नाही का ??

कवि मानव's picture
कवि मानव in जे न देखे रवी...
2 Nov 2016 - 2:36 pm

एकीकडे गोडधोड, एकीकडे पोट दौड,
सामाजिक विषमता, नाही का ??

एकीकडे धर्मांद वेडे, एकीकडे दैवत्वाचा बाझार,
धार्मिकतेचा मुखवटा, नाही का ??

एकीकडे उंच मनोरे, एकीकडे लहानसे घरटे,
हरवला मनाचा मोठेपणा, नाही का ??

एकीकडे घनदाट वर्षा ,एकीकडे भयाण आहे सारे,
नीसार्गाचाच कोप हा, नाही का ??

एकीकडे तिमिर न संपणारे, एकीकडे प्रकाश झेपावणारा,
अज्ञानचा श्राप हा, नाही का ??

एकीकडे स्वार्थी राज्यकर्ते, एकीकडे दैवी श्रमकर्ते,
आपल्या जबाबदारीचा अभाव हा, नाही का ??

मी राहतो व्यस्थ, माझ्या सुखाच्या गोळाबेरीजात,
कळावे तयांचे दुखं कैसे, नाही का ??

चला बंध तोडू, मिटवू साऱ्या विषमता,
हाती उरला वेळ थोडा, नाही का ??

इशाराकविता

प्रतिक्रिया

Bhagyashri satish vasane's picture

2 Nov 2016 - 3:17 pm | Bhagyashri sati...

छान आहे कविता

कवि मानव's picture

2 Nov 2016 - 5:19 pm | कवि मानव

धन्यवद !! _/\_