Skip to main content

मिपा दुसऱ्या क्रमांकावरून प्रथम वर आणायचे कि नाही ?

लेखक एकुलता एक डॉन यांनी मंगळवार, 06/09/2016 18:17 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार बऱ्याच दिवसापासून धागा टाकायचा विचार होता पण प्रतिसाद मिळतील कि नाही शंका होती ,निदान आज मिपा च्या वर्धापन दिनाला तरी किती लोक" हिट" चिंतक आहेत ते बघू 23/05/2016 रोजी मी मिपा मराठीतील प्रथम क्रमांकाचे संकेत स्थळ http://www.misalpav.com/node/36133 म्हणून धागा टाकला होता 5000 वर वाचणे पण शेवटी कपिलमुनी http://www.misalpav.com/comment/reply/36133/861663 ह्यांनी सांगितले कि क्रमांक खाली गेला एकाने पण हळहळ किंवा प्रतिक्रिया दिली नाही निदान आजतरी एक होऊ या मिपा प्रथम क्रमांक वर आणायचे तर 1) दररोज निदान 2 वेळा तरी मिपा ला भेट द्या 2) browser ओपन ठेवा मिपा close नका करू 3) आपल्या मित्र मंडळीला मिपा चा दुवा द्या 4)दररोज लेख नाही तर प्रतिसाद तरी नोंदवा ,वाचणे आणि प्रतिसाद संख्या मध्ये खूप फरक दिसतोय आणि सर्वात मुख्य 5) जरा भांडणे कमी करू या

वाचने 58308
प्रतिक्रिया 113

प्रतिक्रिया

गेली ५ वर्षे मी मिपा वर आहे, जेवढा वेळ मी ऑन्लाइन असतो तेवढावेळ मिपा ओपन असत. माझ्या मते मिपा च एक नंबर आहे. डांगे साहेबांशी १०० % सहमत.

संपादकांनी संकुचित वृत्ती सोडून द्यावी. कक्षा रुंदावाव्यात. उगाचच्या उगाच धागे उखडू नये. हा धागा मायबोलीवर राहू शकतो तर मिपावर का उखडला जावा. मागासलेपणा सोडा...

असा प्रयोग करून बघावा लेखकाचे नाव न देता लेख छापावा . चार पाच दिवसानंतर नाव जाहीर करावे लेख आणि लेखकाला मिळणारे प्रतिसाद कसे असतील ते कळेल

हे आसं नंबरामागं लागला तर मिपाचं संध्यानंद होईल. आणि गर्दी करून करायचंय काय ? ऑनलाईन पेपरांच्या कमेंटा वाचा म्हणजे लोकांची बुद्धी कुठे राहीली ते कळेल. उगाच दंगा वाढला म्हणजे अभ्यासू लोकं लांब व्हायला लागतील. आपलं गरीबाचं मत.....

आता जरा सिरियस विचार. डॉनराव, संस्थळाचा एक आणि दोन नंबर काढायला ही काय स्प्रिंट रेस नाय. मायबोलीशी मिपाची स्पर्धा असं तुम्हाला वाटलं तरी मायबोली मराठी आंतरजालावर पायोनियर आहे. मायबोली कमर्शियल तत्त्वावर चालते तर मिपा हौशी लोकांच्या बळावर. तेव्हा दोन्हीची तुलना तशी करता येणार नाही. मायबोली या वर्षी २० वर्षे पूर्ण करत आहे. तर मिपाला ९ वर्षे झाली. एकूण मराठी बोलणार्‍या आणि वाचू शकणार्‍या लोकांचा विचार करायचा तर मराठी आंतरजालाला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. अजून कितीही संस्थ़ळे आली तरी प्रत्येक संस्थळाला इथे आपली जागा तयार करता येईल आणि सगळ्यानाच वाढायला भरपूर स्कोप आहे. वाचकाला जिथे जे वाचण्यालायक वाटेल, कम्फर्टेबल वाटेल तिथे तो रमतो. अशात मधेच एका संस्थळाच्या हिट्स जास्त असतात तर कधी दुसर्‍याच्या. पण म्हणून ते कायमस्वरूपी कधी होणार नाही. तुम्हाला वाटते तशी कट थ्रोट काँपिटिशनही मराठी आंतरजालावर असू नये असं मला वाटतं. एकमेकांशी सहकार्य करून अजून बरंच काही साध्य करता येईल. मिपा मालकांनी अन्य काही मराठी संस्थळांना तांत्रिक व अन्य मदतीचा हात देऊ केला/दिला होता. हे असे चालत आले आहे आणि पुढेही चालेल. कारण एकही मराठी संस्थळ बंद पडले तर शेवट तोटा मराठी आंतरजालाचाच होणार. तेव्हा स्पर्धा असेल तर ती निकोप असावी. जास्तीत जास्त नवे लोक आंतरजालावर कसे येतील याची असावी. मग तुमचा मिपावर लोभ असेल तर मिपावर जास्तीत जास्त उत्तम लिखाण कसे येईल याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. मिपावरील लिखाण कसे वाढवायचे याचा उपाय हवा असेल तर तुमच्या मित्रांपैकी कोण चांगले लिहू शकतात त्यांना मिपावर यायचे आणि लिहायचे निमंत्रण द्या. मात्र ते काहीतरी चांगले वाचनीय लिखाण असावे. एकोळी, दोनोळी, मदत पाहिजे छाप १०० धाग्यांपेक्षा आतिवास, जयंत कुलकर्णीं सारख्यांचा एक धागा मला वाचक म्हणून लाखमोलाचा आहे. चांगल्या लिखाणाला प्रतिसाद द्या हे तर तुम्हीच म्हणालात. चांगले लिखाण मिपावर येत राहिले तर मिपा नंबर एक का दोन हे मला महत्त्वाचे वाटत नाही. बादवे, मगाशी अलेक्सा रँकिंग पाहिली. मिपा पुन्हा एक नंबरावर दिसते आहे. :)

In reply to by टवाळ कार्टा

मिपावरील लिखाण कसे वाढवायचे याचा उपाय हवा असेल तर तुमच्या मित्रांपैकी कोण चांगले लिहू शकतात त्यांना मिपावर यायचे आणि लिहायचे निमंत्रण द्या. मात्र ते काहीतरी चांगले वाचनीय लिखाण असावे.
अगदी सहमत.

In reply to by पैसा

सहमत. माझे तर असे मत आहे की काही एकोळी, दोनोळी, मदत पाहिजे छाप धागे उडवून टाकावेत येत्या काही दिवसात. स्वच्छ मिपा अभियान ....

In reply to by अभिजीत अवलिया

आणी इनडायरेक्ट मार्केटिंग करणारे "परिक्षणासाठी मदत हवी" छाप धागे पण उडवले पायजेत . काय मसाला नसतो त्यात..

In reply to by जेपी

हजार टक्के सहमत! त्या धाग्यात "धोरणात बसत नसेल तर उडवा" असे स्पष्ट लिहिलेले काही लोक वाचतच नाहीत तेव्हा असे धागे पहिले उडवावे! ;)

In reply to by संदीप डांगे

ज्जे बात.! अजुन एका गोष्टीला सहमत व्हा.मिपाची धोरण लवचीक आहेत.सहानुभुती ठेवतात. . एखादा मिपाकरांची तुलना कु* शी करुन रामराम ठोकतो आणी पुन्हा येऊ शकतो.यातच मिपाच्या लवचीक धोरणाचा प्रत्यय येतो.

In reply to by जेपी

परत एकदा सहमत नक्कीच, काही मिपाकरांचे धोरण व्यक्ती पाहून लवचिक किंवा कडक होते, हे सदस्यांना राजरोस कोल्हे, मतिमंद, इत्यादी काहीही म्हटल्यावर काही बोलले जात नाही हे बघितलं तेव्हा लाख टक्के पटलं! आजचा सुविचार: चार दोन कुजलेल्या शेंगदाण्यांसाठी किलोभर उत्तम दाणे कचऱ्यात टाकावे असा मूर्खपणा करु नये!

In reply to by पैसा

+१००

तिथे मायबोली प्रथम क्रमांकावर नसून एक ब्लॉग (9) आहे ,आणि मिपा 2 (11)वर आहे कृपया मिपा एक क्रमांक दिसल्याचा स्क्रीनशॉट द्यावा

In reply to by एकुलता एक डॉन

मी वरच्या माझ्या प्रतिसादात हेच सांगायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही लेखात दिलेला प्रतिसादाचा दुवा २५ जुलैचा आहे - जेव्हा मायबोली मिपाच्या पुढे होते. मधल्या काळात मिपा आहे तिथेच आहे (११) आणि मायबोली १० वरुन १३ वर गेले आहे. शिवाय, मला वाटते ती तुलना त्यांनी मराठी लेखनातल्या संकेतस्थळांची केली आहे. मराठी दैनिकांचे हिट्स फारच जास्त आहेत. बाकी फक्त हिट्स वाढवायचे असतील तर ते फार सोपे काम आहे. दोन ओळींची एक स्क्रीप्ट फावल्या वेळात चालवली तरी खूप हिट्स वाढतात. तसे करायचे असेल तर येथे स्क्रीप्ट लिहून मिळेल ;)

In reply to by रुपी

हाहा! त्या लिस्टात सगळीच मराठी भाषिक संस्थळे आहेत. सर्कारी संस्थळ, पेपर्सची सगळीच सरमिसळ आहे. मराठीमाती हे मिपा किंवा मायबोलीसारखे इंटरॅक्टिव्ह संस्थळ आहे का? बघून तसे वाटले नाही. नुसता ब्लॉग असेल तर तो त्या कॅटेगरीत टाकता येणार नाही.

नंबर वाढवणे हेच पाहिजीए असेल तर Alexa टूलबार इन्स्टॉल करा नंबर आपोआप वर जाईल. हे ट्रॅफिक प्रकरण सॅम्पलिंग द्वारे मोजले जाते आणि त्यासाठी अलेक्सा टूलबार हे एक इनपुट आहे. १० मिपा करणी जरी टूलबार टाकला तरी ट्राफिक १००% सुद्धा वर जाऊ शकते.

पुढेमागे मिपा या रँकिंगमध्ये खाली गेलेच तर मिपावरचा ट्रोल्स व रिवर्स ट्रोल्सचा गोंधळ कमी होईल अशी शक्यता वाटते.

In reply to by रुपी

तसे झाल्यास ट्रोल्स अन रिवर्स ट्रोल्स मिपाऐवजी अधिक रँक असणार्‍या संस्थळाकडे वळतील असा आडाखा आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

म्हणजे ते अलेक्सावरचं रँकिंग बघून मिपावर येतात असे गृहीत धरण्यासारखे आहे ;) बाकी सध्याच्या रणधुमाळीतही मिपाचा नंबर ११ वरुन १२ वर घसरला. अलेक्साच्या अल्गोरिदममध्ये ट्रोल्स किती हेही धरत असतील काय? ;)

मिपाचं माहिती नाही पण या धाग्यावरची प्रतिसादसंख्या ९९ वरून १०० आणलीच पाहिजे.

मिपा पहिल्या नंबरवर गेल्यामुळे २०% डिस्काउंट देत होते. झालंच तर भाजीवाल्याने पाव किलो भाजी complementary दिली. कंपनी पण मिपा पहिल्या नंबरवर असल्यामुळे पगार वाढवणार आहे. झालंच तर बायकोही आजकाल वाद घालत नाही, कारण मिपा पहिल्या नंबरवर आहे!

In reply to by एकुलता एक डॉन

जगात अशी कोणती गोष्ट आहे जी कायमच आघाडीवर राहू शकली आहे? ही इष्टापत्ती ठरावी :-).

वर

अभिनय पेक्षा झीरो फिगर हवी म्हणून पोष्टीक आहार वर्ज करून निकृष्ट आहार घेवून tb ची रोगी असावी अशी अभिनेत्री आणि मिसळपाव ह्यांची तुलना एकदम योग्य आहे इथे लोकांचा कंपू आहे . आणि तो मिसळपाव ची प्रगती रोखत आहे . आपणच सर्व विद्येचे जाणकार आहोत आणि येणारे सर्व सभासद मूर्ख आणि अनाडी आहेत हे त्यांनी ठरवून टाकले आहे . दारू असेल किंवा अमृत दोन्ही अस्तित्वात आहेत . तसे विचाराचे सुधा आहे प्रत्येकाचं विचार वेगळे असू शकतात आपण त्यांचे विचार बदलायचे असतात .इथे बदलायचे राहिले बाजूला जे वेगळे विचार व्यक्त करतात त्यांच्या व्याकरणातील चुका काढणे . त्या व्यक्तीला मूर्ख ठरवणे ह्यातच मिसळपाव वर हक्क गाजवणारा ताकत वाया घालवत आहे आणि त्या बरोबर मिसळपाव ची ताकत सुद्धा कमी करत आहे