अँब्युलन्स मधून खाली कोण तरी उचलत आहे .आता आठवत नाही कोण होता तो .वर कोणीतरी न्हेलं ते हि आठवत नाही .डायरेक्ट जाग १५ तासांनंतर ,इंजेकशन दिलं असावं .बहुधा झोपेचं असावं आता हे हि आठवत नाही
आता पिक्चर प्रमाणे फ्लॅश बॅक सांगतो ..
सुरवात साधी सरळ छान घर मज्जा मज्जा अश्या टाइप . नीट शिक्षण कॉलेज पोस्ट डिग्री हा सगळा प्रवास (त्यात काय झालं हे परत कधीतरी )सगळंच चांगलं असला की घरचेही फार विचार करत नसावेत बहुधा .कारण कोणाला काय माहित कधी काय होता ते.कारण थोडं ड्रिंक परत कॉलेज मध्ये g.s होतो बाकी मजा मस्ती हे सगळं घरी माहित होतं त्यात काही विशेष पण नाही. खूप काही झाला ते वर सांगितल्याप्रमाणे परत येईलच .युनिव्हर्सिटी राजकारण विद्यार्थी खूप मुद्दे आहेत असो तो काही बोलण्याचा भाग नाही आता
सुरवात झाली आम्हाला जॉब लागल्यापासून मोठी कंपनी बाहेर काम साहजिकच संध्याकाळ रिकामी त्यात अंदमान आसाम आणि जम्मू अश्या ठिकाणी कामं ६-६ महिने म्हणजे रिमोट एरिया असला की संध्याकाळ खायला उठायची . दारू रेगुलर चालू झाली. पहिला सिग्नल पण समजला नाही.पुढे गाडी मी आणि ड्राइवर दिवसभर आता दारू हळू हळू सकाळी चालू झालीं . त्यात सरकारी अधिकारी पार्ट्या वैग्रे जोडीला होतच.पार्ट्या सगळेच करतात पण काही लोकांना कळत नाही .म्हणजे काळ वेळ जुळून येते काही वेळा असा घडायला .
पार्ट २
ती नोकरी सोडली आता मोठी कॉर्पोरेट फील्ड आली बाहेर प्रवास मीटिंग मार्केटिंग त्यामुळे हीच दिनचर्या झाली . सगळ्या जवळच्या व्यक्तींना कळत होत आडून आडून बोलतही होते पण तेव्हा हि मी ऐकलं नाही .कारण अर्धवेळ भारताबाहेर कोणाला काय कळणार अश्या विचाराने मी काहीपण कारण द्यायचो
धोक्याची सूचना भाग २
काही काळाने परत घरी आलो इथेच काम मग तर सगळंच भारी. दारूने आता पूर्ण कब्जा घेतला होता.काही महिने तसेच गेले हळू हळू कामावर बहाणे देण चालू झालं . तिथेही कळायला वेळ नाही लागला पण काम नीट असल्याने कोण काही बोलत नव्हतं .पण कधी ना कधी ते घडणार होतं . बऱ्याचदा सकाळी ड्रिंक आणि स्वतःचा आणखी असलेला व्यवसाय यामुळे कामावर दुर्लक्ष झालं .एक दोन दा समजावलं वरिष्ठानी नोटीस पण मिळाली मग मी स्वतःच ह्या नादात एकदा राजीनामा दिला .आता व्यवसाय आणि बाकी वेळा घरी कधी पण ड्रिंक होऊ लागला बाहेर गाडीत घरी ऑफिस मध्ये .
धोक्याची सूचना ३
(बाकी पुढील भागात )
ता.क -सहज अनुभव आहेत मला काही प्रॉब्लेम झाला नाही वेळीच सावरलं तर पण जे सावरू शकत नाहीत अश्यांसाठी
वाचने
5027
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्वतःचा अनुभव लिहिलेला प्रथमच
+११११
In reply to स्वतःचा अनुभव लिहिलेला प्रथमच by अजया
+1000
In reply to +११११ by टवाळ कार्टा
`
In reply to +1000 by संदीप डांगे
अवांतर : प्रतिसाद आवडला !
In reply to ` by जव्हेरगंज
वाचत आहे, थोडे मोठे भाग टाका
तुटक तुटक लिहू नका. कारण
तुटक तुटक लिहू नका!
लिहीताय चांगलं, फक्त थोडं
हो, सहमत आहे.
In reply to लिहीताय चांगलं, फक्त थोडं by पिलीयन रायडर
तुषार नातू..
In reply to हो, सहमत आहे. by गामा पैलवान
तुटक नका लिहू...आणि लिहायला
पुढे लिहित रहा.
येस सर !