मिपा दुसऱ्या क्रमांकावरून प्रथम वर आणायचे कि नाही ?

एकुलता एक डॉन's picture
एकुलता एक डॉन in काथ्याकूट
6 Sep 2016 - 6:17 pm
गाभा: 

नमस्कार
बऱ्याच दिवसापासून धागा टाकायचा विचार होता पण प्रतिसाद मिळतील कि नाही शंका होती ,निदान आज मिपा च्या वर्धापन दिनाला तरी किती लोक" हिट" चिंतक आहेत ते बघू

23/05/2016 रोजी मी मिपा मराठीतील प्रथम क्रमांकाचे संकेत स्थळ http://www.misalpav.com/node/36133 म्हणून धागा टाकला होता 5000 वर वाचणे

पण शेवटी कपिलमुनी http://www.misalpav.com/comment/reply/36133/861663 ह्यांनी सांगितले कि क्रमांक खाली गेला
एकाने पण हळहळ किंवा प्रतिक्रिया दिली नाही

निदान आजतरी एक होऊ या

मिपा प्रथम क्रमांक वर आणायचे तर

1) दररोज निदान 2 वेळा तरी मिपा ला भेट द्या
2) browser ओपन ठेवा मिपा close नका करू
3) आपल्या मित्र मंडळीला मिपा चा दुवा द्या
4)दररोज लेख नाही तर प्रतिसाद तरी नोंदवा ,वाचणे आणि प्रतिसाद संख्या मध्ये खूप फरक दिसतोय

आणि सर्वात मुख्य

5) जरा भांडणे कमी करू या

प्रतिक्रिया

संजय पाटिल's picture

6 Sep 2016 - 6:19 pm | संजय पाटिल

ओक्के.. नोटेड.

एकुलता एक डॉन's picture

6 Sep 2016 - 6:24 pm | एकुलता एक डॉन

धन्यवाद पाटील साहेब

पैसा's picture

6 Sep 2016 - 6:27 pm | पैसा

तुमची कळकळ पोचते आहे. पहिला दुसरा नंबर सतत तसाच राहील असं नसतं ना. जरा मागेपुढे होणारच. चांगले लिखाण सतत मिपावर समोर रहावे यासाठी आपण सगळ्यानीच प्रयत्न केले पाहिजेत. नंबर आपोआप येईल. पहिला नंबर हा अवांतर फायदा आहे. चांगले लिखाण मिपावर येणे हे मुख्य ध्येय असले पाहिजे. कोणी मुद्दाम कचरा आणून टाकत असेल तर त्यावर प्रतिक्रिया न देता तो मागे ढकलून दिला पाहिजे. बरोबर ना?

मिपा वर्धापन दिनाच्या सर्व मिपाकर सदस्य, वाचक आणि त्यांच्या परिवारांना हार्दिक शुभेच्छा!

टवाळ कार्टा's picture

6 Sep 2016 - 7:51 pm | टवाळ कार्टा

कोणी मुद्दाम कचरा आणून टाकत असेल तर त्यावर प्रतिक्रिया न देता तो मागे ढकलून दिला पाहिजे. बरोबर ना?

कचरा आहे हे माहित असेल, दिसत असेल आणि हातात झाडूही असेल तर कचरा साफ करायच्याऐवजी मागे ढकलणे हा कामचुकारपणा आहे...असा माझा अंदाज

फेदरवेट साहेब's picture

6 Sep 2016 - 8:03 pm | फेदरवेट साहेब

भू भू भू भू भू (माणसाच्या भाषेत हॅ हॅ हॅ हॅ हॅ ),

कचरा साफ करायचा म्हणले तर पहिला " मुली शोधताना" घालवावा का हो? ;)

त्या शिवाय जे "दुत्त दुत्त" "लुऊऊऊऊऊ" वैग्रे कॉमेंट असतात बघा त्या अन त्या देणाऱ्या आयडी समूहाचे काय?

राखणदारीला फाटकावर बसतो मिपाच्या, तरी आत काय चाललंय ह्यावर बारीक लक्ष असतं हो आमचं

(मिसळपावला इमानदार)

ढेल्या

टवाळ कार्टा's picture

6 Sep 2016 - 9:00 pm | टवाळ कार्टा

यझ आयडी + प्रतिसाद खरोखर उडणार असतील (म्हणजे उडवायची धमक + इच्छा असेल) तर माझा एकच नाही तर इतरही असेच टाईमपास म्हणून काढलेले धागे उडवले तरी हरकत नाही

संदीप डांगे's picture

6 Sep 2016 - 9:05 pm | संदीप डांगे

+१०००००

फेदरवेट साहेब's picture

6 Sep 2016 - 9:57 pm | फेदरवेट साहेब

यझ आयडी + प्रतिसाद खरोखर उडणार असतील (म्हणजे उडवायची धमक + इच्छा असेल) तर माझा एकच नाही तर इतरही असेच टाईमपास म्हणून काढलेले धागे उडवले तरी हरकत नाही

भ्वाआआआ (माणसे म्हणतात तसे ब्वार्र)

"यझ आयडी " +" प्रतिसाद" ह्यातच समदे आले

वाल्मिक's picture

6 Sep 2016 - 11:34 pm | वाल्मिक

टवाळ आवाडे विनोद
धागा करते ह्यांनी दुर्लक्ष करावे

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Sep 2016 - 12:07 pm | कैलासवासी सोन्याबापु

टका भाऊ, नको लक्ष देऊ, सुखी राहशील.

टवाळ कार्टा's picture

7 Sep 2016 - 1:33 pm | टवाळ कार्टा

खिक्क...ते तर आहेच...मिपा सोडूनपण बरेच कामधंदे आहेत

पैसा's picture

7 Sep 2016 - 8:58 am | पैसा

ज्यांच्या हातात झाडू आहे ते बघतील तो कधी, कसा आणि कुठे वापरायचा ते. आपल्या हातात झाडू नाही ना, मग जे आपण करू शकतो ते करावे. महात्मा गांधीजी म्हणाले “Be the change that you wish to see in the world.” गौतम बुद्ध म्हणाला "अप्प दीपो भव"

अर्थात काही बदल व्हायला हवा असेल तर स्वतः हातपाय हलवावे लागतात, तेही योग्य दिशेने. तर माणूस पुढे सरकतो. त्यापेक्षा दुसर्‍याकडे बोट दाखवणे कधीही सोपे असते. The Choice Is Yours.

टवाळ कार्टा's picture

7 Sep 2016 - 9:54 am | टवाळ कार्टा

असे असेल तर अशी फ्रेम करून लावायची वाक्ये टंकण्यापेक्षा एकदा झाडू द्याच हातात, दाखवतो फरक पाडून

गॅरी ट्रुमन's picture

7 Sep 2016 - 10:15 am | गॅरी ट्रुमन

असे असेल तर अशी फ्रेम करून लावायची वाक्ये टंकण्यापेक्षा एकदा झाडू द्याच हातात, दाखवतो फरक पाडून

टका तू झाडू हातात घेतलास तर तुझी खैर नाही.तुला इतके म्हणजे इतके झोडपून काढीन की कुठून एकदा झाडू हातात घेतला असे वाटायला लागेल तुला!!

ह.घ्या.हे.वे.सां.न.ला

टवाळ कार्टा's picture

7 Sep 2016 - 10:42 am | टवाळ कार्टा

ख्याक, कारुदेत की, मी वैयक्तिकरित्या अंगाला चिटकवून घेत नाही

पैसा's picture

7 Sep 2016 - 10:23 am | पैसा

पुन्हा तू दुसर्‍यांकडे बोट दाखवतो आहेस. बादवे, तुला द्यायला झाडू माझ्याकडे नाही. तो वापरणारे आणि देणारे दुसरेच आहेत. मी मला काय जमते तेवढेच करते. नुसते एका जागी "हे द्या ते द्या" करत बसत नाही.

टवाळ कार्टा's picture

7 Sep 2016 - 10:40 am | टवाळ कार्टा

मी कोणाकडेही बोट दाखवले नाहीये, कोणाला स्वतः:च बोटासमोर येऊन उभे राहायचे असेल तर त्याला मी काहीच करू शकत नाही
आणि झेपेल तितके करण्यापेक्षा थोडे जास्त प्रयत्न मलातरी करता येतात आणि खेड्या ते द्या असे मी मागत नाहीये, ते उत्तर होते वरच्या प्रतिसादाला, टोलवा टोलावी मात्र करता येत नाही मला

पैसा's picture

7 Sep 2016 - 10:45 am | पैसा

आपण काय लिहिले आहे, दुसरे काय लिहीत आहेत ते नाट वाचा, विचार करा, समजून घ्या आणि मग बोला. बर्‍याच हार्दिक शुभेच्छा! आज बरीच करमणूक आतापर्यंत झाली. आता मला दुसरीही बरीच कामे आहेत. माझ्या घरची आणि मिपाचीही. तेव्हा बायबाय! गणपतीबाप्पा तुम्हाला उदंड सद्बुद्धी देवो.

टवाळ कार्टा's picture

7 Sep 2016 - 10:46 am | टवाळ कार्टा

अपेक्षित प्रतिसाद, बर्याच मिपाकरांसाठी

कपिलमुनी's picture

7 Sep 2016 - 1:33 pm | कपिलमुनी

"कोणाला स्वतः:च बोटासमोर येऊन उभे राहायचे असेल"

यासाठी माझ्याकडून एक कोरोना विथ लेमन !!

टवाळ कार्टा's picture

7 Sep 2016 - 10:44 am | टवाळ कार्टा

अपेक्षा नाहीये, ते उत्तर होते मी काय करू शकेन असे विचारल्यावर, बाकी ते आरत्यावगैरेमध्ये आपल्याला इंट्रेस्ट नाही

स्वलिखित's picture

6 Sep 2016 - 9:09 pm | स्वलिखित

-तर मंडळी मला प्रचंड मताने विजयी करा..
-गपे, ते रस्त्याचे काम बघ पहिले , परगती कर, तालुक्यातली पडीक पोरंसोरं चांगल्या कामाला लावअन मग म्हण मला आमदार करा ते पन परचंड मतानी.
-निवडुन दिल्यावर करतो की
-अहं आता जनता पन खुळी बावळी राहिली नाय.आता पोत काय केल. आधी काम करुन दावा मग बोला..

वेल्लाभट's picture

6 Sep 2016 - 6:32 pm | वेल्लाभट

1) दररोज निदान 2 वेळा तरी मिपा ला भेट द्या

ओढून ताणून कशाला? आपसूक वाटलं पाहिजे भेट द्यावी असं. आणि ते प्रत्येक सदस्याच्या हातात आहे. उत्तम लेखकांसोबतच उत्तम वाचक व प्रतिसादक यांच्या हातात आहे.

2) browser ओपन ठेवा मिपा close नका करू

पुन्हा; असल्या काहीतरी उपायांची गरजच का लागावी?

3) आपल्या मित्र मंडळीला मिपा चा दुवा द्या

हे ठीक. स्वागत.

4)दररोज लेख नाही तर प्रतिसाद तरी नोंदवा ,वाचणे आणि प्रतिसाद संख्या मध्ये खूप फरक दिसतोय

याही गोष्टी उसनं अवसान आणून व्हायला नकोत. लेख असे हवेत की प्रतिसाद द्यावासा वाटेल. व प्रतिसाद असे हवेत की लिखाण करावंसं वाटेल.

5) जरा भांडणे कमी करू या

योग्य.

याशिवाय दुर्लक्ष करण्यासारख्या गोष्टी, धागे, सदस्य, प्रतिसाद यांकडे दुर्लक्ष होणं हेही गरजेचं आहे.

मिपा क्रमांक एक वर येईलच. पण क्रमांक एक वर यावं म्हणून मिपा उघडा, प्रतिसाद लिहा वगैरे मताचा मी नाही.

एकुलता एक डॉन's picture

6 Sep 2016 - 6:35 pm | एकुलता एक डॉन

1) दररोज निदान 2 वेळा तरी मिपा ला भेट द्या

मिपा वर आणायसाठी का नको?

2) पुन्हा; असल्या काहीतरी उपायांची गरजच का लागावी?

seo,bounce rate
4) लेख असे हवेत की प्रतिसाद द्यावासा वाटेल. व प्रतिसाद असे हवेत की लिखाण करावंसं वाटेल.
मान्य ,पण प्रतिसाद कौतुक नाही तर काही चुका किंवा improvement साठी पण देऊ शकता

माझ्याकडे यासाठी ब्लुप्रिंट तयार आहे.
फक्त एकहाती .....द्या.
-
जय मिपा.

पैसा's picture

6 Sep 2016 - 6:33 pm | पैसा

जेपीसह मिपा.... झालाच पायजे!

नूतन सावंत's picture

6 Sep 2016 - 9:30 pm | नूतन सावंत

Zalach payje

नाखु's picture

7 Sep 2016 - 8:44 am | नाखु

जेपी झालाच पाहिजे.


खिल मिपा* (नवमिपासाक्षर ,नवमिपावाचक,नवमिपावाचक-वचक्,नवलेखक्,नवप्रतिसादक्,नवटीकाकार्,नवरंगकर्मी) संघातर्फे मिपा हितार्थ जारी

अखिल मिपा* हे कंसातील सगळ्यांसाठी विशेष्ण आहे म्हणून कंसाबाहेर आहे.

एकुलता एक डॉन's picture

6 Sep 2016 - 6:32 pm | एकुलता एक डॉन

लोक गुगल वॉर शोधतात तेव्हा 80% फक्त पहिलीच साईट ओपन करतात पैसे ताई
मिपा जास्त लोकानापर्यंत पोचण्यासाठी प्रथम क्रमांक गरजेचं आहे
पाहिजे तेवढा कचरा ढकला,हा पण धागा उडवा पण प्रत्ययकाने मिपा वर आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे

संदीप डांगे's picture

6 Sep 2016 - 6:38 pm | संदीप डांगे

लोक गुगल वॉर शोधतात तेव्हा 80% फक्त पहिलीच साईट ओपन करतात

>> गुगलवर काय शोधतात लोक?

एकुलता एक डॉन's picture

6 Sep 2016 - 6:40 pm | एकुलता एक डॉन

समजा गुगळे वर " मराठी कविता" असा search तुम्ही केला तर त्यातल्या किती संकेतस्थळांना भेट देता ? पहिल्याच ना ?

एकुलता एक डॉन's picture

6 Sep 2016 - 6:41 pm | एकुलता एक डॉन

माफ करा
गूगल जागी गुगळे type झाले

संदीप डांगे's picture

6 Sep 2016 - 7:08 pm | संदीप डांगे

मी मराठी कवितांसाठी असा सर्च करत नाही. मी नेमक्या कोणत्या कविता हव्यात त्यासाठी सर्च करतो. जसे की "ग्रेस, ती गेली तेव्हा रिमझिम.." तर जो रिझल्ट येईल त्यातल्या पहिल्या-दुसर्‍या लिन्कवर चेक करतो. मला वेबसाईट कोणती आहे त्याने फरक पडत नाही. नुसतं मराठी कविता किंवा असंच रॅन्डम सर्च मारुन कोणी बघतं का? गुगल ट्रेन्ड्स, अ‍ॅडवर्ड चेक करा.

मिपा किंवा इतर कोणत्याही संस्थळावर एखादी चांगली कविता आली असेल आणि मला मिपा किंवा ते संस्थळ माहितच नसेल तर माझ्यापर्यंत ती आपोआप कशी पोचेल ह्यावर विचार करा.

मिसळपाव काही विकत नाही, त्यामुळे इथे लोकांनी यावं अशी काही मालकांची गरज नाही. असे रॅन्किंग मधे नंबर घेऊन मिसळपावसारख्या कट्टाटाइप संस्थळासाठी काही साध्य होत नसतं. मिसळपाव ना विकिपिडिया आहे ना सॉन्ग्सडॉट्पिके. त्यामुळे नेमकी रॅन्किंगची गरज काय हा प्रश्न महत्त्वाचा. उत्कृष्ठ साहित्य, दर्जेदार चर्चा, जबरदस्त कन्टेन्ट असणं ही मिसळपावची स्वतःची अशी गरज आहे. ह्यात वाढ होण्यात रॅन्किंगची काही मदत होईल काय?

मिसळपाव अधिकाधिक प्रसिद्ध होण्यासाठी सदस्यांनी आपल्याला इथलं काय आवडलं त्याची लिन्क चेपु किंवा ट्विटरवर शेअर केली तरी मोठे काम होईल. अनेक अनभिज्ञ वाचकांना नवा खजिना हाती लागेल. माझी नीलकांत्/प्रशांतला विनंती आहे की प्रत्येक धाग्यावर "शेअर टू सोशल मिडिया" असे काही विजेट देता आले तर बघावे.

बाकी, मिसळपाव कोणत्या स्पर्धेत आहे काय? गणपतीच्या सजावटीच्या स्पर्धा असतात तशा काही?

एकुलता एक डॉन's picture

6 Sep 2016 - 7:17 pm | एकुलता एक डॉन

जर गूगल किंवा अलेक्सा वॉर प्रथम क्रमांकावर आले तरच जास्त लोक येतील

संदीप डांगे's picture

6 Sep 2016 - 7:35 pm | संदीप डांगे

जरा सविस्तर सांगाल काय? म्हणजे गुगलवर पहिले येतं म्हणून जास्त लोक येतात की जास्त लोक आले की गुगलवर पहिले येतं?

एकुलता एक डॉन's picture

6 Sep 2016 - 7:57 pm | एकुलता एक डॉन

गुगलवर पहिले येतं म्हणून जास्त लोक येतात
पण गुगल पण जास्त लोक येणाऱ्या ना प्रथम स्थान देते
एकदा जास्त लोक आले कि क्रमांक वाढतच जाईल

संदीप डांगे's picture

6 Sep 2016 - 8:13 pm | संदीप डांगे

कृपया गैरसमज करुन घेउ नका. तुम्ही नेमका काय विचार करत आहात हे मला समजून घ्यायचे आहे.

तीन मूलभूत प्रश्नांची व्यवस्थित विचार करुन उत्तर द्या.
१. गुगल रॅन्किन्ग मधे मिसळपाव का दिसायला हवं?
२. रॅन्किंग ने लोक येतात की लोकांमुळे रॅन्किंग येतं?
३. गुगल सर्चमधे मिसळपाव किंवा कोणतीही मिसळपाव टैप मराठी संस्थळं दिसतील असे शोधासाठीचे कळीचे शब्द (सर्च किवर्ड्स) कोणते?

ह्या प्रश्नांची योग्य उत्तरं मिळाली तर पुढे काही योजना आखता येईल.

वाल्मिक's picture

6 Sep 2016 - 11:31 pm | वाल्मिक

1) जास्त लोकांनी भेट द्यावी म्ह्णून
2) vice versa
3) त्याने काही जास्त फरक नाही पडत ,तसेच हे काम वेबमास्तर चे आहे

संदीप डांगे's picture

6 Sep 2016 - 11:48 pm | संदीप डांगे

माझा तिसरा प्रश्न चुकला. रिवर्स-प्रोसेस ने विचारलं आहे. वेबमास्टरकडून नाही, युजरकडून विचारत आहे.

मिसळपाव एखाद्या सर्चरिजल्टमधे दिसेल ह्यासाठी युजरने गुगलमधे जाऊन असा कोणता सर्च मारलेला असेल?

उदा>

१. ओला, उबेर हे पहिल्या स्थानावर येतात > युजरने "टॅक्सी हवी"चा सर्च मारलेला असतो
२. मेकमायट्रीप, ट्रीपअ‍ॅडवायजर पहिल्या स्थानावर येतात > युजर ने हॉलिडे पॅकेजेस असा सर्च मारलेला असतो.
३. कारवाले, कारदेखो पैल्या स्थानावर येतात> युजरने कार्स इन इन्डिया, किंवा कोणत्याही कारचे नाव टाकून सर्च मारलेला अस्तो.
४. ओएलक्स, क्विकर पहिल्या स्थानावर येता> युजरने सेकंड हॅन्ड वस्तूचा सर्च मारलेला असतो
५. नायन्टीनाईनएकर्स, मॅजिकब्रिक्स पहिल्या स्थनावर येतात > युजरने "घर मिळेल का हो घर" असा सर्च मारलेला असतो

तसाच.
६. मिसळपाव पहिल्या स्थानावर येते >> युजरने "********" हा सर्च मारलेला असतो.

इथे "*********" काय असणार आहे?

तुषार काळभोर's picture

7 Sep 2016 - 5:23 pm | तुषार काळभोर

Top Keywords from Search Engines
Which search keywords send traffic to this site?

Keyword Percent of Search Traffic
1. misal pav 73.09%
2. कथा 5.51%
3. rinku patil 5.43%
4. नवरा बायको शरीरसंबंध 2.43%
5. charoli 1.90%

७३% लोक मिसळ पाव असे इंग्रजीमध्ये टाईप करून मिसळपाववर पोहचतात.
चाळीसमधील एक व्यक्ती "नवरा बायको शरीरसंबंध" असे सर्च करून मिसळपाव येतात.

संदीप डांगे's picture

7 Sep 2016 - 8:44 pm | संदीप डांगे

धन्यवाद पैलवान साहेब, हेच हवे होते!! केव्हाचं डॉन रावांना विचारतोय,

आता मी काय म्हणतोय ते लक्षात येईल, मिपा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला गुगल सर्च हा मार्ग पुरेसा नाही, फक्त साडेसात टक्के चान्स आहे,

पैसा's picture

6 Sep 2016 - 6:41 pm | पैसा

लोक गुगल वॉर शोधतात तेव्हा 80% फक्त पहिलीच साईट ओपन करतात पैसे ताई

मान्य. पण मला असं वाटतं की सतत काहीतरी चांगलं लोकांच्या नजरेसमोर आलं पाहिजे. वाचक आपोआप येतात. नंबरचा वगैरे विचार केला तर आपण सतत दुसर्‍या कोणाशी तुलना करत राहू. आणि मग त्यानी काय केलं याचा विचार करत बसू. ते व्हायला नको. आपली स्पर्धा स्वतःशी असली पाहिजे.

एकुलता एक डॉन's picture

6 Sep 2016 - 6:43 pm | एकुलता एक डॉन

लेखन वाढायला पाहिजे असा पण टाकणार होतो पण लोक कसे लेखन वाढवतील ह्यावर उत्तर नाहीये

जेपी's picture

6 Sep 2016 - 6:39 pm | जेपी

धागाकर्ते-
इथे रात्रंदिवस पडीक असणारे कित्येक सदस्य आहेत.त्यांच्या मोबल्या ब्राऊझर मध्ये फक्त मिपा चालु असत.
टेंशन नका घेऊ.
पहिला काय अन दुसरा काय? its just a number.!

यशोधरा's picture

6 Sep 2016 - 7:01 pm | यशोधरा

मी तर म्हणते, ऑफिसमध्ये मिळतील तेवढ्या सगळ्या पीसीवरुन मिपा उघडून ठेवायचं का सगळ्यांनी? मिपाकर, अमिपाकर वगैरे वगैरे, चळवळच उभारु! काय म्हंता? सेलवरुन पण तसंच करुया. जातोय कुठे पयला नंबर! हाकानाका!

आहे सामर्थ्य चळवळीचे.. वगैरे.

अभिजीत अवलिया's picture

6 Sep 2016 - 8:10 pm | अभिजीत अवलिया

पण कशाला हवाय पहिला नंबर ? आपली स्पर्धा हे दर्जेदार साहित्य मिपावर असावे ह्यासाठी असली पाहिजे.

Quality महत्वाची

एकुलता एक डॉन's picture

7 Sep 2016 - 12:07 pm | एकुलता एक डॉन

ती असून पण पहिला क्रमांक नाहीये

राजेश घासकडवी's picture

6 Sep 2016 - 8:32 pm | राजेश घासकडवी

5) जरा भांडणे कमी करू या

बाकी सगळं ठीक आहे, पण भांडणं कमी झाली तर टीआरपी कमी होईल अशी भीती वाटते. जिथे घमासान चर्चा चालू असतात तिथे लोक पुन्हापुन्हा तो धागा उघडून वाचतात. त्यापेक्षा 'जास्त भरभरून चर्चा करा, फक्त व्यक्तिगत होऊ नये याची काळजी घ्या' असं म्हणायला हवं.

खटपट्या's picture

6 Sep 2016 - 9:19 pm | खटपट्या

नुसते मिपा उघडे ठेउन फायदा नाही. कारण आपण मिपा एकदा उघडले की ते ऑटो रीफ्रेश होत नाही. थोडक्यात जेव्हा आपण मिपा उघडतो तेव्हा एक हीट जाते. मग तेच पेज तुम्ही दीवसभर उघडून ठेवलेत तरी एकच हीट असणार जो पर्यंत तुम्ही ती रीफ्रेश करत नाही.

आंतरजालावर एखाद्या वेबपेजला जेवढ्या हीट जास्त तेवढे ते पेज प्रसीध्द. जर नुसत्या हीट्स ने वेबसाइट प्रसीध्द करायची असेल तर सारखे रीफ्रेश करत रहावे लागणार. :)

मीपावर जास्त हीट्स येण्याची कारणे - कोणी प्रतीसाद दीलाय का? माझ्या प्रतीसादाला कोणी उत्तर दीलेय का? माझ्या लेखावर कीती प्रतीसाद आलेत? वगैरे...

कुठल्याही संकेतस्थळाचा क्रमांक पहिला राहणारच...

ओढून-ताणून उगाचच एखाद्याला मोठे करायचा प्रयत्न केला की, त्याचा राजीव कपूर किंवा कुमार गौरव होतो.

संदीप डांगे's picture

6 Sep 2016 - 9:30 pm | संदीप डांगे

+१००००००००००.
बास! ह्याच्या पुढे काय नाय!

अभिजीत अवलिया's picture

6 Sep 2016 - 9:37 pm | अभिजीत अवलिया

ओढून-ताणून उगाचच एखाद्याला मोठे करायचा प्रयत्न केला की, त्याचा राजीव कपूर किंवा कुमार गौरव होतो.
--- आई ग. असला हसतोय ह्या डायलॉग वर. एक नम्बर.

रेवती's picture

6 Sep 2016 - 10:33 pm | रेवती

हा हा हा..........

वाल्मिक's picture

6 Sep 2016 - 11:33 pm | वाल्मिक

सलमान खान पण होऊ शकतो

गॅरी ट्रुमन's picture

6 Sep 2016 - 9:36 pm | गॅरी ट्रुमन

4)दररोज लेख नाही तर प्रतिसाद तरी नोंदवा ,वाचणे आणि प्रतिसाद संख्या मध्ये खूप फरक दिसतोय

Mipakar या फेसबुक पेजवर मी १९ जुलै रोजी पुढील लिहिले होते:

पुढील इमेजमध्ये कोणत्या तारखेला मिपावरील महत्वाचे माईलस्टोन (उदा. १०००, २००० इत्यादी लेख) पार केले गेले हे पाहता येईल. ६००० ते ७००० हा लेखांचा टप्पा अवघ्या ४९ दिवसांत (१० फेब्रुवारी २००९ ते ३१ मार्च २००९) पार केला गेला होता.आजच्या घडीला मिपावरील लेखांची संख्या ३६,६९८ आहे. तरीही एक हजार लेख ४९ दिवसात पूर्ण झाले हा विक्रम गेली ७ वर्षे अबाधित आहे.
मिपावरील लेखांचा ओघ आटला आहे का हा एक लेखाचा विषय होऊ शकेल का? :)

Image

<पुणेकर मोड ऑन>
खरोखरच पूर्वीचे मिपा आता राहिले नाही :( :(
<पुणेकर मोड ऑफ>

राजेश घासकडवी's picture

6 Sep 2016 - 10:19 pm | राजेश घासकडवी

मिपावरील लेखांचा ओघ आटला आहे का हा एक लेखाचा विषय होऊ शकेल का? :)

मीही काही काळ ही आकडेवारी तपासून पाहात असे. त्यात २००९ - २०१० हा काळ प्रसिद्ध होणाऱ्या धाग्यांच्या संख्येच्या दृष्टीने सुवर्णयुगाचा होता. दिवसाला १५ ते २० धागे सहज येत. धाग्यांची संख्या मला वाटतं आता दिवसाला १०-१२ च्या आसपास स्थिरावलेली आहे. मात्र प्रतिसादांची आणि धाग्यांच्या वाचनाची आकडेवारी पाहिली तर चित्र अधिक चांगलं आहे असं दिसेल. त्याकाळी ५० प्रतिसाद आणि १००० वाचनं हा माइलस्टोन असायचा. मोजक्या लेखनासाठीच ते मिळायचं.

याची दोन मुख्य कारणं मला दिसतात. यांची ठाम आकडेवारी माझ्याकडे नाही. माझा केवळ अंदाज आहे.
१. फेसबुक आणि व्हॉट्सअॅपने मराठी संस्थळांचा एक मोठा घास घेतला. त्याचा सगळ्याच संस्थळांवर परिणाम झाला. तो परिणाम ११-१२-१३ साली मोठ्या प्रमाणावर दिसला. त्या काळात मिपावरचं लेखन दिवसाला ६-७ लेख इतकं खाली आलेलं होतं. ते एका अर्थाने बरंच असं मला वाटतं कारण चारोळी फेसबुक पोस्टींपलिकडचं लिखाण संस्थळांवर राहायला लागलं.

२. दुसरं कारण थोडंसं अनेक लहानलहान गोष्टींनी बनलेलं आहे. काही संकलित धागे आल्यामुळे अनेक लहानलहान धागे येण्याऐवजी एकच मोठा धागा चालू राहिला. मिपाव्यवस्थापनाने चालू केलेल्या गणेशलेखमाला, दिवाळी अंक, विज्ञानविशेषांक, प्रवासविशेषांक अशा उपक्रमांमुळे जास्त मोठ्या आकाराचे सकस धागेही यायला लागले. त्यांनी अनेक लहान धाग्यांची जागा घेतली.

गॅरी ट्रुमन यांना विनंती करतो की दर दिवसाला येणाऱ्या धाग्यांचा दर काढून त्याचा आलेख मांडावा. गेल्या दोनतीन वर्षांत हा दर वाढत असलेला दिसेल असं वाटतं.

गॅरी ट्रुमन's picture

6 Sep 2016 - 9:38 pm | गॅरी ट्रुमन

मिपा दुसऱ्या क्रमांकावरून प्रथम वर आणायचे कि नाही ?

माझ्यासारख्यांना तरी हा प्रश्नच पडत नाही. कारण माझ्यासाठी मिपा आणि केवळ मिपाच कायमच पहिल्या क्रमांकावर आहे आणि असेल :)

(इतर सर्व मराठी संकेतस्थळांवरून निवृत्ती घेतलेला आणि मिपा सोडून अन्यत्र कुठेही लिहायची अजिबात इच्छा नसलेला) ट्रुमन

संदीप डांगे's picture

6 Sep 2016 - 9:45 pm | संदीप डांगे

सेम पिण्च!!

तुषार काळभोर's picture

6 Sep 2016 - 9:56 pm | तुषार काळभोर

सेम^२ पिंच

नाखु's picture

7 Sep 2016 - 8:52 am | नाखु

अती तीव्र अती तीव्र सहमती.

मिपाविण कुठे (ना) धावे अता मन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Sep 2016 - 9:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>माझ्यासारख्यांना तरी हा प्रश्नच पडत नाही. कारण माझ्यासाठी मिपा आणि केवळ मिपाच कायमच पहिल्या क्रमांकावर आहे आणि असेल :)

सहमत. अधिक बोलण्यासारखं काही नाही. आमचं मिपा जसं आहे, तसं उत्तम आहे.

-दिलीप बिरुटे
(वेडा मिपाकर)

सुचिकांत's picture

6 Sep 2016 - 9:54 pm | सुचिकांत

मी अनेकांना मिपाच्या वापराकरता प्रेरित करत असतो. सर्वांचे मत असते मिपा सारखे दुसरे संकेतस्थळ नाही. पण नवीन लेखकांच्या लेखांच्या खूपच चिंध्या केल्या जातात. त्यावर काही करता आले तर विचार करावा. आपल्याला नुसते वाचक नकोत, लेखक पण निर्माण करायचे असतील तर प्रोत्साहनपर काही करता आलं तर विचार करावा.

संदीप डांगे's picture

6 Sep 2016 - 10:20 pm | संदीप डांगे

सर्वात महत्त्वाचे, नव्या लेखकांच्या चिंध्या होतात हे अर्धसत्य आहे. नकारात्मक घटना जास्त पसरतात तसेच हे. माझ्या दोन वर्षाच्या मिपाप्रवासात अनेक नवलेखकांच्या पहिल्यावहिल्या लिखाणाला, कधीतरीच लिहिणार्‍या दुर्मिळांना खूप चांगले प्रतिसाद मिळाल्याची उदाहरणे खूप पाहिली आहेत.

नविन लेखकांसाठी एक सांगणं आहे. आयडी घेतल्याच्या दुसर्‍या दिवसापासून धाड धाड लेख टाकू नका. आधी इथली वाचक मंडळी काय वाचतात, कसे प्रतिसाद देतात, कशावर देतात हे बघा. म्हणजे थोडक्यात प्रेक्षकांत बसून नाटक बघा. प्रेक्षकांच्या भूमिकेतून लिखाणाकडे बघा. काही आवडले तर बाजुच्या मनभरून दाद देणार्‍याला टाळी द्या. नाही आवडले तर स्पष्ट मत द्या. इथल्या वावराची सवय करा. लिहिणे तुमच्याच हातात आहे. आधी लिहून जिमेलमधे सेव्ह करुन ठेवा. प्रकाशित करण्याची घाई करु नका. तुम्ही घाई का करता? कारण तुम्हाला प्रतिक्रियांची घाई झालेली असते, मग प्रतिक्रिया आल्या की मनासारख्या म्हणजे कौतुकच करणार्‍या आल्या नाही की वाईट वाटतं. प्रत्येकाला आपल्या कलाकृतीचे कौतुक झालेले पाहिजे असते. पण कोणत्या कलाकृतीचे कौतुक होते ते बघून कौतुकाची थाप मिळायला आपली कलाकृती तितकी चांगली आहे काय हे ताडून बघता येतं. किंवा द्या बेधडक टाकून. मन घट्ट करा.

काय लिहावे ह्याचं स्वातंत्र्य हवं असेल तर काय प्रतिक्रिया याव्यात ह्याचं स्वातंत्रय मिळू शकत नाही.

मुक्त विहारि's picture

7 Sep 2016 - 12:43 am | मुक्त विहारि

+ १

अनन्त अवधुत's picture

7 Sep 2016 - 12:47 am | अनन्त अवधुत

.

अलका सुहास जोशी's picture

7 Sep 2016 - 3:40 pm | अलका सुहास जोशी

मी नवीन मेंबर आहे मिपा वर. त्याआधी सहा महिने मिपा वाचत होते.
संदिप डांगे यांच्याशी पूर्ण सहमत. अनुमोदक म्हणा ना.......कारण दिवस बाप्पाचेत.

बोका-ए-आझम's picture

8 Sep 2016 - 11:09 am | बोका-ए-आझम

पण माझा अनुभव थोडा वेगळा आहे. मी आयडी घेतल्याच्या दुस-या नाही, तर त्याच दिवशी लेख टाकला होता. मला प्रतिसाद येईल अशीही अपेक्षा नव्हती. In fact, मिपा हा काय प्रकार आहे हेदेखील माहित नव्हतं. आपण लिहिलेलं लोक वाचणार एवढं समजलं होतं. इथले खास वाक्प्रचार - चान चान, मोठे व्हा, ह्यापी बड्डे, अभ्यास वाढवा आणि सर्वात भारी म्हणजे बसवला टेंपोत - हे नंतर कळले. मला तेव्हा मिळालेले पहिले सगळे प्रतिसाद हे आधी माझ्या आयडीवरुन आणि मग लेखनावरुन मिळाले होते.
मिपाकर स्वॅप्स (आता एस) यांनी एका प्रतिसादात लिहिलं होतं की लोक प्रतिक्रिया देतीलच असं नाही. किती जणांनी वाचलंय ते महत्वाचं. द्याव्याशा वाटल्या प्रतिक्रिया तर देतील. इथल्या प्रतिक्रिया आणि प्रेयसी यांच्यात एक साम्य आहे - यां चिंतयामि सततं मयि सा विरक्ता!(चूभूद्याघ्या).जेवढा जास्त विचार कराल तेवढी समोरची पार्टी विरक्त होत जाईल.

सध्या तरी माझ्याकडे मिपा ११ आणि मायबोली १३ क्रमांकाला दिसत आहेत.

एकुलता एक डॉन's picture

7 Sep 2016 - 11:51 am | एकुलता एक डॉन

कृपया जुना धागा बघावा ,बाकीचे वर्तमान पत्रे आहेत

चित्रगुप्त's picture

7 Sep 2016 - 2:44 am | चित्रगुप्त

मुळात पहिला क्रमांक कश्यासाठी हवा ? हे समजले नाही. उत्तमोत्तम लेख आणि चपखल प्रतिसाद येत रहावेत, हे महत्वाचे. नंबर कोणताही असो.

रघुनाथ.केरकर's picture

7 Sep 2016 - 3:58 pm | रघुनाथ.केरकर

गेली ५ वर्षे मी मिपा वर आहे, जेवढा वेळ मी ऑन्लाइन असतो तेवढावेळ मिपा ओपन असत.

माझ्या मते मिपा च एक नंबर आहे. डांगे साहेबांशी १०० % सहमत.

मराठी कथालेखक's picture

7 Sep 2016 - 4:40 pm | मराठी कथालेखक

संपादकांनी संकुचित वृत्ती सोडून द्यावी. कक्षा रुंदावाव्यात. उगाचच्या उगाच धागे उखडू नये.
हा धागा मायबोलीवर राहू शकतो तर मिपावर का उखडला जावा.
मागासलेपणा सोडा...

देशपांडे विनायक's picture

7 Sep 2016 - 6:43 pm | देशपांडे विनायक

असा प्रयोग करून बघावा
लेखकाचे नाव न देता लेख छापावा . चार पाच दिवसानंतर नाव जाहीर करावे
लेख आणि लेखकाला मिळणारे प्रतिसाद कसे असतील ते कळेल

एकुलता एक डॉन's picture

7 Sep 2016 - 7:37 pm | एकुलता एक डॉन

अहो निदान लेखकाची परवानगी घेऊन लेख छापा

हे आसं नंबरामागं लागला तर मिपाचं संध्यानंद होईल. आणि गर्दी करून करायचंय काय ?
ऑनलाईन पेपरांच्या कमेंटा वाचा म्हणजे लोकांची बुद्धी कुठे राहीली ते कळेल.
उगाच दंगा वाढला म्हणजे अभ्यासू लोकं लांब व्हायला लागतील. आपलं गरीबाचं मत.....

पैसा's picture

7 Sep 2016 - 7:54 pm | पैसा

आता जरा सिरियस विचार. डॉनराव, संस्थळाचा एक आणि दोन नंबर काढायला ही काय स्प्रिंट रेस नाय. मायबोलीशी मिपाची स्पर्धा असं तुम्हाला वाटलं तरी मायबोली मराठी आंतरजालावर पायोनियर आहे. मायबोली कमर्शियल तत्त्वावर चालते तर मिपा हौशी लोकांच्या बळावर. तेव्हा दोन्हीची तुलना तशी करता येणार नाही. मायबोली या वर्षी २० वर्षे पूर्ण करत आहे. तर मिपाला ९ वर्षे झाली. एकूण मराठी बोलणार्‍या आणि वाचू शकणार्‍या लोकांचा विचार करायचा तर मराठी आंतरजालाला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. अजून कितीही संस्थ़ळे आली तरी प्रत्येक संस्थळाला इथे आपली जागा तयार करता येईल आणि सगळ्यानाच वाढायला भरपूर स्कोप आहे. वाचकाला जिथे जे वाचण्यालायक वाटेल, कम्फर्टेबल वाटेल तिथे तो रमतो. अशात मधेच एका संस्थळाच्या हिट्स जास्त असतात तर कधी दुसर्‍याच्या. पण म्हणून ते कायमस्वरूपी कधी होणार नाही.

तुम्हाला वाटते तशी कट थ्रोट काँपिटिशनही मराठी आंतरजालावर असू नये असं मला वाटतं. एकमेकांशी सहकार्य करून अजून बरंच काही साध्य करता येईल. मिपा मालकांनी अन्य काही मराठी संस्थळांना तांत्रिक व अन्य मदतीचा हात देऊ केला/दिला होता. हे असे चालत आले आहे आणि पुढेही चालेल. कारण एकही मराठी संस्थळ बंद पडले तर शेवट तोटा मराठी आंतरजालाचाच होणार. तेव्हा स्पर्धा असेल तर ती निकोप असावी. जास्तीत जास्त नवे लोक आंतरजालावर कसे येतील याची असावी. मग तुमचा मिपावर लोभ असेल तर मिपावर जास्तीत जास्त उत्तम लिखाण कसे येईल याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे.

मिपावरील लिखाण कसे वाढवायचे याचा उपाय हवा असेल तर तुमच्या मित्रांपैकी कोण चांगले लिहू शकतात त्यांना मिपावर यायचे आणि लिहायचे निमंत्रण द्या. मात्र ते काहीतरी चांगले वाचनीय लिखाण असावे. एकोळी, दोनोळी, मदत पाहिजे छाप १०० धाग्यांपेक्षा आतिवास, जयंत कुलकर्णीं सारख्यांचा एक धागा मला वाचक म्हणून लाखमोलाचा आहे. चांगल्या लिखाणाला प्रतिसाद द्या हे तर तुम्हीच म्हणालात. चांगले लिखाण मिपावर येत राहिले तर मिपा नंबर एक का दोन हे मला महत्त्वाचे वाटत नाही. बादवे, मगाशी अलेक्सा रँकिंग पाहिली. मिपा पुन्हा एक नंबरावर दिसते आहे. :)

टवाळ कार्टा's picture

7 Sep 2016 - 8:09 pm | टवाळ कार्टा

खत्रा...अग्दी सहमत

अजया's picture

8 Sep 2016 - 11:26 am | अजया

मिपावरील लिखाण कसे वाढवायचे याचा उपाय हवा असेल तर तुमच्या मित्रांपैकी कोण चांगले लिहू शकतात त्यांना मिपावर यायचे आणि लिहायचे निमंत्रण द्या. मात्र ते काहीतरी चांगले वाचनीय लिखाण असावे.

अगदी सहमत.

शलभ's picture

7 Sep 2016 - 8:32 pm | शलभ

+११११...
सहमत

अभिजीत अवलिया's picture

7 Sep 2016 - 8:35 pm | अभिजीत अवलिया

सहमत. माझे तर असे मत आहे की काही एकोळी, दोनोळी, मदत पाहिजे छाप धागे उडवून टाकावेत येत्या काही दिवसात.

स्वच्छ मिपा अभियान ....

आणी इनडायरेक्ट मार्केटिंग करणारे "परिक्षणासाठी मदत हवी" छाप धागे पण उडवले पायजेत . काय मसाला नसतो त्यात..

संदीप डांगे's picture

7 Sep 2016 - 9:05 pm | संदीप डांगे

हजार टक्के सहमत! त्या धाग्यात "धोरणात बसत नसेल तर उडवा" असे स्पष्ट लिहिलेले काही लोक वाचतच नाहीत तेव्हा असे धागे पहिले उडवावे! ;)

जेपी's picture

7 Sep 2016 - 9:26 pm | जेपी

ज्जे बात.!
अजुन एका गोष्टीला सहमत व्हा.मिपाची धोरण लवचीक आहेत.सहानुभुती ठेवतात.

.
एखादा मिपाकरांची तुलना कु* शी करुन रामराम ठोकतो आणी पुन्हा येऊ शकतो.यातच मिपाच्या लवचीक धोरणाचा प्रत्यय येतो.

संदीप डांगे's picture

7 Sep 2016 - 9:40 pm | संदीप डांगे

परत एकदा सहमत नक्कीच, काही मिपाकरांचे धोरण व्यक्ती पाहून लवचिक किंवा कडक होते, हे सदस्यांना राजरोस कोल्हे, मतिमंद, इत्यादी काहीही म्हटल्यावर काही बोलले जात नाही हे बघितलं तेव्हा लाख टक्के पटलं!

आजचा सुविचार: चार दोन कुजलेल्या शेंगदाण्यांसाठी किलोभर उत्तम दाणे कचऱ्यात टाकावे असा मूर्खपणा करु नये!

संदीप डांगे's picture

7 Sep 2016 - 8:46 pm | संदीप डांगे

यात अधिक काय जोडावे? अर्थात बैलाचा डोळा प्रतिसाद!

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Sep 2016 - 11:20 am | डॉ सुहास म्हात्रे

+१००

एकुलता एक डॉन's picture

7 Sep 2016 - 8:04 pm | एकुलता एक डॉन

तिथे मायबोली प्रथम क्रमांकावर नसून एक ब्लॉग (9) आहे ,आणि मिपा 2 (11)वर आहे
कृपया मिपा एक क्रमांक दिसल्याचा स्क्रीनशॉट द्यावा

मी वरच्या माझ्या प्रतिसादात हेच सांगायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही लेखात दिलेला प्रतिसादाचा दुवा २५ जुलैचा आहे - जेव्हा मायबोली मिपाच्या पुढे होते. मधल्या काळात मिपा आहे तिथेच आहे (११) आणि मायबोली १० वरुन १३ वर गेले आहे. शिवाय, मला वाटते ती तुलना त्यांनी मराठी लेखनातल्या संकेतस्थळांची केली आहे. मराठी दैनिकांचे हिट्स फारच जास्त आहेत.

बाकी फक्त हिट्स वाढवायचे असतील तर ते फार सोपे काम आहे. दोन ओळींची एक स्क्रीप्ट फावल्या वेळात चालवली तरी खूप हिट्स वाढतात. तसे करायचे असेल तर येथे स्क्रीप्ट लिहून मिळेल ;)

पैसा's picture

8 Sep 2016 - 11:43 am | पैसा

हाहा! त्या लिस्टात सगळीच मराठी भाषिक संस्थळे आहेत. सर्कारी संस्थळ, पेपर्सची सगळीच सरमिसळ आहे. मराठीमाती हे मिपा किंवा मायबोलीसारखे इंटरॅक्टिव्ह संस्थळ आहे का? बघून तसे वाटले नाही. नुसता ब्लॉग असेल तर तो त्या कॅटेगरीत टाकता येणार नाही.

एकुलता एक डॉन's picture

20 Sep 2016 - 12:32 am | एकुलता एक डॉन

नुसता ब्लॉग पण पुढे जातो राव

पण इतके का नंबराच्या मागे लागलेत हे नवे डॉन साहेब?
जुने डॉनसाहेब वायले.

नंबर वाढवणे हेच पाहिजीए असेल तर Alexa टूलबार इन्स्टॉल करा नंबर आपोआप वर जाईल. हे ट्रॅफिक प्रकरण सॅम्पलिंग द्वारे मोजले जाते आणि त्यासाठी अलेक्सा टूलबार हे एक इनपुट आहे. १० मिपा करणी जरी टूलबार टाकला तरी ट्राफिक १००% सुद्धा वर जाऊ शकते.

चांदणे संदीप's picture

20 Sep 2016 - 6:51 am | चांदणे संदीप

.

श्रीरंग_जोशी's picture

20 Sep 2016 - 8:37 am | श्रीरंग_जोशी

पुढेमागे मिपा या रँकिंगमध्ये खाली गेलेच तर मिपावरचा ट्रोल्स व रिवर्स ट्रोल्सचा गोंधळ कमी होईल अशी शक्यता वाटते.

हे समजले नाही. रँकिंग खाली गेले तर ट्रोल्स कमी होतील की उलटे?

श्रीरंग_जोशी's picture

20 Sep 2016 - 11:29 pm | श्रीरंग_जोशी

तसे झाल्यास ट्रोल्स अन रिवर्स ट्रोल्स मिपाऐवजी अधिक रँक असणार्‍या संस्थळाकडे वळतील असा आडाखा आहे.

म्हणजे ते अलेक्सावरचं रँकिंग बघून मिपावर येतात असे गृहीत धरण्यासारखे आहे ;)
बाकी सध्याच्या रणधुमाळीतही मिपाचा नंबर ११ वरुन १२ वर घसरला. अलेक्साच्या अल्गोरिदममध्ये ट्रोल्स किती हेही धरत असतील काय? ;)

श्रीरंग_जोशी's picture

21 Sep 2016 - 10:14 pm | श्रीरंग_जोशी

सदर रँकिंग मध्ये खाली जाणे म्हणजे मिपावरची ट्रफिक कमी होऊन ती इतरत्र वळणे अध्याहृत आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Sep 2016 - 11:00 pm | अत्रुप्त आत्मा

असं होणार आहे.. तर ते सगळं!

बॅटमॅन's picture

21 Sep 2016 - 11:31 pm | बॅटमॅन

मिपाचं माहिती नाही पण या धाग्यावरची प्रतिसादसंख्या ९९ वरून १०० आणलीच पाहिजे.

मिपा पहिल्या नंबरवर गेल्यामुळे २०% डिस्काउंट देत होते. झालंच तर भाजीवाल्याने पाव किलो भाजी complementary दिली. कंपनी पण मिपा पहिल्या नंबरवर असल्यामुळे पगार वाढवणार आहे. झालंच तर बायकोही आजकाल वाद घालत नाही, कारण मिपा पहिल्या नंबरवर आहे!

एकुलता एक डॉन's picture

28 Sep 2016 - 8:27 pm | एकुलता एक डॉन

मिपा खूपच खाली गेले

श्रीरंग_जोशी's picture

29 Sep 2016 - 2:07 am | श्रीरंग_जोशी

जगात अशी कोणती गोष्ट आहे जी कायमच आघाडीवर राहू शकली आहे?

ही इष्टापत्ती ठरावी :-).

खटपट्या's picture

29 Sep 2016 - 2:59 am | खटपट्या

एकवेळ टॉपवर जाणे सोपे पण टॉपवर टीकून रहाणे खूप कठीण

म्हणून टॉपवर न गेलेलेच बरे का? ;)

बाकी इष्टापत्तीवरुन शॄंगापत्ती आठवली =)

संदीप डांगे's picture

29 Sep 2016 - 7:39 am | संदीप डांगे

मिपाच्या अलेक्सा रँकिंग वर डॉन रावांचा रक्तदाब वरखाली होतो काय?

एकुलता एक डॉन's picture

5 Mar 2019 - 12:42 am | एकुलता एक डॉन

वर

एकुलता एक डॉन's picture

5 Jun 2019 - 3:15 pm | एकुलता एक डॉन

जुना धागा

नावातकायआहे's picture

5 Jun 2019 - 3:49 pm | नावातकायआहे

सध्या ज्या "योग्यतेचे" धागे येत आहेत ते बघुन....
असोच

नावातकायआहे's picture

5 Jun 2019 - 3:53 pm | नावातकायआहे

सवारी....
ज्या बद्दल वर उल्लेख केला त्या धाग्याला पंख लावले आहेत.
सं मं आभार!

मिपा ला सर्वोत्कृष्ट बनवायचा आज आपण पण करूयात.

खुप छान विचार.

अभिनय पेक्षा झीरो फिगर हवी म्हणून पोष्टीक आहार वर्ज करून निकृष्ट आहार घेवून tb ची रोगी असावी अशी अभिनेत्री आणि मिसळपाव ह्यांची तुलना एकदम योग्य आहे
इथे लोकांचा कंपू आहे .
आणि तो मिसळपाव ची प्रगती रोखत आहे .
आपणच सर्व विद्येचे जाणकार आहोत आणि येणारे सर्व सभासद मूर्ख आणि अनाडी आहेत हे त्यांनी ठरवून टाकले आहे .
दारू असेल किंवा अमृत दोन्ही अस्तित्वात आहेत .
तसे विचाराचे सुधा आहे
प्रत्येकाचं विचार वेगळे असू शकतात आपण त्यांचे विचार बदलायचे असतात .इथे बदलायचे राहिले बाजूला जे वेगळे विचार व्यक्त करतात त्यांच्या व्याकरणातील चुका काढणे .
त्या व्यक्तीला मूर्ख ठरवणे ह्यातच मिसळपाव वर हक्क गाजवणारा ताकत वाया घालवत आहे आणि त्या बरोबर मिसळपाव ची ताकत सुद्धा कमी करत आहे

एकुलता एक डॉन's picture

18 May 2021 - 6:15 pm | एकुलता एक डॉन

बघा भो