
सहस्रधारा प्रकाशाच्या लेवुन अवतरली दीपावली
प्रसन्नतेने सजते मनोमनी आज आनंदाची रंगावली
दरवळला मृदुल सुगंध उटण्याचा भारावुनी दशदिशा
अभ्यंगस्नात लज्जित तारका नभी शोभते नवउन्मेषा
सौंदर्याची करीत उधळण उजळली ही धरा देखणी
अवघा आसमंतही गातसे चैतन्याची सुमधुर गाणी
अंधकाराचे करीत निर्दालन भूतली प्रकटे तेजोवलय
सकल जनांत नांदो शांती आशिष हाच मागते हृदय
प्रतिक्रिया
कविता आवडली.
कविता आवडली
मम्
In reply to कविता आवडली by पैसा
आत्मन्
In reply to मम् by टवाळ कार्टा
श्रुति स्मृति पुराणोक्त फल
In reply to आत्मन् by एस
बाप रे
In reply to श्रुति स्मृति पुराणोक्त फल by सतिश गावडे
छान
कविता आणि चित्र दोन्ही आवडले.
+१
छान