Skip to main content

शुभ दीपावली

लेखक रातराणी यांनी शनिवार, 29/10/2016 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
p4 सहस्रधारा प्रकाशाच्या लेवुन अवतरली दीपावली प्रसन्नतेने सजते मनोमनी आज आनंदाची रंगावली दरवळला मृदुल सुगंध उटण्याचा भारावुनी दशदिशा अभ्यंगस्नात लज्जित तारका नभी शोभते नवउन्मेषा सौंदर्याची करीत उधळण उजळली ही धरा देखणी अवघा आसमंतही गातसे चैतन्याची सुमधुर गाणी अंधकाराचे करीत निर्दालन भूतली प्रकटे तेजोवलय सकल जनांत नांदो शांती आशिष हाच मागते हृदय

वाचने 7628
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

In reply to by एस

श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्रित्यर्थम तथा प्रतिसाद कार्ये सर्वेषाम देवता प्रित्यर्थं पूजनमहं करिष्ये

आवडली कविता. चित्रही छान आहे. धन्यवाद. -दिलीप बिरुटे