Skip to main content

ती....

लेखक Jabberwocky यांनी बुधवार, 09/11/2016 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
ती फुलंराणी, सुगंध वेचणारी. ती स्वच्छंदी, आनंद उधळणारी. चंद्रताऱ्यांचं वेड तिला, ती माझं आभाळ उजळवणारी. ती पणती, अंधार गिळणारी. ती अबोली अबोल, पण मनातले भाव टिपणारी. ती थंड झुळूक वाऱ्याची, नभाला पाझर फोडणारी. ती मोती शिंपल्यातला, ती अथांग सागर प्रेमाचा, ती गुलमोहर, ती रानफुलं, ती सोनाली, ती सोनफुलं..... (Dedicated to my wife)
लेखनविषय:

वाचने 1217
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

कविता खूपच सुंदर आहे! धन्यवाद आणि अभिनंदन!! :) Sandy

पत्नीसाठी इतकी सुंदर कविता लिहिणारा पती लाभल्याबद्दल तुमची पत्नी, आणि जिच्यासाठी कविता लिहावीशी वाटावी अशी सखी लाभल्याबद्दल तुम्ही, दोघेही नशीबवान आहात :)