शत शब्द कथा - भाव कि किंमत

विअर्ड विक्स's picture
विअर्ड विक्स in जनातलं, मनातलं
15 Oct 2016 - 10:52 am

सई नि साहिल चांगले मित्र होते. पदव्यूत्तर शिक्षणासाठीसुद्धा साहिलने सईसोबत प्रवेश घेतला होता. वेलीवर फुल उमलणार का ? याची सगळ्यांनाच उत्सुकता होती.

पदव्यूत्तर अंतिम परीक्षेच्यावेळी दोघे एकाच वर्गात होते.पेपर सुरु होण्यास ५ मिनिटे बाकी होती. अचानक सईचे घड्याळ बंद पडते,नि ती निरागसपणे साहिलकडे त्याचे घड्याळ मागते. साहिल एक क्षणभर विचार करत आपले घड्याळ तिला देतो.वर्गातील सर्वांचेच लक्ष त्या दोंघाकडे जाते. पण फिकीर नव्हती , साहिलला त्याच्या वेळ नियोजनाची नि सईला ....

अनेक वर्षांनंतर सई नि साहिल परत भेटतात. सई साहिलसाठी भेट म्हणून घड्याळ घेऊन येते. हि भेट स्वीकारण्यास साहिल ईच्छूक नसतो परंतु सईच्या आग्रहाखातर ती स्वीकारतो. घरी परतून साहिल त्या घड्याळाकडे पाहत स्वतःशीच पुटपुटतो ,
" किंमत कळली पण भाव नाही कळला ! "

kathaaविचार

प्रतिक्रिया

वेलीवर फुल उमलणार का ? - अप्रतिम

महासंग्राम's picture

15 Oct 2016 - 11:40 am | महासंग्राम

सुंदर आशय असलेली कथा आवडली आहे. पुलेशु .

विअर्ड विक्स's picture

15 Oct 2016 - 11:57 am | विअर्ड विक्स

धन्यवाद. पहिलाच प्रयत्न आहे शत शब्द कथेचा. तरी थोडे सीमोल्लंघन झालेच !

chitraa's picture

15 Oct 2016 - 12:19 pm | chitraa

.