मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लांगूलचालनाचा एक नवीन अध्याय: इस्लामिक बँक

वटवट · · काथ्याकूट
कोणत्याही लोकशाहीचा एक मूळ नियम असावा कि कायदे सर्वांसाठी सारखे असावेत. आणि हा नियम पाळला जावा. असे कायदे असतील तरंच सर्वजण कायदे इतमामाने पाळतील. त्यांचा आदर राखतील. इथे सर्वांसाठी म्हणजे सर्व धर्मीयांसाठी असे अभिप्रेत आहे. ह्या नियमाला हा देश स्वतंत्र झाल्या झाल्या तडाखा बसला. हिंदू कोड बिलाने... आंबेडकर आणि नेहरू प्रचंड आग्रही होते म्हणून हे बिल पास झालं.. आणि फक्त हिंदूंना हे बिल लागू करण्यात आले. आधी हिंदू कोड बिल हे एकंच होतं... पण त्याला प्रचंड विरोध होता म्हणून त्याचे चार तुकडे पाडण्यात आले. १. हिंदू मॅरेज ऍक्ट २. हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट ३. हिंदू अडॉप्शन अँड गार्डीयनशिप ऍक्ट आणि ४. हिंदू सक्सेशन ऍक्ट... जाणून बुजून मुस्लिमांना ह्यातून वगळण्यात आलं. त्यांना त्यांच्या शरियत प्रमाणे वागायला अनुमोदन दिलं... कारण त्यांनी असला भारताने पारित केलेला कायदा मान्य केला नसता म्हणून... तुम्ही आमचे कायदे मानत नसाल तर त्यांना बाहेरचा दरवाजा किंवा योग्य ती शिक्षा दाखवली गेली नाही...तर त्यांच्यासाठी कायदे वगळले गेले. त्यांच्या धर्मासोबत चाटण्याचा धर्मसुद्धा अवलंबिला गेला... गरज नसताना... त्यांच्या कट्टरतेला खतपाणी घालायला इथून सुरुवात झाली... नंतर स्पष्ट उल्लेख करायचा झाला आणि कशी आपल्या संसदेने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला कचऱ्याची टोपी दाखवून, नं पटणारे मुस्लिम लांगुलचालन केले ह्याचा दाखला द्यायचा झाला तर खूप गाजलेली शाह बानो केस सांगावीच लागेल.. तर झालं होतं असं कि ह्या शाह बानोचा मोहम्मद अहमद खानशी निकाह झाला होता १९३२ साली. २ मुलं आणि ३ मुली ह्यांचा नंतर जन्म झाला. मोहम्मद अहमद खाननं साधारण १९७५ च्या सुमारास ह्या शाह बानो ला घरातून बाहेर काढलं. तिने सीआरपीसीच्या सेक्शन १२५ अंतर्गत महिना ५०० रुपयांच्या पोटगीसाठी याचिका दाखल केली, इंदोरच्या मॅजिस्ट्रेटसमोर. (सीआरपीसीच्या सेक्शन १२५ अंतर्गत कोणतीही बायको, घटस्फोटिता, पालक, पाल्य पोटगीसाठी दावा दाखल करू शकतात.) १९७८ मध्ये मोहम्मद अहमद खाननं तिला तलाक दिला. त्यानंतर तिने दुसरं लग्न केलं नाही. आता बचाव करताना मोहम्मद अहमद खाननं सांगितलं कि शाह बानो त्याची बायको नाही. तेंव्हा त्याची तिला पोटगी द्यायची काहीही जबाबदारी नाही. (मुस्लिम पर्सनल लॉ नुसार तलाकनंतर नवऱ्याची बायकोप्रती जबाबदारी फक्त दोनच बाबतीत असते. एक म्हणजे मेहेर, आणि दुसरं म्हणजे इद्दत पुरती पोटगी. मेहेर ही एक रक्कम असते कि जी निकाह करतेवेळेस निश्चित केलेली असते कि जी तलाक, जर झाला तर, नंतर नवर्याने बायकोला द्यायची असते. आणि इद्दत म्हणजे तलाकनंतरचा फक्त तीन महिन्याचा काळ, अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर तलाकनंतर तीन मासिक पाळ्यांचा कालावधी. तोही ८७ दिवसांचा... संपलं.) मोहम्मद अहमद खाननं असा बचाव करायचं कारण म्हणजे त्याने आधीच दोन वर्षे २०० रुपये प्रति महिना तिला पोटगी दिलेली होती आणि त्याचबरोबर ३००० रुपये कोर्टात डिपॉझिट केलेहोते, मेहेरम्हणून... तरीही कोर्टाने त्याला अतिरिक्त २५ रुपये प्रति महिना शाहबानोला द्यायची ऑर्डर केली. पोटगीची रक्कम खूप कमी होती म्हणून शाहबानो ने मध्यप्रदेशच्या हायकोर्टात अपील दाखल केलं. हायकोर्टाने ते अलाउ करून १७९.२० रुपयाची पोटगी द्यायची ऑर्डर केली. त्याच्याविरुद्ध मोहम्मद अहमद खाननं सर्वोच्च न्यायालयात अपील केलं, जे त्या न्यायालयाने फेटाळून लावलं... आणि ऐतिहासिक निर्णय दिला कि इद्दत च्या कालावधीनंतर सुद्धा मुस्लिम नवर्याने बायकोला पोटगी द्यावी, सीआरपीसीच्या सेक्शन १२५ च्या अन्वये. "इस्लाम खतरेमे है" च्या आरोळ्या सुरु झाल्या. सर्व तथाकथीत मुस्लिम विचारवंत ह्यांच्या बैठका वाढू लागल्या. पहिल्यांदाच न्यायालयाने त्यांच्या धर्मात हात घातला होता.. इतरांच्या बाबतीत जे काही करायचं ते करा पण इस्लामला हात नाही कोणी लावू शकत हा त्यांचा स्टॅन्ड होता... अख्खे मुस्लिम जनमानस ढवळून निघाले. राजीव गांधीचे सरकार होते. सर्व मुल्ला, मौलवी गेले त्यांना भेटायला. गंभीर इशारे दिले. सरकारला धोका उत्पन्न करण्याची गर्भित धमकी दिली. राजीव गांधी घाबरले, टरकले... आणि संसदेला हाताशी धरून "मुस्लिम वूमन (प्रोटेक्शन ऑफ राईट ऑन डायव्होर्स) ऍक्ट १९८६" पास केला. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवली. आणि सीआरपीसीचा सेक्शन १२५ हा मुस्लिमांना लागू होणार नाही आणि लागू करायचा असेल तर दोघांनी तसं ऍफेडेव्हिट सादर करावं असं सांगितलं गेलं. आता कोण मुस्लिम नवरा नसती आफत ओढवून घेईल असं ऍफेडेव्हिट सादर करून?? आता पुन्हा तो इद्दतचा नियम लागू केला गेलाय.. इथं काय झालं??? मुस्लिम जनता सर्वोच्च न्यालयाचा निर्णय कि जो कायदाच असतो, तो मानायला तयार नव्हती तेंव्हा कायदा पुन्हा वळवला गेला... त्यांचे बूट चाटण्यासाठीच ना? आणि आता पुन्हा हाच मुद्दा आपल्यासमोर येतोय "इस्लामिक बँकेच्या रूपात" शरियत कायद्यानुसार कर्जावर व्याज घेणे पाप आहे. हा कायदा बरेच मुस्लिम लोक पाळतात. बरेच मुस्लिम लोकं बँकेचे व्यवहार करीत नाहीत. त्यामुळे त्यांचे पैसे बँकेच्या व्यवहारात येत नाहीत. त्यामुळे जर त्यांचे पैसे बँकेच्या व्यवहारात आणायचे असतील तर शरियतच्या कायद्यानुसार चालणारी बँक असावी ह्या पायावर इस्लामिक बँक उभी आहे. ह्या बँकेत कर्जावर व्याज आकारले जात नाही कारण शरियत कायद्यानुसार कर्जावर व्याज घेणे पाप आहे. मग ह्या बँका कशा चालतात... त्या प्रत्यक्षरित्या नाही पण अप्रत्यक्ष रित्या व्याज घेतातंच. उदाहरण द्यायचं झालं तर... एकाला होमलोन घ्यायचं आहे.. तर बँक ते घर एकतर विकत घेईल किंवा बांधून देईल. त्यानंतर त्याव्यक्तीकडून त्या घराचे भाडे आकारेल. ह्या अश्या भाड्यामधून बॅंक नफा मिळवते. जर धंद्यासाठी कर्ज हवे असेल तर प्रॉफिट-लॉस शेअरिंगच्या तत्वावर ही बँक चालते, प्रत्यक्ष व्याज नं घेता. आखातात हि बँक जोरात चालते (अर्थात तिथे काही पर्यायच नाही म्हणा). तिथे मूळ व्यवसाय हा तेलाचाच आहे म्हणून तोट्याची शक्यता खूप कमी. प्रॉफीटशेअरिंगच जास्त चालतं. काही प्रगत राष्ट्रांमध्येही इस्लामिक बँकेचं फायदेशीर आस्तित्व आहे, कारण त्यांच्याकडे कर्ज वसुलीचे तगडे मेकॅनिझम आहे. भारतात बँकेचा जास्त लोचा हा कर्जवसुलीचाच आहे. त्यामुळेच तो बॅलेन्सशीटचा फुगवटा येतो. उद्या हे असं झालं तर त्याचा बोजा प्रत्यक्षरित्या इतर जनतेवर येणार नाही हे कशावरून? तर ह्या अश्या बँका भारतात कितपत चालतील हा प्रश्न आहे. पण मुळात गोष्ट अशी आहे आता पुन्हा एकंच विषय अधोरेखित होत आहे कि, इथेही मुस्लिम लोकं रेग्युलर बँकिंग स्वीकारत नाहीयेत म्हणून आम्ही आमचे कायदे वळवत आहोत, पुन्हा एकदा... युनिफॉर्म मॉनिटरी कोडसाठी काही काळानंतर लढा द्यावा लागेल कि काय अशी स्थिती उद्भवायला काहीच वेळ नाही लागणारे... हे लांगूलचालन नाही तर काय आहे? जे काही बँकिंग आपण सर्व जण वापरत आहोत. त्याचंच कंपल्शन जर त्यांच्यावर केलं तर नाही का चालणार? कि हे गृहितंच धरायचं कि ते हे मान्य करणार नाहीत? इलेक्शनच्या बाबतीत पण इस्लाममधे दोन प्रवाह आहेत. सुन्नी म्हणतात इलेक्शन हि सुन्नत (म्हणजे प्रॉफेट महम्मदने अंगिकारलेली) आहे. आणि शिया वारसाहक्काच्या बाजूने आहेत, इलेक्शनच्या नाही.. तर मग उद्या आपण भारतात शिया पंथीयांसाठी एक वेगळा प्रांत उभारणार आहोत कि जिथे निवडणूक नसेल? हे कुठे चाललंय? हे योग्य आहे? बर्याचदा आपली न्यायालये पण भेदभाव करतात कि काय असं वाटतं... त्या याकूब मेननसाठी मध्यरात्री २.३० वाजता सुनावणी होते. सलमान साठी ७.३० पर्यंत कोर्ट उघडं होतं. कर्जावर व्याज मंजूर नाही पण जर मेहेर दिलेली नसेल तर त्या अनपेड मेहेरवर व्याज घेणं मंजूर आहे असं सर्वोच्च न्यायालय म्हणतं. (हमीरा बीबी वि. झुबैदा बीबी) हेच आहे का आपले "धर्मनिरपेक्ष शासन"? भाजपा हि भगवी काँग्रेस आहे हे कोणीतरी म्हणालं होतं ते खरंच आहे कि काय? केरळ सरकार ह्या अश्याच बँकेच्या स्थापनेच्या प्रयत्नात होतं तेंव्हा डॉ. सुब्रमनियम स्वामींनी दाखल केलेली याचिका कोर्टाने फेटाळून लावली तीही अत्यंत आदर्श कारणे देत (जर कोणाला हे जजमेंट हवं असेल तर माझ्याकडे आहे) ह्याच आदर्शाच्या नावाखाली जगभर पसरलेला दहशतवाद त्यांना दिसत नाही? मला मुस्लिमांबद्दल कसलाच आकस नाही पण जाणून बुजून हि जी काही वेगळी वागणूक दिली जातीये त्या विरोधात मी नक्कीच आहे. (ह्या लेखावर टीका जरूर करावी पण कुठलंतरी एक वाक्य घेऊन मागचा पुढचा संदर्भ हेतुपुरस्सर वगळून, एनडीटीव्ही स्टाईलने, टीका करणे टाळावं, ही मनापासून विनंती... मार्गावरून भटकू नये वा दुसऱ्याला भटकवू नये. कारण मिपावर काही सन्माननीय सदस्य असे आहेत कि जे सोलापुरवरून पुण्याच्या गाडीत बसतात आणि हि गाडी हैद्राबादला कशी जात नाही हे बघतो, ह्या अट्टाहासात असतात)

वाचने 16323 वाचनखूण प्रतिक्रिया 92

वटवट 22/11/2016 - 14:40
रिझर्व्ह बँकेने अश्या बँकेच्या स्थापनेच्या संदर्भात एक प्रस्ताव पाठवला आहे. त्यासंदर्भात हा लेख - लेख एडिट करायचा पर्याय नाही म्हणून हे स्पष्टीकरण इथे...

In reply to by आदूबाळ

माहितगार 22/11/2016 - 15:11
+१ मी मागे केवळ अर्थशास्त्रीय दृष्टीकोणातून धर्मसंस्थेचे ऋण-व्याज व्यवहारातील हस्तक्षेप आणि अज्ञानश्रद्धा या काथ्याकुट धागा माध्यमातून चर्चा केली आहे. ज्यांना केवळ अर्थशास्त्रीय दृष्टीकोणातून मत प्रदर्शन करावयाचे त्यांचे त्या धाग्यावर स्वागत आहे.

In reply to by असंका

वटवट 22/11/2016 - 15:54
मी असं कुठेही म्हणालेलो नाहीये.. एचयूएफ चे बरेच नियम हे लॉजिकल आहेत. मी आलॉजिकल गोष्टींबद्दल बोलत आहे.

In reply to by वटवट

असंका 23/11/2016 - 13:03
मी असं कुठेही म्हणालेलो नाहीये..
तोच तर मुद्दाय साहेब. तुम्ही हिंदु धर्माबद्दल काही बोललाच नाहीत. म्हणून तर आठवण करुन द्यावी लागली. मुळ लेखातलं हे वाक्य बघा:
कोणत्याही लोकशाहीचा एक मूळ नियम असावा कि कायदे सर्वांसाठी सारखे असावेत. आणि हा नियम पाळला जावा.
बरोबर? मग जो फायदा (आर्थिक फायदा-मोजण्यासारखा!)कायद्याने फक्त हिंदुंनाच मिळतो, तो इतर धर्मियांना पण मिळावा किंवा कुणालाच मिळू नये हा मुद्दा अशा लेखात यायला नको?

In reply to by असंका

वटवट 23/11/2016 - 13:36
मग जो फायदा (आर्थिक फायदा-मोजण्यासारखा!)कायद्याने फक्त हिंदुंनाच मिळतो, तो इतर धर्मियांना पण मिळावा किंवा कुणालाच मिळू नये हा मुद्दा अशा लेखात यायला नको?>>> तुमच्यासाठी म्हणून सांगतो कायदे फक्त हिंदूंनाच आहेत बाकीच्यांना मोकळे रान आहे... म्हणून जास्त फायदा त्यांना मिळतो हिंदूंना नाही...

अमर विश्वास 22/11/2016 - 15:46
अत्यंत एकांगी लेख ... मुळात भारतात आर्थिक समावेशकता (Financial Inclusion) हा मोठा प्रश्न आहे. त्यातच एक मोठा समाज धार्मिक कारणांनी आर्थिक संसाधनांपासून दूर रहाणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेला परवडण्यासारखे नाही. या समाजाला मुख्य बँकिंग च्या प्रवाहात आणण्यासाठी काय करायला पाहिजे ? समाज प्रबोधन करुन सुधारणा घडवण्याचा इतिहास हा फारसा उत्सवर्धक नाही. सध्या हा समाज पर्यायी व्यवस्थेकडे (Money laundering इत्यादी) वळतो... हे आपल्या अर्थव्यवस्थेला घातक आहे. इस्लामिक बँकिंगच्या माध्यमातुन हा समाज बँकेच्या धारेशी जोडलेला राहील व या सर्व व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण राहील. तसेच बराच पैसे जो सामन्तर अर्थव्यवस्थेत फिरतो आहे तो ही बँकिंग सिस्टिम मध्ये येईल . इस्लामिक बँकिंग हा योग्य पर्याय आहे का? भारतात हा पर्याय यशस्वी होईल का ? याचे उत्तर रिझर्व्ह बँकेचे पूर्ण प्रपोसलं वाचल्यावरच कळेल पण त्या दिशेने विचार करणे म्हणजे लांगूलचालनाचा एक नवीन अध्याय.. असे अजिबात वाटत नाही... कदाचित समांतर अर्थव्यवस्था नष्ट झाले तर समान नागरी कायद्यासाठीही एक मास्टरस्ट्रोक ठरेल..... जता जाता : जागतिक बँकेने इस्लामिक बँकिंगला मान्यता दिली आहे.. मान्यता देताना कोणते पॅरामीटर्स वापरले हे पाहणे इंटरेस्टिंग ठरेल...

In reply to by अमर विश्वास

वटवट 22/11/2016 - 16:02
कोणी कितीही वळवळ केली तरीही रिझर्व्ह बँकेचे हे प्रपोजल मान्य होईलच आणि सर्वोच्च न्यायालयपण त्याला हिरवा कंदील दाखवणार ह्याची मला अत्यंत खात्री आहे.... तरीही एक मोठा समाज धार्मिक कारणांनी आर्थिक संसाधनांपासून दूर रहाणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेला परवडण्यासारखे नाही.>> ही अर्थव्यवस्थेची कि धर्मान्ध लोकांची?? धर्माची लालूच दाखवली कि लगेच येणारी जनता हि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक नाही? समाज प्रबोधन करुन सुधारणा घडवण्याचा इतिहास हा फारसा उत्सवर्धक नाही.>> कुठलीही मूलभूत सुधारणा इतकी सोपी नसते.. विषय असाय कि प्रयत्न किती झाले?? सध्या हा समाज पर्यायी व्यवस्थेकडे (Money laundering इत्यादी) वळतो... हे आपल्या अर्थव्यवस्थेला घातक आहे>> फक्त हाच नाही तर सर्व समाजाचा हा प्रॉब्लेम आहे... त्यात ह्यांना विशेष वागणूक का म्हणून? माझा तोच महत्वाचा आक्षेप आहे. जागतिक बँकेने इस्लामिक बँकिंगला मान्यता दिली आहे.>>> युनोने स्थलांतराला पण मान्यता दिलीये... अख्खा युरोप भोगतोय त्याची फळं...

In reply to by वटवट

अमर विश्वास 22/11/2016 - 16:27
वटवट साहेब ... हे वळवळ वगैरे शब्द तुमच्या वटवट नावाला शोभून दिसतात ... बाकी तुम्ही रिझर्व्ह बँकेचा प्रस्ताव निदान वाचला तरी आहे का ? (कारण हा प्रस्ताव मला तारे पूर्ण स्वरूपात सापडला नाही ) हा प्रस्ताव वाचला नसेल तर आपला विरोध नक्की कशाला आहे ? इस्लामिक या नावाला ? की ही नुसतीच वटवट आहे ?

In reply to by अमर विश्वास

माहितगार 22/11/2016 - 16:14
धागा लेखकाचा अभिनिवेश आणि दृष्टीकोण काही काळ बाजूला ठेवला तरी विशीष्ट आर्थीक तत्वांवर/पद्धतीवर आधारीत बँक म्हणावयाचे सोडून धर्माचे नाव वापरणे धर्मसंस्थेचा हस्तक्षेप तिच्या तिच्या परिघाच्या बाहेर ग्राह्य ठरवते, व्हेजीटेरीअन थाली /रेस्टॉरंट नॉनव्हेज रेस्टॉरंट असे म्हणताना धर्मांच्या नावांचे उल्लेख कमी होतात तेवढाच कडव्या धार्मीकांचा हस्तक्षेपाचा वाव कमी राहतो. अमुक प्रकारच्या युनायटेड फॅमिलीला अमुक प्रकारची युनायटेड फॅमिली म्हणाना त्याला हिंदू युनायटेड फॅमिली असेच म्हणणे गरजेचे असते का ?

In reply to by माहितगार

वटवट 22/11/2016 - 16:21
नवीनहिंदू कोड बिलामध्ये स्पष्ट पणे हे कायदे केवळ हिंदूंसाठीच बनवले गेले असल्याचा उल्लेख आहे... म्हणून अजून अडचणी टाळण्यासाठी हिंदू अंडीव्हायडेड फॅमिली असा उल्लेख सारखा आढळतो. ते गरजेचे असते... जर समान नागरी कायदा आला तर कोणत्याच धर्माचा उल्लेख राहणार नाही. पण सध्यातरी हे गरजेचे...

In reply to by वटवट

माहितगार 22/11/2016 - 16:32
नवीनहिंदू कोड बिलामध्ये स्पष्ट पणे हे कायदे केवळ हिंदूंसाठीच बनवले गेले असल्याचा उल्लेख आहे...
शब्द न वापरताही हे केले जाऊ शकत होते अगदी वेगवेगळ्या समुहाच्या गरजांसाठी वेगवेगळे कौटूंबिक कायदे ठेऊनही धर्मांची नावे टाळता येऊ शकली असती, ब्रिटीशांनी केलेली चूक-कि जाणीव पुर्वकता स्वतंत्र भारतानेही रिपीट करण्याची गरजच काय ? एनीवे किमान इनकम टॅक्सच्या आंगणात हिंदू युनायटेड फॅमिली म्हणण्याची गरज काय २) धागा लेखक महोदय ज्या न्यायाने धर्म विषयक शब्दांचे इनकम टॅक्सच्या संदर्भात समर्थन करत असतील तर त्याच न्यायाने बँकींगसारख्या वेगळ्या क्षेत्रात वेगळ्या धर्माच्या शब्दाचे समर्थनही होऊ शकते हे लक्षात घेऊ इच्छित नाहीत असे दिसते. भूमिकेत एक सारखेपणा हवा तो त्यांच्या भूमिकेत आहे का या बद्दल साशंकता आहे. इन एनी केस खालील एका प्रतिसादात म्हटल्या प्रमाणे व्याज विरहीत बँकींगवर श्रद्धा असलेल्या कुणालाही ती करावी वाटेल, किंवा एकत्र कुटूंब असलेल्या कोणत्याही कुटूंबाला लाभ घेता येईल अशा धर्म निरपेक्ष नाम-रचना ठेवण्यास काय हरकत आहे.

In reply to by माहितगार

वटवट 22/11/2016 - 16:39
अहो माहितगार... मी लेखाच्या सुरुवातीलाच हे स्पष्ट केलंय कि हेतुपुरस्सर हिंदू कोड बिल पास करण्यात आलं... हिंदू शब्दाला सर्वांचाच आक्षेप होता. कारण सर्व भारतीयांना लागू करावं असं म्हणणं होतं... इतरांना वगळून हिंदू हा शब्द टाकण्याचा हेतू हा कि हे फक्त हिंदूंनाच लागू व्हावं, दुसऱ्यांना नाही. आता हिंदूंच्या प्रॉपर्टीला म्हणून सहाजिकच हिंदू प्रॉपर्टी हे नाव आलं. आता इथे नाव वेगळं आणि दुसऱ्या कायद्यामध्ये नाव वेगळं असं चालत नसतं? कायदेशीर अडचणी उद्भवतात, म्हणून इनकम टॅक्सच्या आंगणात हिंदू युनायटेड फॅमिली असं म्हणतात...

In reply to by वटवट

माहितगार 22/11/2016 - 16:52
इतरांना वगळून हिंदू हा शब्द टाकण्याचा हेतू हा कि हे फक्त हिंदूंनाच लागू व्हावं, दुसऱ्यांना नाही.
पर्याय अ पर्याय ब पर्याय क पर्याय ड असे पर्याय द्यावयास हवे होते, ज्या कुटूंबास जो पर्याय क्रमांक हवा तो निवडेल धर्मसंस्थेचे नसते हस्तक्षेप ओढवून घेण्यास जागा ठेवायची मग तुझे-माझे करून भांडत रहायचे.

In reply to by अमर विश्वास

ओम शतानन्द 22/11/2016 - 16:55
या समाजाला मुख्य बँकिंग च्या प्रवाहात आणण्यासाठी काय करायला पाहिजे ? समाज प्रबोधन करुन सुधारणा घडवण्याचा इतिहास हा फारसा उत्सवर्धक नाही. समाज प्रबोधन करुन मुस्लिम समाज सुधारणार नाही हे तुम्हालाही पटलेले दिसते , राजीव गान्धी यानाही शहाबानो प्रकरणात ते पटल्यामुळे मुस्लिम धार्मिक बाबतीत त्यानी मान तुकविली आणि निर्णय उलट फिरवला, भाजप ही त्याच मार्गाने चाललेली आहे. आर्थिक व्यवहारान्ची धार्मिक विभागणी म्ह. शरियाप्रणित बन्किन्ग असा नवा पायन्डा सुरु करायचा भाजप चा ( त्यामुळे तरी काही मुस्लिम मते मिळतील ) विचार आहे तर !

इस्लामिक बँक

इस्लामिक बँकिंग भारतात रीतसर सुरु झाल्यावर मी मनुवादी बँकिंग सुरु करण्यासाठी जनहित याचिका दाखल करणार आहे =))

In reply to by प्रसाद गोडबोले

नाखु 22/11/2016 - 16:11
सारख्या टनाटनी लोकांमुळे काळा पैसा देशाबाहेर चालला आहे..
अखिल मिपा दैनिक " स्वयंघोषीत सुधारक".
तुम्ही भारताला ५० वर्षे मागे नेत आहात..
अखिल मिपा धागा हितरक्षण आणि कळ(का)वळा समीती.
ज्जे बात , काही भागभांडवल गुंतवू इच्छीत आहे. वेगळा धागाच काढावा.
अखिल मिपा अंधुक उजेडातील ऊजवी असलेली उदयोन्मुख संघटना..
संकलक नाखु

माझ्याकडे विदा नाही, आपण कायदा अन बँकिंग मधले जाणकार दिसता तरीही जर ठराविक डेटा मिळाला तर पुढे बोलता येईल, डेटा मागणी खालील प्रमाणे १. भारतात मुसलमान लोकांचे बँकिंग मधले इन्व्हेस्टमेंट २. ते कमी असल्यास सध्या (इस्लामिक बँकिंक अस्तित्वात नसताना) ते लोक पैस्याचे व्यवहार कसे करतात?? ३. हवाला मध्ये किती मुस्लिम सहभागी असतात, हवाला वानगीदाखल आहे, कुठल्याही समांतर व्यवस्थेत त्यांचा सहभाग किती असतो? ४. बांगलादेश मध्ये नोबल विजेते मुहम्मद युनूस ह्यांचा ग्रामीण बँकेचा मायक्रोफायनान्स प्रकल्प इस्लामिक बँकिंग अंतर्गत कारभार करतो का? करत असल्यास त्याने बांगलादेशी मुस्लिम लोकांच्या जीवनमानावार काय फरक पडलाय? (हे parameter अभ्यासणे कुतूहल आहे एक माझे कारण काहीही म्हणले तरी एकाच उपखंडातील मुसलमान असल्यामुळे बांगलादेशी मुसलमान अन भारतीय मुसलमान लोकांच्या मानसिकतेत समान धागे नक्कीच असतील) ५. भारतात जे विनाव्याज(नावापुरते का होईना) इस्लामिक बँकिंगचे मॉडेल स्थापन होते आहे त्यात कंपल्सरी फक्त मुस्लिमांनाच बँकिंग करायचा अधिकार असेल का? की गरीब हिंदू गरजू हिंदू ती सोय वापरू शकतील ? (एक्सक्लुजीव मुस्लिम समाजपुरती बँक असल्यास माझा आगाऊ निषेध नोंदवून ठेवतो) ६. व्याज नाही ह्यावरून आठवले (डिटेल चुकले असल्यास दुरुस्त करा) मुद्रा लोन्स सुद्धा व्याजमुक्त आहेत न? असल्यास मुद्रा लोन्स इस्लामिक बँकिंगचाच एक प्रयोग म्हणून पाहता येईल का ? डेटा मिळाल्यावर अभ्यासून पुढे चर्चा करता येईल बाकी आबासाहेबांशी सहमत

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वटवट 22/11/2016 - 16:31
१. ज्या पद्धतीने आरबीआयने प्रपोजल दिलेले आहे, त्यावरून वाटत आहे कि कमी प्रमाण असेल मुस्लिम समाजाचे एकंदरीत बँकिंग मध्ये. पण निश्चित आकडेवारी माझ्याकडे नाही. बघू हुडकून मिळते का ती २. त्यांचे व्यवहार मुख्यत्वे कॅश मधून होतात म्हणे. बँकेमार्फत नव्हे.. म्हणून तर हा अट्टाहास चालूये... ४. बांगलादेश मध्ये नोबल विजेते मुहम्मद युनूस ह्यांचा ग्रामीण बँकेचा मायक्रोफायनान्स प्रकल्प इस्लामिक बँकिंग अंतर्गत कारभार करतो का? करत असल्यास त्याने बांगलादेशी मुस्लिम लोकांच्या जीवनमानावार काय फरक पडलाय?>>> अभ्यासाचा विषय आहे हा... करावाच लागेल. ५. नाही... कोणीही त्या बँकेत जाऊ शकतो फक्त त्याला शरियतच्या कायद्याप्रमाणे कर्ज मिळेल. ही एक्सक्लुजीव मुस्लिम समाजापुरती बँक नाही. ६. माझ्या माहितीप्रमाणे मुद्रा लोन हे धर्मावर आधारित नाही. व्याज आहे पण कमी दरात. छोट्या उद्योजकांसाठीची हि योजना आहे.

In reply to by वटवट

१. अंदाजे अदमासे भागातल्या डेटावर बोलणे तितके संयुक्तिक नसेल, बरं त्याची निश्चित माहिती माझ्याकडे सुद्धा नाही, त्यामुळे तूर्तास लेट्स पार्क दॅट थॉट आऊटसाईड फॉर अ मोमेंट टिल नंबर्स सरफेस अप, फेयर इनफ? २. परत एकदा, विषयानुरूप चर्चा करत असताना (त्यातही पैसा, अर्थ, वित्त ह्या बाबतीत) म्हणे वगैरेला स्थान नसलेलेच बरे, तरीही तूर्तास हा किंवा वरचा किंवा दोन्ही मुद्दे रुजू करून घेऊयात, चर्चेला मजा तितकीच, कसे? ३. (तुमचा चुकीने पडलेला ४ नंबर मुद्दा) सहमत आहे, ह्या विषयात मलाही रस आहे पण वेळ नाही, तरीही जर काही डेटा अभ्यास साहित्य शेयर केलेत तर उपकृत राहीन असेच म्हणतो :) ४. (दोन मुद्दे घेतो तुमचा ५ व ६) मुद्रा धर्माधारीत नाही, मान्य, इस्लामिक बँकेत सगळ्यांना बिनव्याजी (सकृतदर्शनी) कर्जे मिळणार, ह्यात मला समान धागे जास्त दिसतायत का माझी काही गफलत होते आहे? तसेही शरियाच्या नियमाप्रमाणे कर्ज म्हणजे काय हे अधिक स्पष्ट केल्यास पुढे बोलता येईल एकंदरीत, इस्लामिक बँकिंग फायनान्सल इन्कल्यूजन वाढवेल, अगदी छप्पर फाडके नाही, पण काही प्रमाणात, असा निष्कर्ष आत्तापर्यंतच्या उपलब्ध डेटा सेट वरून निघतोय (माझातरी) ,पुढे सद्ध्या अंदाजेपांचे दाहोदरसे मुद्यातून डेटा निघेल तेव्हा ही पोजिशन बदलू सुद्धा शकते, तरीही उपलब्ध डेटासेट वरून मी काढलेल्या निष्कर्षावर तुमची किती टक्के सहमती असेल (उत्तर क्वांटीटेटिव्हली असले की कसे सुस्पष्ट होते सगळे! म्हणून विचारतोय) कळावे बाप्या

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आदूबाळ 22/11/2016 - 17:01
बापूसाहेब, मला वाटतं (आय-ई माझ्या माहितीत / पाहण्यातल्या) इस्लामिक बँकिंगमध्ये व्याज घेत नाहीत असं नसतं. व्याज वेगळ्या रूपात घेतलं जातं. पण ते असतं व्याजच.

In reply to by आदूबाळ

ओके आबा म्हणूनच मी 'सकृतदर्शनी' किंवा 'प्राइमा फेसी' असा शब्द वापरलाय आबा, मुळात मला शरिया बँकिंग समजवावे असाच माझा पहिला स्टँड आहे, असेल, तुम्ही जाणकार आहात आय विल टेक युवर वर्ड ऑन द सेम. आता मला सांगा इस्लामिक बँकिंग चे प्रच्छन्न व्याज हे सामान्य बँकेच्या उघड व्याजापेक्षा जास्त असते का कमी?? कमी असल्यास फायनान्शियल इन्कल्यूजनचं एक इन्स्ट्रुमेंट म्हणून इस्लामिक बँकिंग वापरता येईल/ वापरले जावे की त्याचा सरसकट विरोध करावा ?, मॅक्रो फायनान्स ते मायक्रो फायनान्स, इस्लामिक बँकिंग व्यवस्था आणि प्रस्थापित (पाश्चात्य) बँकिंग व्यवस्था ह्यांचा तौलनिक अभ्यास कोणी केला आहे का? केला असल्यास फायनान्शियल इन्कल्यूजनला कुठली व्यवस्था जास्त कंडयूसीव्ह आहे? तुम्ही म्हणालात तसे दरवेळी सामाजिक उद्बोधनावर जो विसंबला त्याचा कार्यभाग बराच बुडाला, हे मान्य. पण प्रस्थापित बँकिंग मॉडेल नाकारणाऱ्या जनतेला त्यांना सोयीचे पडेल असे मॉडेल देऊन आर्थिक मुख्यधारेत आणून त्याचवेळी त्यांची transaction जर मॉनिटर करता आली तर का करू नयेत? माझ्यामते दाढ्या कुरवाळणे (आत्यंतिक शब्दप्रयोग) हा गोषा पांघरून जर नॅशनल सिक्युरिटी निश्चित करता आली तर जरूर करावी, (त्यातही प्रच्छन्न व्याज आहेच म्हणजे हे काही वेल्फेयर मेजर नसेल तर प्रॉपर बिझनेस असेल), शिवाय इस्लामिक बँकिंग आहे म्हणजे व्याज किंवा जमा ठेवी वगैरेंच्या बाबतीत इस्लामिक असणार आहे का ती आरबीआयला अजिबात बांधील नसणार आहे? रेपो, रिव्हर्स रेपो,सीआरआर वगैरे पासून स्वतंत्र असणार आहे का? त्यांना केंद्रीय बँकेला सालीना ताळेबंद देणे बांधील असेलच ना? हे ही काही प्रश्न पडले आहेत

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आदूबाळ 22/11/2016 - 17:45
अर्थव्यवहारापासून धर्मसंस्थेने अलिप्त राहावं असं माझं वै० मत. याचाच दुसरा अँगल म्हणजे अर्थव्यवहाराचा विचार करताना माणसाने धर्मनिरपेक्ष असावं. उद्या मला कमी व्याजात कर्ज मिळत असेल तर मी महाराष्ट्र ब्यांकेतून खातं हलवून हबीब ब्यांकेत न्यायला एका पायावर तयार आहे. त्यामुळे, जर फायनान्शियल इन्कल्यूजनची पहाट इस्लामिक बँकिंगच्या कोंबड्यामुळे उगवत असेल तर सो बी इट. नाय तिथे धर्म आडवा आणण्यात काय अर्थ आहे? बाकी मुद्द्यांवर (सध्या) पास, पण मला काय वाटतं ते सवडीने लिहेन.

In reply to by आदूबाळ

मला वाटते जोवर ओव्हरसियर, किंवा रेग्युलेटरी ऑथॉरिटी तुम्ही म्हणता तशी धर्मलिप्त असेल तोवर खाली इन्कल्यूजन साध्य करायला युज हूक (लुक्रेटिव्ह ऑफर) ऑर क्रुक (धर्म) की फरक पैंदा?? हे म्हणजे घरी बापुस लक्ष देतोय कडक तोवर पोरांनी कितीही मस्ती करायचे इमले बांधावे तसे काहीसे (अर्थात मला फायनान्स चे तांत्रिक ज्ञान इल्ले शुन्य टक्के असती)

In reply to by आदूबाळ

माहितगार 22/11/2016 - 17:55
जर फायनान्शियल इन्कल्यूजनची पहाट इस्लामिक बँकिंगच्या कोंबड्यामुळे उगवत असेल तर सो बी इट. नाय तिथे धर्म आडवा आणण्यात काय अर्थ आहे?
फायनान्शियल इन्कल्यूजनचीच गरज आहे तर इस्लामिक हा शब्दच कशाला इतर धर्मांच्या नावेही बिनव्याजी/कमीव्याजी बँका काढाना इफेक्टीवली हे लांगूलचालनच झाले कदाचित सरकार भरीस पडेलही, आज ज्यांना रिझर्वेशन नाही त्यांचेह रिझर्वेशन हवे म्हणून मोर्चे निघतात तसे बँकींगच्या बाबतही होईल एवढेच, रिझर्वेशन प्रकारात जाती निरपेक्षता हरली इथे धर्मनिरपेक्षता हरेल. जे व्हायचे ते होतेच, काथ्या कुटून थांबत नाही. असो.

In reply to by माहितगार

माहितगारजी, इतर धर्मात जर चलनी पैसे देणे घेणे, कर्ज, व्याज, चलनी व्यापार इत्यादी संबंधी नियम त्यांच्या पूज्य पुस्तकात असतील , मुख्य म्हणजे त्यांना जर त्याला अनुसरून बँकिंग व्यवस्था हवी असेल, त्याहून उप्पर त्यातून बँकिंग व्यवसायाला नफा काढता येत असेल अन प्रस्थापित बँकिंग मॉडेल मध्ये जर का ते बसत असेल नीट तर त्या त्या धर्माला त्यांच्या मान्यतेप्रमाणे बँकिंगची मागणी करण्याचा अधिकार लोकशाहीत नक्कीच असेल ना? शिवाय इन्कल्यूजनला पुढे रेटण्यात प्रस्थापित व्यवस्था नक्कीच कुठंतरी कमी पडली आहेच न? ह्यात लांगूलचालन कसे म्हणले जाईल ते उलगडून सांगा.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

माहितगार 22/11/2016 - 19:31
त्या त्या धर्माला त्यांच्या मान्यतेप्रमाणे बँकिंगची मागणी करण्याचा अधिकार लोकशाहीत नक्कीच असेल ना?
हो अभिव्यक्ति स्वांतत्र्यांतर्गत मागण्यास काहीही मागता येते पण त्याला धर्मनिरपेक्षता म्हणता येत नाही केवळ धर्म निरपेक्षतेचा बट्ट्याबोळ म्हणता येते, या न्यायाने इकॉनॉमीक प्रुडन्सला आणि एफिशीअन्सी बाजूस ठेऊन बँंकीग व्यवहारातही धर्मवार जातवार रिझर्व क्वोटापण देता येईल, माओवादी नक्षल स्वतःला माओ धर्मीय आहोत म्हणून शस्त्रांसाठी फायनान्स मागतील तर एखाद्या पंथाचे लोक त्यांचे संत गांजा ओढत म्हणून गांजा ओढण्या साठी त्याच्या शेतीसाठी फायनान्स मागतील इन्कल्यूजनला महत्व असावे इन्कल्यूजनसाठी खास पर्याय असावेत पण जाती धर्मांची नावे देण्याची गरज कुठे आहे. प्रस्थापित व्यवस्था एकतर्फी कमी पडली असे कसे म्हणता येईल ? को ऑपरेटीव्ह बँकींगचे पर्याय जवळपास शतकभरा पासून होते आणि आहेत त्यात धर्माचे नाव न वापरता अधिक पर्यायही मागण्यास लोकशाहीत कुणाची काही ना आहे का ? व्यवस्था एकतर्फी कशी कमी पडली ते उलगडून सांगाल का ? धर्मसंस्थेचे ऋण-व्याज व्यवहारातील हस्तक्षेप आणि अज्ञानश्रद्धांना व्यवस्थेचे अपयश कसे म्हणता येईल ? उलगडून सांगण्यासाठी धर्मसंस्थेचे ऋण-व्याज व्यवहारातील हस्तक्षेप आणि अज्ञानश्रद्धांना ह्या धाग्या वर मी सविस्तर चर्चा केली आहे ती वाचून घ्यावी आणि लांगूलचालनाला लांगूलचालन का म्हणू नये ते सांगावे. अशा लपवण्याचे प्रयत्न केलेल्या लांगूलचालनांमुळे अथवा सोईच्या समर्थनामुळे मांजरीने डोळे झाकून दूध पिले तरी मांजरीने दूध पिले हे कुणालाही समजतेच आणि प्रतिक्रीयावाद फोफावत असतात. असो.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बोका-ए-आझम 22/11/2016 - 17:15
व्याज आकारते. व्याजाचा दर खूप कमी असतो, कारण ग्रामीण बँकेचा मुख्य हेतू हा गरीब आणि अतिगरीब लोक ज्यांना मुख्य धारेतील बँका थारा देत नाहीत, अशा लोकांना बँकिंग सुविधा पुरवणं हा आहे. पण त्यांच्यावर इस्लामविरोधी वगैरे असल्याचा आरोप झालेला नाही. ते व्याज घेतात हे स्वतः त्यांच्या तोंडूनच ऐकलेलं आहे.

अमर विश्वास 22/11/2016 - 16:35
बापूसाहेब .. मायक्रोफायनान्स हा प्रकार आपल्याकडेही चांगल्या प्रमाणात रुळायला लागला आहे ... आपले महिला बचत गट हे याचेच उदाहरण आहे, अर्थात आपल्या इथे या बचत गटांना बँकेचा मिळणारा सपोर्ट आणि मोहम्मद युसूफ यांची ग्रामीन बँक यांच्या कार्यपद्धतीत थोडा फरक आहे

In reply to by अमर विश्वास

होय, ते माहिती आहे अन सहमत आहे अमर भाऊ, मला वेगळा अभ्यास करायचा आहे, आपल्या मायक्रोफायनान्स मध्ये असलेली लुपहोल्स अन ती भरायला आपण ग्रामीणच्या मॉडेल मधून काय मदत घेऊ शकू असा अभ्यास करायचा आहे. बघू ! विषय खूप आहेत अन आयुष्य छोटे. असो

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बोका-ए-आझम 22/11/2016 - 17:18
बँकर टू द पुअर वाचा बापू. खूपच छान पुस्तक आहे. स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवल्यामुळे ग्रामीण बँक बांगलादेशात यशस्वी झाली आणि तो मुद्दा विसरल्यामुळे आपल्याकडे प्रश्न निर्माण झाले असं माझं वैयक्तिक मत आहे.

In reply to by अमर विश्वास

माहितगार 22/11/2016 - 17:29
इंग्रजी विकिपीडियावरील बांग्लादेशातील या नावाजलेल्या बँकेबद्दलचे बारकावे अभ्यासले तर काही तथ्ये पुढे येतात ती अशी १) हि बँक व्याजरहीत बँक नसावी तब्बल २० टक्के व्याजदर आकारला जातो. (एकुण काय तर मायक्रो फायनान्स म्हणजे कमी व्याजदर असे निश्चितपणे सांगता येत नसावे( २.१) कर्ज घेणार्‍या महिलांना फायदा हा की कोणतेही तारण अथवा लेखी करार करावा लागत नाही. (हि उजवी बाजू) २.२) पण परतफेडीचा दबाव असतोच संदर्भ इंग्रजी विकिपीडियावरील लेख चुकभूल देणे घेणे

In reply to by माहितगार

बोका-ए-आझम 23/11/2016 - 09:39
BANKER TO THE POOR मध्येच वाचलेलं आहे. त्यानुसार राहतं घर हे तारण ठेवावं लागतं, आणि कर्ज स्त्रियांनाच प्रामुख्याने दिली जातात त्यामुळे ते घर जर त्या स्त्रीच्या नावावर नसेल तर तिला ते स्वतःच्या नावावर करुन घ्यावं लागतं. त्याचा एक फार मोठा अप्रत्यक्ष फायदा युनूस यांनी सांगितलेला आठवतो की त्यामुळे स्त्रियांना त्यांच्या नव-यांनी मारहाण करणं (विशेषतः दारु पिऊन) आणि घराबाहेर काढणं बंद झालं कारण घर तर तिच्या नावावर आहे. त्यामुळे ही अशी फालतू मर्दुमकी (युनूस यांनी male chauvinism शब्द वापरलाय) बंद झाली.

In reply to by बोका-ए-आझम

माहितगार 23/11/2016 - 09:52
करेक्शन बद्दल धन्यवाद. आपण दिलेला संदर्भ वापरुन खरेतर इंग्रजी विकिपीडियावरही दुरुस्ती करावयास हवी.

अमर विश्वास 22/11/2016 - 17:34
बापुसाहेब उत्तम विचार आहे बोका-ए-आझम यांनी सुचवलेले पुस्तक बँकर तो पुअर जरूर वाचा .. हे इंटरनेटवर फ्री डाउनलोड आहे ... किंवा मी PDF कॉपी ईमेलवरही पाठवू शकतो या पुस्तकाची सुरवातच विचार करायला लावणारी आहे ... ‘It’s not people who aren’t credit-worthy. It’s banks that aren’t people-worthy’

अभिजित - १ 22/11/2016 - 19:55
लांगुलचालन वगैरे काही नाही. सरकारला फुकट मध्ये जर का पैसे वापरायला मिळत असतील तर त्यांना ते हवेच आहेत. मुसलमान वगैरे काही नाही .. फुकट ते पौष्टिक !! आत्ता १/२ महिन्या पूर्वी एक मोठी पोस्ट फिरत होती . सिंडिकेट बँक दिल्ली मध्ये अकाउंट , सर्व जनतेने रोज १ रुपया द्या . हा अकाउंट पण चोर लोकांनीच उघडला होता. कारण याच्या विरुद्ध बरीच माहिती आली होती. पण पुढे सरकारने तो ताब्यात पण घेतला !!

मारवा 22/11/2016 - 20:12
धागा नेहमीच्या यशस्वी शैलीतील असला तरी प्रतिसादांंमुळे विशेषत: माहीतगार, आदुबाळ, मुळे व सोन्याबापु यांचे प्रश्नही मार्मिक आहेत यामुळे हा वाचनीय झालेला आहे. अनेक नविन बाबी कळल्या या धाग्यामुळे चर्चकांना धन्यवाद !

गामा पैलवान 22/11/2016 - 20:54
लोकहो, आदूबाळ म्हणतात की :
जर फायनान्शियल इन्कल्यूजनची पहाट इस्लामिक बँकिंगच्या कोंबड्यामुळे उगवत असेल तर सो बी इट. नाय तिथे धर्म आडवा आणण्यात काय अर्थ आहे?
एक प्रश्न आहे. मुस्लिमांचं फायनान्शियल इन्क्ल्युजन कशाला व्हायला हवंय? नक्की काय फायदे आहेत. नसलं तर काय फरक पडतो? एक शंका म्हणून विचारतोय. समजा मी एक रामकृष्ण नावाची इब्या स्थापन केली तर कोणी मुस्लिम ठेव ठेवेल काय? याउलट कोण्या मौलवीने गरीब-अल-नर्मगर्म नावाची इब्या उघडली तर सगळे मुस्लीम तिथे धावतील ना? मग इन्क्ल्युजन झालं का? की नाही झालं? की झाली इन्क्ल्युजनची ऐशीतैशी? शिवाय घुसखोर अतिरेक्यांना आज जो रोखीने पतपुरवठा होतो तो अशा प्रकारच्या इब्यातनं थेट होणार नाही याची काळजी कोण घेणार? इब्यावरून बीसीसीआय बँकेची आठवण झाली. ( च्यायला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची पण तीच अद्याक्षरे आहेत. हा योगायोग आहे की आजून काही ? ! असो. ) तिची पाकिस्तानस्थित शाखा सर्वात मोठी आणि सर्वाधिक कार्यरत होती. जगभरचा पैसा फिरवाफिरवी करून अखेरीस पाकी गुप्तचर संस्था आय एस आय ला पुरवणारी हीच ती बँक. साला भ्रष्टाचार करायचा असतो तेव्हा इस्लामिक बँकेची शाटा गरज पडंत नाही. आणि इन्क्ल्युजन नाही म्हणून भारतीय मुस्लिमांसाठी मात्र विशेष इब्या उघडायची. खासा न्याय आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

आदूबाळ 22/11/2016 - 21:37
अच्छा. म्हणजे एखादी बँक मुस्लिम असली तर ती दहशतवाद्यांना पतपुरवठा करणारीच असणार असं प्रिझम्शन आहे का?

In reply to by आदूबाळ

गामा पैलवान 23/11/2016 - 03:25
आदूबाळ,
म्हणजे एखादी बँक मुस्लिम असली तर ती दहशतवाद्यांना पतपुरवठा करणारीच असणार असं प्रिझम्शन आहे का?
हो. बेटर सेफ दॅन सॉरी. छोडो भारत चळवळीमधनं तोडो भारत चळवळ केव्हा सुरू झाली ते आजतागायत कोणालाही कळलं नाही. अगदी सावरकरांनी हेच शब्द वापरून स्पष्टपणे धोक्याची सूचना देऊनही. कशावरून बँकिंगमध्येही असंच होणार नाही? भारतात इस्लामिक बँक स्थापन करून चालवायला कायद्याने मुस्लिमांना परवानगी नाकारणार का? तसं असेल तरंच विचार करावा म्हणतो मी. आ.न., -गा.पै.

वटवट 22/11/2016 - 21:51
काही जणांना देशाशी काहीही देणं घेणं नसतं. त्यांना फक्त पैशाशी देणंघेणं असतं. ते तांत्रिक बाबतीत मूळ मुद्दा सपशेल वळवतात. धर्म सुद्धा ते हत्यारासारखा वापरतात. माझा त्याला विरोध आहे. आणि एका विशिष्ठ समाजाला त्यांच्या धर्माला शरण जाऊन त्यांना मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न हा देशासाठी धोकादायक आहे. मुस्लिम समाज हा जास्त करून धर्माचाच अनुनय करतो देशाचा नाही. आणि ह्या अश्या प्रकारच्या इस्लामिक बँकेमुळे एका विचित्र प्रवाहाला खतपाणी घातलं जातंय असं मला वाटतं. ओसामा बिन लादेन ला फायद्यासाठीच अमेरिकेने हाताशी धरलं होतं... ते कसं फेडावं लागलं??? आता माझी कोणी भक्त म्हणून हेटाळणी केली तरी मला काही फरक पडणार नाही...

In reply to by वटवट

अहो ह्यात भक्त असण्या नसण्याचा काय संबंध आला हो? इतकी चांगली चर्चा सुरु आहे/होती स्वतः धगकरत्यानेच स्वकाडी आसन कश्याला करावे म्हणतो मी, बरं ते एक अस्तु. मी काय म्हणतोय, काही जणांना देशाशी घेणंदेणं नसतं, पैश्याशी असतं, बरोबर आहे तुमचे म्हणणे, पण ते लोक कायमच धर्म वापरतात असेही नाही विजय मल्या, ललित मोदीनं कुठं धर्म वापरला तरी त्यांना कुठं देशाशी काय घेणं उरलं होतं आहे? एका विशिष्ठ समाजाला त्यांच्या धर्माला शरण जाऊन त्यांना मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न हा देशासाठी धोकादायक आहे. अहो वरतीच तुम्हीच डेटा मिळवतो, अभ्यास करायला हवा वगैरे नमूद केलेत की हो, मग डेटा नसताना आपण वरच्या निष्कर्षाला कसे पोचलात म्हणे? शिवाय इस्लामिक बँकिंग नावाला इस्लामिक असून त्यात रिजर्व बँकेची पकड ते पार व्याज सगळेच असणार आहे मग प्रॉब्लम नक्की कश्यात आहे ? इस्लामिक शब्दात? बरं ते ही सोडा , वरतीच मी 'धर्माच्या नावावर का होईना सगळा फायनान्शियल डेटा, ट्रान्झॅक्शन डिटेल संरक्षण/अंतर्गत संरक्षण विभागाला उपलब्ध होतील' ,अशी एक सकारात्मक शक्यता बोललोय त्याचं काय? त्यावर तुमचे मत काय असेल ?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

माहितगार 22/11/2016 - 22:16
प्रॉब्लम नक्की कश्यात आहे ? इस्लामिक शब्दात? बरं ते ही सोडा , वरतीच मी 'धर्माच्या नावावर का होईना सगळा फायनान्शियल डेटा, ट्रान्झॅक्शन डिटेल संरक्षण/अंतर्गत संरक्षण विभागाला उपलब्ध होतील' ,अशी एक सकारात्मक शक्यता बोललोय त्याचं काय? त्यावर तुमचे मत काय असेल ?
गापै आणि वटवट त्यांची उत्तरे देतील पण सेक्युलर बाजूनेही इतर धार्मीक नाव शब्दात जसा प्रॉब्लेम असेल तसाच इस्लामिक शब्दातही असेल, इनकम टॅक्स आणि आर बी आय कडून सर्वच ट्रँझॅक्शन चेक होत नसतात चार्टर्ड अकाऊंटट लोकांच्या विश्वासावर गोष्टी चालतात त्या चार्टर्ड लोकांवर किती विश्वास ठेवावा (मग कोणताही भारतीय व्यवसाय असो) को-ऑपरेटीव्ह बँकांना जुन्या नोटा स्विकारण्यास परवानगी दिली नाही तर त्यास धार्मीक रंग येत नाही; तेच एकदा अबकड धर्माची बँकेस परवानगी दिली नाही म्हटले की लगो लग धार्मीक अन्यायाची बोंब आणि राजकारण होईल ते कोण निस्तरेल ?

In reply to by माहितगार

माझा आपला साधा प्रश्न आहे , जर उद्या अत्यल्पसंख्यांक मनुवाद्यांनी त्यांचे स्वतंत्र ब्यँकिंगचे रुल्स बनवुन त्यांच्या तत्वावर चालणारी अत्यंत खाजगी बँक स्थापन करायचा घाट घातला तर त्यालाही सेक्युलर लोकं समर्थन देणार की नाही ? अवांतरः नुकतेच ते मातीचा बकरा वरुन जगद्विख्यात सेक्युलर लोकांच्या पुरोगामित्वाचा बुरखा फाटलाच आहे म्हणा तसा परत फाटेल कि नाही ? अतिअवांतरः एकाने स्वतंत्र देश मागितला कि उपोषण करुन खट्टदिशी तुकडा पाडुन देश देवु अन दुसर्‍यांनी मागितला की त्यांच्या मंदिरात घुसुन एकेकाला पकडुन पकडुन मारु. असोच असो!

In reply to by प्रसाद गोडबोले

वटवट 23/11/2016 - 08:13
मार्कस.... काय बोलत आहात??? उगाच काहीही बोलायचं आणि मूळ मुद्द्याला बगल द्यायची.... सोडा हे असलं.... जमल्यास...

In reply to by वटवट

आमची आपली उगाचच वटवट :D असो, एका विशिष्ठ धर्माच्या तत्वांना आचारणारी बँक देशात येऊ घालत आहे सेक्युलर लोक त्याचं कचकचुन समर्थनही करत आहेत ! पण हेच लोक दुसऱ्या धर्माच्या लोकांना त्यांच्या तत्वां नुसार चालणारी बँक सुरु करायची म्हणाले की धर्मनिरापेक्सातेच्या नावाने गळे काढतील इतकाच मुद्दा आहे ! Period.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

वटवट 23/11/2016 - 08:10
खरंच खूप चांगली चर्चा सुरु आहे. बापू, मी स्वकाडी असं नाहीये ओ करत.. ज्या गोष्टीची माहिती काढावी लागेल असं आपलं बोलणं झालं तो अतिरिक्त अभ्यासाचा विषय आहे तो होईलंच. बापू... माझा स्टॅन्ड असा कि नुसते साध्य नाही तर साधन सुद्धा महत्वाचे... खूप काही बोलण्यासारखे आहे पण केवळ ते खूप स्फोटक असेल म्हणून बोलत नाही. पण वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही. (अर्थात जो काही आपला विषय झाला त्याचा अभ्यास चालू राहिलंच)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

प्रश्न फक्त इस्लामिक बँकिंगचाच नाही, आरबीआयचं प्रोपोजल मुख्यत्वे इस्लामिक विंडोचं असावं असं दिसतंय. म्हणजेच या मुद्द्याची व्याप्ती दिसतेय त्यापेक्षा जास्त आहे (नॅशनॅलिज्ड बँकांना या सुविधा द्याव्या लागतील). तरीही विषयाला अनुसरून काही शंका आहेत - १. इस्लामिक बँकिंगचा मूळ गाभा असलेल्या शरियतवर आधारित हे बँकिंग असणार. त्यामुळे आता जसा शरियतचा आपापल्या गरजेनुसार वेगवेगळा अर्थ लावला जातो, तसा इथेही लावला जाईल का? इस्लामिक बँकिंगच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अशा वेळेस इस्लामिक स्कॉलरची मतं घेतली जावीत असं आहे. आता हे स्कॉलर कोण आणि कसे ठरवणार? भारतात प्रत्येकाची तोंडे वेगळ्या दिशेला. २. हि बँकिंग यशस्वी होण्यासाठी त्याचे ग्राहक कमीत कमीत धर्माचे पालन तरी व्यवस्थित आणि पूर्णपणे करणारे असायला हवेत असं सकृतदर्शनी दिसतं. भारतात ते होतं का? ३. म्हणजे या बँकिंगनुसार जर एखाद्याने लोन घेतले तर त्याचा वापर करून नफ्यातला वाट परतावा म्हणून देणे अपेक्षित आहे व्याज नाही. म्हणजेच नफ्यातला वाटा इमानेइतबारे नाही दिला तर धर्माच्या दृष्टीने आपण चुकीचे केले आणि त्याची कडक शिक्षा (जिवंतपणी किंवा मरणानंतर या ना त्या मार्गाने) आपल्याला होईल यात पूर्ण विश्वास हवा. हे भारतात कितपत यशस्वी होईल? ४. नफ्यातला वाटा देणे हे धार्मिक तथ्यांवर आधारित असल्याने जर व्यवसाय बुडला तर पुढे काहीच नाही असे आहे का(म्हणजे जप्ती वगैरे असते का?)?. भारतात छोटे मोठे धंदे बुडणे सर्रास आहे. अगदी इस्लामिक राष्ट्रांमध्येही अशा बँकिंग मध्ये कर्ज देण्याच्या अटी जाचक आहेत मग इथे त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होईल का (भ्रष्टाचार?)? ५. जर इतर धर्मियांनासुद्धा या बँकिंगच्या सुविधा उपलबध असतील तर ते याचा गैरफायदा घेतील का (उदा. त्या धर्माचे नियम आपल्याला लागू होत नाहीत म्हणून कर्ज बुडवणे )? मला वैयक्तिक असे वाटते कि इस्लामिक बँकिंग पेक्षा, आहे त्याच बँकांना शरियतवर आधारित कर्ज योजना (स्किम/ऑफर/प्लॅन) तयार केली व त्याचा योग्य तो प्रचार होणार केला तर ते जास्त यशस्वी होणार नाही का?

अर्धवटराव 23/11/2016 - 03:50
मला तरी तसच वाटलं. बिनव्याजाच्या बँकींग पद्धतीचं स्वतःचं म्हणुन एक महत्व आहे. त्यातले आवष्यक ते गुण बँकींगसिस्टीम मधे आले तर चांगलच आहे कि. आणि शरीयाच नाहि, तर पार उत्तर ते दक्षीण धृवामधे प्रचलीत यच्चयावत धर्म, रुढी, परंपरा, कला, रितीरीवज.. जे काहि म्हणुन अर्थविषयक ज्ञान संगोपन करत असेल आणि ते आजच्या आणि पुढच्या अर्थविश्वाला पोषक असेल ते सर्व आपल्या व्यवस्थेत सामाऊन घ्यावं.. अगदी नावासहीत त्या त्या क्लॉज ला क्रेडीट देऊन.. अमुक क्लॉज रेफर्ड फ्रोम शरीय, तमुक फ्रोम मिपा वगैरे.

In reply to by अर्धवटराव

माहितगार 23/11/2016 - 09:47
वस्तुतः या बद्दल धर्मसंस्थेचे ऋण-व्याज व्यवहारातील हस्तक्षेप आणि अज्ञानश्रद्धा या धाग्यात विस्तार पुर्वक लिहिले आहेच. आपल्या दृष्टीकोण प्रथमदर्शनी आदर्श दिसत असला तरी धर्म भाषा प्रांत जात इत्यादी अस्मीता त्यांच्या चांगल्या पांघरूणा खाली इतरही गोष्टी खपवून नेऊ इच्छितात असे अनेकदा होते त्या शिवाय इकॉनॉमीक प्रुडन्सच्या आणि एफिशीअन्सीच्या एवजी शब्द प्रामाण्य ग्रंथ प्रामाण्य व्यक्ती प्रामाण्य यांना महत्व मिळते, हा माझा तो आपला हे चालू असते पावित्र्याच्या पांघरुणामुळे चौकशी तपास करणे अवघड होऊ शकते. भारतभरातल्या औकाफ बोर्डांमध्ये काय चालू आहे ? किती जणांची चौकशी आणि किती जणांवर कारवाई झाली याचे काही हिशेब आहेत का ?

खटपट्या 23/11/2016 - 06:08
चांगली चर्चा. एक प्रश्न - इस्लामिक बँकेत हींदू माणूस खाते उघडू शकतो का? बँकेने मुस्लीमांना खातेदार म्हणून काही सवलती दील्या असतील तर त्या सवलती उपभोगू शकतो का?

In reply to by खटपट्या

माहितगार 23/11/2016 - 09:38
एक प्रश्न -
ते आर बी आय, संसद आणि न्यायालये ठरवतील, न्यायालयाने होकार दर्शवल्या शिवाय भारतात सवलती असमान असणे अवघड हे खरे; बनारस हिंदू विद्यापीठात मुस्लीमांना आणि अलिगढ मुस्लिम विद्यापीठात हिंदूंना प्रवेश घेता येतो, बहुधा किरकोळ प्रमाणात घेतलाही जातो परंतु एक मोठा वर्ग धार्मीक नावांमुळे परस्पर धर्मीय नावांच्या विद्यापीठांना टाळतही असू शकतो त्या शिवाय संबंधीत संस्थांचे मॅनेजमेंट जरासे झुकलेले असेल हे आपसूक होते. धर्मीय नावे न ठेवता विद्यापीठे सर्व प्रकारचे शिक्षण उपलब्ध करणारी विद्यापीठे चालवता येत नाहीत का ? धर्मीय नावे न देता सर्व प्रकारच्या बँकींग सुविधा सर्वांना दिल्या जाऊ शकत नाहीत का ?

मला वाटतं लेखकाला नावाबद्दलच केवळ हरकत आहे. आरबीआयने आखाती देशांत चालणाऱ्या बॅंकिंग मॉडेलचा अभ्यास केला आणि तशा प्रकारे कार्य करणाऱ्या बॅंकांना पार्टनरशिप लोन बॅंक्स म्हटलं तर काही हरकत नसेल. पण इस्लाम-हिंदू हे शब्द खूप वेळा लेखात आल्यामुळे त्यावरून धर्माधिष्ठित कशालाही लेखकाची हरकत आहे असं वाटतं. एकंदरीत लेखक सिक्युलर, कॉंग्रेसी असावा - कारण आजच्या भाजपा सरकारातही दाढ्या कुरवाळणं कसं चालू आहे हेच दाखवून देण्याचा लेखकाचा उद्देश वाटतो.

In reply to by राजेश घासकडवी

वटवट 23/11/2016 - 07:57
नुसत्या नावाबद्दलच नाही तर पायाबद्दल सुद्धा हरकत आहे. माझा धर्माधिष्ठित कोणत्याही सेक्युलर ऍक्टिव्हिटीला विरोध आहे... आणि.... चार हाणा पण काँग्रेसी म्हणू नका...

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाखु 23/11/2016 - 09:04
व्यवस्थापकीय संचालक हाजीर हो !! संचालक मंडळावर अगोबा असणे अनिवार्य असेल याची नोंद घ्यावी. वाचक नाखु पत्रेवाला

अद्द्या 23/11/2016 - 11:39
http://www.thehindu.com/business/Industry/Sharia-banking-RBI-proposes-%E2%80%98Islamic-window%E2%80%99-in-banks/article16669006.ece या लेखानुसार सध्यातरी फक्त "एक खिडकी " उघडायचा विचार आहे.. पूर्ण बँक नाही . आणि यातून साधे सोपे व्यवहार कसे होतात ते बघून पूर्ण बँकिंग सिस्टम चालू करतील . पण तरी .. अशी धर्माधारित बँक हा फक्त चाटूपणा आहे . भाजपकडून हि अपेक्षा नव्हती .

गामा पैलवान 23/11/2016 - 13:38
लोकहो, शरियामते व्याज घेणे निषिद्ध आहे. तर मग व्याज घेण्यासोबत देणेही तेव्हढेच निषिद्ध आहे का? नसल्यास वेगळ्या इस्लामिक ब्यांकेची गरजच काय मग? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 23/11/2016 - 13:46
गापै चर्चेस येताना बेसिक चाळून घ्या की जरा नाही तर अलगद विकेट जाऊ शकते, विकिपीडिया लेख तुमच्या माझ्यासारख्यांसाठीच असते, ह. घ्या.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 23/11/2016 - 13:54
इस्लाम मध्ये प्रॉफीट ला ना नाही व्याजाला नकार आहे म्हणून व्याज द्यायचे घ्यायचे नाही पण प्रॉफीट द्यायचे घ्यायचे म्हणून तथाकथित इस्लामिक बँका त्याला पार्टनरशीप म्हणून दाखवतात, आपल्या कोऑपरेटीव्ह बँकींग सारखेच पण को-ऑपेरेटीव्ह बँकींग मध्ये डिपॉझीटर कर्जघेणार्‍याच्या व्यवसायातली रिस्क स्वतःच्या डोक्यावर गेहत नाही. प्युअर इस्लामीक बँकींग मध्ये कर्ज घेणार्‍याचा डिपॉझीटर हा पार्टनर म्हणून दाखवला जातो आणि कर्ज घेणार्‍याचे नफा नुकसान ही झेलावे लागते. अर्थात इस्लामीक बँकींग नावा खाली होणारे बहुतांश बँकींग प्युअर इस्लामीक बँकींग या प्रकारात मोडणारे नसते.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 23/11/2016 - 14:04
गापै आपण मोरे सरांची अलिकडची लेखमाला वाचली असेल तर, व्यक्ती ज्या काही वस्तु आणि सेवांचे उत्पादन करते त्याची नोंद घेणे आणि गरजे नुसार नेमका चलन पुरवठा करण्यासाठी, तसेच भविष्यातील चलन विरहीत आर्थीक व्यवहारांसाठी सर्व जनता बँकींगशी जोडली जाणे गरजेचे आहे म्हणजे बँकींगचा फायदा इतरांना व्हावा एवढाच उद्देश नाही तर सरसकट (किमान बहुतांश समाज) बँकींगशी जोडला जाणे हि अर्थशास्त्रीय गरज वास्तव आणि ठीक आहे. त्यासाठी लोकांना व्याजा एवजी प्रॉफीट शेअरीग वाले इत्यादी बँकींग पर्याय देणे अगदीच गैर आहे असे नाही पण त्यात विशीष्ट धर्मांची नावे स्विकारण्याची गरज नसतानाही त्याचा आग्रह धरला जातो आहे तो अनाठायीच आहे.

In reply to by गामा पैलवान

माहितगार 23/11/2016 - 14:14
गा पै गूगलल्या नंतर सियासत डॉट कॉमवर हा लेख सापडला छोटेखानी लेख पण फायदे आणि मर्यादांची चटकन माहिती देतो.

In reply to by माहितगार

माहितगार 23/11/2016 - 14:36
जिज्ञासूंसाठी हा लेख पण उत्तम दिसतो. व्याजरहीत -पार्टनरशीप बँकीग मध्ये मॅच्युरीटी पिरीएड मिसमॅचचा घोळ या लेखात नेमकेपणाने पकडला आहे. या लेखात म्हटल्या प्रमाणे विशीष्ट मर्यादीत चौकटीत काम करणारे म्युच्यूअल फंड हे या (अज्ञान)श्रद्धावंतांसाठी अधिक बरे असावेत.

श्रीगुरुजी 23/11/2016 - 14:30
इस्लामिक बँकेची गरज नक्की कोणाला आहे, का आहे, अशा बँकेचा सर्वसामान्यांना काही फायदा आहे का फक्त एका विशिष्ट वर्गाला आहे? इस्लामला व्याज देणेघेणे मान्य नसेल तर पठाणी व्याज हा शब्द कोठून आला असेल? इस्लामवाल्यांसाठी वेगळे व्यक्तिगत कायदे, इस्लामी बहुसंख्य असलेल्या राज्याला विशेष दर्जा, नंतर त्यांच्यासाठी वेगळ्या शिक्षणसंस्था, नंतर शरिया कोर्ट, आता इस्लामिक बँक . . . state within state कडे वाटचाल सुरू आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

माहितगार 23/11/2016 - 14:46
इस्लामला व्याज देणेघेणे मान्य नसेल तर पठाणी व्याज हा शब्द कोठून आला असेल?
इस्लामला मान्य नसले तरी काही समुदायांनी वेळोवेळी व्याजाने पैसे देण्याचा व्यवहार केला आहे. भारतातला पठाण समाज आज या व्यवसायात तेवढासा दिसत नाही पण वाकप्रचारावरुन कोण्याकाळी त्यांनी पिळून व्यवसाय केला असला पाहीजे. माझा एक सहकारी मुस्लिम खोजा समाजातून होता आणि मुस्लिम खोजा समाज कशी मोठ्या प्रमाणावर मुनाफाखोरी करणारी सावकारी करुन उदर निर्वाह दक्षिण आशिया आणि जगात इतरत्र करतो त्याचे वर्णन त्याच्या कडूनच ऐकले आहे. बहुतांश मुस्लिम राष्ट्रांनी सॉव्हरीन डेब्ट्सचा वेळोवेळी अंगिकार केला आहे आणि करतात, ओटोमन साम्राज्याच्या कर्जबाजारीपणा आणी युरोपियनांनी सर्वसामान्य तुर्कस्थानींकडून केलेली कर्जवसूली इतिहासाच्या पानांवर विराजमान आहे. आजही तथाकथित इस्लामिक बँकीग अगदी बहुतांश इस्लामिक देशांमध्येही आजाही ४० टक्क्यांच्या वर नसावे. बांग्लादेशातील मायक्रो फायनान्स करणारी ग्रामीण बँक इस्लामीक बँक नाही तरीही या धागा चर्चेत बर्‍यांनी ती तशी आहे समजून चर्चा केली आहे म्हणजे गैरसमज बरेच आहेत.

In reply to by माहितगार

माहितगार 23/11/2016 - 14:48
या प्रतिसादाचे शीर्षक आपोआप तयार झाले आहे, 'इस्लामला व्याज देणेघेणे मान्य नसेल' असेच वाचावे

In reply to by असंका

माहितगार 23/11/2016 - 15:17
=))
कॉपीपेस्ट केलेले गुरुजींचे वाक्य मिपा सॉफ्टवेअर ने नको तेथे तोडले त्यास आम्ही हतबल आहोत केवळ मिपा मालकांकडे कळवू शकतो.

In reply to by श्रीगुरुजी

माहितगार 23/11/2016 - 15:02
अशा बँकेचा सर्वसामान्यांना काही फायदा आहे का फक्त एका विशिष्ट वर्गाला आहे?
याच उत्तर हो आणि नाही असेही आहे, ज्यांना नवा व्यवसायात गुतंवणूकदार पार्टनर हवा आहे त्यांना गुतंवणूकदार पार्टनर मिळण्यात अधिक साहाय्य होते, इथे गुतंवणूकदार व्यवसायात हस्तक्षेप करू शकतो त्या शिवाय गुंतवणूकदारांनी बँकेचा पाठींबा अचानक काढून घेण्याचे ठरवलेतर अशा बँकेमार्फत गुंतवणूक घेतलेले व्यावसायिक टेक्नीकली गोत्यात येऊ शकतात. अशा बँकेमार्फत सर्वसामान्य गुंतवणूकदार (यांना ठेवीदार म्हणण्यात पॉईंट नाही) आहेत त्यांची इच्छा असो अथवा नसो त्यांच्यावर बँकेने गुंतवलेल्या व्यवसायांची रिस्क स्विकारावी लागते म्हणजे गुंतवणूकीवर परतावा मिळेल याची हमी नाहीच पण लॉसही स्विकारावा लागू शकतो (मी प्युअर इस्लामिक बँकींग तत्वा बाबत म्हणतो आहे), जर औकाफ मध्ये आर्थीक सावळा गोंधळ होऊ शकतो तर इस्लामिक बँकेत होणार नाही याची हमी काय म्हणजे ज्या सर्वसामान्यांच्या नावाने टाहो फोडला जात आहे त्यास क्रेडीट वर्दीनेस कमी पडतो म्हणून गुंतवणूक तर मिळणार नाही अशी गुंतवणूक केवळ क्रेडीट वर्दीनेस असलेल्या बलाढ्य व्यावसायिकांनाच मिळेल आणि सामान्य गुंतवणूकदार बलाढ्य व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायावर तोटा दाखवू नये म्हणून एकमेव परमेश्वराची प्रार्थना करत असेल तर शेअर मार्केट आणि या नव्या रुपातल्या बँकातल्या रिस्क मध्ये सर्वसामान्यासाठी फरक काय राहतो ? रिटायरमेंट नंतरसाठी म्हातारपणाच्या सोईसाठी रिस्कफ्री गुंतवणूक करण्याचा यात तत्वतः मार्ग असू शकणार नाही हे माझे मत चुकभूल देणे घेणे असो.

जेथे जेथे आणि/किंवा जेव्हा जेव्हा धर्म आणि राज्यप्रशासन यांची सरमिसळ झाली आहे, तेथे तेथे आणि/किंवा तेव्हा तेव्हा त्याचे पर्यवासन एकांगी आणि जुलुमी राज्यव्यवस्था निर्माण होण्यात झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अश्या व्यवस्थेत धर्माच्या नावाखाली चालणार्‍या अनेक जुलुमी / अतार्किक गोष्टींना केला जाणार्‍या गोष्टींना "धर्मावर आक्रमण" या नावाखाली सहजपणे मोडून काढणे शक्य होते. त्यामुळे, आजतागायत कोणतीही धर्माधिष्टीत राज्यव्यवस्था फार काळपर्यंत सुजाण, सुप्रशासित किंवा समतापूर्ण राहू शकलेली नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

धर्म नसलेली कम्युनिस्ट व्यवस्था अन सोविएत तरी कुठं टिकलं काका? बिसाईड्स, प्रपोजल आरबीआय म्हणजे केंद्र सरकारने मान्य केलेले आहे, रोजचे व्यवहार सरकारी नियंत्रणात येऊन टेरर फायनान्स किंवा संबंधित गतीविधींवर चेक ठेवण्याच्या विचारावर आपले मत काय ते जाणून घ्यायला आवडेल !

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

कम्युनिस्ट ही निधर्मी व्यवस्था आहे हा गैरसमज आहे :) किंबहुना, कार्ल मार्क्सच्या मनात असलेला; आणि आताच्या कम्युनिस्टांच्या मनात नसलेला पण त्यांनी धूर्तपणे पसरवलेला हा गैरसमज आहे. कम्युनिझम ही; "गरज नाही तिथे धर्माला अफूची गोळी म्हणत ठेचणारी (उदा: झिंजियांग)" आणि "गरज असेल तेथे धर्माच्या नावाखाली चिथावणी देऊन (उदा: युएनमध्ये चीनने केलेली धार्मिक अतिरेक्यांची आणि त्यांना संरक्षण देणार्‍या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची पाठराखण व त्यांची ऑल-वेदर मैत्री )" आपला कार्यभाग साधणारी धूर्त, पाताळयंत्री व कोणत्याही कडव्या धर्माइतकीच (किंवा कांकणभर जास्तच) कडवी, आणि केव्हाही या बोटावरची थुंकी त्या बोटावर करू शकणारी कडवी विचारसरणी आहे. याच धूर्त, पाताळयंत्री व प्रसंगी क्रूर धार्मिक अतिरेक्यांचाही थरकाप उडवणार्‍या कम्युनिस्टांच्या वैशिष्ट्यामुळे, झिंजियांगमध्ये इस्लामी अतिरेक कडवेपणाने मोडून काढला गेला/जात आहे; तेथे मुस्लिम सरकारी नोकरांना कामाच्या वेळात अगदी, रमजानमध्येही, नमाज पढायला बंदी आहे. तरीही, कोणत्याही इस्लामी राष्ट्राने किंवा तथकथित इस्लामी अतिरेकी संघटनांनी त्याविरुद्ध ब्र काढल्याचे ऐकू येत नाही. किंबहुना, बर्‍याच इस्लामी अतिरेक्यांचा आणि देशांचा तो "प्रिफर्ड ऑल-वेदर फ्रेंड" आहे ! :) निधर्मीपणाच्या "धर्माचा" मुखवटा घावून कम्युनिस्ट इतर धर्मांशी मैत्रीचे संबंध ठेवून होते/आहेत/असतील. आताही मध्यपूर्वेत कम्युनिस्ट व कॅपिटॅलिस्ट यातल्या दोघांपैकी कोणाच्या साथीत (डझनांनी असलेले) कोणते धार्मिक मर्सिनरी गट आहेत हे रोज बदलत्या हितंसंबंधांबरोबर आणि लावलेल्या बोलीच्या किंमतीप्रमाणे बदलत आहे. भारतातल्या अतिरेक्यांच्या नावे शहीदी नारे देणार्‍या फुटीरतावादी संघटनांबरोबर तथाकथित भारतिय कम्युनिस्ट हिरीरीने उभे आहेत. आणि इस्लमिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची आयएसआय भारतातील माओवाद्यांना पैसा आणि इतर मदत पुरवत आहे. ज्यांच्या मते "देव न मानणे केवळ देहदंडयोग्य कृती आहे" त्यांची "देव व धर्म या अफूच्या गोळ्या आहेत" असे म्हणणार्‍यांबरोबर युती होणे, हा अत्युच्च्य प्रतीचा कांगावाखोरपणा आणि धर्माचा राजकिय-आर्थिक स्वार्थाकरिता उपयोग नाही तर काय आहे ? लोकशाहीत, सेक्युलर झूल पांघरून व कोणत्याही धर्माच्या मागे लपून स्वार्थ साधणे यासारखा कांगावाखोर आणि धोकादायक प्रकार दुसरा नाही. ======================== बिसाईड्स, प्रपोजल आरबीआय म्हणजे केंद्र सरकारने मान्य केलेले आहे, रोजचे व्यवहार सरकारी नियंत्रणात येऊन टेरर फायनान्स किंवा संबंधित गतीविधींवर चेक ठेवण्याच्या विचारावर आपले मत काय ते जाणून घ्यायला आवडेल ! प्रश्न तितकासा स्पष्ट नाही, पण, तरीही मला समजला त्याचे उत्तर असे आहे. सद्याच्या डीमॉनेटायझेशनमुळे अतिरेक्यांच्याविरुद्ध खालील तडक फायदे झाल्याचे दिसत आहे... १. रु ५०० व रु१००० च्या नोटा रद्दबातल झाल्याने, पाकिस्तानात छापून भारतात पाठविण्यासाठी साठवलेल्या व भारतातील अतिरेक्यांचा जाळ्यांत पोचलेल्या खोट्या नोटा निकालात निघाल्या. पाकिस्तान स्वतःला जरूर आहे त्यापेक्षा तीनपट नोटांचा कागद गेले एकदीड दशक खरेदी करत आहे, यावरून या समस्येच्या व्याप्तीची थोडी कल्पना यावी. या खोट्या पैशाचा अचूक आकडा केवळ आयएसआयच सांगू शकेल, पण अनेक अंदाजां प्रमाणे तो अनेक दशहजार किंवा लक्ष कोटीत असावा. मात्र, त्याच्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला, नागरिकांना आणि सुरक्षादलांना होणार्‍या मोठ्या धोक्याबद्दल कोणाच्याच मनात संदेह नसावा. नोटा रद्दबातल केल्यानंतर एकदोन दिवसांतच काश्मीरमधील दगडफेक बंद होणे, ९०-९९% मुले शालेय परिक्षांना जाणे आणि सर्वसाधारण परिस्थितीत लक्षणिय सुधारणा होणे, हे हुरियत व इतर फुटीरतावादी गटांची आर्थिक शक्ती कमी झाल्याचे व त्यामुळे त्यांचा जनतेवरची पकड कमी झाल्याचे निदर्शक आहे. २. डीमॉनेटायझेशनचा असाच परिणाम माओवाद्यांच्या संबंधातही दिसत आहे. हे पाहता, माझ्या अल्पमतीप्रमाणे... अ) अतिरेक्यांच्या संबंधात डिमॉनेटायझेशनचा, हाच (१ व २ मध्ये लिहिलेला) मुख्य, त्वरीत प्रभाव दाखवणारा आणि इतकाच तात्कालीक परिणाम अपेक्षित होता. आणि तो झाला आहे असेच दिसत आहे. यानंतर... आ) आता या काही काळासाठी नियंत्रणात आलेल्या संघर्षाच्या व सामाजीक शांततेच्या स्थितीचा फायदा घेऊन संरक्षक दले आणि गुप्तचरसंस्थांनी एकत्रितपणे सीमेवर आणि सीमेच्या आत दीर्घकालीन प्रभाव पाडणार्‍या कारवाया करणे आणि वरचढपणा मिळविणे अपेक्षित आहे. सद्याच्या घडीला इतकेच अपेक्षित आहे. त्यांनतर, त्या वरचढपणाचा प्रभाव वाढवत नेत... (इ) देशांतर्गत समस्येचा इतर अनेक सामाजिक-आर्थिक-राजकीय उपायांच्या मदतीने दीर्घकालीन प्रयत्न करून खातमा करण्याचा करावा लागेल. याला आपण "हार्ट्स अँड माइंड्स ऑपरेशन" म्हणू शकतो. (ई) सीमेवरच्या चकमकी व सीमेवरून होणार्‍या घुसखोरीच्या (पक्षी : पाकिस्तानच्य) समस्येचा उतारा, अर्थातच, खूप वेगळा आणि अधिक कठीण असेल. त्यासंबंधातल्या जरूर त्या कारवाया सीमेवर आणि काश्मीरमध्ये सैन्यदल, सीमासुरक्षा दल, अर्धसैन्यदले अधिक जोमाने करत असल्याचे दिसत आहेच. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर मुत्सद्देगिरी आणि महत्वाच्या देशांशी असलेले राजकीय-आर्थिक-सामरिक संबध घट्ट करणे, नवीन संबंध प्रस्थापित करणे व त्यांच्या तर्फे पाकिस्तानला वाळीत पाडणे, त्याला कडक संदेश देणे, इत्यादी चालू आहेच. नुकत्याच झालेल्या सार्क सभेच्या संबंधात आणि याच (नोव्हेंबर) महिन्यात रशिया, जपान, चीन, इझ्रेल, इत्यादी देशांबरोबर भारतात व भारताबाहेर घडलेल्या कृती व संवाद (इंटरअ‍ॅक्शन्स) हेच दाखवतात, असे माझे निरिक्षण आहे. असो, थोडक्यात, "केवळ नोटा रद्द करण्याने सर्व काळा पैसा नष्ट होईल" आणि "केवळ खोट्या नोटा निकामी झाल्या म्हणजे अतिरेकी खतम झाले" ही दोन्हीही वाक्ये एकाच उच्च प्रतीची हास्यास्पद वाक्ये आहेत. ती वाक्ये ना कोणी जाणकार म्हणत आहेत ना कोणी जबाबदार सरकारी सूत्रे. मात्र, विरोधक सरकारवर बळजबरीने (पक्षी : कांगावाखोरपणे) ते आरोप लादतान दिसत आहेत; हा भारतीय राजकारणाचा जुना रोग आहे. सद्यातरी, (कोणत्याही सत्तेत असलेल्या) सरकारला आणि सुजाण नागरिकांना ते दुखणे अंगावर काढण्याशिवाय दुसरा उपाय दृष्टीपथात नाही. असो. तुमचा प्रश्न वरवर साधा दिसला तरी तो सोपा किंवा बायनरी नसल्याने गैरसमज टाळण्यासाठी त्याचे सविस्तर उत्तर देणे योग्य वाटले. शिवाय, या समस्येतल्या काही खाचाखोचा व निर्देश जेवढे शक्य आहेत तेवढे आणि तेवढेच दिले आहेत. तुम्ही जाणकार आहात, त्यामुळे त्याबाबत अधिक लिहायची गरज नव्हतीच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जेथे जेथे आणि/किंवा जेव्हा जेव्हा धर्म आणि राज्यप्रशासन यांची सरमिसळ झाली आहे, तेथे तेथे आणि/किंवा तेव्हा तेव्हा त्याचे पर्यवासन एकांगी आणि जुलुमी राज्यव्यवस्था निर्माण होण्यात झाले आहे. धर्म नसलेली कम्युनिस्ट व्यवस्था अन सोविएत तरी कुठं टिकलं काका? हे वाक्य "सेपरेशन ऑफ स्टेट अँड चर्च / रिलिजन" या वाक्प्रचाराच्या पार्श्वभूमीवर पहा. कधी कधी मुद्दा समजवून द्यायला विंग्रजीचा आधार घेतला की सोपे पडते. ;) :) आणि तसं बघितलं तर या जगात काहीच / कोणीच अमरपट्टा घेऊन येत नाही. वर मुद्दा जुलुमी राजवटीचा होता, नश्वरतेचा नव्हता :)

गामा पैलवान 24/11/2016 - 00:02
माहितगार,
गापै चर्चेस येताना बेसिक चाळून घ्या की जरा नाही तर अलगद विकेट जाऊ शकते
मान्य. विकीवरचा लेख अगोदरच चाळायला हवा होता. उशीर झाला खरा. पण काही हरकत नाही. देर से आये दुरुस्त आये. तो लेख चाळल्यावर रिबा म्हणून पापासामान संकल्पना सापडली. व्याज हे रिबा आहे असं अनेक मुस्लिम लोकं मानतात. आता विकीवरचा उल्लेख पहिला तर रिबा म्हणजे unjust, exploitative gain अशी स्पष्ट शब्दयोजना आहे. यांतला gain हा शब्द परम महत्वाचा आहे. कारण उघड आहे. समजा गाम्याने शेखचिल्लीला व्याजाने पैसा दिला. बदल्यात शेखचिल्लीने रीतसर व्याज भरून यथोचित समयी मुद्दलाची परतफेड केली. तर रिबाचं (=व्याजाचं) पाप शेखचिल्लीला कधीच लागणार नाही. कारण या व्यवहारात gain गाम्याचा झाला आहे. इस्लामिक ब्यांकिंगची गरज शेखचिल्लीला नसून गाम्याला आहे. सर्वसामान्य मुस्लिमास आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी इस्लामिक बँकेची गरज नाही. प्रचलित बॅंकिंग पद्धतीत ते आरामात सामावले जाऊ शकतात. आ.न., -गा.पै.