आतापर्यंत मिसळपाववर अनेक चर्चेचे, शंका निवरणाचे धागे आलेले आहेत. पण आपल्या जवळील माहिती (फुकटचे सल्ले) यावर धागे मी अजून बघितले नाहीत.
पुष्कळ वेळा आपल्याला अचानक नवीन आणि भन्नाट माहिती मिळते आणि आपले पोट दुखायला सुरुवात होते. तेव्हाच बाहेर निघून जगाला ओरडून सांगावेसे वाटू लागते. अशा वेळच्या साठी धागा काढण्याचे फार मनात होते. दसरा दिवाळीचे दिवस असल्याने पतंगबाजी लवकरच सुरु होईल त्यामुळे आता हा धागा काढल्याने माझी पोटदुखी तरी बंद होईल. आता माझे चार आणे
दोन वर्षांपूर्वी ब्रह्मपुर येथे युवा महोत्सवासाठी जात असतांना माझी समोर च्या बर्थवरील गुजराती तरुणांशी गट्टी जमली. अर्धवट गुजराती आणि मराठी बोलत, नवीन सरकार, गुजरात महाराष्ट्रातील फरक यावरून गाडी संक्रांत व पतंगावर गेली. मांजामुळे एका दुचाकीस्वार तरुणीचा गळा कापल्याची घटना तेव्हा ताजीच होती. त्यामुळे गुजराती लोक यावर काय करतात याची मला उत्सुकता होती. विचारल्यावर त्यांनी सांगितला तो जुगाडचा एक उत्तम नमुना आहे. त्यांच्यानुसार संक्रांत जवळ आली कि एक लांब बांबू किंवा सळई घ्यायची आणि दुचाकीच्या समोरील बाजूस उभी किंवा मागील बाजूस झुकती बांधायची. हि सळई गाडी किंवा सायकल च्या एक्सेल वर अशी बांधायची कि एकदा गाडीवर बसल्यावर तिची उंची डोक्याच्या पातळी एवढी असली पाहिजे. म्हणजे आपण जेव्हाही गादीवर निघू आणि रस्त्यात मांजा आडवा असेल तर तो आधी सळईला लागेल आणि सळई आपल्या बाजूने मागे झुकली असेल तर झटकन डोक्यावरून निघून जाईल. शेवटी सिर सलामत तो हेल्मेट पचास.☺
टीप: या अगोदर विचार करून फक्त निबंधच लिहिले असल्याने कृपया सांभाळून घ्यावे.
वाचने
7208
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
भा री धा गा!
छान धागा.
जेव्हाही "गादी"वर निघू
फुकटचा सल्ला क्र. 1:
In reply to जेव्हाही "गादी"वर निघू by नावातकायआहे
क्षमस्व
In reply to जेव्हाही "गादी"वर निघू by नावातकायआहे
फुकटचा सल्ला क्र. २:
In reply to क्षमस्व by सांगकाम्या राक्षस (verified= न पडताळणी केलेला)
आयडीयाची कल्पना चांगली आहे पण
हॅहॅहॅ लय भारी धागा. इथे
फारच उपयोगी धागा! लिस्टच
कोणी मिर्ज्या पहिला नसेल तर
असाच एक धागा होता "वॅाश
मस्त धागा आहे! काही सुचले तर
युट्युबची URLवरून व्हिडिओ
सल्ला - सुखी वैवाहिक जीवनासाठी!!!
आणि छाटी लावून निमुटपणे बाहेर
छातीला छाटी लावून निमूट बाहेर
In reply to आणि छाटी लावून निमुटपणे बाहेर by कंजूस
हाहाहा
In reply to छातीला छाटी लावून निमूट बाहेर by अभ्या..
पोट दुखियला लागते, यावर
भारतातला अनुभव नाही. अमेरिकेत
In reply to पोट दुखियला लागते, यावर by palambar
माझ्या मागे फार लागलेत हो
In reply to पोट दुखियला लागते, यावर by palambar
घे आणि कुठेतरी टाकून दे घरात
In reply to माझ्या मागे फार लागलेत हो by अभ्या..
आँय?
In reply to घे आणि कुठेतरी टाकून दे घरात by यशोधरा
पैशे न घालवता सांबाळायचे ना
In reply to आँय? by अभ्या..
ते सांगतात ना मार्केटिंगवाले.
In reply to पैशे न घालवता सांबाळायचे ना by यशोधरा
ह्या सल्ल्याचे वेगळे पैशे
In reply to ते सांगतात ना मार्केटिंगवाले. by अभ्या..
मग नको. हे नेटसुद्धा
In reply to ह्या सल्ल्याचे वेगळे पैशे by यशोधरा
=)) अंबानी फुकट देत्यात व्हय!
In reply to मग नको. हे नेटसुद्धा by अभ्या..
असु दे, नंतर टाटा, बिर्ला,
In reply to =)) अंबानी फुकट देत्यात व्हय! by यशोधरा
फुकट सल्ला क्र. xx
In reply to माझ्या मागे फार लागलेत हो by अभ्या..
म्हणजे कसं मेहेंदळे साहेब?,
In reply to फुकट सल्ला क्र. xx by राजेंद्र मेहेंदळे
जाउंद्याना बाळासाहेब!!
In reply to म्हणजे कसं मेहेंदळे साहेब?, by अभ्या..
ते आमचे डॉन. आमी ज्युनिअर.
In reply to जाउंद्याना बाळासाहेब!! by राजेंद्र मेहेंदळे
पहिल्या प्रथम हे सांगतो की लेखकाचा अायडी प्रचंड भारी आहे.
लग्नमंडपातले.
In reply to पहिल्या प्रथम हे सांगतो की लेखकाचा अायडी प्रचंड भारी आहे. by बोका-ए-आझम
किंवा वेडिंग रिंगमधले म्हणाले
In reply to लग्नमंडपातले. by अभ्या..
आयडी आवडल्याबद्दल धन्यवाद
In reply to पहिल्या प्रथम हे सांगतो की लेखकाचा अायडी प्रचंड भारी आहे. by बोका-ए-आझम
अल्याडला जागा नसेल तर पल्याड