक्यता खूप कमी. प्रॉफीटशेअरिंगच जास्त चालतं. काही प्रगत राष्ट्रांमध्येही इस्लामिक बँकेचं फायदेशीर आस्तित्व आहे, कारण त्यांच्याकडे कर्ज वसुलीचे तगडे मेकॅनिझम आहे. भारतात बँकेचा जास्त लोचा हा कर्जवसुलीचाच आहे. त्यामुळेच तो बॅलेन्सशीटचा फुगवटा येतो. उद्या हे असं झालं तर त्याचा बोजा प्रत्यक्षरित्या इतर जनतेवर येणार नाही हे कशावरून? तर ह्या अश्या बँका भारतात कितपत चालतील हा प्रश्न आहे. पण मुळात गोष्ट अशी आहे आता पुन्हा एकंच विषय अधोरेखित होत आहे कि, इथेही मुस्लिम लोकं रेग्युलर बँकिंग स्वीकारत नाहीयेत म्हणून आम्ही आमचे कायदे वळवत आहोत, पुन्हा एकदा... युनिफॉर्म मॉनिटरी कोडसाठी काही काळानंतर लढा द्यावा लागेल कि काय अशी स्थिती उद्भवायला काहीच वेळ नाही लागणारे... हे लांगूलचालन नाही तर काय आहे? जे काही बँकिंग आपण सर्व जण वापरत आहोत. त्याचंच कंपल्शन जर त्यांच्यावर केलं तर नाही का चालणार? कि हे गृहितंच धरायचं कि ते हे मान्य करणार नाहीत? इलेक्शनच्या बाबतीत पण इस्लाममधे दोन प्रवाह आहेत. सुन्नी म्हणतात इलेक्शन हि सुन्नत (म्हणजे प्रॉफेट महम्मदने अंगिकारलेली) आहे. आणि शिया वारसाहक्काच्या बाजूने आहेत, इलेक्शनच्या नाही.. तर मग उद्या आपण भारतात शिया पंथीयांसाठी एक वेगळा प्रांत उभारणार आहोत कि जिथे निवडणूक नसेल? हे कुठे चाललंय? हे योग्य आहे? बर्याचदा आपली न्यायालये पण भेदभाव करतात कि काय असं वाटतं... त्या याकूब मेननसाठी मध्यरात्री २.३० वाजता सुनावणी होते. सलमान साठी ७.३० पर्यंत कोर्ट उघडं होतं. कर्जावर व्याज मंजूर नाही पण जर मेहेर दिलेली नसेल तर त्या अनपेड मेहेरवर व्याज घेणं मंजूर आहे असं सर्वोच्च न्यायालय म्हणतं. (हमीरा बीबी वि. झुबैदा बीबी) हेच आहे का आपले "धर्मनिरपेक्ष शासन"? भाजपा हि भगवी काँग्रेस आहे हे कोणीतरी म्हणालं होतं ते खरंच आहे कि काय? केरळ सरकार ह्या अश्याच बँकेच्या स्थापनेच्या प्रयत्नात होतं तेंव्हा डॉ. सुब्रमनियम स्वामींनी दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली तीही अत्यंत आदर्श कारणे देत (जर कोणाला हे जजमेंट हवं असेल तर माझ्याकडे आहे) ह्याच आदर्शाच्या नावाखाली जगभर पसरलेला दहशतवाद त्यांना दिसत नाही? मला मुस्लिमांबद्दल कसलाच आकस नाही पण जाणून बुजून हि जी काही वेगळी वागणूक दिली जातीये त्या विरोधात मी नक्कीच आहे. (ह्या लेखावर टीका जरूर करावी पण कुठलंतरी एक वाक्य घेऊन मागचा पुढचा संदर्भ हेतुपुरस्सर वगळून, एनडीटीव्ही स्टाईलने, टीका करणे टाळावं, ही मनापासून विनंती... मार्गावरून भटकू नये वा दुसऱ्याला भटकवू नये. कारण मिपावर काही सन्माननीय सदस्य असे आहेत कि जे सोलापुरवरून पुण्याच्या गाडीत बसतात आणि हि गाडी हैद्राबादला कशी जात नाही हे बघतो, ह्या अट्टाहासात असतात)
  • Log in or register to post comments
  • 16198 views

प्रतिक्रिया

Submitted by वटवट on Tue, 11/22/2016 - 14:40

Permalink

एक राहिलेलं

रिझर्व्ह बँकेने अश्या बँकेच्या स्थापनेच्या संदर्भात एक प्रस्ताव पाठवला आहे. त्यासंदर्भात हा लेख - लेख एडिट करायचा पर्याय नाही म्हणून हे स्पष्टीकरण इथे...
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Tue, 11/22/2016 - 14:54

Permalink

अभिनिवेश टाळून "इस्लामिक

अभिनिवेश टाळून "इस्लामिक बँकिंग हे अर्थव्यवस्थेत बसू शकतं का?" असा चर्चाप्रस्ताव असता तर जास्त आवडला असता. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 11/22/2016 - 15:11

In reply to अभिनिवेश टाळून "इस्लामिक by आदूबाळ

Permalink

+१

+१ मी मागे केवळ अर्थशास्त्रीय दृष्टीकोणातून धर्मसंस्थेचे ऋण-व्याज व्यवहारातील हस्तक्षेप आणि अज्ञानश्रद्धा या काथ्याकुट धागा माध्यमातून चर्चा केली आहे. ज्यांना केवळ अर्थशास्त्रीय दृष्टीकोणातून मत प्रदर्शन करावयाचे त्यांचे त्या धाग्यावर स्वागत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Tue, 11/22/2016 - 14:58

Permalink

हिंदुंचा ते हिंदु असल्यामुळे

हिंदुंचा ते हिंदु असल्यामुळे होउ शकणारा / होत असणारा असा काहीच फायदा नाही का हो? एच यु एफ?
  • Log in or register to post comments

Submitted by वटवट on Tue, 11/22/2016 - 15:54

In reply to हिंदुंचा ते हिंदु असल्यामुळे by असंका

Permalink

मी असं कुठेही म्हणालेलो

मी असं कुठेही म्हणालेलो नाहीये.. एचयूएफ चे बरेच नियम हे लॉजिकल आहेत. मी आलॉजिकल गोष्टींबद्दल बोलत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Wed, 11/23/2016 - 13:03

In reply to मी असं कुठेही म्हणालेलो by वटवट

Permalink

मी असं कुठेही म्हणालेलो

मी असं कुठेही म्हणालेलो नाहीये..
तोच तर मुद्दाय साहेब. तुम्ही हिंदु धर्माबद्दल काही बोललाच नाहीत. म्हणून तर आठवण करुन द्यावी लागली. मुळ लेखातलं हे वाक्य बघा:
कोणत्याही लोकशाहीचा एक मूळ नियम असावा कि कायदे सर्वांसाठी सारखे असावेत. आणि हा नियम पाळला जावा.
बरोबर? मग जो फायदा (आर्थिक फायदा-मोजण्यासारखा!)कायद्याने फक्त हिंदुंनाच मिळतो, तो इतर धर्मियांना पण मिळावा किंवा कुणालाच मिळू नये हा मुद्दा अशा लेखात यायला नको?
  • Log in or register to post comments

Submitted by वटवट on Wed, 11/23/2016 - 13:36

In reply to मी असं कुठेही म्हणालेलो by असंका

Permalink

तुमच्यासाठी म्हणून सांगतो

मग जो फायदा (आर्थिक फायदा-मोजण्यासारखा!)कायद्याने फक्त हिंदुंनाच मिळतो, तो इतर धर्मियांना पण मिळावा किंवा कुणालाच मिळू नये हा मुद्दा अशा लेखात यायला नको?>>> तुमच्यासाठी म्हणून सांगतो कायदे फक्त हिंदूंनाच आहेत बाकीच्यांना मोकळे रान आहे... म्हणून जास्त फायदा त्यांना मिळतो हिंदूंना नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by अमर विश्वास on Tue, 11/22/2016 - 15:46

Permalink

अत्यंत एकांगी लेख ...

अत्यंत एकांगी लेख ... मुळात भारतात आर्थिक समावेशकता (Financial Inclusion) हा मोठा प्रश्न आहे. त्यातच एक मोठा समाज धार्मिक कारणांनी आर्थिक संसाधनांपासून दूर रहाणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेला परवडण्यासारखे नाही. या समाजाला मुख्य बँकिंग च्या प्रवाहात आणण्यासाठी काय करायला पाहिजे ? समाज प्रबोधन करुन सुधारणा घडवण्याचा इतिहास हा फारसा उत्सवर्धक नाही. सध्या हा समाज पर्यायी व्यवस्थेकडे (Money laundering इत्यादी) वळतो... हे आपल्या अर्थव्यवस्थेला घातक आहे. इस्लामिक बँकिंगच्या माध्यमातुन हा समाज बँकेच्या धारेशी जोडलेला राहील व या सर्व व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण राहील. तसेच बराच पैसे जो सामन्तर अर्थव्यवस्थेत फिरतो आहे तो ही बँकिंग सिस्टिम मध्ये येईल . इस्लामिक बँकिंग हा योग्य पर्याय आहे का? भारतात हा पर्याय यशस्वी होईल का ? याचे उत्तर रिझर्व्ह बँकेचे पूर्ण प्रपोसलं वाचल्यावरच कळेल पण त्या दिशेने विचार करणे म्हणजे लांगूलचालनाचा एक नवीन अध्याय.. असे अजिबात वाटत नाही... कदाचित समांतर अर्थव्यवस्था नष्ट झाले तर समान नागरी कायद्यासाठीही एक मास्टरस्ट्रोक ठरेल..... जता जाता : जागतिक बँकेने इस्लामिक बँकिंगला मान्यता दिली आहे.. मान्यता देताना कोणते पॅरामीटर्स वापरले हे पाहणे इंटरेस्टिंग ठरेल...
  • Log in or register to post comments

Submitted by वटवट on Tue, 11/22/2016 - 16:02

In reply to अत्यंत एकांगी लेख ... by अमर विश्वास

Permalink

कोणी कितीही वळवळ केली तरीही

कोणी कितीही वळवळ केली तरीही रिझर्व्ह बँकेचे हे प्रपोजल मान्य होईलच आणि सर्वोच्च न्यायालयपण त्याला हिरवा कंदील दाखवणार ह्याची मला अत्यंत खात्री आहे.... तरीही एक मोठा समाज धार्मिक कारणांनी आर्थिक संसाधनांपासून दूर रहाणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेला परवडण्यासारखे नाही.>> ही अर्थव्यवस्थेची कि धर्मान्ध लोकांची?? धर्माची लालूच दाखवली कि लगेच येणारी जनता हि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक नाही? समाज प्रबोधन करुन सुधारणा घडवण्याचा इतिहास हा फारसा उत्सवर्धक नाही.>> कुठलीही मूलभूत सुधारणा इतकी सोपी नसते.. विषय असाय कि प्रयत्न किती झाले?? सध्या हा समाज पर्यायी व्यवस्थेकडे (Money laundering इत्यादी) वळतो... हे आपल्या अर्थव्यवस्थेला घातक आहे>> फक्त हाच नाही तर सर्व समाजाचा हा प्रॉब्लेम आहे... त्यात ह्यांना विशेष वागणूक का म्हणून? माझा तोच महत्वाचा आक्षेप आहे. जागतिक बँकेने इस्लामिक बँकिंगला मान्यता दिली आहे.>>> युनोने स्थलांतराला पण मान्यता दिलीये... अख्खा युरोप भोगतोय त्याची फळं...
  • Log in or register to post comments

Submitted by अमर विश्वास on Tue, 11/22/2016 - 16:27

In reply to कोणी कितीही वळवळ केली तरीही by वटवट

Permalink

हे वळवळ वगैरे शब्द तुमच्या वटवट नावाला शोभून दिसतात ...

वटवट साहेब ... हे वळवळ वगैरे शब्द तुमच्या वटवट नावाला शोभून दिसतात ... बाकी तुम्ही रिझर्व्ह बँकेचा प्रस्ताव निदान वाचला तरी आहे का ? (कारण हा प्रस्ताव मला तारे पूर्ण स्वरूपात सापडला नाही ) हा प्रस्ताव वाचला नसेल तर आपला विरोध नक्की कशाला आहे ? इस्लामिक या नावाला ? की ही नुसतीच वटवट आहे ?
  • Log in or register to post comments

Submitted by वटवट on Tue, 11/22/2016 - 16:34

In reply to हे वळवळ वगैरे शब्द तुमच्या वटवट नावाला शोभून दिसतात ... by अमर विश्वास

Permalink

साष्टांग

हा लेख वाचून जर आपणास हा प्रश्न पडला असेल तर.... साष्टांग ___/\___
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 11/22/2016 - 16:14

In reply to अत्यंत एकांगी लेख ... by अमर विश्वास

Permalink

वेगळी साशंकता

धागा लेखकाचा अभिनिवेश आणि दृष्टीकोण काही काळ बाजूला ठेवला तरी विशीष्ट आर्थीक तत्वांवर/पद्धतीवर आधारीत बँक म्हणावयाचे सोडून धर्माचे नाव वापरणे धर्मसंस्थेचा हस्तक्षेप तिच्या तिच्या परिघाच्या बाहेर ग्राह्य ठरवते, व्हेजीटेरीअन थाली /रेस्टॉरंट नॉनव्हेज रेस्टॉरंट असे म्हणताना धर्मांच्या नावांचे उल्लेख कमी होतात तेवढाच कडव्या धार्मीकांचा हस्तक्षेपाचा वाव कमी राहतो. अमुक प्रकारच्या युनायटेड फॅमिलीला अमुक प्रकारची युनायटेड फॅमिली म्हणाना त्याला हिंदू युनायटेड फॅमिली असेच म्हणणे गरजेचे असते का ?
  • Log in or register to post comments

Submitted by वटवट on Tue, 11/22/2016 - 16:21

In reply to वेगळी साशंकता by माहितगार

Permalink

नवीनहिंदू कोड बिलामध्ये

नवीनहिंदू कोड बिलामध्ये स्पष्ट पणे हे कायदे केवळ हिंदूंसाठीच बनवले गेले असल्याचा उल्लेख आहे... म्हणून अजून अडचणी टाळण्यासाठी हिंदू अंडीव्हायडेड फॅमिली असा उल्लेख सारखा आढळतो. ते गरजेचे असते... जर समान नागरी कायदा आला तर कोणत्याच धर्माचा उल्लेख राहणार नाही. पण सध्यातरी हे गरजेचे...
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 11/22/2016 - 16:32

In reply to नवीनहिंदू कोड बिलामध्ये by वटवट

Permalink

१

१
नवीनहिंदू कोड बिलामध्ये स्पष्ट पणे हे कायदे केवळ हिंदूंसाठीच बनवले गेले असल्याचा उल्लेख आहे...
शब्द न वापरताही हे केले जाऊ शकत होते अगदी वेगवेगळ्या समुहाच्या गरजांसाठी वेगवेगळे कौटूंबिक कायदे ठेऊनही धर्मांची नावे टाळता येऊ शकली असती, ब्रिटीशांनी केलेली चूक-कि जाणीव पुर्वकता स्वतंत्र भारतानेही रिपीट करण्याची गरजच काय ? एनीवे किमान इनकम टॅक्सच्या आंगणात हिंदू युनायटेड फॅमिली म्हणण्याची गरज काय २) धागा लेखक महोदय ज्या न्यायाने धर्म विषयक शब्दांचे इनकम टॅक्सच्या संदर्भात समर्थन करत असतील तर त्याच न्यायाने बँकींगसारख्या वेगळ्या क्षेत्रात वेगळ्या धर्माच्या शब्दाचे समर्थनही होऊ शकते हे लक्षात घेऊ इच्छित नाहीत असे दिसते. भूमिकेत एक सारखेपणा हवा तो त्यांच्या भूमिकेत आहे का या बद्दल साशंकता आहे. इन एनी केस खालील एका प्रतिसादात म्हटल्या प्रमाणे व्याज विरहीत बँकींगवर श्रद्धा असलेल्या कुणालाही ती करावी वाटेल, किंवा एकत्र कुटूंब असलेल्या कोणत्याही कुटूंबाला लाभ घेता येईल अशा धर्म निरपेक्ष नाम-रचना ठेवण्यास काय हरकत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by वटवट on Tue, 11/22/2016 - 16:39

In reply to १ by माहितगार

Permalink

अहो माहितगार... मी लेखाच्या

अहो माहितगार... मी लेखाच्या सुरुवातीलाच हे स्पष्ट केलंय कि हेतुपुरस्सर हिंदू कोड बिल पास करण्यात आलं... हिंदू शब्दाला सर्वांचाच आक्षेप होता. कारण सर्व भारतीयांना लागू करावं असं म्हणणं होतं... इतरांना वगळून हिंदू हा शब्द टाकण्याचा हेतू हा कि हे फक्त हिंदूंनाच लागू व्हावं, दुसऱ्यांना नाही. आता हिंदूंच्या प्रॉपर्टीला म्हणून सहाजिकच हिंदू प्रॉपर्टी हे नाव आलं. आता इथे नाव वेगळं आणि दुसऱ्या कायद्यामध्ये नाव वेगळं असं चालत नसतं? कायदेशीर अडचणी उद्भवतात, म्हणून इनकम टॅक्सच्या आंगणात हिंदू युनायटेड फॅमिली असं म्हणतात...
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 11/22/2016 - 16:52

In reply to अहो माहितगार... मी लेखाच्या by वटवट

Permalink

इतरांना वगळून हिंदू हा शब्द

इतरांना वगळून हिंदू हा शब्द टाकण्याचा हेतू हा कि हे फक्त हिंदूंनाच लागू व्हावं, दुसऱ्यांना नाही.
पर्याय अ पर्याय ब पर्याय क पर्याय ड असे पर्याय द्यावयास हवे होते, ज्या कुटूंबास जो पर्याय क्रमांक हवा तो निवडेल धर्मसंस्थेचे नसते हस्तक्षेप ओढवून घेण्यास जागा ठेवायची मग तुझे-माझे करून भांडत रहायचे.
  • Log in or register to post comments

Submitted by पुंबा on Tue, 11/22/2016 - 16:39

In reply to वेगळी साशंकता by माहितगार

Permalink

सहमत. हेच मत अरुण शौरींनी

सहमत. हेच मत अरुण शौरींनी हिंदू rate of growth या संकल्पनेबद्दलही मांडले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by ओम शतानन्द on Tue, 11/22/2016 - 16:55

In reply to अत्यंत एकांगी लेख ... by अमर विश्वास

Permalink

या समाजाला मुख्य बँकिंग च्या

या समाजाला मुख्य बँकिंग च्या प्रवाहात आणण्यासाठी काय करायला पाहिजे ? समाज प्रबोधन करुन सुधारणा घडवण्याचा इतिहास हा फारसा उत्सवर्धक नाही. समाज प्रबोधन करुन मुस्लिम समाज सुधारणार नाही हे तुम्हालाही पटलेले दिसते , राजीव गान्धी यानाही शहाबानो प्रकरणात ते पटल्यामुळे मुस्लिम धार्मिक बाबतीत त्यानी मान तुकविली आणि निर्णय उलट फिरवला, भाजप ही त्याच मार्गाने चाललेली आहे. आर्थिक व्यवहारान्ची धार्मिक विभागणी म्ह. शरियाप्रणित बन्किन्ग असा नवा पायन्डा सुरु करायचा भाजप चा ( त्यामुळे तरी काही मुस्लिम मते मिळतील ) विचार आहे तर !
  • Log in or register to post comments

Submitted by वटवट on Tue, 11/22/2016 - 16:56

In reply to या समाजाला मुख्य बँकिंग च्या by ओम शतानन्द

Permalink

दिसतंय तर तसंच..

दिसतंय तर तसंच..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 11/22/2016 - 15:59

Permalink

इस्लामिक बँक

इस्लामिक बँक इस्लामिक बँकिंग भारतात रीतसर सुरु झाल्यावर मी मनुवादी बँकिंग सुरु करण्यासाठी जनहित याचिका दाखल करणार आहे =))
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Tue, 11/22/2016 - 16:11

In reply to इस्लामिक बँक by प्रसाद गोडबोले

Permalink

तुम्च्या

सारख्या टनाटनी लोकांमुळे काळा पैसा देशाबाहेर चालला आहे..
अखिल मिपा दैनिक " स्वयंघोषीत सुधारक".
तुम्ही भारताला ५० वर्षे मागे नेत आहात..
अखिल मिपा धागा हितरक्षण आणि कळ(का)वळा समीती.
ज्जे बात , काही भागभांडवल गुंतवू इच्छीत आहे. वेगळा धागाच काढावा.
अखिल मिपा अंधुक उजेडातील ऊजवी असलेली उदयोन्मुख संघटना..
संकलक नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by ओम शतानन्द on Tue, 11/22/2016 - 16:55

In reply to इस्लामिक बँक by प्रसाद गोडबोले

Permalink

मनुवादी बँकिंग

सही
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Tue, 11/22/2016 - 16:09

Permalink

माझ्याकडे विदा नाही, आपण

माझ्याकडे विदा नाही, आपण कायदा अन बँकिंग मधले जाणकार दिसता तरीही जर ठराविक डेटा मिळाला तर पुढे बोलता येईल, डेटा मागणी खालील प्रमाणे १. भारतात मुसलमान लोकांचे बँकिंग मधले इन्व्हेस्टमेंट २. ते कमी असल्यास सध्या (इस्लामिक बँकिंक अस्तित्वात नसताना) ते लोक पैस्याचे व्यवहार कसे करतात?? ३. हवाला मध्ये किती मुस्लिम सहभागी असतात, हवाला वानगीदाखल आहे, कुठल्याही समांतर व्यवस्थेत त्यांचा सहभाग किती असतो? ४. बांगलादेश मध्ये नोबल विजेते मुहम्मद युनूस ह्यांचा ग्रामीण बँकेचा मायक्रोफायनान्स प्रकल्प इस्लामिक बँकिंग अंतर्गत कारभार करतो का? करत असल्यास त्याने बांगलादेशी मुस्लिम लोकांच्या जीवनमानावार काय फरक पडलाय? (हे parameter अभ्यासणे कुतूहल आहे एक माझे कारण काहीही म्हणले तरी एकाच उपखंडातील मुसलमान असल्यामुळे बांगलादेशी मुसलमान अन भारतीय मुसलमान लोकांच्या मानसिकतेत समान धागे नक्कीच असतील) ५. भारतात जे विनाव्याज(नावापुरते का होईना) इस्लामिक बँकिंगचे मॉडेल स्थापन होते आहे त्यात कंपल्सरी फक्त मुस्लिमांनाच बँकिंग करायचा अधिकार असेल का? की गरीब हिंदू गरजू हिंदू ती सोय वापरू शकतील ? (एक्सक्लुजीव मुस्लिम समाजपुरती बँक असल्यास माझा आगाऊ निषेध नोंदवून ठेवतो) ६. व्याज नाही ह्यावरून आठवले (डिटेल चुकले असल्यास दुरुस्त करा) मुद्रा लोन्स सुद्धा व्याजमुक्त आहेत न? असल्यास मुद्रा लोन्स इस्लामिक बँकिंगचाच एक प्रयोग म्हणून पाहता येईल का ? डेटा मिळाल्यावर अभ्यासून पुढे चर्चा करता येईल बाकी आबासाहेबांशी सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by वटवट on Tue, 11/22/2016 - 16:31

In reply to माझ्याकडे विदा नाही, आपण by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

१. ज्या पद्धतीने आरबीआयने

१. ज्या पद्धतीने आरबीआयने प्रपोजल दिलेले आहे, त्यावरून वाटत आहे कि कमी प्रमाण असेल मुस्लिम समाजाचे एकंदरीत बँकिंग मध्ये. पण निश्चित आकडेवारी माझ्याकडे नाही. बघू हुडकून मिळते का ती २. त्यांचे व्यवहार मुख्यत्वे कॅश मधून होतात म्हणे. बँकेमार्फत नव्हे.. म्हणून तर हा अट्टाहास चालूये... ४. बांगलादेश मध्ये नोबल विजेते मुहम्मद युनूस ह्यांचा ग्रामीण बँकेचा मायक्रोफायनान्स प्रकल्प इस्लामिक बँकिंग अंतर्गत कारभार करतो का? करत असल्यास त्याने बांगलादेशी मुस्लिम लोकांच्या जीवनमानावार काय फरक पडलाय?>>> अभ्यासाचा विषय आहे हा... करावाच लागेल. ५. नाही... कोणीही त्या बँकेत जाऊ शकतो फक्त त्याला शरियतच्या कायद्याप्रमाणे कर्ज मिळेल. ही एक्सक्लुजीव मुस्लिम समाजापुरती बँक नाही. ६. माझ्या माहितीप्रमाणे मुद्रा लोन हे धर्मावर आधारित नाही. व्याज आहे पण कमी दरात. छोट्या उद्योजकांसाठीची हि योजना आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Tue, 11/22/2016 - 17:09

In reply to १. ज्या पद्धतीने आरबीआयने by वटवट

Permalink

१. अंदाजे अदमासे भागातल्या

१. अंदाजे अदमासे भागातल्या डेटावर बोलणे तितके संयुक्तिक नसेल, बरं त्याची निश्चित माहिती माझ्याकडे सुद्धा नाही, त्यामुळे तूर्तास लेट्स पार्क दॅट थॉट आऊटसाईड फॉर अ मोमेंट टिल नंबर्स सरफेस अप, फेयर इनफ? २. परत एकदा, विषयानुरूप चर्चा करत असताना (त्यातही पैसा, अर्थ, वित्त ह्या बाबतीत) म्हणे वगैरेला स्थान नसलेलेच बरे, तरीही तूर्तास हा किंवा वरचा किंवा दोन्ही मुद्दे रुजू करून घेऊयात, चर्चेला मजा तितकीच, कसे? ३. (तुमचा चुकीने पडलेला ४ नंबर मुद्दा) सहमत आहे, ह्या विषयात मलाही रस आहे पण वेळ नाही, तरीही जर काही डेटा अभ्यास साहित्य शेयर केलेत तर उपकृत राहीन असेच म्हणतो :) ४. (दोन मुद्दे घेतो तुमचा ५ व ६) मुद्रा धर्माधारीत नाही, मान्य, इस्लामिक बँकेत सगळ्यांना बिनव्याजी (सकृतदर्शनी) कर्जे मिळणार, ह्यात मला समान धागे जास्त दिसतायत का माझी काही गफलत होते आहे? तसेही शरियाच्या नियमाप्रमाणे कर्ज म्हणजे काय हे अधिक स्पष्ट केल्यास पुढे बोलता येईल एकंदरीत, इस्लामिक बँकिंग फायनान्सल इन्कल्यूजन वाढवेल, अगदी छप्पर फाडके नाही, पण काही प्रमाणात, असा निष्कर्ष आत्तापर्यंतच्या उपलब्ध डेटा सेट वरून निघतोय (माझातरी) ,पुढे सद्ध्या अंदाजेपांचे दाहोदरसे मुद्यातून डेटा निघेल तेव्हा ही पोजिशन बदलू सुद्धा शकते, तरीही उपलब्ध डेटासेट वरून मी काढलेल्या निष्कर्षावर तुमची किती टक्के सहमती असेल (उत्तर क्वांटीटेटिव्हली असले की कसे सुस्पष्ट होते सगळे! म्हणून विचारतोय) कळावे बाप्या
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Tue, 11/22/2016 - 17:01

In reply to माझ्याकडे विदा नाही, आपण by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

बापूसाहेब, मला वाटतं (आय-ई

बापूसाहेब, मला वाटतं (आय-ई माझ्या माहितीत / पाहण्यातल्या) इस्लामिक बँकिंगमध्ये व्याज घेत नाहीत असं नसतं. व्याज वेगळ्या रूपात घेतलं जातं. पण ते असतं व्याजच.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Tue, 11/22/2016 - 17:26

In reply to बापूसाहेब, मला वाटतं (आय-ई by आदूबाळ

Permalink

ओके आबा म्हणूनच मी

ओके आबा म्हणूनच मी 'सकृतदर्शनी' किंवा 'प्राइमा फेसी' असा शब्द वापरलाय आबा, मुळात मला शरिया बँकिंग समजवावे असाच माझा पहिला स्टँड आहे, असेल, तुम्ही जाणकार आहात आय विल टेक युवर वर्ड ऑन द सेम. आता मला सांगा इस्लामिक बँकिंग चे प्रच्छन्न व्याज हे सामान्य बँकेच्या उघड व्याजापेक्षा जास्त असते का कमी?? कमी असल्यास फायनान्शियल इन्कल्यूजनचं एक इन्स्ट्रुमेंट म्हणून इस्लामिक बँकिंग वापरता येईल/ वापरले जावे की त्याचा सरसकट विरोध करावा ?, मॅक्रो फायनान्स ते मायक्रो फायनान्स, इस्लामिक बँकिंग व्यवस्था आणि प्रस्थापित (पाश्चात्य) बँकिंग व्यवस्था ह्यांचा तौलनिक अभ्यास कोणी केला आहे का? केला असल्यास फायनान्शियल इन्कल्यूजनला कुठली व्यवस्था जास्त कंडयूसीव्ह आहे? तुम्ही म्हणालात तसे दरवेळी सामाजिक उद्बोधनावर जो विसंबला त्याचा कार्यभाग बराच बुडाला, हे मान्य. पण प्रस्थापित बँकिंग मॉडेल नाकारणाऱ्या जनतेला त्यांना सोयीचे पडेल असे मॉडेल देऊन आर्थिक मुख्यधारेत आणून त्याचवेळी त्यांची transaction जर मॉनिटर करता आली तर का करू नयेत? माझ्यामते दाढ्या कुरवाळणे (आत्यंतिक शब्दप्रयोग) हा गोषा पांघरून जर नॅशनल सिक्युरिटी निश्चित करता आली तर जरूर करावी, (त्यातही प्रच्छन्न व्याज आहेच म्हणजे हे काही वेल्फेयर मेजर नसेल तर प्रॉपर बिझनेस असेल), शिवाय इस्लामिक बँकिंग आहे म्हणजे व्याज किंवा जमा ठेवी वगैरेंच्या बाबतीत इस्लामिक असणार आहे का ती आरबीआयला अजिबात बांधील नसणार आहे? रेपो, रिव्हर्स रेपो,सीआरआर वगैरे पासून स्वतंत्र असणार आहे का? त्यांना केंद्रीय बँकेला सालीना ताळेबंद देणे बांधील असेलच ना? हे ही काही प्रश्न पडले आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Tue, 11/22/2016 - 17:45

In reply to ओके आबा म्हणूनच मी by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

अर्थव्यवहारापासून

अर्थव्यवहारापासून धर्मसंस्थेने अलिप्त राहावं असं माझं वै० मत. याचाच दुसरा अँगल म्हणजे अर्थव्यवहाराचा विचार करताना माणसाने धर्मनिरपेक्ष असावं. उद्या मला कमी व्याजात कर्ज मिळत असेल तर मी महाराष्ट्र ब्यांकेतून खातं हलवून हबीब ब्यांकेत न्यायला एका पायावर तयार आहे. त्यामुळे, जर फायनान्शियल इन्कल्यूजनची पहाट इस्लामिक बँकिंगच्या कोंबड्यामुळे उगवत असेल तर सो बी इट. नाय तिथे धर्म आडवा आणण्यात काय अर्थ आहे? बाकी मुद्द्यांवर (सध्या) पास, पण मला काय वाटतं ते सवडीने लिहेन.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Tue, 11/22/2016 - 17:50

In reply to अर्थव्यवहारापासून by आदूबाळ

Permalink

मला वाटते जोवर ओव्हरसियर,

मला वाटते जोवर ओव्हरसियर, किंवा रेग्युलेटरी ऑथॉरिटी तुम्ही म्हणता तशी धर्मलिप्त असेल तोवर खाली इन्कल्यूजन साध्य करायला युज हूक (लुक्रेटिव्ह ऑफर) ऑर क्रुक (धर्म) की फरक पैंदा?? हे म्हणजे घरी बापुस लक्ष देतोय कडक तोवर पोरांनी कितीही मस्ती करायचे इमले बांधावे तसे काहीसे (अर्थात मला फायनान्स चे तांत्रिक ज्ञान इल्ले शुन्य टक्के असती)
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 11/22/2016 - 17:55

In reply to अर्थव्यवहारापासून by आदूबाळ

Permalink

इथे धागा लेखकाचा लांगूलचालन मुद्दा रास्त ठरतो

जर फायनान्शियल इन्कल्यूजनची पहाट इस्लामिक बँकिंगच्या कोंबड्यामुळे उगवत असेल तर सो बी इट. नाय तिथे धर्म आडवा आणण्यात काय अर्थ आहे?
फायनान्शियल इन्कल्यूजनचीच गरज आहे तर इस्लामिक हा शब्दच कशाला इतर धर्मांच्या नावेही बिनव्याजी/कमीव्याजी बँका काढाना इफेक्टीवली हे लांगूलचालनच झाले कदाचित सरकार भरीस पडेलही, आज ज्यांना रिझर्वेशन नाही त्यांचेह रिझर्वेशन हवे म्हणून मोर्चे निघतात तसे बँकींगच्या बाबतही होईल एवढेच, रिझर्वेशन प्रकारात जाती निरपेक्षता हरली इथे धर्मनिरपेक्षता हरेल. जे व्हायचे ते होतेच, काथ्या कुटून थांबत नाही. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Tue, 11/22/2016 - 18:49

In reply to इथे धागा लेखकाचा लांगूलचालन मुद्दा रास्त ठरतो by माहितगार

Permalink

माहितगारजी, इतर धर्मात जर

माहितगारजी, इतर धर्मात जर चलनी पैसे देणे घेणे, कर्ज, व्याज, चलनी व्यापार इत्यादी संबंधी नियम त्यांच्या पूज्य पुस्तकात असतील , मुख्य म्हणजे त्यांना जर त्याला अनुसरून बँकिंग व्यवस्था हवी असेल, त्याहून उप्पर त्यातून बँकिंग व्यवसायाला नफा काढता येत असेल अन प्रस्थापित बँकिंग मॉडेल मध्ये जर का ते बसत असेल नीट तर त्या त्या धर्माला त्यांच्या मान्यतेप्रमाणे बँकिंगची मागणी करण्याचा अधिकार लोकशाहीत नक्कीच असेल ना? शिवाय इन्कल्यूजनला पुढे रेटण्यात प्रस्थापित व्यवस्था नक्कीच कुठंतरी कमी पडली आहेच न? ह्यात लांगूलचालन कसे म्हणले जाईल ते उलगडून सांगा.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 11/22/2016 - 19:31

In reply to माहितगारजी, इतर धर्मात जर by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

त्या त्या धर्माला त्यांच्या

त्या त्या धर्माला त्यांच्या मान्यतेप्रमाणे बँकिंगची मागणी करण्याचा अधिकार लोकशाहीत नक्कीच असेल ना?
हो अभिव्यक्ति स्वांतत्र्यांतर्गत मागण्यास काहीही मागता येते पण त्याला धर्मनिरपेक्षता म्हणता येत नाही केवळ धर्म निरपेक्षतेचा बट्ट्याबोळ म्हणता येते, या न्यायाने इकॉनॉमीक प्रुडन्सला आणि एफिशीअन्सी बाजूस ठेऊन बँंकीग व्यवहारातही धर्मवार जातवार रिझर्व क्वोटापण देता येईल, माओवादी नक्षल स्वतःला माओ धर्मीय आहोत म्हणून शस्त्रांसाठी फायनान्स मागतील तर एखाद्या पंथाचे लोक त्यांचे संत गांजा ओढत म्हणून गांजा ओढण्या साठी त्याच्या शेतीसाठी फायनान्स मागतील इन्कल्यूजनला महत्व असावे इन्कल्यूजनसाठी खास पर्याय असावेत पण जाती धर्मांची नावे देण्याची गरज कुठे आहे. प्रस्थापित व्यवस्था एकतर्फी कमी पडली असे कसे म्हणता येईल ? को ऑपरेटीव्ह बँकींगचे पर्याय जवळपास शतकभरा पासून होते आणि आहेत त्यात धर्माचे नाव न वापरता अधिक पर्यायही मागण्यास लोकशाहीत कुणाची काही ना आहे का ? व्यवस्था एकतर्फी कशी कमी पडली ते उलगडून सांगाल का ? धर्मसंस्थेचे ऋण-व्याज व्यवहारातील हस्तक्षेप आणि अज्ञानश्रद्धांना व्यवस्थेचे अपयश कसे म्हणता येईल ? उलगडून सांगण्यासाठी धर्मसंस्थेचे ऋण-व्याज व्यवहारातील हस्तक्षेप आणि अज्ञानश्रद्धांना ह्या धाग्या वर मी सविस्तर चर्चा केली आहे ती वाचून घ्यावी आणि लांगूलचालनाला लांगूलचालन का म्हणू नये ते सांगावे. अशा लपवण्याचे प्रयत्न केलेल्या लांगूलचालनांमुळे अथवा सोईच्या समर्थनामुळे मांजरीने डोळे झाकून दूध पिले तरी मांजरीने दूध पिले हे कुणालाही समजतेच आणि प्रतिक्रीयावाद फोफावत असतात. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Tue, 11/22/2016 - 17:15

In reply to माझ्याकडे विदा नाही, आपण by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

मोहम्मद युनूस यांची ग्रामीण बँक

व्याज आकारते. व्याजाचा दर खूप कमी असतो, कारण ग्रामीण बँकेचा मुख्य हेतू हा गरीब आणि अतिगरीब लोक ज्यांना मुख्य धारेतील बँका थारा देत नाहीत, अशा लोकांना बँकिंग सुविधा पुरवणं हा आहे. पण त्यांच्यावर इस्लामविरोधी वगैरे असल्याचा आरोप झालेला नाही. ते व्याज घेतात हे स्वतः त्यांच्या तोंडूनच ऐकलेलं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अमर विश्वास on Tue, 11/22/2016 - 16:35

Permalink

बापूसाहेब ..

बापूसाहेब .. मायक्रोफायनान्स हा प्रकार आपल्याकडेही चांगल्या प्रमाणात रुळायला लागला आहे ... आपले महिला बचत गट हे याचेच उदाहरण आहे, अर्थात आपल्या इथे या बचत गटांना बँकेचा मिळणारा सपोर्ट आणि मोहम्मद युसूफ यांची ग्रामीन बँक यांच्या कार्यपद्धतीत थोडा फरक आहे
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Tue, 11/22/2016 - 16:51

In reply to बापूसाहेब .. by अमर विश्वास

Permalink

होय, ते माहिती आहे अन सहमत

होय, ते माहिती आहे अन सहमत आहे अमर भाऊ, मला वेगळा अभ्यास करायचा आहे, आपल्या मायक्रोफायनान्स मध्ये असलेली लुपहोल्स अन ती भरायला आपण ग्रामीणच्या मॉडेल मधून काय मदत घेऊ शकू असा अभ्यास करायचा आहे. बघू ! विषय खूप आहेत अन आयुष्य छोटे. असो
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Tue, 11/22/2016 - 17:18

In reply to होय, ते माहिती आहे अन सहमत by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

वाचलं नसेल तर

बँकर टू द पुअर वाचा बापू. खूपच छान पुस्तक आहे. स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवल्यामुळे ग्रामीण बँक बांगलादेशात यशस्वी झाली आणि तो मुद्दा विसरल्यामुळे आपल्याकडे प्रश्न निर्माण झाले असं माझं वैयक्तिक मत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Tue, 11/22/2016 - 17:28

In reply to वाचलं नसेल तर by बोका-ए-आझम

Permalink

थँक यु बोका भाऊ विशलिस्ट

थँक यु बोका भाऊ विशलिस्ट अपडेटेड :)
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Wed, 11/23/2016 - 09:43

In reply to थँक यु बोका भाऊ विशलिस्ट by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

ही लिंक.

https://g.co/kgs/eqNQAm
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Tue, 11/22/2016 - 17:29

In reply to बापूसाहेब .. by अमर विश्वास

Permalink

युनूसच्या ग्रामीण बँक काही तथ्ये

इंग्रजी विकिपीडियावरील बांग्लादेशातील या नावाजलेल्या बँकेबद्दलचे बारकावे अभ्यासले तर काही तथ्ये पुढे येतात ती अशी १) हि बँक व्याजरहीत बँक नसावी तब्बल २० टक्के व्याजदर आकारला जातो. (एकुण काय तर मायक्रो फायनान्स म्हणजे कमी व्याजदर असे निश्चितपणे सांगता येत नसावे( २.१) कर्ज घेणार्‍या महिलांना फायदा हा की कोणतेही तारण अथवा लेखी करार करावा लागत नाही. (हि उजवी बाजू) २.२) पण परतफेडीचा दबाव असतोच संदर्भ इंग्रजी विकिपीडियावरील लेख चुकभूल देणे घेणे
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Wed, 11/23/2016 - 09:39

In reply to युनूसच्या ग्रामीण बँक काही तथ्ये by माहितगार

Permalink

तारण द्यावं लागत नाही हे चुकीचं आहे.

BANKER TO THE POOR मध्येच वाचलेलं आहे. त्यानुसार राहतं घर हे तारण ठेवावं लागतं, आणि कर्ज स्त्रियांनाच प्रामुख्याने दिली जातात त्यामुळे ते घर जर त्या स्त्रीच्या नावावर नसेल तर तिला ते स्वतःच्या नावावर करुन घ्यावं लागतं. त्याचा एक फार मोठा अप्रत्यक्ष फायदा युनूस यांनी सांगितलेला आठवतो की त्यामुळे स्त्रियांना त्यांच्या नव-यांनी मारहाण करणं (विशेषतः दारु पिऊन) आणि घराबाहेर काढणं बंद झालं कारण घर तर तिच्या नावावर आहे. त्यामुळे ही अशी फालतू मर्दुमकी (युनूस यांनी male chauvinism शब्द वापरलाय) बंद झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Wed, 11/23/2016 - 09:52

In reply to तारण द्यावं लागत नाही हे चुकीचं आहे. by बोका-ए-आझम

Permalink

करेक्शन बद्दल धन्यवाद. आपण

करेक्शन बद्दल धन्यवाद. आपण दिलेला संदर्भ वापरुन खरेतर इंग्रजी विकिपीडियावरही दुरुस्ती करावयास हवी.
  • Log in or register to post comments

Submitted by अमर विश्वास on Tue, 11/22/2016 - 17:34

Permalink

बापुसाहेब उत्तम विचार आहे

बापुसाहेब उत्तम विचार आहे बोका-ए-आझम यांनी सुचवलेले पुस्तक बँकर तो पुअर जरूर वाचा .. हे इंटरनेटवर फ्री डाउनलोड आहे ... किंवा मी PDF कॉपी ईमेलवरही पाठवू शकतो या पुस्तकाची सुरवातच विचार करायला लावणारी आहे ... ‘It’s not people who aren’t credit-worthy. It’s banks that aren’t people-worthy’
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Tue, 11/22/2016 - 17:36

In reply to बापुसाहेब उत्तम विचार आहे by अमर विश्वास

Permalink

आई शपथ!!! काय ओपनिंग आहे राव!

आई शपथ!!! काय ओपनिंग आहे राव!
  • Log in or register to post comments

Submitted by पुंबा on Tue, 11/22/2016 - 18:32

In reply to आई शपथ!!! काय ओपनिंग आहे राव! by कैलासवासी सोन्याबापु

Permalink

आवडले..

आवडले..
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 11/23/2016 - 12:51

In reply to बापुसाहेब उत्तम विचार आहे by अमर विश्वास

Permalink

‘It’s not people who aren’t

‘It’s not people who aren’t credit-worthy. It’s banks that aren’t people-worthy’ काय लिहिलेय ! सलाम !!!
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजित - १ on Tue, 11/22/2016 - 19:55

Permalink

लांगुलचालन वगैरे काही नाही.

लांगुलचालन वगैरे काही नाही. सरकारला फुकट मध्ये जर का पैसे वापरायला मिळत असतील तर त्यांना ते हवेच आहेत. मुसलमान वगैरे काही नाही .. फुकट ते पौष्टिक !! आत्ता १/२ महिन्या पूर्वी एक मोठी पोस्ट फिरत होती . सिंडिकेट बँक दिल्ली मध्ये अकाउंट , सर्व जनतेने रोज १ रुपया द्या . हा अकाउंट पण चोर लोकांनीच उघडला होता. कारण याच्या विरुद्ध बरीच माहिती आली होती. पण पुढे सरकारने तो ताब्यात पण घेतला !!
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Tue, 11/22/2016 - 20:12

Permalink

धागा टीपीकल असला तरी प्रतिसाद युनिक आहेत

धागा नेहमीच्या यशस्वी शैलीतील असला तरी प्रतिसादांंमुळे विशेषत: माहीतगार, आदुबाळ, मुळे व सोन्याबापु यांचे प्रश्नही मार्मिक आहेत यामुळे हा वाचनीय झालेला आहे. अनेक नविन बाबी कळल्या या धाग्यामुळे चर्चकांना धन्यवाद !
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Tue, 11/22/2016 - 20:54

Permalink

इ.ब्या. आणि दहशतवाद

लोकहो, आदूबाळ म्हणतात की :
जर फायनान्शियल इन्कल्यूजनची पहाट इस्लामिक बँकिंगच्या कोंबड्यामुळे उगवत असेल तर सो बी इट. नाय तिथे धर्म आडवा आणण्यात काय अर्थ आहे?
एक प्रश्न आहे. मुस्लिमांचं फायनान्शियल इन्क्ल्युजन कशाला व्हायला हवंय? नक्की काय फायदे आहेत. नसलं तर काय फरक पडतो? एक शंका म्हणून विचारतोय. समजा मी एक रामकृष्ण नावाची इब्या स्थापन केली तर कोणी मुस्लिम ठेव ठेवेल काय? याउलट कोण्या मौलवीने गरीब-अल-नर्मगर्म नावाची इब्या उघडली तर सगळे मुस्लीम तिथे धावतील ना? मग इन्क्ल्युजन झालं का? की नाही झालं? की झाली इन्क्ल्युजनची ऐशीतैशी? शिवाय घुसखोर अतिरेक्यांना आज जो रोखीने पतपुरवठा होतो तो अशा प्रकारच्या इब्यातनं थेट होणार नाही याची काळजी कोण घेणार? इब्यावरून बीसीसीआय बँकेची आठवण झाली. ( च्यायला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची पण तीच अद्याक्षरे आहेत. हा योगायोग आहे की आजून काही ? ! असो. ) तिची पाकिस्तानस्थित शाखा सर्वात मोठी आणि सर्वाधिक कार्यरत होती. जगभरचा पैसा फिरवाफिरवी करून अखेरीस पाकी गुप्तचर संस्था आय एस आय ला पुरवणारी हीच ती बँक. साला भ्रष्टाचार करायचा असतो तेव्हा इस्लामिक बँकेची शाटा गरज पडंत नाही. आणि इन्क्ल्युजन नाही म्हणून भारतीय मुस्लिमांसाठी मात्र विशेष इब्या उघडायची. खासा न्याय आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Tue, 11/22/2016 - 21:37

In reply to इ.ब्या. आणि दहशतवाद by गामा पैलवान

Permalink

अच्छा. म्हणजे एखादी बँक

अच्छा. म्हणजे एखादी बँक मुस्लिम असली तर ती दहशतवाद्यांना पतपुरवठा करणारीच असणार असं प्रिझम्शन आहे का?
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on Wed, 11/23/2016 - 03:25

In reply to अच्छा. म्हणजे एखादी बँक by आदूबाळ

Permalink

हो.

आदूबाळ,
म्हणजे एखादी बँक मुस्लिम असली तर ती दहशतवाद्यांना पतपुरवठा करणारीच असणार असं प्रिझम्शन आहे का?
हो. बेटर सेफ दॅन सॉरी. छोडो भारत चळवळीमधनं तोडो भारत चळवळ केव्हा सुरू झाली ते आजतागायत कोणालाही कळलं नाही. अगदी सावरकरांनी हेच शब्द वापरून स्पष्टपणे धोक्याची सूचना देऊनही. कशावरून बँकिंगमध्येही असंच होणार नाही? भारतात इस्लामिक बँक स्थापन करून चालवायला कायद्याने मुस्लिमांना परवानगी नाकारणार का? तसं असेल तरंच विचार करावा म्हणतो मी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com