Skip to main content

शिका

लेखक स्वलिखित यांनी रविवार, 04/09/2016 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपा वर पहिल्यांदा काही शब्द अर्पण करत आहे .लेखनात व टंकनात चुका आहेत / असल्यास क्षमस्व. __/\__ आज शिकाने मनाशीच निर्धार केला होता. जर का आपल्याला उत्तर मिळालं तर शाबासकी मिळाल्या बिगर राहणार नाय असं शिकाला वाटत होतं. काय ना बाय कारणं दाखवून आज मुद्दाम बाकीच्या पोरांना त्याने मगाच गावात धाडलं होतं. उरली सुरली दोन जनावरं घेऊन गावाकडं आता निघाला होता. तसं म्हणलं तर आता कडुसच पडल होतं. पायाखालची वाटच काय ती दिसत होती तेवढी. नदी जवळ आल्यावर गाईच्या आणि म्हशीच्या कासर्याची एक गाठ मारुन तिथल्याच एका झाडाला अशी एक गावठी गाठ मारली की त्याच्या बिगर ती कुणालाच सुटु नये. पुन्यांदा चार कासरं माघारी चालत गेला आन वळन घेऊन जागेवर थांबला. आपल्याला कुणी पाहिलं तर नाहीना मागं पहिलं तसं तर वळण पार केल्यावर झुड्पानं आणि आंधारानं काहीच दिसत नव्हतं पण मनाची समजुत घालायची म्हणुन मागं वळुन बघितलं. आता पर्यंत त्याला कसलीच भिती वाटत नव्हती पण ईथुन पुढे त्याच्यातही ईतकी हिम्मत राहिली नव्हती. पण मनाच कुतुहल म्हणुन तो गेल्या महिन्याभरापसुन वाट बघत होता आणि काल सकाळ पासुन जणु संधीच मिळाली असं त्याला वाटत होतं. अंगातला सगळा जीव पायात आणला अन दोनच पावलं पुढं टाकली अण शिका मटकन खाली बसला नव्हे पडलाच. समोर बर्यापैकी पसरलेल्या रखेचा ढिग लागला होता. उजवा हात पुढे करून राखेत घातला तसे काही कोळसे हाताला लागले. तसे ते कोळसे थंड झाले होते पन राख गरम लागत होती. आता हाताला मऊ असं काहितरी वाटत होतं. तसं ते भलं मोठं मांडीचे हाड त्याच्या हाताला लागलं. आता मात्र त्याची हाल्फ चड्डी ओली होन्याची वेळ आली होती. पण नेमक होत काय हे पाहन्यासाठी त्याने ते हाड राखेतुन काढुन बाजुला ठेवले आणि आणखी त्या राखेत चाचपडु लागला. मनगटापासुन पुढचा हाताचा सापळा जसाच्या तसा जळालेला काळा पडलेला जसाच्या तसा हातात आला. "हा S S हा सगळा ईथेच आहे" म्हनतच त्याची चड्डी ओलि झाली आणि तो जिवाच्या आकांताने पळत सुटला तो थेट नदी पार केल्यावरच थांबला. गावच्या वेशिवरचा उजेड बघुनच तो थांबला. एव्हाना तो घामनेही ओलाचिंब झाला होता. हाताच्या अपुर्या बाहिने कपाळावरचा घाम पुसला अन काहितरी आठवल्या सारखे झाले. ताडकन डाव्या हाताने जोरात आपल्याच कानाखाली मारुन घेतली. ईतकासा जीव पन एखाद्या शहाण्या माणसाचा आव आनत होता. पुन्हा माघारी जाऊन नदीवर बांधलेली दोन दुभती जनावरे सोडुन माघारी आनायची होती. "भिती कुठपर्यंत हाय? त्या मसन वाट्यापर्यंत. मग नदी पाशी काय होतय" स्वतःलाच प्रश्न विचारुन स्वतःच उत्तरे देत हा अवालिया माघारी फिरला. तरीही मनात भिती होतीच. कारण जनावरे घरी नाही नेली तर खैर नव्हती. ईकडे तिकडे बघत डाव्या हाताने चड्डी सावरत नदी गाठली. एकदाची जनावरे सोडुन दिली आणि गावाकडे चालु लाग़ला. एवढ्याने मन भरेना म्हणुन जनावरे उधवळवली आणि मागे पळु लागला. एर्हवि शांत, गंभीर लहान लहान गोष्टीना घाबरनारा शिका आज इतका कसा धाडस करतो याचं त्याला स्वता:लाच नवल वाटत होतं. ही गोष्ट कोणालाही सांगयची नाही हे त्याने पहिलेच ठरवलेले .निम्म्या गावाला सुतक पडले होते. गाव सगळा शांत. जनावराना गोठ्यात बांधल्यावर एकदाचा जीव भांड्यात पडला. बाप नसलेला शिका हात पाय न धुताच जेवायला बसनार एवढ्यात आईनेच अंघोळीला पाणी दिले. रोज एकटा फिरणारा शिका, कधी घराच्या बाहेर निघत नाही यावेळेला आज कसा उशिर झाला याचं सगळ्यालाच नवल वाटत होतं. आज केलेली उठाठेव कुनाला कळलीच नाही म्हणुन शिका ही मनातल्या मनात खुश होता पन अंगात त्रान नव्हते तो ताटावरच डुलक्या घेऊ लागला म्हणुन आईने त्याला आधिच टाकलेल्या अंथरुनावर आजोबा शेजारी झोपवला. आज तो आजोबाची गोष्ट न ऐकताच झोपी लगला होता. आई जाताना कहितरी म्हनत होती.. " तात्यास उद्या पोराचा दुसरीचा निकाल हाय त त्याला पन लवकर उठवा... "
लेखनविषय:

वाचने 1610
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

कथा जरा अपुरीशी वाटली. किंवा मांडणी जरा वेगळ्या पद्धतीने हवी होती. पण प्रयत्न आवडला. अजून लिहा!

वरील लिखाणात गोष्ट शोधण्याचा प्रयत्न करतो आहे.