व्यक्त न मी कुणास, तुज उमजेन का तरी
- निनाव (१२.०९.२०१६)
व्यक्त न मी कुणास, तुज उमजेन का तरी
अव्यक्त गुंत भावनांची, तुज समजेल का तरी
आठवून विसरावे तुला, प्रयत्न मज आसवांचे
विसरलोच तुला जर कधी, मी उरेन का तरी
आस ही जगण्याची मी, सोडली नसली तरी
जगलो तुझ्याच साठी, तुज उमगेल का तरी
आठवून विचारावे तुला, अर्थ मज जगण्याचे
आठवलोच मी नाही तुज, मी उरेन का तरी
बहर गोड़ मज स्वप्नांना, कधी येईल का तरी
मन बंद पापण्यांना, चिंब भिजवेल का तरी
स्पर्श एक तुझे, मज स्वप्न कोवळे स्वप्नांचे
भंगूनि स्वप्न तुझे असे, मी उरेन का तरी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2205
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
.
घन्यवाद!
In reply to . by खालीमुंडी पाताळधुंडी
घन्यवाद!
In reply to . by खालीमुंडी पाताळधुंडी
घन्यवाद!
In reply to . by खालीमुंडी पाताळधुंडी
अनेक वेळा प्रकाशित चुकून झाले, माफि असावीं
छान... आवडली
मस्त कविता. गाण्यासारखी ,
धन्यवाद राजेन्द्र जी , विवेक जी. _/\_
प्रिय कवि वर्ग हो, मी थोडे
छान..