✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

पिंपरी चिंचवडची खाद्ययात्रा

प
प्रचेतस यांनी
Wed, 08/31/2016 - 16:43  ·  लेख
लेख
औरंग्याचे ठाणे खादाडी धागे पाहून पिंपरी चिंचवडमधील ठिकाणांसाठी पण धागा असावे असे वाटल्याने इथल्या काही ठिकाणांची भर टाकत आहे. पिंपरी चिंचवडचे मिपाकर अजून काही ठिकाणांबद्दल लिहितीलच. १. नाशिककर कॅन्टीन - एच ए कॉलनीत, ह्याचं फरसाण खूप जबरदस्त. वडापाव पूर्वी खूप छान होता पण हल्ली सोडा जास्त मारतो. सामोसा आणि त्याबरोबर देत असलेली खोबर्‍याची चटणी मात्र अत्युत्तम. गुलाबजामपण खूप उत्कृष्ट. सकाळी ८ ते संध्याकाळी ५.३० / ६ पर्यंत चालू असतं. २. करमरकर - चापेकर चौक, चिंचवड साबुदाणा खिचडी, कोथिंबीर वडी खूप छान, पोहे, उपमा, मिसळ वगैरे मिळतात. किंचित महागडं पण दर्जेदार ३. मयुर मिसळ - चिंचवड स्टेशन पिंचिंमधली सर्वात चांगली मिसळ इथेच खाल्लीय. बाकी चिंचवडगावात नेवाळे ( हा तिखटाचे डबेच्या डबे ओतत असावा रश्श्यात इतकी तिखट), लिंक रोडवर दे धक्का, पिंपरीगावात निसर्ग, अतिथी, जनता, दिप्ती असे मिसळीचे ठेले आहेत. ४. कुदळेची भेळ - पिंपरीगाव, नवमहाराष्ट्र शाळेच्या मागे. मटकी भेळेसाठी प्रसिद्ध. भेळेची ताटली अगदी भरगच्च देतो. त्यवार मटकी आणि लिंबाच्या रसात वाफवलेल्या हिरव्या मिरच्या. अफाट लागतात. ५. महादेव पॅटिसवाला - पिंपरी कॅम्प सकाळी ह्याच्याकडे खास सिंधी पक्वान मिळतं. दाल पकवान. आणि संध्याकाळी रगडा पॅटिस (सिंधी स्टाईलचं). दोन्ही वेळा भरपूर गर्दी असते. दालवडा, मिरचीवडा, भजी ह्या अजून काही खासियती. ६. गीता स्नॅक्स सेंटर - निगडी पावभाजी आणि कॉल्ड कॉफीसाठी फेमस ७. गणेश स्वीट मार्ट - पिंपरी कॅम्प. ह्याच्यासारखी रसमलई अगदी चितळे बंधू, काका हलवाईकडे देखील मिळत नाही. माफक गोड आणि चवीला प्रचंड सुंदर. ८. यशवंत स्वीट मार्ट - चिंचवडगाव गुलाबजाम, बाकरवडी आणि इतर पदार्थ. गुलाबजाम जवळपास नाशिककरसारख्याच चवीचे. ९. कलादीप स्वीट मार्ट - चिंचवडगाव. इथला ढोकळा खूप भारी आणि त्याच्याबरोबर मिळणारी पुदिन्याची चटणीपण खूप भारी. खूप लवकर संपतो ढोकळा इथला. हाटेलं वगैरे मुद्दामच दिलेली नाहीत, मिपाकर अजून भर घालतीलच.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
38590 वाचन

💬 प्रतिसाद (202)

प्रतिक्रिया

वरील ठिकाणे

नाखु
Wed, 08/31/2016 - 16:50 नवीन
नक्की कुठे आहेत? जवळची खूण दिल्यास बरे होईल अज्ञ नाखु
  • Log in or register to post comments

दुत्त दुत्त नाखुन चच्चा.

प्रचेतस
Wed, 08/31/2016 - 16:58 नवीन
दुत्त दुत्त नाखुन चच्चा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

दुत्त दुत्त प्रचेतसकाकाच.

अभ्या..
Wed, 08/31/2016 - 17:21 नवीन
दुत्त दुत्त प्रचेतसकाकाच. आम्ही आल्यावर कुठलेतरी क्लब स्टाइल हाटेल हुडकून पनिरवाले आयटेम खाऊ घालतो. तेव्हा असले काही आठवत नाही त्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

एकतर येतोस रात्री ८ च्या पुढे

प्रचेतस
Wed, 08/31/2016 - 17:23 नवीन
एकतर येतोस रात्री ८ च्या पुढे. ही ठिकाणं तोवर बंद झालेली असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हायला तुम्ही पुण्यात पण येता

महासंग्राम
Wed, 08/31/2016 - 17:24 नवीन
हायला तुम्ही पुण्यात पण येता अभ्या शेठ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ब्याट्या, धन्या वल्लया

अभ्या..
Wed, 08/31/2016 - 17:25 नवीन
ब्याट्या, धन्या वल्लया पशासाठी कायपण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

नेक्ष्ट टैम आले कि कळवा आम्ही

महासंग्राम
Wed, 08/31/2016 - 17:28 नवीन
नेक्ष्ट टैम आले कि कळवा आम्ही बी आपले दर्शनाभिलाषी हौत देवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अवश्य मंदारराव. भेटूच आपण.

अभ्या..
Wed, 08/31/2016 - 17:31 नवीन
अवश्य मंदारराव. भेटूच आपण. ह्या वल्ल्याला फाडायचेय स्ट्रीट ट्रीटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

आपला रम-यज्ञ सुद्धा ड्यु आहे

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 08/31/2016 - 20:38 नवीन
आपला रम-यज्ञ सुद्धा ड्यु आहे बे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बापुसाठी कवापन, कुठपन, कसापन.

अभ्या..
Wed, 08/31/2016 - 21:15 नवीन
बापुसाठी कवापन, कुठपन, कसापन. यज्ञ नव्हे तर पुरोहित महत्वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

माझं नाव घ्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/01/2016 - 20:51 नवीन
आमचंबी नाव घ्या, पुण्यात आलो की वल्लीची गाडी घेऊन ही सर्व ठिकाणं पालथी घालणं आलं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तोंडाला पाणी सुटलं ना राव

महासंग्राम
Wed, 08/31/2016 - 16:50 नवीन
तोंडाला पाणी सुटलं ना राव मटकी भेळ वाचून आमचा पॉईंट आहे तो .. आज येऊ का सांगा निसर्गची शाखा आता चौकात पण सुरु झालीये आणि प्रदीपचा सामोसा विसरला कि राव तुम्ही
  • Log in or register to post comments

उद्या जमवू. आज ८ पर्यंत

प्रचेतस
Wed, 08/31/2016 - 16:58 नवीन
उद्या जमवू. आज ८ पर्यंत हापिसातच :( प्रदिपचा सामोसा चांगलाच आहे पण नाशिकक्र उत्कृष्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

आमचा विकी* पॉईंट आहे तो

महासंग्राम
Wed, 08/31/2016 - 16:51 नवीन
आमचा विकी* पॉईंट आहे तो
  • Log in or register to post comments

व्वा!

कंजूस
Wed, 08/31/2016 - 16:54 नवीन
व्वा!
  • Log in or register to post comments

म्याप हवाच .गुगल नको.साधा रोड

कंजूस
Wed, 08/31/2016 - 16:57 नवीन
म्याप हवाच .गुगल नको.साधा रोड लाइन आणि रे स्टे ,बस डेपो ,मोरया गणपती ,शाळा मार्क करून
  • Log in or register to post comments

मटकी भेळ..

ब़जरबट्टू
Wed, 08/31/2016 - 17:08 नवीन
वडगाव गावालाच लागून (जुना मुंबई हायवे ) काही मटकी भेळची दुकाने आहेत. 2 माणसांना पण भरपेट होते. पींची वरून एक बाईक राईड काढून भटकंती करायला बेस्ट असते बघा.. :)
  • Log in or register to post comments

कुठेशी नेमके?

प्रचेतस
Wed, 08/31/2016 - 17:11 नवीन
कुठेशी नेमके? इष्टुर फाकड्याच्या समाधीजवळ का पंचमुखी हनुमानाजवळ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब़जरबट्टू

लागल्या हाती थोडं समोर जावून

महासंग्राम
Wed, 08/31/2016 - 17:13 नवीन
लागल्या हाती थोडं समोर जावून बेडसे लेणी पण होतील पाहून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अगदी अगदी. :)

प्रचेतस
Wed, 08/31/2016 - 17:15 नवीन
अगदी अगदी. :) किंवा तळेगावचं पांडवांचं मंदिर आणि झोपलेली द्रौपदी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

तुम्ही जे म्हणाल ते या बाबतीत

महासंग्राम
Wed, 08/31/2016 - 17:17 नवीन
तुम्ही जे म्हणाल ते या बाबतीत आमचा अभ्यास अगदीच कच्चा त्यामुळे तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बाब्बो !

ब़जरबट्टू
गुरुवार, 09/01/2016 - 09:08 नवीन
एव्हढा अभ्यास नाही राव. वडगावचा बोर्ड दिसला की आजू बाजूलाच आहे हायवेच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

प्रदीप स्वीट्स आणि अरिहंत भेळ!!!

जिन्गल बेल
Wed, 08/31/2016 - 17:22 नवीन
प्रदीप स्वीट्स आणि अरिहंत भेळ/मिसळ !!!
  • Log in or register to post comments

अरिहंत भेळ सांगली स्टाईलची

प्रचेतस
Wed, 08/31/2016 - 17:32 नवीन
अरिहंत भेळ सांगली स्टाईलची आहे. सौम्य असते पण एकदम क्रिस्पी आणि चवीला छान. तिथे इडली/डोश्याबरोबर जी खोबर्याची हिरवी चटणी मिळते ती लै भारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिन्गल बेल

अरिहंत भेळ... माझ्या मित्राचे

Mrunalini
Mon, 09/05/2016 - 14:15 नवीन
अरिहंत भेळ... माझ्या मित्राचे हॉटेल आहे ते. अमित भिलवडे. आम्हि दोघे हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्सला एकत्र होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिन्गल बेल

डी के ची भेळ , पाणीपुरी,

इल्यूमिनाटस
Wed, 08/31/2016 - 17:29 नवीन
डी के ची भेळ , पाणीपुरी, कच्छी दाबेली (गणपती मंदिरासमोर) चव फार विशेष नाही तरी लहानपणापासून तिथेच खातो!
  • Log in or register to post comments

भेळ आणि फरसाण भेळ चांगली असते

प्रचेतस
Wed, 08/31/2016 - 17:31 नवीन
भेळ आणि फरसाण भेळ चांगली असते. बाकी साधारण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इल्यूमिनाटस

१. प्रदीप स्वीट्स पण चांगले

मृत्युन्जय
Wed, 08/31/2016 - 17:49 नवीन
१. प्रदीप स्वीट्स पण चांगले आहे एकुणच सगळ्याच पदार्थांसाठी. २. भेळ चौकापासुन जवळ नॅचरल आइसक्रीम पाशी एक गाडीवाला असतो संध्याकाळी त्याच्याकडचे बदाम रबडी अगदी अप्रतिम. ३. पुर्वी वासुचा वडापाव (वरच्या गाडीच्या समोर) चांगला असायचा. आताचे माहिती नाही.
  • Log in or register to post comments

वासु वडापाववाल्याचे आता हॉटेल

रुपी
Wed, 08/31/2016 - 23:53 नवीन
वासु वडापाववाल्याचे आता हॉटेल आहे.. वडापावही मिळतो अजून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

लायनीनं देतो एक एक

गणामास्तर
Wed, 08/31/2016 - 17:50 नवीन
लायनीनं देतो एक एक 1) वडापाव - निगडी प्राधिकरणात 'वासू वडापाव'. कॅम्प एजुकेशन जवळ एक काका हातगाडी लावतात त्यांचा वडापाव पण भारी आहे. दिवसा फत्तेचंद शाळे बाहेर आणि रात्री चापेकर चौकात मिळणारा दत्त्या चा वडापाव. लिंक रोड ला डॉमिनोज शेजारी हातगाडी लावतो तो सुद्धा ट्राय करून पहा चांगला आहे. थरमॅक्स चौकातून चिखली कडे जाताना डाव्या हाताला 'काका वडापाव' पण मस्त. फरसाण आदी पदार्थांसाठी गांधी पेठेतील परदेशी ला तोड नाही. 2) साबुदाणा खिचडी,पोहे,उपमा, इडली चटणी साठी वल्ली नि सांगितल्याप्रमाणे चापेकर चौकातले करमरकर यांचे श्रद्धा स्नॅक सेंटर चांगले आहे. मोरया गोसावी मंदिराजवळ गपचूप वाड्यात सुद्धा हे सर्व अतिशय उत्तम चवीचे आणि वाजवी दरात मिळते. गपचूप कडे उपवासाची मिसळ सुद्धा लै भारी. बटाट्याचा चिवडा,उपासाचे पापड यावर साबुदाणा वडा कुस्करून दाण्याची आमटी घालतात. मस्त लागते. मोरया गोसावी मंदीरा समोरचं 'चिंतामणी' मध्य उपवासाचे थालीपीठ मिळते ते पण छान. क्रमशः
  • Log in or register to post comments

दत्त्याचा वडापाव झकास आहे.

प्रचेतस
Wed, 08/31/2016 - 18:00 नवीन
दत्त्याचा वडापाव झकास आहे. डॉमिनोज म्हणजे तुझ्या इथेच रे. चक्कर टाकतो हापिसातन येता येता. गपचुपाकडे अजून गेलोच नाही. उद्या गुरुवार. उपासाचे पदार्थ मिळतील. जाऊयात संध्याकाळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

दत्त्या कधी कधी खारट वडा पाव

इल्यूमिनाटस
Wed, 08/31/2016 - 18:19 नवीन
दत्त्या कधी कधी खारट वडा पाव देतो. कालच एक नवीन वडापाव वाला /वाली सापडला/ सापडली. मोरया हॉस्पिटल समोर, कमला कॉर्नर च्या चौकात चांगला होता वडापाव आकुर्डीच्या संभाजी चौकात चाचा चा बर्गर मिळतो , म्याक डी पेक्षा लै वेळा भारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आकुर्डीच्या संभाजी चौकात बर्गर

सत्याचे प्रयोग
Wed, 08/31/2016 - 19:18 नवीन
सहमत. बर्गर झकास चव असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इल्यूमिनाटस

दत्ताचा वडापाव

देवांग
Wed, 09/07/2016 - 11:30 नवीन
दत्ताचा वडापाव फक्त फत्तेचंद शाळेजवळ मिळतो. गेल्या महिन्यात दत्ता वारला. चापेकरचौकात मिळतो तो त्याच्या भावाचा गिरधारीचा वडापाव. सध्या त्याचा मुलगा रुपेश गाडी चालवतो. फक्त 6 ते 9. 1000 वडापाव विकत असावा ... त्याच्याकडे थंड वडापाव देवालासुद्धा मिळणार नाही. वडापाव एकच नंबर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इल्यूमिनाटस

मुंबई मासोळी

कपिलमुनी
Wed, 08/31/2016 - 18:09 नवीन
मस्त्यप्रेमींसाठी इथे छान थाळी मिळते पत्ता : डी वाय पाटील आकुर्डी कडून रावेत कडे येणार्‍या रस्त्याला डाव्या बाजूस . बांगडा थाळी १५० , सुरमई : २०० असे रेट आहेत , तांदळाची गरम भाकरी , सुकटाची किंवा सोड्याची चटणी , रस्सा आणि रवा फ्राय असा बेत असतो . ( सोलकढी आवडली नाही)
  • Log in or register to post comments

गांधी पेठेतील बालाजी मिसळ,

संपत
Wed, 08/31/2016 - 18:10 नवीन
गांधी पेठेतील बालाजी मिसळ, मोरया गोसावी जवळची कवी मिसळ पण छान. आजकाल कवी मिसळ जरा तिखट झाली आहे.. आणि आपल्याला नेवाळे मिसळ देखील आवडते बुवा. लिंक रोड वरचा डोमिनोस जवळचा वडापाव देखील छान रोज् वूड शाकाहारी जेवणं चांगले चिंचवड मधून आल्यापासून चावडीत अनेकदा गेलो. तेही ठीक.. बाजूचे वाटिका हि आवडते लिंक रोड वरचे कालिका मातेच्या देवळाजवळ साफारोन.. दोनदा गेलो.. दोन्हीवेळा खुप छान पंजाबी जेवण जवळपास विसरलो होतो.. तंदुरी पदार्थ आणि बिर्याणी साठी सर्वात आवडते आणि सवयीचे चापेकर चौकातले KGN.
  • Log in or register to post comments

बालाजी मिसळ म्हणजेच कवी मिसळ.

प्रचेतस
Wed, 08/31/2016 - 19:36 नवीन
बालाजी मिसळ म्हणजेच कवी मिसळ. मिसळीपेक्षा त्याचं वडा श्याम्पल भारी लागतं. गांधी पेठेत आहे ती नेवाळे. त्याच्याकडची बटाटा भजी आणि लाल तिखटाची चटणी मस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत

सॉरी नेवाळे मिसळ गल्लीबाहेर

संपत
Sat, 09/03/2016 - 23:10 नवीन
सॉरी नेवाळे मिसळ गल्लीबाहेर एक हॉटेल आहे. बहुधा काळुराम ची मिसळ म्हणतात. मला ती मिसळ गांधी पेठेतली म्हणायची होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

शशीची मिसळ

देवांग
Wed, 09/07/2016 - 11:34 नवीन
नेवाळेच्या बाहेर मशिदीच्या बाजूला शशीची मिसळ मिळते. मस्त असते. माझी फेव्हरेट.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत

शशीची खाल्ली नाही. वीकांती

प्रचेतस
Wed, 09/07/2016 - 11:37 नवीन
शशीची खाल्ली नाही. वीकांती जाईन तिथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवांग

शशी का विनायक

नाखु
Wed, 09/07/2016 - 12:42 नवीन
कारण तोच मनुक्ष्य भजी-पाव पॅटीसचा गाडा लावतो तिथेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

वाचनखुण

प्रशांत
Wed, 08/31/2016 - 18:19 नवीन
वाचनखुण साठवण्यात आली.
  • Log in or register to post comments

हे असं नुसतं तोंडाला शाब्दीक

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/31/2016 - 18:29 नवीन
हे असं नुसतं तोंडाला शाब्दीक पाने पुसू नका. पिंचीमध्ये एक झक्कास कट्टा आयोजित करा आणि लेखात सगळं खर्र खर्र लिहीलं आहे हे सिद्ध करा. :)
  • Log in or register to post comments

ह्ये परफेक्ट एक्काकाका.

अभ्या..
Wed, 08/31/2016 - 18:31 नवीन
ह्ये परफेक्ट एक्काकाका. वल्ल्या नुसता बोलबच्चन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

पिंचीमध्ये कट्टा

कपिलमुनी
Wed, 08/31/2016 - 19:27 नवीन
कधी करायचा सांगा ! पिंचीवाले पुणेकरांसारखे टांगारू नाहीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अगदी अगदी.

प्रचेतस
Wed, 08/31/2016 - 19:32 नवीन
अगदी अगदी. आणि ठाणे डोंबोलीकरांसारखे जाहिरातबाजही नाहित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

एक तारीख ठरवून धागा टाका

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 08/31/2016 - 20:35 नवीन
एक तारीख ठरवून धागा टाका लगोलग !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

लवकरच तारीख ठरवून धागा काढतो.

प्रचेतस
Wed, 08/31/2016 - 22:41 नवीन
लवकरच तारीख ठरवून धागा काढतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

धाग्याच्या

अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 09/01/2016 - 10:23 नवीन
प्रतिक्षेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ठाणे डोंबोलीकरांसारखे जाहिरातबाजही नाहित....

मुक्त विहारि
Wed, 08/31/2016 - 20:46 नवीन
ते पुणेकर आणि पिंचिकरच येणार-येणार म्हणून जाहीरात बाजी करतात आणि येत नाहीत. अंबरनाथचा महादेव साक्षीला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा